anamak bhati books and stories free download online pdf in Marathi

अनामिक भिती



अनामिक भिती

                 कॉलेजला सुट्टया लागल्यामुळे साहेबराव आज लयचं आनंदात होता. केव्हा एकदा घरी जाऊन आपल्या बालमिञांना भेटतो असे त्याला  झाले होते. तो काळ  १९८० चा होता. शिक्षणाचे प्रमाण अगदी तुरळकच. गावात जेवढी शाळा तेवढंच मुलानं शिकावं हा पायंडाचं पडलेला. त्यावेळी आजूबाजूला जळपासच्या मोठ्या शहरातही महाविद्यालये नव्हते. साहेबरावच्या मनात शिकण्याचीे ऊर्मी होती. घरची परिस्थिती जरा बरी असल्यामुळे त्याने थेट औरंगाबाद गाठले. तेथिल मिलिंद महाविद्यालयात बी.ए.ला प्रवेश घेतला . दिवाळीची सुट्टी संपल्यानंतर सहा महिन्यापासून तो औरंगाबादला आला होता त्यामुळे  भूमराळा या जन्मगावी जायची ओढ त्याच्या मनात निर्माण झाली होती.
                 पेपर संपले त्याच दिवशी सामानाची आवरासावर करुन दुपारच्या  चार वाजताच्या मेहकर गाडीने साहेबराव गावाकडे निघाला. गाडी आपल्या वेगाने एक गाव ओलांडून दुसरे गाव जवळ करीत होती.परंतु विचाराविचारात साहेबरावचे मन गाडी पोहोचायच्या आत गावात पोहोचलं होतं.आपल्या मिञांबरोबर नदीनाले,डोंगर,शेत सर्वञ मनमुराद आनंद घेत हिंडत आहे.या व यासारख्या विचारत रममान होऊन त्याला केव्हा झोप लागली हे कळलेही नाही. कनडॉक्टरने" बिबी आली. चला बिबीवाले उतरा लवकर. कोणी राहीले का उतरायचे?"ही आरोळी दिली तेव्हा साहेबराव खडबडून जागा झाला.आपल्या सामानाची थैली घेऊन तो खाली उतरला. एव्हाना गाडीतील सर्व प्रवाशी खाली उतरले होते.त्यामुळे गाडी लगेच निघून गेली. 
               साहेबराव बिबीत उतरला तेव्हा जवळपास आठ वाजले होते.आता आपल्याला किनगावपर्यत जाण्यासाठी एखादे वाहन लागले तर आपली पायपीट तेवढीच कमी होईल म्हणून या गाडीजवळून तो त्या गाडीजवळ विचारत फिरु लागला. तेव्हा एक  कमांडर गाडी त्यामध्ये दोनतीन प्रवाशी व ड्रायव्हर.अजून काही प्रवाशी येतात का याची वाट पाहत थांबले होते. त्यात साहेबरावचीही भर पडली. त्यावेळी प्रवाशांची खाजगी वाहतूक करण्यासाठी कमांडर गाड्यांचाच वापर होत होता.ग्रामीण भागात याच गाडीचा सर्वञ बिनधोक वावर होता.गाडीत आतमध्ये कमी प्रवाशी व बाहेर लटकलेले जास्त त्यामुळे गाडी कोणती हेही दिसतं नव्हतं. त्याप्रमाणात गाडीत थोडेफार का होईना प्रवाशी मिळतील या आशेने ड्रायव्हर सर्व प्रवाशांना वेठीस धरुन थांबला होता.दुसरी कोणतीही गाडी नसल्यामुळे प्रवाशांना  थांबल्याशिवाय गंत्यंतर नव्हतं. साहेबरावने गाडीतील प्रवाशांना कोणी भुमराळा येणारा आहे म्हणून विचारपूस केली.परंतु कोणीही भुमराळा जाणारे नव्हते.त्यामुळे किनगाव ते भुमराळा हा पायी प्रवास एकट्यायालाच करावा लागणार आणि तोही राञी या विचाराने जरा मनात कालवाकालव झाली. अजून दोनचार प्रवाशी गाडीत येऊन बसले व गाडी धकली.तेव्हा साडेनऊ वाजले होते. गाडी रस्त्याला लागली होती. खड्डे ,दगडगीट्टी यामध्ये आदळआपट करीत गाडी तासभरानंतर किनगावला पोहचली.त्यातील एक प्रवाशी साहेबरावचा बाप पर्वतरावच्या ओळखीचा होता. पर्वतराव हा गावचा सावकार माणूस त्यामुळे आजूबाजूच्या पंचक्रोशीत त्यांचा वावर होता. अंगात तिन गुंड्याचं शर्ट,पांढरशुभ्र धोतर,पायात पायतान,चेहरा उंच व त्यावरील धारदार, रुबाबदार मिशा,सरळ नाक,मोठाले काळेभोर डोळे, डोक्यावर जरीचा पटका,हा संपूर्ण रुबाबदार देहाला शोभेल असा उंच असा अबलक घोडा. यामुळे एकदा पाहणारा त्यांना क्षणात पर्वतरावच आहे.म्हणून ओळखत असे.त्यामुळे किनगावातील तो माणूस " साहेबराव एवढ्या भयाण राती तू एकटं जाऊ नगंस मह्या घरी थांब रातभर ? "म्हणून विनवू लागला. परंतु साहेबराव त्याला म्हणाला."आत्ता तासभरात घरी जातो.आपला नेहमीचाच रस्ता त्यामुळे दिवस काय आणि राञ काय सारखंच !" याचं वाटेने साहेबरावने किनगावला अनेक वर्षे पायी येजा केली होती.कारणं गावात चवथा वर्ग पास होऊन पाचवी ते दहावी तो किनगावलाचं शिकायला  होता. हजारो वेळा या वाटेने जाणेयेणे झाल्यामुळे कसलीच भिती त्याला  नव्हती. त्यातच साहेबराव एक पैलवान माणूस. अंगाने व मनाने त्याचे शरीर राकट झालेलं होतं. अंगावर चार माणसं आली तरी चारीमुंढ्या चीत करण्याची शक्ती.'लाथ मारीन तेथे पाणी काढीन'ही हिंमत. अंधाराला न जुमानता त्याने आपली थैली बगलात मारुन त्या ओळखीच्या माणसाचा निरोप घेऊन निघाला.
                 राञीचे अकरा वाजले होते. वेळेची पर्वा न करता गाव जवळं करायचं हा हेतू मनातं ठेवून साहेबराव झपझप पावले टाकीत  निघाला होता.उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे  सर्वञ ओसाड झालेलं होतं. जंगल तेवढ घनदाट . या जंगलातून डोंगरमाथ्याची वाट.  पिक काढून वावरं नांगरणी होऊन पडले होते.तर काही वावरातून नांगर हाकण्याच्या जोरात आरोळ्या येत होत्या.त्या काळी ट्रंक्टर नव्हताच.  संपूर्ण शेती बैलाच्या भरवसावरच असायची. दिवसराञ शेतकरी  बैलाकडून कामे करुन शेतीची मशागत करीत असत. उन्हाळ्यात जेवणं झाल्यानंतर झोपेची वेळ होईपर्यत नांगरणी चाले. त्यानंतर शेतकरी शेतातच  झोपत असे.अमावस्या दोनतीन दिवसावर आली असेल 

इतर रसदार पर्याय