anamak bhati bhag 2 books and stories free download online pdf in Marathi

अनामिक भिती भाग २

 झोपत असे.अमावस्या दोनतीन दिवसावर आली असेल त्यामुळे नुकताच चंद्राचा प्रकाश त्या अंधाऱ्या राञीला चिरुन बाहेर येत  होता.कोल्ह्याची कुईssकुई ऐकू येई,तर कोठे वटवाघूळीची चिंगारी, कोठे मोराचे किंचाळणे,तर कोठे घुबडीचे ओरडणे. यामुळे राञीच्या अंधाराला अधिकच भयाणता प्राप्त होत होती.
               साहेबराव किनगावहून सावरगाव जवळच्या लोणार  नदीपाञात आला.नदीत सर्वञ दाट झाडी व त्यात रातकिडे किssर करीत होते. नदीच्या पाण्याचा  खळंखळाट ऐकू येत होता.पाण्याजवळ जाताच त्याने तोंडावर पाणी मारले व पोटभरून पाणी पिले.यामुळे  त्याला हुशारी आली. एवढ्या भयाण राञी सोबत होती ती फक्त पाऊलवाट. तिच्यावर भरवसा ठेऊन, ती जिकडे जाईल तिकडे साहेबराव चालतं जात होता. काही ओळखीच्या खुणा जसे.मोठं झाड, मोठं वळण दिसल्या कि आपण आपल्या वाटेने बरोबर जात आहोत असे त्याला वाटे. एकटा माणूस, एवढ्या भयाण राञी, स्मशान शांततेत, जंगलातून पायवाटेने एकटाच चालंलाय आणि त्याच्या मनातं कसलीही भिती वाटतं नाही असं होऊच शकतं नाही. साहेबरावच्या मनातही या अनामिक भितीने घरं केलेलं होतं. जेव्हा किनगावहून त्यांच्यासोबत कोणीही नव्हतं तेव्हाच . परंतु त्याने ते न दाखविता मनाचा हिय्या करुन निघाला होता.
              अनेक लोकांच्या तोंडून चकवा,भूत,चांडाळ यांच्याविषयीच्या कथा ऐकल्या होत्या . पण सुज्ञ साहेबराव त्या सगळ्या खोट्या मानणारा.आता तर आंबेडकरी विचाराने तो भारून गेला होता. कधीही कोणत्याही  अंधश्रध्देला  बळी तर पडलाचं नाही व इतरांनाही त्यापासून परावृत्त करीत असे. मनात फक्त चोरांची, जनावराची, इच्चूसापाची भिती. त्यांनाही दोन हात करण्याची हिंमत. त्यामुळेच तर एवढ्या भयाण राञी तो एकटाच गाव जवळ करीत होता. तो आता ओसाड माळावर आला . तेथून गावातील मिणमिणत्या दिव्यांचा प्रकाश दिसू लागला. त्याच्या जिवात जीव आला. आता काय फक्त हा माळ उतरुन खाली कोसभर चालतं गेलं की घरी पोहोचणार होता. त्याच्या अंगात हत्तीच बळ, पायात घोड्याची चाल, हरणीची चपळता आली.
               डोंगरमाथ्याची पायवाट संपून तो खाली उतरू लागला. खाली पायथ्याशीच वडाचं भलमोठं झाडं गेल्या कित्येक वर्षापासून दिमाखात उभं होतं. तेथे अनेक वाईट घटना घडल्यामुळे ते झाडचं बदनाम झालं होतं. या घटनांची उजळणी साहेबरावच्या मनात हे झाड दिसताच झाली. या विचाराविचारात तो झाडाखाली केव्हा आला हे त्यालाही कळाले नाही. झाडाखाली अंधार दाटून आला होता. चंद्राचा उजेडाचा मागमूसही तेथे नव्हता. त्यामुळे त्या झाडाखालील रस्ताही दिसत नव्हता. तो चाचपडतच रस्ता शोधीत साहेबराव निघाला. तेवढ्यातच त्याची धडक एका कुबड्या म्हाताऱ्या बाईशी झाली. या धडकेने ती म्हातारी खाली पडली व किंचाळू लागली. तिला वाटले आता मला भूताने धरले. म्हणून ती जिवाचा आकांत करीत "वाचवाsssरे,वाचवाsssरे "म्हणून ओरडू लागली. साहेबराव  पैलवान गडी भिती काय असते हे त्याला माहीतच नव्हते.पण आता माञ त्याचे सर्वांग घामाने फतफत भिजले होते. दगडाच्या काळजाचा माणूस पण त्याच्याही काळजाने पाणी सोडले. आता खूपच मोठ काहीतरी घडतं आहे असं वाटून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली.   उसने आवसान आणून त्याने त्या अंधारात पडलेल्या स्ञीला जोराने दरडावून विचारले ,'अरं क...क..क.. कोण हाये रे तू ?' माणसाचा आवाज ऐकून म्हातारीच्याही जरा जिवातं जीव आला."म्या ...म्या..म्या. सखू कुंभारीण, सांजपासून महा एक बईल कुठी गेलाय काय बी ठावं नाय. कोणी म्हणतंय हिकडं पायलाय कोणी म्हणतंय तिकडं पायलाय. हुडकू-हूडकू म्हवा जीव मेटाकूटीला आलाय पण त्यो बईल काही अजून गावला न्हायं."म्हतारी खूपच थकली होती.त्यामुळे तिला बोलताबोलता मधात धाप लागे.'आरं मही विचारपूस करणारा तू कोण हायं रं ?' ' तुलं दिसला का महा बईल कुठं !' साहेबरावच्या जीवात जीव आला.ही बाई आपल्या गावातीलच आहे आणि आपण उगाचचं भीलो .अस त्याला मनातल्या मनातच वाटलं. "त्याला थोडी हुशारी आल्यामुळे तो आवाज चढून म्हणाला "मी पर्वता बुध्दाचा लेक हाये.औरंगाबादला शिकायला हाय.गाडीला यायला उशीर झाला.म्हणून ही वेळ झाली." ' मी तर सगळ्या माळाला पालथा घालून आलोय पण तुहा बैल माञ कोठेही दिसला नाही.'अयं म्हातारे आता चाल घरी लयं रात झालीय.तुहा बैल कुठं जाणार हाये येईल सकाळी घरी. न्हाय रे बाप्पा, महा बुढा मले जिंदा ठेवणार न्हाय. तुबी थोडं हूडकू लागं की मला ? साहेबराव म्हणाला नाही म्हतारे तू हिंड रातभर बैल बैल करीत जंगल.मह्या घरचे वाट पाहत असतील मी जातो.असे म्हणून साहेबराव तडक घरी निघाला. लांबूनच कुञ्याला चाहूल लागल्यामुळे ते  जोरजोराने भूंकू लागले.त्याच्या भूंकण्याने सर्वांना जागे केले. साहेबराव जवळ येताच त्याचा आवाज आपोआपच बंद झाला. पर्वतराव दरडावणीच्या सूरात म्हणाले.'कारे सायबा ही का येळ हाय येयाची.रातच्याला भ्या वाटतं चोराचीलटाच ,भूताखेताचं. जाय जेउन घे नि झोप.'बापापुढे साहेबरा
व काही एक बोलला नाही.कारण एवढ्या राञी येऊन त्याने मोठी चूक केली होती.

इतर रसदार पर्याय