Bhuk ek katha books and stories free download online pdf in Marathi

भूक एक कथा

                              "भूक"
"ही कथा काल्पनिक नसून लेखकाच्या भूतकाळात घडलेली घटना असून , ही घटना साधारण पने सण 1994 दरम्यानची गोष्ट असून तिचे या एका कथेच्या स्वरूपात वर्णन करण्यात आले आहे ,
भूक माणसाला काय काय करायला लावते आणि माणूस ह्या परिस्तिथी मधून गेल्यावर काय उपाय करू  शकतो.
यामध्ये एक साधारण 30 वर्षांची महिला की जिचे नाव लक्ष्मी असून तिला  दोन मुले आहेत, अतुल आणि सुरज लक्ष्मी घराच्या उपजीविकेसाठी काही तरी काम करून घर चालवायचे आहे ह्या उद्देशाने ती गोधडी शिवण्याचे काम करत असते,
लक्ष्मी आपल्या घरात गोधडी शिवत असते
शिवत असताना लक्ष्मी मुलांना आवाज देते ,
तशी दोन्ही मुले धावत घरात येतात अतुल(दादा) आणि सुरज ही दोन भावंडे आपल्या आई समोर येऊन थांबतात तेव्हा लक्ष्मी त्या दोघांना कडे पाहून  म्हणते घराकडे लक्ष द्या , आजून दोन गोधड्या शिवायच्या आहेत कालच तांबे गुरुजी ची बायको आली होती घरी आणि म्हटली दुपारच्या पारी ये मळ्यात आणि गोधडी शिवायची कापड घेऊन जा तेव्हा मी आता थोड्या वेळाने जाणार आहे घराकडे लक्ष द्या कुठं जाऊ नका,
तेव्हा सुरज म्हणजे लहान मुलगा म्हणतो आई लय भूक लागली आहे काही तरी खायला देना...!
काल सकाळी खाल्लं आहे आता लय भूक लागली आहे  ग आई काही तरी देना ग आई....
लक्ष्मी म्हणते घरात काल पर्यंत दोन मूठ फक्त हुलगे होते त्यातले एक मूठभर काल सकाळी कडन केले, आणि आता उरलेले एक मूठभर रात्री करावे लागेल
तुमचे वडील गेल्यात त्यांच्या मित्राकडे आणतील काहीतरी ,
सुरज म्हणतो पण बाबा काल गेल्यात आजून का नाही आले येतील रे बाळांनो लांब गेलेत 3 दिवस लागतील म्हटले होते , येतील काही भेटले नसेल म्हणून नसतील आले घेऊनच येतो म्हटलेत येतील नाहीतर उसने पैसे आणतील हाताला काम नाही काय करतील तरी ते,
रिकाम्या हातांनी कसे जायचे म्हणून आले नसतील ते ,
मी करते रात्री आज कडन पण आता जाते मी मळ्यात तेव्हा तिकडून खायला जे मिळेल आपल्याला घेऊन येते .
तेव्हा दोघेही होकार म्हणून आपली डोकी हलवतात,
व एकमेकांकडे पाहतात गालातल्या गालात हसतात. तेव्हा लक्ष्मी दोघांच्या पण डोक्यावरून हात फिरवते आणि आपल्या डोक्यावर दोन्ही हातानी बोटे मोडते आणि बोलते पोर माझी लय गुणांची आहेत तशी, बोलता बोलता बोटे मोडते आणि हसते व दोघांची पप्पी घेते व आपल्या हातातील गोधडीची घडी घालते व दोघांना घरातच बसा असं म्हणत हातात एक रिकामी गोणी घेते व तिची घडी घालते व हातात घेऊन निघते,
जशी आई घराच्या बाहेर निघून जाते व दोघे पण अंदाज घेतात की आई आता लांम्ब गेली आहे ,
असं बघून दोघेपण घराच्या बाहेर येतात
रविवारची शाळेला सुट्टी असते ,
सुट्टी म्हटल्या नन्तर लहान मुलानं खेळण्याचा दिवस पण सुरज आणि अतुल ह्यांना खेळ खेळावे म्हणून जी ताकत हवी असते ती आपल्याला मिळणाऱ्या रोजच्या अन्नातून मिळत असते तेव्हा सुरज आणि अतुल कुठला खेळ खेळावा असे वाटत नव्हते, तर त्यांना वाटत होते की आज आपल्याला जेवण मिळेल कि नाही आणि मिळाले तर कधी आणि किती भेटेल आई वडील हि भुकेलेले आणि तेही इतरत्र कामासाठी गेलेले अश्या अवस्थे मध्ये कुठला खेळ खेळावा असे वाटेल कारण पोटात अन्न जाऊन त्याला 24 तास उलटून गेली असतात तेव्हा हि दोघे भावंडे कुठून तरी काही तरी खाण्यास मिळावे ह्या आश्येवर होती,
ह्यांचे घर तसे गावाच्या चौकात होते,
आणि काही काळाच्या अंतराने एक टेम्पो लग्नाच्या व्हरडाने  भरलेला येताना दिसतो दोघेही भाऊ त्या टेम्पोकडे बघत होती,
तेव्हा लहान भाऊ म्हणजे सुरज हा अतुल ला म्हणाला दादा हा टेम्पो इथं थंम्बला असता तर आपण दोघे पण बसून गेलो असतो आणि लग्नात खूप जेवलो असतो हे सर्व मोठा भाऊ त्याचे एकूण घेतो आणि त्याला म्हणतो असं कसं शक्य आहे, आणि अतुल सुरजला म्हणतो चल आपण घरात बसून काही तरी खेळू तेव्हा चल तू घरात मी आलोच असे म्हणून अतुल हळूच त्या टेम्पोच्या दिशेने निघून जातो सुरज घरामध्ये जाऊन बसतो.
अतुल रस्त्याने पळत निघतो टेम्पोच्या दिशेने त्याला कल्पना असते की गावातीलच कुठल्या तरी वस्तीवर लग्न आहे पण ते कुठे आहे ते माहित नसते आणि सकाळ पासून अतुल हा चौकात व्हरडाच्या गाडीची च वाट पहात असतो,
टेम्पोच्या दिशेने आपली छोट्या पायांनी मार्ग काढत पळत असतो थोडे पुढं गेल्यावर कच्या रस्त्याने धुराळा उडत असलेला दिसतो आणि अतुल आपल्या मनात अंदाज बांधत पक्का रास्ता सोडून त्या कच्या रस्त्याने टेम्पोच्या माग काढत टेम्पोच्या चाकाचा वणं पहात पहात पळत असतो आणि त्याला माहित असते की लग्ना पर्यंत पोहचण्यास वेळ लागणार आहे कारण मी अजून लहान आहे,
फक्त देवाला मनातून फक्त एक इच्छा सांगत असतो की देवा मी पोहचे पर्यंत जेवणाची पंगत संपू देऊ नको,
अगदी लग्नाच्या मंडपापर्यंत पोहचतो तेव्हा त्याच्या कानावर लाऊड स्पीकर वरचा आवाज येतो ,
जे कोणी पाहुणे मंडळी जेवणाचे राहिले असतील त्यांनी जेवून घ्यावे हि शेवटची पंगत असेल,
हे ऐकताच अतुलला खूप आनंद होतो ,
तो पंगतीच्या शेवटला जाऊन बसतो आपला चेहऱ्यावरील घाम शर्टाणेच पुसतो आणि पंतरवळी भेटते वाडेकरी येतात त्यामध्ये सुरुवातीला सर्वांना रवा वाढतात अतुल ला हि रवा वाढला जातो,
अतुल सर्वांची नजर चुकवून रवा आपल्या चड्डीच्या खिशात भरतो वरण भात न घेता फक्त रवा वाढा असे म्हणतो तो खात नसतो फक्त सर्वांची नजर चुकवून आपले दोन्ही खिसे रव्याने भरतो,
जसा त्याला अंदाज येतो की आपले दोन्ही खिसे आता भरले आहेत तेव्हा त्याला खूप आनंद होतो व हळूच तेथून निघतो घराच्या दिशेने,
अतुलला त्यावेळेस शाळेतील शिक्षकांनी शिकवलेली एक म्हण आठवते,
आनंद गगनात मावेना इतका आनंद असतो पण खरी गंमत तो मनात म्हणत असतो की रवा खिश्यात मावेना असं स्वतःच आपल्या मनाशी बोलत चालत असतो कारण आता पळण्याची ताकत त्याच्या मध्ये राहिलेली नसते रस्त्याने जाताना,
वाटेत एक ओढा होता त्यात त्याला छोटे छोटे मासे दिसतात  त्यांना तो आपल्या खिशातील थोड़ा रवा  टाकतों व माश्यांना तो रवा खाताना पाहून त्याला खूप आनंद होतो मनातल्या मनात म्हणतो तुम्हाला पण खूप भूक लागली आहे वाटते असं म्हणत पुढे निघतो,
तो घरी येतो घरातील रिकामे पातेले घेतो आणि त्यात रवा टाकतो व पातेले ठेवून देतो.
आपल्या लहान भावाचा शोध घेतो घराच्या मागच्या बाजूला असणाऱ्या झाडाखाली बसलेला असतो,
त्याला आवाज देतो आणि घरामध्ये बोलावतो
आणि म्हणतो मी तुला आज जादू दाखवतो,
त्याला विचारतो तुला किती भूक लागली आहे तेव्हा त्याच्या लहान भावाच्या डोळ्यामध्ये पाणी भरून येते आणि तो लहान भाऊ म्हणतो जितकी तुला लागली आहे तेवढीच मलाही लागली आहे ,
कारण आपण परवा एकत्र खाल्ले आहे तेव्हा पासून तू आणि मी काहीच खाल्ले नाही आणि तू मला सोडून कधीच खाऊ शकत नाही दादा, जेवढी तुला भूक आहे न तेवढीच मला सुद्धा आहे आता,
तेव्हा मोठ्या भावाच्या डोळ्यातही पाणी येते ,
आणि तो लहान भावास म्हणतो आता डोळे बंद कर मी तुला जादू दाखवतो असं म्हणताच छोटा भाऊ आपले डोळे बंद करतो, तेव्हा लगेच कुठल्याच क्षणाचा विलंम्ब न करता किंवा कुठलाच प्रकारचा मंत्र वगैरे न म्हणता लगेच वरती ठेवलेले रव्याचे पातेले लहान भावाच्या समोर ठेवतो,
रव्याचा वास येताच लहान भावाने डोळे ताडकन उघडले कुठलाच विलंब न करता त्याने आपल्या दादा ला मिठी मारली आणि त्याच्या गळ्यात पडून रडायला लागतो ,
लहान भाऊ मोठ्या भावाला म्हणतो तू हि जादू कशी केलीस मला माहित आहे आणि पण असं पुन्हा करू नको आणि एकटा जाऊ नकोस मलाही सोबत घेऊन जात जा आपण दोघे मिळून अशी जादू करत जाऊ
तेव्हा मोठा भाऊ  म्हणतो अरे तू छोटा आहेस खूप तेव्हा तुला कसं जमेल हे
छोटा भाऊ म्हणतो हा तू खूप मोठा आहे बघ चौथीला जातोना शाळेत आणि मी छोटा आहे मी अजून तर तिसरीलाच आहे तेव्हा दोघेही हसतात आणि दोघे मिळून रवा खाण्यास सुरवात करतात, एकमेकांना पहिला घास भरवतात आणि खूप आनंदाने खातात,
खात असताना त्याच्या लक्षात येते की,
आपली आई पण आपल्या सारखी उपाशी आहे तेव्हा दोघेपण मिळून आपल्या आई साठी  रवा ठेवतात,
व म्हणतात आई पण खाईल अस मोठा भाऊ अतुल म्हणतो तेव्हा सुरज म्हणतो अरे दादा पण आई तुला रागवेल की' तू कुठं गेलतास? आणि किती लांब गेलतास ?
तुम्हाला जाऊ नको म्हटले होते कुठेच मारेल तुला रे आई ,
आईला नाही आवडणार खरंच मारेल तुला
तेव्हा अतुल सुरजला म्हणतो मारू दे काही नाही वाटणार कारण मी आईच ऐकल नाही म्हणून मला आई मारेल पण मला काहीच नाही वाटणार ,
पण जेव्हा आईला आपण हा रवा भरवू आणि आई खाईल तेव्हा आपल्याला किती आनंद होईल तू सांग तेव्हा सुरज म्हणतो खरंच रे दादा तू किती भारी आहेस, खूप भारी वाटेल ...
आणि आईला खाताना पाहून तर इतके बर वाटल ना मला अजून 3 दिवस जरी नाही भेटले ना खायला काही तरी मला भूक नाही लागणार इतका आनंद होईल. कारण आई मर मर करून काम करते आपल्यासाठी आणि आपण आज तिच्यासाठी काही तरी केले याचा खरा आनंद होईल बघ.
तसेच दोघे पुन्हा पाणी पितात व घरा बाहेर येतात व आपल्या आई येण्याची वाट पहात असतात सूर्य हळू हळू खाली चाललेला असतो आणि तेव्हा सुरज म्हणतो दादा आई कधी येईल आता खूप उशीर झालाय सगळ्या लोकांची गुर पण घरी घेऊन आली आहेत आकाशाकडे बघत म्हणतो वरती बघ दादा पक्षी पण आप आपल्या घरट्याकडे जात आहेत आता कोणीच नाही सगळे आप आपल्या घरी जात आहेत ,
अतुल सुरजला समजावत म्हणतो मळा लांम्ब आहे रे,म्हणून  खूप उशीर होतोय,
आई येईल पण मला आता एक युक्ती सुचलीय आणि आई आली की मी आईला सांगेन तू आईला काहीच नको सांगू आज मीच सांगेन ठीक आहे तेव्हा सुरज म्हणतो नीट सांग नाहीतरी मला पण मार बसवशील तेव्हा अतुल पण हसत म्हणतो युक्ती तर हीच आहे की माझ्या बरोबर तुला मार बसवायची,
आणि दोघेपण हसतात...! तेव्हा हसता हसता समोर पाहतात तर आई येताना दिसते आईचा चेहरा दोघे पण पाहतात तेव्हा आईचा चेहरा खूप नाराज असतो.
आई जशी जवळ येते, तेव्हा आपल्या डोक्यावरील कापडाच्या चिंध्यानि भरलेल पोत खाली ठेवते जे की, गोधडी शिवण्यासाठी आणले होते खाली ठेवले तसे आईने म्हणजे लक्ष्मी ने अतुल ला पाणी आणण्यास सांगितले अतुल घरात जात असताना पाणी आणण्यासाठी तो सुरज कडे पाहतो आणि आपल्या होटांवरती बोट ठेवून गप्प राहण्यास सांगतो तसे सुरज आपले मुंडके हलवून होकार देतो व शांत उभा राहतो,
तेव्हा लक्ष्मी आपला चेहरा आपल्या पदराने पुसत असते तसा सुरज तांब्या भरून पाणी घेऊन येतो आपल्या आईच्या हातात देतो आई पाणी पिते आणि तांब्या बाजूला ठेवते आणि म्हणते बाळांनो मी तुम्हाला काहीच नाही आणले तिथं मळ्यात गेल्यावर कळलं की त्यांच्या मुलीला पाहायला पाहुणे आले होते तांबे बाई तिच्याच गडबडीत होती मग तिला मला काही मागता नाही आले ,
मलाच बराच वेळ तिथं बाहेर बसावं लागलं म्हणून उशीर झाला घरी येण्यासाठी,
आपल्या दोन्ही मुलांना मायेने जवळ घेत डोक्यावरून हात फिरवत म्हणते भूक लागली असल माझ्या बाळांना बनवते लगेच कडन हाय ते घरात थोडं हुलगे त्याचे अस म्हणत लक्ष्मी घरात जाते आणि हुलगे असणारा डबा घेते तेव्हा अतुल म्हणतो आई मला तुला काही सांगायचं आहे पण आम्हाला मारू नकोस परत असं नाही करणार तुला विचारल्या शिवाय यापुढे कुठंच नाही जाणार आज मला काहीच नको बोलू तुला "आमची शपथ आहे" तेव्हा लक्ष्मी म्हणते चोरी केलीस का तेव्हा अतुल म्हणतो -नाही ,
"मी तुझा अतुल आहे मरण उपाशी पण चोरी नाही करणार"
लक्ष्मी आपल्या पानवलेल्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहून लक्ष्मी दोघांना जवळ घेते आणि म्हणते सांग आता मी काहीच नाही करणार आणि काहीच नाही बोलणार,
(तेव्हा सर्व घडलेली हकीगत अतुल आणि सुरज मिळून सांगतात )
आणि अतुल हे सांगत असतानाच सुरज रवा असलेले पातेले घेतो आणि आपल्या आईच्या समोर धरतो हे सर्व ऐकूण आणि समोरचे दृश्य पाहून ,
लक्ष्मीच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू थांबवणे कठीण होते ,आणि थांबतच नव्हते त्या परिस्तिथी मध्ये ती डसा-डसा रडत आपल्या दोन्ही मुलांना कवळी मारते आपल्या मिठीत घेते ,
काही वेळा नन्तर सुरज आणि अतुल समोर बसतात, आणि सुरज पातेल्यात हात घालून एक घास घेतो आणि आईला भरवायला लागतो तेव्हा आई त्याचा हात धरते...!आणि काही क्षण थांबते तेव्हा सुरज आणि अतुल एकमेकांकडे पाहतात आणि दोघांनाही वाटते की आता आई आपल्याला मारणार आई त्या दोघांकडे पाहते आणि म्हणते आपल्या घरात अजून कोणी तरी आहे त्याला आधी हा घास त्याला भरूयात कारण खूप दिवसातून आपण आपल्या घरात गोड पदार्थ खात आहोत तेव्हा आपल्या घरातील गणपती बाप्पा ला हा घास ठेवुयात घरात फळीवर्ती वरच्या बाजूला एक गणपतीची मूर्ती असते तेथे लक्ष्मी एक घास ठेवते आणि मग सुरज आणि अतुल मिळून आपल्या आईला घास भरवतात व तसेच आई आपल्या दोन्ही हातानी आपल्या दोन्ही मुलांना घास भरवते तिघेही आनंदात हसत हसत खातात.................end


इतर रसदार पर्याय