ना कळले कधी - Season 1 - Part - 2 Neha Dhole द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • चाळीतले दिवस - भाग 6

    चाळीतले दिवस भाग 6   पुण्यात शिकायला येण्यापूर्वी गावाकडून म...

  • रहस्य - 2

    सकाळ होताच हरी त्याच्या सासू च्या घरी निघून गेला सोनू कडे, न...

  • नियती - भाग 27

    भाग 27️मोहित म्हणाला..."पण मालक....."त्याला बोलण्याच्या अगोद...

  • बॅडकमांड

    बॅड कमाण्ड

    कमांड-डॉसमध्ये काम करताना गोपूची नजर फिरून फिरून...

  • मुक्त व्हायचंय मला - भाग ११

    मुक्त व्हायचंय मला भाग ११वामागील भागावरून पुढे…मालतीचं बोलणं...

श्रेणी
शेयर करा

ना कळले कधी - Season 1 - Part - 2

तो आला आणि आर्यांच्या बाजूला बसला. hii everyone सॉरी डिस्टर्ब तर नाही केलं ना तुम्हाला, मी बसलो तर चालेल ना तुम्हाला. अस त्याने म्हंटल आत मात्र सगळ्यांचा थोडा मूड खराबच झाला पण सगळे अगदी आनंदी असल्याचं भासवत होते. आर्या मात्र थोडी गंमतच वाटली काय घाबरतात यार ह्याला हा तर cool दिसतो. आणि सगळे शांत  बघून सिद्धांतच बोलला अरे के मग कसा चालू आहे काम??? त्याने एकेकाला विचारलं आणि मग आर्या ला म्हणाला न्यू जॉईनी?? आणि लगेचच   रेवा कडे वळून तिला प्रोजेक्ट बद्दल बोलायलया लागला. आर्या मात्र हो म्हणायचा पण chance नाही दिला.तिला फारच राग आला. तो जेवण आटपून लगेच निघाला आणि जाताना रेवाला बजावून च गेला 10 मिनिटांमध्ये माझ्या कॅबिन मध्ये ये. रेवाचा चेहरा एकदमच उतरला . अरे काय माणूस आहे हा......???? आणि सगळेच जेवण करून उठले.
मग तिथे फक्त  पूर्वा, रेवा आणि आर्यच राहिल्या. पूर्वा म्हणाली यार रेवा तुझा team leader काय भारी आहे कसला दिसतो नशीबवान आहे यार तू नाहीतर आम्ही. रेवा तिला मध्येच थांबवत म्हणाली ओह मॅडम प्लीज हा दिसतं तस नसतं तो दगड आहे दगडं कळलं का.चलो guls मी निघते नाहीतर परत बाबा ओरडेल. अस म्हणून ती निघाली आणि जाताना आर्याला All the best आर्या होप तू आमच्या टीम मध्ये नाही यावी.
आता हा सगळा प्रकार पाहून आर्याला ला टेन्शनच आलं.आर्या लंच करून परत आपल्या जागेवर आली आणि तिला खरच जाम टेन्शन आलेलं होत.ती टेन्शन जाण्यासाठी आपला फोन वर  chatting, insta वर scroll करणे अशे बरे बरेच प्रकार करत होती शेवटी तिलाच जाणवले की हा असा timepass करून काहीही फायदा  नाही मग तिथे आशिष आला त्याच्याशी बोलून आर्याला थोडं relax वाटलं. आणि एकदाचा पहिला दिवस संपला. आर्या घरी निघाली,घरच्यांसोबत बोलून थोडा वेळ टीव्ही बघून तिचा मूड फ्रेश झाला आणि तिचं सगळे टेन्शन दूर झाले.

   आज आर्यला ऑफिस ला यायला थोडा उशीरच झाला. तशी ती वक्तशीर आहे पण आज नेमका उशिर झाला. ती वेळेतच निघाली पण नेमका आज गाडीने त्रास दिला. ती ऑफिस ला ऑफिस ला पोहचली.तिला तिच्या बॉस ला reporting करायला गेली. तिचा बॉस म्हणाला गुड मॉर्निंग आर्या, आज पासून तू मला नाही सिद्धांत ला रिपोर्ट करायचं तो तुझा टीम लिडर, ऑल दि बेस्ट. आर्या ok सर म्हणाली, तर आर्या जा पटकन सिद्धांत ला भेटून घे माझं बोलणं झालंय त्याच्याशी, तो वाट बघत असेल तुझी.आर्या ला काही बोलायचा चान्स च नाही मिळाला.ती सिद्धान्त च्या केबिन जवळ गेली.मे आय कंमिंग सर,त्याने तिला आत बोलावलं तो चांगलाच रागात दिसत होता आर्या ला कळेना की हा नेहमीच असा असतो की की खरच रागात आहे.इतक्यात तो जवळ जवळ आर्या वर ओरडलाच की किती वाजले,ही वेळ आहे का ऑफिस ला येण्याची .आर्या ने घड्याळ पाहिले ती आज फक्त 10 मिनिटे उशिरा आली होती आणि 5 मि. तिच्या बॉस ने घेतले होते.सर actully मी वेळेतच निघाले पण माझी बंद पडली होती so माझा वेळ तिथे गेला आर्या म्हणाली. सिद्धान्त तिच्यावर ओरडलाच बे बघ आर्या मला मुळात वेळेची किंमत नसणारे लोकच पटत नाहीत. आणि त्यात तू तुझी चुकी accept करायचं सोडून मला फालतु कारण देतीये त्याचा आवाज बराच वाढला होता. आर्या तर काय चाललय काही कळतच नव्हते सर मी खरच सांगतीये माझी गाडी बंद पडली होती.आर्या please get out from here तू अजून काही कारण देणार आणि मी तुला अजून काही बोलेल परत तू रडणार वगैरे मला हा कुठलाही drama नकोय so please leave. आर्या तर रडूच कोसळले पण तीने ठरवलं की अजिबात रडायचं नाही. हा कोण आहे मला राडावणारा पण तरीही तिच्याही नकळत केबिन च्या बाहेर निघताना पाणी आलेच आणि सिद्धांत च्या नजरेतून हे काही  सुटले नाही. अरे यार हे काय केलं मी का मी माझ्या रागावर नियंत्रण नाही मिळवू शकलो. सकाळी त्या माणसाने फोन केला आणि त्याचाच राग मी एका न्यू जॉयनी वर करावा, सिद्धांत ला मनातून फार वाईट वाटले पण तीही मला काय फालतू कारण देत होती. वाटलं असेल तर वाटलं असेल तिला वाईट मी का विचारकरतोय इतका मला काही फरक नाही पडत. मान्य आहे थोडं over react केलं पण चुकी तिचीही आहेच.