पहिल प्रेम - भाग 2 Nitin Chandane द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

पहिल प्रेम - भाग 2

मी आवाज दिल्यावर तिने मागे वळून पहिले आणि समोर चालतं राहिली.मला वाटलं तिला ऐकू आले नसेल म्हणून मी म्हटलं जाऊ दे .दुसऱ्या वेळी बोलू , असं मनात म्हणून चालू लागलो. तिचा विचार माझ्या मनातून जातच नव्हता.तेवढ्यात मला विनोद मी त्याला आवाज दिला आणि शाळेकडे जाण्यास निघालो.असेच तिला बघण्यात सहा महिने निघून गेले .ती काहि मला बघत नव्हती कारण तिला माहीतच नव्हतं की, मी तिच्याकडे बघतो म्हणून मग मी रोज शाळेच्या पायऱ्यावर बसायला सुरुवात केली .मला विश्वास होता कि, ती एकदा तर माझ्याकडे बघेल आणि तो दिवस आला तिने माझ्याकडे बघितले आणि मी एवढा खुश झालो कि ,माझ्या आनंदाला पाराच राहिला नाही.माझ्या सर्व मित्रांना माहित होत कि, मी तिच्यावर प्रेम करतो म्हणून पण सगळे म्हणायचे कि, ती तुला बघणार देखील नाहि तिने मला बघितले आणि माझे मित्र मला म्हणाले खरंच खूप प्रेम करतोस भावा आज मला खूप छान वाटत होत.कारण पहिले वेळेस तिने मला बघितलं होत.मग मी  प्रार्थनाच्यावेळी एक सारखं तिलाच बघत होतो.तरी पण ती मला तेवढं बघत नव्हती .आता मला तिला पाहायला भीती वाटायची नाहि पाहिल मी तिला चोरून बघायचो पण आता तिला बघून जोर जोरात बोलायचो कारण तिच लक्ष माझ्याकडे वळावं म्हणून तिला  मला आता फक्त एकच काम होत जेवायचं आणि तिची रोज शाळेत  कधी येईल याची वाट पहायची. मला आधीच अभ्यास करायचा फार कंटाळा आणि आता तर जे करत होतो तें हि बंद झाला. आता तर सरचा मार चांगला वाटू लागला होता.पहिल शनिवार रविवार कधि येईल कि, वाटायचं आता शनिवार रविवार दुश्मन वाटू लागले होते.हे दोन दिवस कधी जातात कि, वाटायच आणि तो सोमवार आला.जो मला परत तीच्या प्रेमात पडला .ती आली लाल कलरचा ड्रेस घातला होता आणि केसाला तेल लावल नसल्यामुळे तिचे सोनेरी केस आणखीच छान वाटत होते आणि त्या केसात तीच्या ड्रेसवर मॅचिंग अश्या पिना त्यात भर टाकत होते. मी माझ्या मित्रावर घालून म्हणालो आज उशीर का झाला ती माझ्याकडे बघितली आणि वर्गात गेली आता तिच्या लक्षात आलं की, मी तिच्याकडे बघतो म्हणून. मला तीचं रूप रोज वेगळ दिसायचं . आम्ही फक्त एकमेकांना बघत होतो बोललो कधीच नाही नुसती बघा बघी असच एक वर्ष गेलं आमचं पाहण्यात ती वर्गात फार हुशार होती .तिचा आवाज पण छान होता. ती 15 ऑगस्ट 26 जानेवारीला गाणं म्हणायची.मला तिचा आवाज खूप आवडायचा.मी तिला चिट्टी द्यायचा विचार केला.पण मनात भीती पण वाटायची तिने घरी सांगितले तर म्हणून 15 दिवस चिट्टी खिशात घेऊन फिरलो.पण द्यायची काहि हिम्मत झाली नाही. आणि शाळा पण संपतं आली .उन्ह्लायच्या परीक्षा सुरू झाल्या आमच्या दोघांची तर भेट पण होत नव्हती ती सकाळी यायची पेपर द्यायला आणि माझा पेपर दुपारी असायचा.तरी पण मी तिला पाहण्यासाठी वेळ काढून यायचो पण ती काही मला दिसायची नाहि.माझे पण  पेपर असल्यामुळे मी तेवढं काहि वाट पाहत नव्हतो . तसं हि पूर्ण दिवस तिला बगण्यातच घालवलेले होते. त्यामुळे जो पेपर आहे त्याचा थोडा का होईना अभ्यास करू लागलो होतो.मग शेवटचा पेपर आमचा एकाच वेळात होता सकाळी मला फार आनंद झाला टाईम टेबल चेंज झाल्यानं मी ठरवलं त्या दिवशी तिला चिट्टी द्यायची म्हणून कसा तरी पेपर दिला आणि सगळ्यात पुढे जाऊन मी आणि माझा मित्र मनोज थांबलो तिची येण्याची , आज ती फ़क्त एकाच मैत्रिणी सोबत होती पण माझ्या काळजाचे ठोके वाढत होते जसे जसे ती माझ्या जवळ येतं होती तसे तसे.