Library - 5 books and stories free download online pdf in Marathi

लायब्ररी - 5


दिवसभर कॉलेज मध्ये प्रॅक्टिकल आणि सबमिशन ची गडबड चालू होती…संध्याकाळी घरी आल्या आल्या सरळ झोपायचीच तयारी केली होती की तो आठवला ,,काय करावं जावं का?? पण मीच तर त्याला बोलवलं होत आणि मीच नाही जायचं म्हणजे ते काही मला बरोबर वाटेना…संध्याकाळी तासभर मी आवरण्यात घालवला जाऊ की नको ???? 
शेवटी हो नाही करत मी finally आवरून bridge वर पोहोचले मी तर जवळ जवळ वीस एक मिनटं लवकर आले होते तो अजून आला नव्हता बहुतेक तशी इकडेतिकडे फिरणारी तुरळक मानस सोडली तर फारशी गर्दी तिथे नव्हती.मी ही समोरून कुणी आलं तर लगेच दिसेल अशाच  हिशोबाने बसले.
नऊ वाजायला अजून दहा मिनिटे तरी बाकी असतील आणि मी नेहमीप्रमाणे चिडले.माझ हे नेहमी असच होत,त्याला तरी बिचार्याला काय माहीत पण आज मी त्याला माझ्या मनात तुझ्याबद्दल कुठलीही भावना नाही हे स्पष्ट सांगणार आहे. उगीच नको त्या आशा लावण्यात के अर्थ म्हणून गैरसमज वाढायला नको असं मला मनापासून वाटलं…आधी बराच वेळ विचार केला की कुठून आणि कशी सुरवात करायची.पहिल्यापासून स्पष्ट पणे आपले विचार मांडायची सवय असल्यामुळे जास्त काही अडचण मात्र येणार नव्हती…मित्र म्हणून मी फार आदर करते त्याचा पण अजून तरी मी प्रेमापर्यंत पोहोचलेले नाही आणि पोहोचेल अस मला तरी वाटत नाही…म्हणून मी बरच काही ठरवून आले होते…पण आता मात्र जसे नऊ वाजून गेले तशी माझी चिडचिड वाढायला लागली…नऊ चे साडेनऊ झाले पण तो काही येईना इथे येणारे जाणारे लोक आता माझ्याकडे विचित्र नजरेने पाहायला लागले होते,आता दहा मिनिटांच्या आत आला नाही तर सरळ निघून जायचं अस ठरवल शेवटी कंटाळून  एक तासाने तिथून निघाले पण तो काही आला नाही…काही वेळापासून नाकावरचा राग जाऊन एका वेगळ्याच विचारात मी हरवले होते….तो का आला नसेल बर?? मी नकार देणारे हे त्याला आधीच कळलं असेल का??? जाऊदे ना तसही मी कुठे त्याला होकार देणार होते!!! 
पण शेवटचं बोलणं तर व्हायला हवं होतं!!!!
का कोण जाणे पण त्याच्या त्या न येण्याने मानात कुठेतरी हुरहूर दाटली.मनाला खटकलं कुठेतरी पण काय ते कळेना ..
त्या दिवशीची भेट शेवटचीच त्यांनतर एक आठवडा उलटला पण दिवसागणिक त्याच्या आठवणी ताज्या होत होत्या.स्वतःत हरवलेला तो आणि मुक्त वाहणार झरा मी आमचं कस जमणार होत माहीत नाही पण मनाला एक अनामिक ओढ लागली….ती मात्र कसली हे कळेना..
आधीच माझी गाडी चालवण्याची पद्धत घरच्यांनी चांगली माहीत झाली होती त्यामुळे माझी गाडी माझ्याकडून काढुन घेण्यात आली होती,रोज बस ने प्रवास करून मात्र मला कंटाळा आला होता ,त्यात हा good for nothing ब्रेकअप …ब्रेकअप कसा??? जे असेल ते त्यांनतर तो मला कधी दिसलाच नाही पण शेवटी पुन्हा मी त्याच्यावर्यंत पोहचायचे ठरवलं आणि ती ही आशा फोल ठरली तो आणि त्याची फॅमिली केव्हाच शहर सोडून गेलेली…आणि तो ही गेला!!! का माहीत नाही पण त्या वेळी फार वाईट वाटलं.
आता माझं बोरिंग life पुन्हा तसच सुरू झालं दरम्यानच्या काळात एक वर्ष उलटू  गेलं मी graduate झाल्यावर पोस्ट graduation साठी ते कॉलेज सोडून शहरात Admission घेतलं..नवीन शहर नवीन लोक सगळं वातावरण कस गडबडून टाकणारं होत….हळू हळू मी ही त्या वातावरणात मिसळून गेले,आणि त्याच दरम्यान माझं आयुष्य पालटून टाकणारी गोष्ट घडली…आणि माझं आयुष्य बदललं कायमच.
पोस्ट graduation च दुसरं वर्ष चालू झालं सगळेच जीव तोडून अभ्यासाला लागले,मी ही त्यातलीच आपण मागे राहायला नको म्हणून मी ही अभ्यासाला लागले….दिवस जात होते जीव तोडून सगळ्यांचा अभ्यास तर चालूच होता..

फायनल एक्साम आणि viva च्या  dates Announce झाल्या मी वेड्या सारख पुन्हा पुन्हा त्याच त्याच गोष्टी वाचून पाहत होते , जवळ लावळ सगळाच वाचून काढल्यावर थोडं बर वाटल मी माझा नंबर येण्याची वाट पाहत होते ,आतून viva देऊन बाहेर येणाऱ्यांचे चेहरे पाहून चांगलीच धडधड होत होती…निकिता परांजपे finally माझं नाव अनाऊन्स झालं मी हळूच दरवाजा उघडून शक्य तेवढ्या अदबीने म्हणाले, Met I come in sir ???...Yes come in आतून आवाज आला..मी सावकाश पणे पाऊलं टाकत आत पोहोचले आत तीनचार लोक बसलेले दिसले  external….!!!! मी एक पाठोपाठ सर्वांना गुड मॉर्निंग करत होते तोच एका खुर्चीपाशी माझी नजर खिळली…पुन्हा तोच फील मी खाली कोसळतेय की काय अस वाटायला लागलं,आणि तेवढ्यात कुणीतरी मला बस म्हणलं खाली पडण्यापूर्वी बसलेलं बर असा विचार करून मी मी मटकन खुची पकडली.वर पाहण्याची तर हिम्मतच होईना हात पाय थरथरत होते. माझ्या आजू बाजूचे लोक काहीतरी बोलत होते पण मला मात्र काहीच ऐकू येईना…कारण समोर तो बसला होता… अभिनव पाटील….दोन वर्षांनंतर मी त्याला पाहत होते..तेव्हाच तो आणि आताच तो यात कितीतरी फरक जाणवत होता,चुरगळलेला शर्ट आणि विस्कटलेले केस अस काहीस गाबाळ वर्णन मला आठवत होत त्याच पण आता मात्र मी त्याला पाहतच राहिले …व्यवस्थित कट केलेले केस कोरून केलेली दाढी आणि तो फॉर्मल ड्रेस आणि ते छानसे पाणीदार डोळे आणि त्याला अजून सुंदर बनवणारा तो चष्मा मी त्याच्याकडे पाहत होते आणि तो आपल्या सहकाऱ्यांशी गप्पा मारत माझा प्रोजेक्ट चेक करत होता ..त्याच्या चेहऱ्यावरचे भाव यत्किंचितही बदलले नाही याचं मात्र मला नवल वाटलं..तो त्याच गंभीर चेहऱ्याने माझ्याकडे पाहत होता…
याने मला ओळखलं नसेल का??? मला प्रश्न पडला..
तेव्हा घडलेली प्रत्येक गोष्ट माला जशीच्या तशी आठवत होती तो गेल्यावर त्या आठवनींत घालवलेले क्षण जसेच्या तसे  माझ्या स्मरणात होते .मी प्रेमात पडले होते का???
 माहीत नाही!!! पण एक मात्र होत की मी त्याला तेवढे दोन वर्षे खुप मिस केलं..का ते ही माहीत नाही पण एक गोष्ट होती आमच्यात जी अजुन मला कळायची बाकी होती….
आयुष्यात काही गोष्टी अशा असतात ना की आपल्याला त्या थांबवता येत नाहीत त्या घडतातच मग आपली इच्छा असो वा नसो.
हॅलो……आम्ही तुमच्याशी बोलतोय!!!! अस कुणीतरी माझ्या कानात ओरडल्याचा मला भास झाला.. तशी मी विचारांतून बाहेर आले. मॅडम आपलं आल्या पासून अशाच बसल्या आहात काही बोलणार आहात की झालं???
मी तिथे जाऊन त्याला पाहताक्षणी सगळं विसरले..तो का आला असेल माझ्या आयुष्यात परत??? कितीतरी प्रश्न…!!!
तेव्हा राहिलेला एक प्रश्न अजूनही माझ्या मनात होता!! त्याला एकदा तरी विचारावं अस मला सारख  वाटत होतं,
हीच वेळ आहे बोलावं का??? 
बराच वेळ विचारलेल्या प्रश्नच उत्तर मी देईल या आशेने सगळे माझ्याकडे पाहत होते.आणि मी मात्र पाहत होते ते त्याच्याकडे …
तू त्या दिवशी का आला नाहीस???? माझ्या अचानक विचारलेल्या अशा प्रश्नाने त्याला काय बोलावे सुचेना त्याने रागात माझ्या समोर फाईल आपटली  आणि तो बाहेर निघून गेला..पुन्हा त्याच पाठमोऱ्या आकृतीकडे टक लावून पाहत होते…आणि हा सगळा तमाशा माझ्या समोर असलेले सगळे एक्सटर्नल  बघत होते….नंतर माझीच मला लाज वाटली,मी तडक उठून बाहेर निघाले…या वेळी ओरल बॅक ला राहणार हे तर नक्कीच होत…
संध्याकाळी घरी आले पण ध्यास मात्र वेगळाच त्याचा विचार काही डोक्यातून जाईना!!!
कितीही विचार केला तरी माझं मात्र कशातच लक्ष लागेना आपल्याच धुंदीत गाडी चालवत मी लव्हर्स bridge कडे निघाले……आज मला एकांत हवा होता..नऊ नंतर तिथे विशेष गर्दी नसते हे एव्हाना मला माहित झालं होतं कारण त्यां पहिल्या भेटीनंतर ही मी कित्येकदा तिथे यायची जेव्ह मन अशांत होईल तेव्हा त्याला आठवायची का ते माहीत नाही पण ते छान वाटायचं..आजही मी त्याच एकांताचा शोधात मी ब्रिज वर पोहोचले तो येणार नाही हे माहीत असतानाही.........

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED