Library - 6 books and stories free download online pdf in Marathi

लायब्ररी - 6


सवत्ताच्याच विचारात मग्न होऊन गाडी भरधाव वेगाने लव्हर्स ब्रिच कडे चालली होती.आज पुन्हा त्याच्या येण्याने जणू मी मधला काळ विसरून आता स्वत्ताच्याच दुनियेत हरवले होते. जुन्या स्मृती जाग्या झाल्या तेव्हा प्रेम वगैरे आहे का नाही हे कळतच नव्हतं खर तर आता  ही अगदी तीच स्थिती आहे पण त्याच्या जाण्याने काहीतरी बदल झालेला.अल्लड अशी स्वतःत मग्न असणारी मी माझ्यातून वेगळी झाले सारखी बडबड करणारी आता कमालीची शांत दिसते याच माझंच मला नवल वाटायला लागल की तो पुन्हा माझ्या आयुष्यात आला…आज अस अचानक त्याच समोर येण म्हणजे नवलच होत माझ्यासाठी ,त्याला माहित असावं का हे???
माहीत नाही पण काहीही असो आज मात्र मला त्या जागेची आठवण झाली जीथे आम्ही पाहिल्यांदा भेटलेलो..
रस्त्याच्या बाजूलाच गाडी लॉक करून ठेवली आणि हळू हळू चालत मी ब्रीच कडे निघाले स्वतःत मग्न झालेली मी माझ्या लक्षातच आलं नाही की माझ्या आधी माझ्या आवडत्या जागेवर कुणी बसलेलं आहे,स्वतःत मग्न असलेली मी नकळतपणे त्या व्यक्ती च्या शेजारी जाऊन बसले मग माझ्या लक्षात आल्यावर काहीस ओशाळून तिथून उठणारच की त्या तरुणाने आवाज दिला बसू शकता तुम्ही मला काही प्रॉब्लेम नाही..
मी चेहऱ्यावर हसू आणत thank you म्हणले..गेला अर्धा तास आम्ही दोघेही असेच शांत बसलो होतो तो त्याच्या विचारात आणि मी माझ्या.. काही वेळाने शांततेचा भंग करत तो म्हणाला hi….!! मी शंतनु !!! तुम्ही???
मी निकिता मी माझी स्थिर नजर त्याच्यावर टाकत उत्तर दिलं..
तुम्ही SP कॉलेज चे स्टुडेंट ना ?? 
हो तुला कस माहीत?? 
मी तुम्हाला ओळखतो सेम कॉलेज!!!!
Ooh अच्छा!!! पुन्हा काही काळ शांतता पसरली….
तुम्ही इथे रोज येत का ??
मी तर रोज येतो...कधी दिसला नाहीत??त्याने बऱ्याच वेळाने प्रश्न केला..???
नाही नेहमी नाही पण अधून मधून येत असते ..मी पुन्हा त्याच थंड आवाजात मी उत्तर दिलं.!!
अच्छा अधून मधून येता का पण मी नेहमी येतो मला फार आवडते ही जागा…शांत निवांत वाटत सगळा स्ट्रेस निघून जातो …तो खालून शांत पण झुळझुळ वाहणाऱ्या पाण्याकडे टक लावून बघत होता…कधी कधी न असा क्षण येतो वाटत संपल सगळं पुढे काहीच वाट नाही जेव्हा जेव्हा अस वाटत ना तेव्हा तेव्हा मी इथेच येतो…आता तर जगायचाच कंटाळा आला आहे.मी चमकून त्याच्याकडे पाहिलं त्याचा चेहर्यावर मघाशी पाहिलेले निरागस भाव कुठेच दिसेना आता हळू हळू त्याच्या चेहऱ्यावर राग जाणवायला लागला.. …कुठेतरी दूर निघून जावं अस वाटत …संपून टाकावं सगळं मग पण मी का संपवू स्वताला !!! ज्याने मला हे सगळं भोगायला लावलं ना मी त्यालाच संपवेन…
नाही….शंतनु तू तसा मुलगा नाहीये…तू ….तू…का…ही
तर त्याचा हा अवतार पाहून मला असाच घाम फुटला…..हे अस काय बोलतोयस तू???  मी घाबरतच त्याला म्हणाले…!! हे काय स्वताला संवणार आणि हे सगळं म्हणजे काय ?? माझा चढलेला आवाज पाहून की काय तो थोडा शांत झाला…
माफ करा मी पॅनिक झालो की अस होत मी काय वागतोय आणि काय बोलतोय हे  लक्षात येत नाही माझ्या…मी ……..मी वेडा होत चाललोय..डोकं बिघडलय माझं ..तो काही बाही बडबडत होता मला त्याच्या अशा बोलण्यावर  काही उत्तर सापडेना..खरंच वेडा आहे की काय हा अस मला वाटायला लागलं घाबरून मी इकडे तिकडे पाहिलं आजू बाजूला कुणी लोक ही दिसेना शक्यतो या बाजूला लव्हर्स दिसतात पण आज दूरवर बसलेलं एक जोडपं सोडलं तर कुणीच मला नजरेस पडेना.आता कुठे काहीस अंधारायला लागलं होत...तो सुनसान ब्रीच पाहू  असच अंगाच पाणी झालं ..मी शक्य तेवढी स्वताला शांत ठेवत तिथुन उठले..मी तिथून अशी घाबरून उठले हे त्याच्या लक्षात आलं असेलच…तो त्याच थंड आवाजात पण मला ऐकू येईल अस म्हणाला…
घाबरलात का मला??? मी आहेच असा सांगळे माझ्यापासून लांब पाळतात ..वाईट आहे मी खुप अस म्हणून तो मुसमुसुन रडायला लागला..
अरे देवा!!!! हे काय आता!!! आता मात्र ते घाबरने सोडून मला हसायला आली..
हे…अस काय रडतोयस मुलींसारखा??? मी हसून म्हणले..
म्हणजे फक्त मुलीच रडतात का?? मुलांना भावना नसतात?? तो पाणावलेले डोळे पुसत म्हणाला…
का माहीत नाही पण मी पुन्हा त्या जागेवर बसले त्याच्या अगदी शेजारी…अंधार पडल्यावर लोक येतात हे मला माहित होत म्हणूनच मी उठण्याची घाई केली नाही..
अरे अस का म्हणतोस तू असतात ना!! मुलाना ही तेवढ्याच भावना असतात!! आणि मुलींनीच रडल पाहिजे असही काही नाही…मी गमतीत बोलले कारण अस बोललं म्हणून  तू थांबलास ना रडायचा!!!...हो की नाही आता हास पाहू!!! मी त्याच्याकडे पाहुन हसले, मला हसताना पाहून तो ही जरासा हसला आता थोडसा नॉर्मल झाल्यावर मी त्याला म्हणले एवढं काय कंटाळलास तू जीवनाला?? अरे आज प्रोब्लेम आहे उद्या संपतील त्याचा एवढा खोल वर विचार करत बसलं की आपल्याला फार मोठे वाटतात आपले प्रॉब्लेम.आयुष्य असच असत जेव्हड आपण त्याला कॉम्प्लिकेटेड समजू तेव्हडच ते मोठे होतात, त्याला घाबरून चाललं तर कस होणार??
तू स्ट्रॉंग बॉय आहेस ना असा विचार नाही करायचा!!! Ok…
हम्मम खर आहे तुमचं पण मी खरंच कंटाळवाणं आयुष्य जगतोय ,पण आता नाही मी ठरवलंय कुणासाठी म्हणून स्वताला दोष द्यायचा नाही..हम्म पक्का प्रॉमिस ?? आता असा वाईट विचार करणार नाहीस ना ??? जीव वगैरे द्यायचा !! प्रॉमिस दे मला!! मी पुढे केलेला हात काही काळ तसाच होता बराच विचार करून त्याने माझ्या हातात हात देऊन आता अस करणार नाही असं प्रॉमिस केलं …
आणि आणि हो आता पासून आपण फ्रेंड्स मला तू म्हणालास तरी चालेल.!!
तो ही गालात हसला.. तुला सांगू निकिता मी ना SP कॉलेजलाच  माझं graduation पूर्ण केलं..आणि पोस्ट graduation साठी तिथेच करत होतो कसा बसा  मी past विसरून स्वताला सावरत होतो तर पुन्हा त्याच आठवणी  तो ओशाळलेला काळ माझ्या डोळ्यासमोरून सरकू लागला..
कॉलेज मधे असताना मी एका मुलीवर प्रेम करायचो,तिला ही मी आवडायचो ..तिच्यासाठी मी रोज तिच्या आवडीची फुलं न्यायचो ती ज्या वर्गात ज्या बेंच वर बसायची ना तिथे रोज ठेवायचो तिलाही ते माहीत असायचं ती अलगद  ती फुलं स्वताच्या हृदयाशी कवटाळायची,तेव्हा मला ती मलाच हृदयाशी धरतेय असा भास व्हायचा..रोज तिला पाहण्यासाठी माझ्या कॉलेज मधून तिच्या कॉलेज ला श्रीनगर ला जायचो दिपवर्धन कॉलेज ला!!! 
अरे म्हणजे मी ज्या कॉलेज ला होती तेच कॉलेज!!! माझ्या जुन्या कॉलेज च नाव ऐकून मी जरा उत्साहित झाले..
तुम्ही त्या कॉलेज ला होता का?? ती ही त्याच कॉलेज ला होती  ..तीच नाव समिधा..समोरा समोर बोलायला माझी कधी हिम्मत झाली नाही..पण आम्ही बोलायचो पत्रातून मी आधी कविता करायचो तिच्यासाठी..तीही अधून मधून उत्तर द्यायची ..तिला तशी अलंकारिक भाषा जरी जमत नसली तरी तिने लिहिलेलं एक एक वाक्य मी मग्न होऊन वेड्यासारखं वाचायचो…खूप छान वाटायचं.. मी कधीही तिला भेटण्याचा प्रयत्न केला नाही आणि तिनेही तस कधी बोलुन दाखवलं नाही आमच बोलणं मात्र चालूच होत …तिला वाचनाची आवड होती आणि तिची आवडती पुस्तकही मला माहित होती..त्या एका पुस्तकात पत्र ठेऊन आम्ही बोलायचो मी पत्र ठेवल्यावर ती ते घेऊन जायची आणि दुसऱ्याच दिवशी त्याच ठिकाणी त्याच उत्तर ही मिळायचं ,फार छान वाटायचं तेव्हा ते गुलाबी दिवस आठवले की वाटत बस असच त्या आठवनींत स्वताला विसरून जावं… त्याच्या चेहऱयावर कमालीचं समाधान दिसत होतं तिच्या नुसत्या आठवणीनेच तो किती सुखावला असेल हे त्याच्याकडे पाहूनच कळत होतं..
Waaaaaaw  मग पुढे??? तीच काय झालं??
 मी उत्सुकतेने विचारलं!! 
माझं शेवटचं पत्र कित्येक दिवस त्याच पुस्तकात पडून होत त्यांनतर ती कधी आलीच नाही आणि मला कधी दिसलीही नाही..ते जणू आमच शेवटचाच बोलणं..त्या दिवसापासून मी आजपर्यंत तिच्या आठवणीत झुरतो आहे.. 
म्हणजे?? 
ते पत्र तू लिहिलं होतं???  ते पुस्तकात भेटलेल पत्र आणि तो दिवस आठवून  माझ्यापुढून भूतकाळ एखाद्या चित्राप्रमाणे सरकू लागला….
इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED