अव्यक्त (भाग - 5) Komal Mankar द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

अव्यक्त (भाग - 5)

आताच तुझं पत्र आलं बघ . तसा उत्साह संचारून आला . खरचं येशील पॅरिसला जून महिन्यात ? जमेल ना तुला यायला . तुझं नेहमीचं . विकेंड मध्ये भेटू ... प्रत्येक वेळेला प्लॅन फसतोच ह्या ना त्या महत्वाच्या कामात .  की खुद्द तुला वाटतं मला न भेटावं ? असो , तुझं तुला ठावं . 
इथे आल्यापासून वाटतं आपली माणसं आपला देश  आपल्या मातीशी असलेली नाळ ब्रिटिश म्युझियमच्या एखाद्या प्रचंड भल्या मोठ्या वास्तू समोर थिटी पडेल .  

      मी तिथे असतांना आपण नेहमीच एकमेकांना  एखाद्या अपराधीन  नजरेने बघत असू . तुला आठवतं . शेफालीचा जन्म झाला तेव्हा तू नव्हतास जवळ .  मी किती व्याकुळ झाले होते तुझ्या असण्यासाठी त्या वेळेला तुझ्या वात्सल्याची खरी गरज होती मला . अरे नवरा म्हणून माझ्यासाठी नाही पण निदान  तुझ्या होणाऱ्या बाळासाठी तरी यायचं होतं तू .

        आपलं एकदुसऱ्याच्या आयुष्यात असणंही कोण्यातरी सामाजिक बंधनात अडकल्या पेक्षा जास्त होतं .  स्वतःला  मृगजळामागे धावताना ठेच लागून रक्तबंबाळ होईपर्यंत पडल्यासारखं वाटू लागायचं मला .

    सुटले तुझ्या आयुष्यातून मी एकदाचे . तू शेफालीच्या ओढीने इथे येतोही तिला भेटायला . बाप म्हणून आता तिच्या गरजा भागवायची तू हौस पूर्ण करत असलास तरी पत्नी म्हणून मला स्वीकारायला आद्यपही तयार नव्हताच कधी .

माझा दूरदेशी जाण्याचा निर्णय तुला योग्य वाटला नाही . कारण तुझी तुझ्या मुली पासून ताटातूट केलीये  मी . डिओर्स पेपरवर सह्या करतांना  तू मला म्हटलं होतं . काय वाटेल ते माग तुला माझी सर्व संपत्ती देण्यासाठी मी तयार आहे . तेव्हा ऐलिमँनी मध्ये मी तुला आपली मुलगी मागितली . माझा जगण्याचा तो एकच सहारा त्याला तू  माझ्यापासून हिरावून घेऊ शकत नव्हता .  तुझ्याजवळ तुझं सो कॉल्ड प्रेम होतच तरी तुझा जीव शेफाली मध्ये अडकलेला . 
मग निरर्थकतेने आपण कुठे चुकतोय हे तरी डोकावून बघायचं होतं एकदा ... मी तुला डिओर्स नसताही दिला . पण वैतागले होते तुला आणि तुझ्या खोट्या वागणुकीला . कोण बाई आपल्या नवऱ्याच्या एक्सगर्लफ्रेंड सोबत एका छताखाली राहायला तयार होईल ? 
डिओर्स झाला तरी आपल्या नात्याला शेफालीने बांधून ठेवलं . तिच्यासाठी म्हणून तू येतो तरी . हे बरं ! 

       तू नसतांना जगणं म्हणजे केवळ तू येईपर्यंत तू येण्याची वाट बघत बसणं असं आहे . 
तुझ्या शारीरिक कैदेतून सुटले बघ मी पण , भावनिक परावलंबातून सुटता यावं असं काही सांग ... मला धर सोड करत तू जायचाच तुझ्या गर्लफ्रेंडकडे आणि शेवटी म्हणाला मी तुला सोडू शकतो पण तिला नाही . तुझ्या ह्या डावपेचांचा कंटाळा आला होता सांगू . म्हटलं तर तू मला दीर्घकाळ स्वतःच्या स्वार्थासाठी जखडून ठेवलं असतं . म्हणून मीच तो वेगळं होण्याचा निर्णय घेतला आणि तू ही चक्क राजी झाला . आणि मला प्रेम बीम वाटता येत नाही रे . त्याला तू उपकार केले असे समजत असला तरी ते चुकीचं आहे मीच माझी तुझ्यापासून सुटका केलीये .

शेफाली अगदी दिसण्याने तुझ्या वळणावर गेली . तेच लांब सरळ नाक तसेच हुबेहूब तुझ्या सारखे डोळे . माझ्या माहेरचे सर्व म्हणतात , पोरगी बापावर गेली  . नीरजची पोरगी म्हणून शोभून दिसतं हं ! माझ्या माहेरच्यांना वाटतं तूही माझ्यासोबत पॅरिसलाच राहतो म्हणून . आई बाबासोडले तर इतर नातेवाईकांना आपला डिओर्स झाला आणि आता आम्ही वेगळे राहतो हे सांगायची हिंमतच मला होत नाही . आपल्या सुखी संसाराला किती डोक्यावर घेतलं होतं त्यांनी . 

इतकं सगळं आपल्यात रामायण घडल्यावर आता तू महिन्यातून पत्र पाठवून शेफाली बद्दल विचारपूस करतो त्याचं मला फारच हसू येतं . तुला एक सांगावं वाटतं मला समोरासमोर कधी हे बोलायचं तुझ्यासमोर धाडसच झालं नाही  आणि तुलाही कधी कनिकातून निसटायला वेळ मिळाला नाही .  पण आता सांगते तुझ्यावरही खूप प्रेम केलं मी . खूप केलं हृदयाच्या  तळघरातुन केलंय . रागात , सुखात , कस का होईना पण प्रेम केलंय ..  तुझ्या आठवणी आहे त्या सर्व खोट्या आपलं नातंही खोटंच होतं म्हणून आपल्यातली देवाण घेवाण संपली . हे नातं एका दृष्टीनं फुळकट समजल्या जाणारे होते  . सामाजाने लादलेल्या आणि इथपर्यत जगलेल्या ह्या नात्यातून आणि " देवाण - घेवाणी " तुन खऱ्या अर्थानं आता मुक्त झालोय कायद्याने !

         मनात येईल ते मालतीने कोऱ्या कागदावर खरवडले  .  पाकिटावर नीरजच्या घराचा पत्ता टाकला .  पत्र पाकीटात टाकून तिने ते फेविकोलने चिकटवून घेतले . दोन्ही ओठ घट्ट धरून पत्राची दुमडलेली बाजू ती दोन घट्ट आवळल्या ओठांनी पत्र चिमटीत धरून त्यावरून फिरवू लागली तेवढ्यात तिच्या डोक्यात विचार आला . 
कनिका नीरजच्या सोबत तर नसेल रहात . त्याच्या दहा पत्रावर हे आपलं त्याला लिहिलेले पहिलं पत्र . आपण उत्तर न देताही तो पत्र पाठवताच पाठवतो दर महिन्याला नचुकता . उगाच ती त्याच्या सोबत राहत असेल तर पत्रावरून तिला संशय येईल की अजूनही ह्या दोघात डिओर्स होऊनही पत्राच्या माध्यमाने बोलणं चालूच आहे म्हणून ... 

           काय करू पत्र पोस्ट करू की नको , का आपण त्याच्यात गुंतत जातो . तो कनिका सोबत खुश आहे ना !  झालं तर मग नमिळत्या आनंदाच्या मागे मी का धावत सुटावं ? लग्नाला चार वर्षे लोटली . मुलगी झाली  तरी कनिकावरच प्रेम कधी त्याने आटू दिलं नाही . 
मालती आपल्या भूतकाळात शिरली . ज्या दिवशी नीरजचे आईबाबा तिला बघायला आले होते त्याच दिवशी पहिल्याच भेटीत नीरजच्या आईला मालती खूप आवडून गेली . नीरजच्या आईला त्याच्या अफेर्स बद्दल समजले होते म्हणून त्यांनी निरजच्या होकाराची प्रतीक्षा नकरता मालतीच्या आईवडिलांना मुलगी आम्हाला पसंद आहे म्हणून तेव्हाच सांगितले . नीरज आपल्या शब्दाबाहेर जाणार नाही असा त्याचा आईचा अट्टाहास होताच . आणि आई समोर तो बोलायलाही भीत होता . 
लग्न जुळलं तेव्हा मालतीला प्रत्यक्षात भेटून तिला सांगायच त्यांनी ठरवलं . तो मालतीच्या समोर गेला तेव्हा त्याच्या तोंडून  शब्दच बाहेर पडत नव्हते . नीरजच्या आईचा गैरसमज होता की लग्नानंतर तो कनिकाला विसरून जाईल . 

     लग्न झालं मालती आपल्या सासर सुखात रुळली होती . पण तिला कशाची तरी कमतरता जाणवत होती काही तरी मनाला खटकत होतं . घरात दीर , सासू  , सासरे सर्व तिच्याशी चांगले वागायचे पण नीरज तिच्या सोबत बोलायचं टाळत होता . बाहेर कुटुंबात तो फॉर्मलिटी म्हणून तिच्या सोबत बोलत होता . 
एकदा रात्री उशिरापर्यंत नीरज घरी आला नाही . मालती त्याची वाट बघत जेवण नकरता  तशीच झोपी गेली . नीरज आला आणि तिच्या बाजूला येऊन बसला  . तिच्या झोपलेल्या शांत चेहऱ्याकडे बघून त्याला वाटलं , आपण ह्या निष्पाप मुलीला का फसवतो आहे आपल्या जाळ्यात . जेव्हा तिला माझ्या अफेर्स बद्दल समजेल तेव्हा तिला काय वाटेल . लग्नाला दोन महिने लोटून गेली पण नीरजने तिला स्पर्शही केला नाही . पत्नी प्रेम जे काही होतं ते त्याच्यासाठी कनिकाकरिता राखून होतं आणि तो दुसऱ्या कोण्या स्त्रीला त्या नजरेने बघू शकत नव्हता शिवाय कनिकाच्या . 

       रोज उत्साहानं वाट तरी कसली बघायची ? म्हणून मालती झोपून जायची .   सकाळी सहा वाजतापासून रात्री दहापर्यंतचा लांबच लांब दिवस जायचा तिचा .  आल्याआल्या सर्वच गोष्टीच नवल वाटतं होतं तिला . आता मात्र हळूहळू करून एक एक नवलाई संपली . रोज उठून बिछाना करा  , चहा करून सर्वाना हातात कप द्या !  घर साफ करा .. घरात कामवाली असल्यामुळे दिवसभर जेवा आणि निजा उठून परत बिछाना करा  वैगरेचा तिला पुरता कंटाळा आला .  दोन दिवसाचे नीरजचे वीकेंडही कनिका सोबतच घालवण्यात जायचे .  मालतीला तर आता तिच्या सौंदर्याचा देखील तिटकारा येऊ लागला . साधी स्तुती तरी करायला नीरज तिच्याकडे बघत नसे . ती मात्र नीरजला मी ह्या साडीत छान दिसावी म्हणून रोज नव्या कोऱ्या साड्या गूढाळी . तिच्या मनाची धुसफूस होई . तो पैशाला ना म्हणाऱ्यातलाही नव्हता , पगार आला की ड्रॉवर मध्ये ठेवून देत असे तुला लागेल तेवढे पैसे घे मला हिशोब नको देत जाऊ असं तिला बजावून सांगितलं त्याने .

         मालतीच्या मनात प्रश्नांची कालवाकालव होई का देखावा करतो हा असा ? अजून पर्यत एका रात्रीही जवळ घेतलं नाही मला कधी . साधी तोंडभरून स्तुती नाही की , कुठे बाहेर फिरायला घेऊन जाणं नाही . नातेवाईकांसमोर बोलतो  तेही फॉर्मलिटीज म्हणून ... माझं काही चुकत का ? मी त्याला पत्नी सुख देत नसावी असंही काही नाही . रोज तो येईपर्यत जागी राहते त्यांची वाट बघत . तो ऑफिस वरून कधी निघतो जातो कुठे की उशिरानेच निघतो रोज तोच जाणे . तिकडून येऊन तो जेवण झालं की अंथरुणाला खिळतो . माझ्याकडे बघायला वेळही नाही . तीन महिने झालेत लग्नाला त्याला एकदाही वाटलं नसावं का ? 
मीच घाई करते आहे असं वाटतंय ... छे !  पण , वेळ द्यावा का त्याला अजून .. की बोलावं ह्या विषयावर त्याच्यासोबत . त्याला माझं बोलणं नाही आवडलं म्हणजे ?  विचाराच्या तंद्रीतच मालती झोपी गेली .  दुसऱ्या दिवशी सकाळी उठून बघते तर बेडवर नीरज नव्हताच . कुठे गेला असावा हा एवढ्या सकाळी तसाही तो कुठे जातो काय करतो हे आपल्याला सांगून नाहीच जात  .
दिवस असाच कंटाळावाना निघून जातो . सायंकाळ झालेली असते तरी नीरज आला का नसावा जेवण करायला म्हणून मालती काळजीत असते .  नीरज त्या रात्री घरी बारा वाजता येतो . सर्व झोपलेली असतात मालती एकटीच जागी असते . 

     ती एवढा वेळ जागी का ? म्हणून नीरज तिला विचारतो . तिच्या मनात येत हीच वेळ आहे नीरजला विचारायची . त्याचं चाललंय तरी काय ? 
कधी नव्हे ते तिला मन मोकळं करायची लहर आली त्याच आवेशात ती बोलू लागली , 
" नीरज , आपल्या लग्नाला तीन महिने झालीत तरी तुला कधीच वाटलं नाही ? माझ्याबद्दल  काही .... साधी स्तुती तर सोडा पण कधी दिवसभरात ऑफिस मधून एक कॉल नाही . लग्नानंतर नवरा बायकोला जे सुख देतो त्या सुखापासून तुम्ही एका स्त्रीला वंचित कसं काय ठेवू शकता ? माझ्या मनाची घालमेल होते ... "

     नीरजने व्हिस्की ग्लासात ओततं तिच्याकडे एक कटाक्षाने बघत म्हटलं , 
" काय करावं तुझ्यासोबत असं वाटतं तुला ? "
त्यांच्या ह्या वाक्यावर काय बोलावं म्हणून मालती गप्पच राहिली . एका स्विप मध्ये गटागटा व्हिस्की पेत तो तिच्या जवळ आला . आणि तिच्या 
केसाला मागे गच्च धरून आवरत म्हणाला ,
" माझ्याकडून  तू त्या सुखाची अपेक्षाही नको करु .... आय एम इन ल्व कनिका नाँट फाँर यू ... एक्झँक्टली तीन महिनेच झाली ना लग्नाला ? चल लग्नाची बायको आहे तू माझी ... किती दिवस तुला पती प्रेमापासून वंचित ठेवू तुला प्रेम हवंय ना माझ्याकडून चल ... "
कोण कनिका ? म्हणजे नीरज दुसऱ्या कुणावर प्रेम करतो हे ऐकून मालतीला धक्काच बसला  .  
त्या रात्री नीरजने दारूच्या नशेते तिला ओरबडलेच पण पती समजून तिने त्यांच्या वागणूकीची कुठेच वाच्छता केली नाही . 

मटेरिअँलिझम म्हणून तो रोज रात्री तिच्या सोबत  प्रणय करायचा बिनबोभाट तिला छळायचा . त्याला विरोध पण ती करू शकतं नव्हती . जेवतांना आसवांबरोबर घास गिळायची .  लग्न म्हणजे तिला आता कैद्या सारखं वाटायला लागलं .  त्याला बोलून मोकळं होता आलं असतं तर हा पश्चाताप वाट्याला आला नसता म्हणून ती हिरमुसायची .  असं  असमाधानी जगणं , अतृप्ती  सारी जीवनाची ससेहोलपटच भरून काढली असती म्हणतं तिचा दिवस फिकीरीत जायचा . सुख अनुभवण्यासाठी काय करायचं ? नवऱ्याला आपली तृष्णा भागवण्यासाठी बाहेर तोंड काळ करायला जागा आहे . आपण कुठे जायचं ?? इथून चार भिंतीच्या बाहेर पडायला काहीच मार्ग नाही आपल्याला . शिवाय रात्री तो चवताळून शरीराला झोबेलच . तिथंही पुन्हा प्रेमवेगापेक्षा रोमँटिकपणापेक्षा मैत्रीचा , उबेचा भाग नव्हताच आणि मालती त्याच्याकडे प्रेमाच्या आशाळभूत नजरेने बघ्याची . तो तेवढाच आक्रमक व्हायचा . 

      घरात साऱ्यांना  पाळणा हलताना बघायचं कुतूहल लागल्याने हा आपल्या सोबत असा तर नाही वागतो आहे ना !  असा मालतीच्या मनात प्रश्न भेडसावला .  तो होता तेवढा सौम्य . आपल्या प्रेमाच्या थापा गाजवणारा त्याला माझ्यात आणि कामिनीशिवाय परकीत काहीच इंटरेस्ट नाही म्हणे मग हा ह्याचा दुहेरी पुरुषी स्वभाव म्हणावं का ? सासूबाईंच्या म्हणण्यानुसार अपेक्षा कमी ठेवणं काही त्यावर उपाय नाही . 

मालतीला आई होण्याची बातमी डॉक्टर कडून मिळताच ती खूप खुश झाली . ही गोड बातमी नीरजला द्यायची म्हणून तिने त्याला पाच सहा वेळा कॉल केला पण त्याने काही रेसिव्ह केला नाही . आई होणं कोणत्याही स्त्रीसाठी किती सुखद अनुभव असतो हे तिला जाणवतं होतं . पण तो आनंद नवऱ्यासोबत वाटता येत नाही एवढं दुर्भाग्य आपल्याच नशिबी का यावं ?   ह्याचा तिला खेद वाटला . पण ती मनात स्वतःलाच म्हणाली , " सब्स्टीट्यूट आईपणाचा फायदा होणार आहे जगण्याला  . " 
हॉस्पिटलमधून घरी जायला ती निघाली होती . वाटेत तिला तेवढ्यात मागून आवाज आला , 
" ह्या हॉस्पिटलमध्ये तू इथे एकटीच काय करतेयस?  आणि काय हा अवतार झालंय काय तुला ? ठीक तर आहेस ना ! "

वळून पाहिलं तर नीरज एका अविवाहित तरुणी सोबत  तिच्या समोर उभा होता . ती आपली निर्विकारपणे त्यांच्या तोंडाकडे बघत राहिली आणि म्हणाली , हो सर्व ठीक आहे . मग इथे तू काय करत आहे असा प्रश्न नीरजने पुन्हा  उपस्थित केलाच . तसं शुभेच्छा द्यायला मालतीने हात समोर करत त्याला म्हटलं , 
" कॉंग्रेट्स , तू बाप होणार आहेस ... " तिचा हात खाडदिशी हातातून निसटवत तो म्हणाला , " हे खरंय ? "
तिने हो म्हटलं तेव्हा नीरजच्या चेहऱ्यावर आनंद कमी ओसंडून वहात होता आणि आश्चर्य अधिक उमटलं होतं . 
बाय द वे म्हणतं त्यांनी कनिका सोबत मालतीची ओळख करून दिली . तेव्हा मालतीला तिच्याकडे बघून वाटलं . असं काय आहे हिच्यात ? नीरज तिच्यावर एवढं प्रेम करतो आणि आपल्यात अशी काय कमी आहे . मालतीने नीरज समोरच कनिकाला म्हटलं ,
" तू आहेस तर कनिका , एवढंच नीरजवर तुझं प्रेम होतं तर लग्न का नाही केलं .. तुझ्यामुळे मला किती काय काय भोगाव लागलं एक स्त्री असून तू दुसऱ्या स्त्रीच्या जीवनाची वाट लावायला निघालीये . ह्याच तुला काहीच कस वाटतं नाही ?" 
कनिका स्तब्ध शांत उभी काय बोलावं तिच्या सोबत मालती तर तिला दोष देणार होतीच ह्यात तिचा एकटीचा काहीच दोष नव्हताच पण ती सहानुभूती म्हणून तिला म्हणाली , 
" एनी वे ! सॉरी सर्व दोष माझाच आहे ... पण नीरजच्या आयुष्यात तुझ्या आधी मी आली तो मला सोडू शकत नाही आणि मी त्याला , तुझ्या एकटेपणालाही मीच कारणीभूत आहे .  "
तिच्याकडे न बघता नीरजकडे बघत मालती म्हणाली ,

" इट् डझन्ट मॅटर एनी मोअर . एकटं राहिलं काय आणि दुकट राहीलं काय आता सवय झाली एकटेपणाची ... पण हा आता एकटी नसणार आहे मी . " हसतच तिने गुड बाय म्हणत ऑटोला हात दिला आणि ऑटोत जाऊन बसली . तिच्या चालत्या ऑटोच्या पाठमोऱ्या आकृतीकडे कनिका बघत राहिली .. 

ऑटोत बसल्यावर मालतीला साराच रस्ता अरुंद अरुंद हजारो मैलांचा वाटू लागला . पण निरजच्या वर्तवणुकीत तिला निख्खळ ऐकटेपणही एकटं नसतं असं खुणावत होतं .