अव्यक्त (भाग - 7) Komal Mankar द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

अव्यक्त (भाग - 7)



जगातल्या सर्व शक्तीच्या तुलनेत मानवी मेंदू हा अधिक शक्तीशाली आहे . एखाद्या दैवी शिकतीपेक्षा ही मानवाच्या मेंदू मध्ये सर्वाधिक लक्षणीय शक्ती असते . पण ती त्याने कधी जाणून घेतलीच नाही . मानवी माईंड हे दोन भागात विभागले गेले आहे . conscious maind & sub - conscious maind म्हणजेच चेतन आणि अचेतन मन . तुमचे विचार , राहणे , मनन चिंतन , निश्चय करणे हे तुमच्या चेतन मनात येतं ह्या उलट तुमच्या सवयी , विश्वास , भावना ह्याला कुठे तरी थांबा मिळतो एखादी गोष्ट करण्यापासून मागे ओढल्या जाते . 

तुम्ही उठता बसता खाता पिता तेव्हा काही ना काही तुमच्या मनात विचार रेंगाळत असते ते विचार मग तुम्ही कशाचे ही करा पण मेंदूला तुमच्या सूचना पोहचत असते . आणि त्याचं विचाराचा परिणाम म्हणून तुम्ही जगत असता . तुम्ही विचार चांगले करत आहे कि वाईट ह्याचा ठाव मेंदूला नसते त्याला तर तुम्ही दिलेल्या सूचनेच पालन करावं लागते . कारण तो तुमचा मेंदू आहे तुमचं माईंड आहे ते तुमच्या दिलेल्या आज्ञेच्या बाहेर जाणार नाही .. 

तुम्हाला एखाद्या गावाला रेल्वेने जायचं आहे घरून तुम्ही जरा वेळेच्या उशिरा निघाले तुम्हाला स्थानकापर्यंत पोहचून गावाला जायचं तर आहे पण तुम्ही तिथे पोहचेपर्यँत बसल्या जागी ते ठिकाण येईपर्यंत तुमच्या माईंडला निगेटिव्ह विचार ढकलता . आणि एवढ्या गतीने विचार प्रक्रिया तुमची सुरु असते ट्रेन निघून तर जाणार नाही ना ! भेटली पाहिजे भेटली पाहिजे ट्रेन निघून गेल्यावर मी कशाने जाणार ? किंवा कशाने जाऊ ? हे देखील विचार तुमच्या माईंड मध्ये तुम्ही ठोसून भरता . दहा वेळा हाताला बांधलेल्या घडीकडे बघतं तुम्ही मनात म्हणत असता झाला आता ट्रेनचा वेळ झाला जाऊन काहीच फायदा नाही . जेव्हा तुम्ही गाडीतून उतरता तेव्हा दुसऱ्या ट्रेनचे लोक येत असताना त्यांच्याकडे न्याहाळत बघताना परत तुमचं सुरु होते , आपली तर ट्रेन नसेल आली ?? तुम्ही वेगाने प्लेटफ्रॉमच्या दिशेने पळ काढता तुमच्या माईंड मध्ये हाच विचार ठेवत ट्रेन निघून तर नसेल गेली ना ?? आणि होत काय तुमच्याच डोळ्या समोर तुमच्या ह्या विचाराने ट्रेन धाडधाड करतं निघून जात असते .. 

एकदा झालं काय माझा आणि माझ्या फ्रण्ड्चा पेपर होता सकाळी साडे पाच वाजताच्या ट्रेनने आम्हाला जायचं होत . तिची वाट बघत आधी तर मी गेट च्या बाहेर थांबली आणि ती जेव्हा आली तेव्हा आतमध्ये जाऊन टिफीन भरला आणि बॅग घेतली चाल आता निघुयात म्हणून आम्ही बाहेर पडलो . आम्ही स्टेशन च्या जवळ जाताच समजलं ट्रेन ब्लॉक झाली तिथून मग आम्ही पळत जायला सुरवात केली . ट्रेन येऊन उभी आम्ही ट्रेनच्या थोड्याच अंतरावर तर ट्रेन आमच्या समोरून धाडधाड करत निघून जात होती आम्ही जाणाऱ्या ट्रेनलाच बघतं राहिलो आणि मग ऍटो करून बायपास मार्गे निघालो .. मी आधीच बॅग घेऊन बाहेर उभी असती तर ट्रेन भेटली असती ही माझी मोठी चूक पण रस्त्याने जातानाही वाटतं होते ट्रेन भेटणार कि नाही .. म्हणून ती निघून गेली डोळ्यासमोरून पण धावत्या ट्रेन मध्ये आम्ही बसू शकलो नाही .. 

तुमचा माईंड तुम्ही विचार योग्य करत आहे कि अयोग्य काय चूक काय बरोबर ह्याचा विचार न करता तुम्ही त्याला जी सूचना देता तीच तो आत्मसात करतं ते कार्य घडवून आणतो . 

तुम्ही एखादी परीक्षा देऊन आले रिजल्ट लागायच्या आधी तुमच्या मनात भीती असेल आपलं कसं होणार आपण पास होऊ की नाही . तुम्ही पास होणार असता पण तुमच्या मनाने तुम्हाला डामलडोल करून सोडले असते तुमच्या विचाराची तीव्रताचं एवढी गहन असते जी तुमच्या माईंड पर्यंत पोहचते आणि जेव्हा निकाल हातात येतो तेव्हा एक दोन काही मार्काने तुम्ही फेल होत असता . आणि जर तुमचा पेपर बऱ्या पैकी ठीकठाक गेला तरी तुमचा आत्मविश्वास तुम्ही ढळू न देता स्वतः ला बजावतं असता मी काहीही झालं तरी पास होणार म्हणजे होणार तर तुम्ही हमखास पास होणारच . पण प्रचंड आत्मविश्वासासोबत तुम्हाला पास होण्यासाठी परिश्रम घेणेही महत्वाचे आहे .. 

विचारच तुम्हाला बनवत असतात विचारच तुम्हाला घडवत असता प्रत्येक मनुष्य हा त्याच्या विचाराचं चांगलं वाईट फळ घेऊन जगत असतो . 

एखादी गरीब असेल त्याच्या जवळ खायला नाही राह्यला घर नाही तो एका झोपड्यात राहतो पण त्याचे हात पाय शाबूत आहे आणि त्यांनी ठरवलं कि मी श्रीमंत बनार तर तो बनू शकतो . त्याने श्रीमंत बनण्याचा केलेला विचारच पुरे असतो आणि त्या मार्गाने जाण्यासाठी त्यांनी केलेली मेहनत . 

तो दिवसभर काम करून मेहनत करून आपल्या झोपड्यात येतो आणि रात्री झोपलेल्या जमिनीवर तो पडून विचार करतो आणि झोपेतच तो त्या गोष्टीला अनुभवत असतो त्या विचारता स्वतःला पूर्णपणे झोकून देतो. तो असतो झोपड्यातच पण स्वतःला तो एका आलिशान बंगल्यात बघतो आपण कार चालवत आहोत असं तो अंतर्मनातून अनुभवतो . त्याची सूचना त्याच्या माईंडने आत्मसात केली असते कारण तो गेली पंधरा दिवस जास्त ते स्वप्न वास्तव्यात बदलण्यासाठी आपल्या माईंडला आदेश देत असतो . आदेश द्या आणि तुम्ही ही मिळवा ! तुम्ही आदेशच दिला नाही तर तुम्हाला जे हवंय ते मिळेल कसं ??? 

एखादी गोष्ट तुम्हाला आवडली खूप जास्त आवडली पण ती तुमची होऊ शकत नाही पैशाचा अभावी किंवा काही करणास्तव . आणि तुम्ही त्याच त्याच गोष्टी बदल दिवस रात्र विचार करत असेल तर ती वस्तू कोणत्याना कोणत्या बहाण्याने तुमच्या जवळ खिचत येते कारण तुम्ही त्या गोष्टीवर आकर्षित झाले होते . 

कोणती देवी शक्ती तुमच्या मनातली इच्छा पूर्ण करणार नाही पण तुमचं स्वतःच मन तुमच्या इच्छेची पूर्ती करेल . मग ते कोणतंही अश्यक्य काम असो . त्या अश्यक्य अशा कामाचा तुम्ही स्वतः गहनतेने विचार करून मनात ते काम शक्य केलं तर तुमचं मन तुमच्या माईंडला ते काम करण्याचा आदेश देईल आणि तुमचा माईंड तुमचा आदेश ऐकणार नाही असं होणार नाही . तुमचं माईंड जेव्हापर्यंत तुमचा आदेश वास्तविकतेत बदलत नाही तेव्हापर्यंत तुम्ही ती इच्छा मनात पूर्ण होतपर्यंत खोलवर रुंजवायला पाहिजे . इच्छा करा आणि मिळवा . 

मानवी मेंदू एक शक्तीच गूढवलय आहे . चमत्कारिक रित्या नाही तर वैज्ञानिक दृष्टीने मानव हा निसर्गाचा एक अविभाज्य घटकच आहे . शेवटी विचारच तुम्हाला घडवतात त्या विचार कक्षेत कोणी काय रुजवायचा तो ज्याचा त्याचा वैक्तिक प्रश्न . तुम्ही चांगले विचार पेरणी कराल तर फळ त्याच चांगलंच मिळेल वाईट विचार कराल तर वाईट . आणि तुम्ही जसा विचार केला तस घडत जाईल . हा मानवी माईंडसेट आहे तो आपल्या रित्या काम करतो .