अव्यक्त (भाग - 4)

         

    "  ओहहहहहहह ओओ  बाई जरा होता का बाजूला .... रस्ता धरूनच बोलायला जागा सापडते ह्यांना जाणारे जावो ह्यांच्या उरावर लाथा देऊन ..." 

शांतीने तोंडातला पदराचा गोळा काढत  रेवतीला रस्त्याच्या कडेला नेले   . 
दोघीही आज त्या सबजीमंडी मध्ये कितीतरी वर्षांनी भेटल्या . शांती आणि रेवती दोन 
सख्या बहिणी बाप मेल्यावर पोटच्या लेकरांना पोसायचं कसं म्हणून तिच्या मायनं 
पहिल्याचा ह्या धंद्यात पाऊल ठेवलं .    

शांती आणि रेवती उपवर झाल्यावर 

त्यांना आपल्या पासून दुर सारत हा धंदा करणार्या मालकांला तिच्या आईने विकली .
आणि त्या पैशाने कुटखाना उभारून  नव्या कोर्या पोरीचा सौदा कराचा बेत ह्या मालतीबाईने आखला .  

शांती आणि रेवती बारावर्षाच्या असताना एकमेकीपासून अलग झाल्या तर सलग वयाची चाळीसावी उलटल्यावर भेटल्या   .

शांती उंच नाजूक बांध्याची तर तिच्या तुलनेत रेवती धिपाड उंच माणसासारखी अंगकाठी असलेली बाईमाणूस ... 

शांतीला बघून रेवतीचा आनंद गंगनात मावेनासा झाला  . नात्याची ताटातूट झालेला वियोग रात्रीच्या छिनलेल्या झोपाची बदलती कुस  आणि वेदनेचा मारा शरीराच्या जखमा जिरून मनावर मलमपट्टी  ह्यांना काय कोणत्याच मानव जातीला करता येत नाही .

पण दुखन सलतं बोचतं म्हणून बसून रहानं ह्यांचा वाट्याला येत नाही .   

डबडबत्या पाणी भरल्या नजरेने ओशाळल्यागत होऊन  भर रसत्याच्या कडेला आपल्या  मोठ्या बहिणीला कवटाळत शांती आलिंग्नबंध झाली  ..

डोळ्याला लावलेलं अंजन अश्रूधारेने ओघळत गालापर्यत आलं  . आपल्या साडिच्या पदराने तिचे अश्रु पुसत रेवती म्हणाली ,

" का रडते ?? मया  समजू शकते तुलै पण आपल्या मायनचं आपल्याला ह्या धंद्यात ढकलं 
आता जगाची इच्छा नाह्य होतं माही तरी रोजच मरणं कुढतं जगते ." 

  जाणारे येणारे चेहर्यावर मिश्कील   हसू आणतं त्या दोघीकडे  बघत बघतं जातात .   

त्याच्याकडे दृलक्ष करतं शांती आपले डोळे पुसत बहिणीला म्हणते ,

" इथून बाहेर  नाह्य पडता यायचं का ? काहीतरी कर ना मोठंताय ."

" माह्य लेकरू हाय त्याले मी ह्या धंद्यावरच शिकवते ... हा धंदा बंद झाला तर त्याचं शिक्षण बी होईलं बंद ..."

  आपल्या बहिणीला स्वतः च पोरं आहे हे ऐकून शांती आवाकच झाली ..

डोक्यात विचाराचं थैमाण माजलेलं आपल्या बहिणीला पण असाच 
कुणाच्या संभोगातून गर्भ राहिला असावा  क्षणभर थांबतच ती बोलली  


" काय सांगते वहहहयय मालक कुठं हाय मग ? आणि किती मोठं पोरं तै ? "  

रेवती आपली हकीकत तिला सांगू लागली ....

" एक इसम  मलै लग्न करून तुलै इथून बाहेर काढतो म्हणून रोजरातच्या पायरी आपल्या बंगल्यात न्यायचा कुटंखाण्यातून रोज जबरदस्तीने तो संभोग करायचा त्याच्यापासून मलै ते पोरं झालं तीन महिने झाले तरी काह्य बी समजतं नवहतं पोटात मासाचा गोळा वाढतो म्हणून ... 

सांगावं बी कुणाले तिथं ... सारे आपल्या जिंदगानीत मग्न . म्या तो गर्भ वाढवला  मालकालै समजलं तेव्हा तो पाडाच्या मागे लागला .म्या त्या इसमापासून गर्भार आहे हे समजताच तो बी वाडा सोडून गेला . गर्भ मोठाझाला होता माह्या जिवालै धोका होता तो पाडता यायचा नाह्य .  त्या लेकराले मी सहा वर्षाचा होईसतोवर वाढवलंन आता त्यालै मग बोर्डीग मध्ये घातलं . ..."

तिचं बोलणं संपायच्या आतच शांती म्हणाली , 

" मग आता कुठे ? आणं बापाचं नाव कोणाचं लावलं त्याचा मागं ?? "

.......   
    
        " बापाचं नाव कायलै लागते मी माह्य नावं दिल त्याले ..... मैट्रिक बारावीत पहिल्या क्रमांकान 
उतीर्ण झालं पोट्ट माह्य पण त्यालै त्या बोर्डिग मधून मह्या कधीच बाहेर नाही येऊ दिलं ....

म्हणलं शिकणं सवरण आता डॉक्टरकीच्या दुसर्या वर्षालै हाय लै पैसा लागतो सरकारी कालेज हाय तर निभतं त्याचं 

   सुट्ट्या लागल्या की येतो म्हणतो माय तुह्याकडं पण शांती तुलै सांगते ,

त्याले अजून बी मह्या सांगितलं नाह्य मी कोणता धंदा  करून  त्यालै लहाण्याचं मोठं केलं नसनं 

ठेवलं मी त्यालै आपल्या जवळ पण शिकवलं वीस वर्षात स्वतः साठी एक कपडा नाह्य घेतला 

पण त्यालै कायची कमी नाही पडू दिलं .... 

मी गेली की त्याचे मित्र मलै पाहून हसतात बी त्याले ह्याचं लय वाईट वाटतया म्हणून आता  त्याले भेटायला सालातून एकदा जाते ..... " 

तिचं बोलणं ऐकून शांती सुखावली मलै बी एखादी लेकरू असतं मापोटचं म्हणून मनातच ती कुजबूजली  , 

" ताय लै बरं केलं पोरगं डॉक्टर झालं की निगण तुयै दिस ...."

तिचं वाक्य ऐकून  तिच्या खांद्यावर हात ठेवत रेवती म्हणाली ," तेव्हा तुलै बी मी  इथून बाहेर काढीण मह्या  विज्यालै डाक्टर होऊ दै ..... 

विज्या माह्या सोबत राहयला असता तर त्यांन समाजातल्या कितेक पोरीची  अब्रू विकून भडवेगिरी केली असती पण मलै तसं नव्हतं होऊ द्यायचं त्यालै म्हणून म्या त्यालै स्वतः पासणं एवढे वर्ष लोटली दूरचं ठेवलं ......

-------

विजयला तिकडे कल्पना नव्हती त्याची आई एक वेशा आहे म्हणून 

कधी कधी तिच्या शरीरयष्टिकडे आणि रहानीमानाकडे पाहून त्याला संदेह निर्माण व्हायचा 

पण त्याला वाटायचा आपण उगाच आपल्या माय वर जाल घेतो .... 

ती तर टायमावर पैसा देऊन आपल्याला शिकवते पण  काळोखात विलिन जगणं त्याला का ठावं ??


बघता बघता  विजयते चार वर्ष एमबीबीएसचे संपून जाते .....

विजय चांगल्या मार्काने उतीर्णही होतो ... इन्टर्नशिप दोन वर्षात संपते !

विजयला एका चांगल्या सरकारी हॉस्पिटल मध्ये नोकरी भेटते ...

रेवती  कुंटखाणा सोडून विजय जवळ रहायला जाते ..... पण खर्या परिस्थितिची जान विजयला ही नसते खरं समजल्यावर विजय आपल्या ह्या आईचा स्विकार करेल

की तिचं मातृत्व एक वेशा समजून धुडकावून लावेल ??? अनेक प्रश्न आता उपस्थित 

होणार होते ...

रेवती तर सामान्य स्त्री सारखी आता जगायला लागली डोळ्यात अंजण ओढणं 

ओठाला लालभडक लिपिस्टिक लावणं तिनं सोडलं होतं .... 

पण , 

तिचा शोध घेणारे देहविक्रीकर तिला शोध घेत तिच्यापर्यत पोहचणार होते जगाच्या कानाकोपर्यात ती  कुठेही दडून असली तरी ....

विजय घरी असतांना एकदिवस दुपारीच दारावर थाप पडली ... 

रेवती आतमध्ये बसलेली होती  ....

" रेवती इथेच रहाते ना ! तुझी माय पाठव तिला बाहेर आधी ...."

असं आपल्या घरी कोणी अचानक येऊन आपल्या आई बददल अभद्र शब्दात बोलतं 

असावं विजयला विचित्रचं वाटलं त्याचं बोलणं ... तो म्हणाला ,

" कोण कुठले तुम्ही ....  हो रेवती माझीच आई पण तुम्ही कोण ? " 

त्याच्याकडे रागान बघत ते म्हणाले ," हे बघ आमचा टाईम घेऊ नको तिले आवाज दे .. वेशा होती तुही माय आन आता धंदा सोडून इथं येऊन बसली ...."

त्याच्या बोलण्याने विजयला धक्काच बसला ...

विजयने आईला बाहेर बोलवतच म्हटलं , 

" काय बोलतं आहे माय हे लोक तू आणि वेशा छी छी ..... अगं माय आहे तू माझी तू वेशा कशी होऊ शकते जन्म दिला न तू मला आज तूझं नाव माझ्या नावाला जोडलं त्याच

गर्व वाटतं मला .... मी तुला कधी माझ्या बापा बददल ही विचारलं नाही कुठे असतो काय करतो 

कारण तुला दुखवायचं नव्हतं पण तू वेशा ??? "

रेवतीला त्याला काय सांगाव सुचतं नव्हतं एवढ्यात सावकार रेवतीच्या जवळ

येऊन तिच्या अंगाशी चाळे करू लागला ....

" इथे येऊन बसली होती ते ही मला न सांगता चल इथून आताच्या आता ...."

विजयला  आता भयंकर चीड येत होती आपल्या आईचीही आणि त्या इसमाचीही .... 

त्याच रागात त्याने धक्के मारून आपल्या आईला बाहेर काढलं त्या सावकारासोबत 

पुन्हा माझ्या दारावर पाय नको ठेऊ म्हणून विनंतीही केली .

रेवती काय करणार होती .... जे घडलं ते ती विसरून गेली  तिची तब्येतही खालावली 

त्याच काळजीने .... तिची तब्येत गंभीर आहे म्हणून कुंठखाण्यातून विजयला तार गेली पण त्याने वाचून फाडून फेकून दिली .... शांतीला कळताच ती आपल्या मोठ्या बहिणीच्या भेटीला आली ..

तिने घडलेलं सर्व तिच्या जवळ कथन केलं ते ऐकून शांतीला विजय बद्दल चिड निर्माण झाली ती ताडताड त्याचा घरी गेली ....

" एवढे दिवस तुझी आई तुला पैसे पाठवतं राहिली स्वतः त्रासात जगणं तिने तुला ह्यासाठी शिकवलं 

तू स्त्रीयाचे देह विकून भडवेगिरी करू नये म्हणून ती तुझ्यासाठी झटत राहिली पण , तू तिच्यासाठी 

काय केलं ??? धक्के मारून तिला पुन्हा कुंठखाण्यात धक्कलं .... "

रागाच्या वेशात तोंडात आलं ते ती विजयला बोलली .... आणि ती तिथून निघून गेली ..

विजयला पश्चाताप झाला खरा पण वेळ निघून गेली होती ....

वेशा वस्तीत त्यांची पाऊले पडली तेव्हा त्याला समजलं 

आपल्या आईची प्रेतयात्रा स्मशानात गेली .... त्याच्या डोळ्यातून घळघळा अश्रू वहात होते .

तिकडे रेवतीची चिता जळत होती धगधगत ..... स्मशानात !

विजयनेही सौदाच केला होता आपल्या आईच्या मातृत्वाचा ....... 

   

***

रेट करा आणि तुमची मतं मांडा.

Surekha 3 महिना पूर्वी