ना कळले कधी Season 1 - Part 14 Neha Dhole द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

ना कळले कधी Season 1 - Part 14

सकाळी सकाळी सिद्धांत ला आणि आर्याला सोबतच जाग आली. आर्याने त्याच्याकडे पाहून smile दिली. बाहेर छान धुके होते. 'किती सुंदर आहे ना ही सकाळ! फार आवडतात मला ही धुके, थंडी. आपलं आयुष्य पण ह्या धुक्या सारखंच आहे. नाही का? म्हणजे पुढचं सगळंच खुप मोहक वाटतं, समोर काय आहे हे दिसत नाही पण चालायला लागलो की रस्ता पण आपोआप सापडतो.', आर्या म्हणाली. 'वा आर्या! खूप पुस्तकं वाचते का गं तू? नाही म्हणजे exact फिलॉसॉफी मांडली म्हणून विचारलं.' तिने थोडं रागानेच सिद्धांतकडे पाहिलं. 'sorry sorry!! अगं मला असं काही म्हणायचं नव्हतं. तू काही तरी चुकीचा अर्थ घेतीये. I am just saying, खरंच तू नेमक्या शब्दात बोलली.', 'Its ok sir, एवढं का explain करत आहात. तुला राग नाही ना आला?' 'अजिबात नाही', आर्या म्हणली आणि दोघंही जण हसले. सिद्धांत पुढे म्हणाला, 'खरं तर मला पण हा निसर्ग, धुके हे सगळंच खूप आवडतं, म्हणजे मला निसर्गाच्या प्रत्येक रुपाबरोबर राहायला आवडतं. त्याचं प्रत्येक रूप तितकंच सुंदर तितकंच प्रेमळ'. 'चला म्हणजे तुम्ही कुठल्यातरी गोष्टीच्या प्रेमात आहात.' आर्या म्हणाली. 'what you mean? कुठल्यातरी म्हणजे काय?', 'Nothing', आर्या पुढे काहीच म्हणाली नाही. 'अरे यार!! हे काय बोलून बसले मी.' 'आर्या बोल काय म्हणायचं आहे तुला.' 'म्हणजे, खरं सांगू का सिद्धांत सर, एकंदरीत तुमचा स्वभाव पाहता अस वाटत नाही की तुम्हाला कुठल्या गोष्टी आवडत असतील आणि निसर्ग वगैरे तर मी कल्पनाच केली नव्हती.' 'अच्छा असं होय!! पण माझं फक्त निसर्गावरच प्रेम आहे. कारण तू म्हणाली होतीस तसं तो कधीच दुखावत नाही अगं.. त्याच्याकडे आहे ते सगळं भरभरून देतो तो.' सिद्धांत म्हणाला. 'I am really very sorry!! परत एकदा थोडी personal होत आहे.पण, सगळेच सारखे नसतात. एकदा परत विश्वास ठेवून बघा नात्यांवर.' आर्या म्हणाली. सिद्धांत एकदम शांतच झाला, पण तो आता आर्या वर अजिबात चिडला नव्हता. आर्याला वाटलं आपण थोडं जास्तच बोलून गेलो प्रत्येक वेळेस ठरवते मी की आता ह्याला पर्सनल काही बोलणार नाही. पण निघूनच जातं. आता चिडेल परत माझ्यावर. 'sorry सर तुम्हाला आवडलं नसेल तर पण मला मनाला जे वाटलं ते मी बोलले.' 'Cool आर्या, मी काही बोललो का तुला? आवडला उलट तुझा सल्ला मला.' आर्या त्याच्याकडे पाहतच राहिली, 'हा नेमका सिद्धांतच आहे ना?' तिने विचार केला . 'हो मी सिद्धांतच आहे आर्या', इतक काय त्यात मी प्रत्येक गोष्टीवर तुला रागवायलाच हवं का?' 'नाही', ती म्हणाली. 'ह्याला कसं काय कळतं प्रत्येक वेळेस मी काय विचार करते ते. आता ना मी मनात पण काही बोलणार नाही.' 'हे बघ आर्या, तू खूप innocent आहे, त्यामुळे तुझ्या मनातले भाव लगेच चेहऱ्यावर येतात. आणि मला माणसांचे चेहरे वाचता येतात. त्यामुळे मनातलं ओळखणं इतकं काही कठीण नाही माझ्यासाठी.' 'बापरे !!! Danger चं प्रकरण आहे हे', आर्या मनातच म्हणाली. सिद्धांत तिचा चेहरा पाहून हसला आणि म्हणाला, 'काही danger नाही गं.' आर्या चा चेहरा एकदम पाहण्यासारखा झाला होता. आणि सिद्धांतला तिची ही अवस्था पाहून हसणं control च नव्हतं होत.
         इतक्यात विक्रांत मागून आला, 'चल सिद्धांत उतरायचं नाही का?' 'अरे हो! चल आर्या उतरायचयं आपल्याला. पोहचलो आपण आपल्या destination ला.' विक्रांत त्याला म्हणाला, 'वेळ कसा गेला कळलं ही नसेल ना तुला?' विक्रांत ने मारलेला खोचक टोमणा सिद्धांतला कळाला, त्याने आर्याकडे पाहिलं पण तीचं काही लक्ष नव्हतं. बरं झालं हीचं लक्ष नाही आहे. 'कळतं विक्रांत मला तुला काय म्हणायचं आहे, तू उतर खाली.' 'मला कुठे काय म्हणायचयं. मी फक्त प्रवास चांगला झाला, म्हणजे बघ ना रात्रच होती तर झोपेतच झाला ना सगळा प्रवास तर कळलंच नाही कसा गेला वेळ. that's it!! हेच म्हणायचं होत मला. तुला काय वाटलं?' 'हे बघ तू काही सकाळी सकाळी माझी घ्यायचीच आहे ठरवलयं काय?तुला कोणी मिळत नाही आहे का दुसरं?' 'माझं कुठं नशीब आहे बाबा तुझ्यासारख. तुलाच मिळतात दुसरे.' 'चल उतरायचं ना? कारण तू नाही सुधरू शकत. आणि माझी सकाळी सकाळी तुझ्यासोबत डोकं लावण्याची अजिबात इच्छा नाही आहे.' इतक्यात आर्याचा group आला मागून, 'Good morning सिद्धांत सर & आर्या!! आर्या चल ना पटकन खाली. इथे काय बसली आहे.' त्यांनी आर्याला जवळ जवळ ओढुनच नेलं. 'चल गेली ती.', विक्रांत म्हणाला आणि ते दोघंही बाहेर आले. सगळे जण आवरून परत भेटणार होते.
           सिद्धांत तयार होऊन खाली उभा होता. बाकीचे एक- एक येत होते . पण खरं तर तो आर्याच्या येण्याची वाट बघत होता. 'किती वेळ लावतीये ही?इथेही उशीर, पटकन नाही आवरता येत का?', इतक्यात त्याला आर्या येताना दिसली आणि तो तिच्याकडे बघतच राहिला. कारण तो तिला असं casual  look मध्ये first time बघत होता. तिचा ब्लॅक t- shirt तिच्या गोऱ्या रंगावर अधिकच खुलून दिसत होता. सिद्धांतच्या ऐवजी दुसरं कोणीही असतं तरी तिच्या कडे पाहून प्रेमातच पडावं अशीच दिसत होती आर्या. ती सिद्धांत जवळ आली. 'इथेही लवकर आलात.', दोघंही हसले. खरं तर आज सिद्धांत चा look पण एकदम cool होता.  सिद्धांत तिच्याकडे च पाहत होता. 'छान दिसतीये आर्या!!' 'thank you!', आर्या म्हणाली. 'चहा घेणार?', आर्याने विचारलं, सिद्धांत म्हणाला, 'नाही मी चहा नाही घेत. मी कॉफीच घेतो.' 'काय, चहा आवडत नाही???', आर्या ने आश्चर्यचकित होऊन विचारलं. 'त्यात काय झालं? नाही घेत मी आणि अस काय बघतिये जसं काही मी कुठला गुन्हाच केलाय. आणि मी आवडत नाही असं म्हंटलेलं नाही आहे. I am just saying की मी घेत नाही.' 'ठीक आहे. पण मग आज try करणार ना?', आर्या ने पटकन विचारलं. आणि आज सिद्धांत तिला नाही म्हणू शकला नाही.