Naa Kavle kadhi - 1-15 books and stories free download online pdf in Marathi

ना कळले कधी Season 1 - Part 15

     दोघंही चहा घेत होते. 'काय मग भारी वाटतो ना चहा प्यायला?', आर्या ने विचारलं. 'पर कॉफी का अपनाही जुनून हैे।', सिद्धांत म्हणाला. आर्या त्याच्याकडे पाहून म्हणाली, 'पर चाय मे ही सुकुन हेै।' 'सोड आर्या हा न संपणारा वाद आहे. कारण तू काही मान्य करणार नाही.' कॉफीच ग्रेट आहे.' 'मी का मान्य करू उगाचच', आर्या म्हणाली. 'एक दिवस मीच घेईल तुझ्याकडून मान्य करून. बघंच तू..' सिद्धांत तिला म्हणाला. 'बघू, असा दिवसच येणार नाही. चला निघायचं बाकीचे वाट बघत असतील.' 'आर्या, मी तुझ्यापेक्षा जास्त ओळखतो त्या लोकांना ते इतक्या लवकर येणार नाही. वेळेचा आणि त्यांचा काहीही संबंध नाही आहे.' त्यात खरं तर आर्याचेच जास्त friends होते म्हणून ती काही बोलली नाही. सिद्धांतने ते लगेच ओळखलं, 'आर्या कदाचित तुला राग आला असेल पण हीच रिऍलिटी आहे . मला नाही आवडत वेळेचा अपमान करणारे लोकं.' 'ठीक आहे सर! मला नाही वाटलं काहीच.' मग सिद्धांत तिला आजूबाजूच्या परिसराची बरीच माहिती देत होता. इतक्यात आर्याचा फोन वाजला. 'हा रेवा बोल, हा आलेच थांब तिथेच' असं म्हणून तिने फोन ठेवून दिला. 'चला आले सगळे.', खरं तर दोघांनाही तिथून उठावं वाटत नव्हतं पण ते निघाले.
         विक्रांत सिद्धांतला म्हणाला, 'किती थंडी आहे इथे, चल मस्त कॉफी घेऊ. बाकीच्यांना जाऊ दे पुढे.' 'अरे यार विक्रांत, तू घेऊन ये, मी just चहा घेवून आलो. काय!! तू चक्क चहा घेतलाय सिद्धांत! are you all right.' 'अरे इतका काय over react करतो. मी फक्त चहाच घेतला.', 'हो पण आज कसंकाय? उभ्या आयुष्यात कधी घेतला नाही तू.' 'हे बघ विक्रांत, जरुरी नाही ना आपण आयुष्यात एखादी गोष्ट आधी केली नाही म्हणून ती करायचीच नाही, किंवा ती वाईटच आहे. आणि चहाचा आर्याने खूप आग्रह केला तर तिला मला नाही म्हणता नाही आलं thats it!' 'ओहहह!!! म्हणजे आर्याचा आग्रह होता तर, हा मग ठीक आहे. तू तिला कसं नाही म्हणणार ना.' 'हे बघ विक्रांत, मी आधीही सांगितलं आणि आताही तेच सांगतोय आमच्यात काहीही नाही. जे काही आहे ना ते तुझ्या डोक्यात आहे. so please डोक्यातून हे विचार काढून टाक आधी.' 'excuse me, सिद्धांत पण तू reality accept कर, मान्य कर ना तुला ती आवडते! प्रेमात पडलाय तू तिच्या कळत नाही का तुला? की तुला मान्य करायचं नाही आहे,' विक्रांत म्हणाला. 'विक्रांत जा तु कॉफी घेऊन ये तुला खुप गरज आहे.', सिद्धांत त्याला म्हणाला. 'हे बघ सिद्धांत, मला तुझ्यासारखे माणसांचे चेहरे वाचता येत नाही. पण मला तुझा चेहरा मात्र नक्की वाचता येतो. आणि  त्यावरूनच मी बोललो. कळलं?', असं म्हणून तो निघून गेला. 'काहीही बडबड करतो विक्रांत. बरं, झालं गेला.' आर्या सगळ्यांसोबत मजा करत होती. सिद्धांत मागेच राहिला होता. इतक्यात आर्याचं लक्ष त्याच्या कडे गेलं. आर्या मागे जायला निघाली इतक्यात तिला आशिष म्हणाला, 'ए कुठे चाललीयेस? आपल्याला समोर जायचं आहे मागे नाही.' 'अरे, सिद्धान्त सर मागेच राहिले. तुम्ही जा पूढे मी आलेच.' 'नक्की ना जाऊ पुढे?', 'हो! जा रे', आर्या त्याला म्हणाली आणि बाकीचे पुढे निघाले.
        'काय एकटेच का मागे? चला ना सगळ्यांसोबत.', 'काही नाही गं.. I am enjoining my own company.',  'परत तेच, आज मी काही ऐकणार नाही चला ना सगळ्यांसोबत.', 'हे बघ आर्या, please मला force नको करू. मला नाही आवडत.आणि मी नाही enjoy करू शकत त्या लोकांसोबत.' 'सर पण एक दिवस काय हरकत आहे.' आर्या तुला एकदा नाही म्हंटलेलं कळत नाही का गं? काय लावलं आहे चला ना मला नाही यायचं तू जा ना.', सिद्धांत तिच्यावर ओरडलाच. आर्याला खूप वाईट वाटलं, एव्हाना सगळे खुप पुढे निघून गेले होते. दूर दूर पर्यंत कोणीही दिसत नव्हते. आर्या काहीही बोलली नाही.तिला एकटीला पुढे जाणंही शक्य नव्हतं. ती काहीही न बोलता सिद्धांत सोबत चालत होती. सिद्धांतला कळून चुकलं की आपण विनाकारणच चिडलो आर्यावर. त्यात आर्यानी काहीही प्रतिक्रिया न दिल्याने तो अधिकच बैचेन झाला. त्याने आर्याकडे पाहिलं तिच्या चेहऱ्यावर अगदी शून्य भाव होते.आणि सिद्धांत ला हे पाहून अजूनच त्रास होत होता. 'का मी आर्याला झालेला थोडाही त्रास पाहू शकत नाही? नकळत का होईना पण तिच्या त्रासाचं कारणही मीच असतो. मी आर्याला आनंद नाही देऊ शकत तर मला तिला दुखवण्याचाही काहीही अधिकार नाही.' तो चालताना मध्येच थांबला आणि आर्याचा हात पकडला, 'आर्या, sorry! चुकलं माझं, मला असं नव्हतं बोलायचं...' 'ठीक आहे', आर्या मध्येच त्याला थांबवत म्हणाली. 'अगं ठीक आहे काय तुला काहीच नाही बोलायचं का? तुला राग नाही आला?', सिद्धांत तिला म्हणाला. 'मला सवय झाली आता असे विनाकारण बोलणे खाण्याची, आणि काय बोलणार मी, आणि मुळात चुकी माझीच होती. मी उगाचच आग्रह धरला. extremely sorry for that!',
सिद्धांत ला काय बोलावं काहीच कळत नव्हतं. 'आर्या...' तो काही बोलणार इतक्यात आर्याने त्याच्या हातातला हात सोडवून घेतला आणि ती चालायला लागली.
          दोघंही एकमेकांना बोलत नव्हते. वातावरण खुप थंड होतं पण ह्यांच्या मध्ये चांगलंच तापलेलं होत. इतक्यात . आर्या चालता चालता मधेच थांबली, काय झालं आर्या का थांबली अशी मधताच?  आणि ती पडणार इतक्यात तिला सिद्धांत ने पकडलं. काय झालं ? are you ok?त्याने विचारलं. nothing, i am ok. आणि ती परत चालायला प्रयत्न करत होती पण तिचा पाय मुडपला होता त्यामुळे तिला चालणेही काही शक्य होत नव्हते. 'आर्या मला वाटतं की तू थोड्या वेळ इथे बाजूला दगड आहे तिथे बस', 'No sir I'm fine.' 'तू  फक्त मला म्हणते, पण तू ही काही कमी हट्टी  नाही आर्या.' असं म्हणून त्याने जबरदस्ती तिला बाजूला घेतले आणि बसवले. तिचा पाय इतका भयानक दुखत होता की तिचं त्याच्या बोलण्याकडेही लक्ष नव्हतं. आर्याला आता ते दुखणं सहन होत नव्हतं. आणि तिला असं त्रासात पाहणं सिद्धांतला. खर तर आर्याची सहन शक्ती खूप चांगली होती, पण तिने कितीही प्रयत्न केला तरीही आज तिला सहनच होत नव्हत. सिद्धांत तिच्या पायाजवळ बसला, 'आर्या, remove your shoes', 'नाही, मी नाही काढणार खुप दुखतोय पाय, मी हात पण नाही लावणार.' सिद्धांतने स्वतः तिच्या पायातील shoes काढायला घेतला. 'सर, please dont do this.' 'हे बघ आर्या, मी तुलाच बरं वाटावं म्हणून करतोय. फक्त एक 5 मिनिट सहन कर.' त्याने जोरात तिचा पाय ओढला, आर्याने घट्ट डोळे मिटले होते. 'आर्या उघड डोळे. बघ झाला तुझा पाय नीट.' तिला खरच बरं वाटत होतं. 'thank you! सर खरंच खूप बरं वाटतंय. चला जायचं पुढे, बाकीचे बरेच पुढे गेले आहेत', आर्या म्हणाली. 'हे बघ आर्या, आता ते सगळे आपल्याला भेटणार नाही, तू इथे आधी आलेली आहेस का?' 'नाही पहिल्यांदा येतीये.', 'चल मग, असेही आता आपण त्यांच्या मागे जाण्यापेक्षा मी तुला लोकल मार्केट दाखवतो खूप छान आहे.' 'wow म्हणजे shopping!! जाऊया ना आर्या लगेच उभी राहिली.' 'किती excited  असता ना तुम्ही shopping म्हंटल की..', 'सर सुरवात तुम्ही केली, shopping चा विषय तुम्हीच काढला.' 'चलो, lets go.. परत भांडण चालू होण्याच्या आत, कारण तो एक आवडता विषय आहे तुमचा.', सिद्धांत म्हणाला. 'असं काहीही नसतं, फक्त आमचं नाव झालेलं आहे. आणि प्रत्येक जण सारखा नसतो.' असं आर्या म्हणाली आणि दोघे निघाले.
         मार्केट मध्ये बरीच वर्दळ होती. 'वाटलं नव्हतं इथे इतकी गर्दी असणार बराच पॉप्युलर दिसत हे.', आर्या म्हणाली. सिद्धांत तिला गर्दी पासून बराच protect करण्याचा प्रयत्न करत होता. तो फक्त हो म्हणाला. ते एका दुकानात गेले तिथे आर्याने बरंच काही घेतलं. 'काय आर्या इतक सगळं घेतलं पण स्वतः साठी काहीच का नाही घेतलं?' 'घेतलं ना आयुष आणि आई साठी. माझ्यासाठी तेच सगळ काही आहे. आणि माझ्या कडे सगळंच आहे, अस काही special घ्यायचं नाही.' 'ok great! ', त्यांच्या बाजूलाच काही मुलांचा group होता. आणि त्यांनी आर्या वर काही तरी comment पास केली. आर्या ने ते igonre च केलं. सिद्धांत ला स्पष्ट काही ऐकू आलं नाही. 'आर्या काय म्हणाले ते?', सिद्धांत ने तिला विचारलं. 'काही नाही सर, माझं लक्ष नव्हतं.' इतक्यात ते परत काही तरी बोलले आणि हे मात्र सिद्धांत ने ऐकलं. तो direct जो बोलणारा होता त्याच्या जवळ गेला आणि त्याची कॉलर पकडून त्याला एक जोरात  ठेवून दिली. आर्याला तर काय घडलं हेच कळालं नाही. सिद्धांत त्याला परत मारणार इतक्यात आर्याने त्याचा हात पकडला. 'stop it', ती जोरात ओरडली. त्याने तिच्या कडे पाहून वर उचललेला हात खाली घेतला. तोपर्यंत ते मुलं पळूनही गेले. आर्या ने सिद्धांतला ह्या आधी रागात पाहिलं होतं पण इतकं भयानक रूप ती प्रथमच पाहत होती. 'का थांबवलं मला', सिद्धांत तिच्यावरच ओरडला. 'का म्हणजे काय? आपण मारामाऱ्या करण्यासाठी आलो आहोत का इथे? मला नाही द्यावी वाटत असल्या लोकांना उलट उत्तरं. मी मुळात लक्षच देत नाही अशा लोकांकडे. दुर्लक्ष करायचं.' 'पण ते तुझ्याबद्दल बोलत होते आणि मी ते नाही सहन करू शकत!तुला नसला फरक पडत तरीही मला फरक पडतो कारण....!' आणि तो शांत झाला. 'का पडतो फरक?' तिच्या या प्रश्नाला मात्र सिद्धांत निरुत्तर झाला. कारण ह्या ''का'' चं उत्तर त्याला ही सापडलेलं नव्हतं.


इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED