ना कळले कधी Season 1 - Part 22 Neha Dhole द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • चाळीतले दिवस - भाग 6

    चाळीतले दिवस भाग 6   पुण्यात शिकायला येण्यापूर्वी गावाकडून म...

  • रहस्य - 2

    सकाळ होताच हरी त्याच्या सासू च्या घरी निघून गेला सोनू कडे, न...

  • नियती - भाग 27

    भाग 27️मोहित म्हणाला..."पण मालक....."त्याला बोलण्याच्या अगोद...

  • बॅडकमांड

    बॅड कमाण्ड

    कमांड-डॉसमध्ये काम करताना गोपूची नजर फिरून फिरून...

  • मुक्त व्हायचंय मला - भाग ११

    मुक्त व्हायचंय मला भाग ११वामागील भागावरून पुढे…मालतीचं बोलणं...

श्रेणी
शेयर करा

ना कळले कधी Season 1 - Part 22

  सिद्धांत घरी आला तो फार थकला होता. 'काय रे सिद्धांत आज बराच वेळ झाला, खूप काम होत का?', त्याच्या आई ने विचारलं. 'नाही गं आई, आज आर्याचा accident झाला तर हॉस्पिटलमध्येच होतो इतक्या वेळ.' 'बापरे कुठे? लागलं तर नाही ना तिला जास्त? आणि आता कशी आहे ती?' 'आई किती प्रश्न विचारणार आहेस. घाबरू नको आता ती बरी आहे. सकाळी डिस्चार्ज मिळणार आहे. सगळे रिपोर्ट्स पण नॉर्मल आले.' 'मग तू का नाही थांबला? काही लागलं वगैरे तर रात्री.' 'अग तिच्या घरचे आहे, आणि तिला झोप लागली होती आता. आणि मी डॉक्टरांना बोललो ते ही म्हणाले घाबरण्याच काहीही कारण नाही. म्हणून मी आलो. सकाळी जाईल परत.' 'बर बर.. सकाळी मला पण घेऊन जा तिला भेटायला. मला पण भेटायचं आहे तिला.' 'आई तिला घरी आणलं ना की नक्की नेईल मी तुला.' 'खरंच जास्त लागलं नाही ना रे तिला?' 'आई तिला जास्त लागलं असत तर मी तिला अस सोडून आलो असतो का?' 'हा ते ही खरच आहे म्हणा. लवकर बर वाटावं तिला म्हणजे झालं', सिद्धांतची आई म्हणाली. 'हो लवकर बरी व्हावी ती.', सिद्धांत थोड्या काळजीनेच म्हणाला.
              तो जेवण वगैरे आटपून रूम मध्ये आला. आर्याचा चेहरा काहीही केल्या डोळ्यासमोरून जातच नव्हता. 'काय अवस्था झालीये तिची आणि ती ही माझ्यामुळेच. सकाळी मी थोडं शांततेत बोललो असतो तर, पण आता विचार करून काय फायदा. तिला नेहमीच माझ्या मुळे suffer करावं लागतं. आज थोडक्यात निभावल म्हणून ठीक आहे. आर्याचं जर काही झालं असत तर मी स्वतःला कधीही माफ करू शकलो नसतो. तिला थोडही काही लागलं तर मी नाही सहन करु शकत. जर तिला काही झालं असत तर.... छे!!!!!  मला तर कल्पनाच केली जात नाही. खूप कमी वेळात आर्या खूप जवळची होऊन गेली आहे. आर्या ला कितीही जपण्याचा प्रयत्न केला तरीही तिला माझ्यामुळेच त्रास होतो. नेहमी तिच्या त्रासाचं कारण मीच असतो. तस पाहिलं तर माझ्या मागे पुढे कितीतरी मुली असतात, पण त्यांचा मोह मला कधीच झाला नाही कारण त्यांची योग्यताच नाही आहे. आर्या ह्या सर्वांपेक्षा खूप वेगळी आहे.म्हणूनच मला ती जवळची वाटते. कदाचित आमच्या आयुष्यातील दुःख एकच आहे म्हणूनही ती जवळची वाटत असावी. पण आर्याच्या प्रश्नांच काय? तिच्या कुठल्याच प्रश्नांची उत्तरे नाही आहेत माझ्याकडे. आणि ती मला शोधायचीही नाही आहे. नको ह्या गोष्टीचा जास्त विचार करायला नको. ह्या जगात प्रेम, नाते ह्या गोष्टी मुळात अस्तित्वातच नसतात. ये सब मोह माया हैे!! ह्यात अडकलं की वाटेला फक्त दुःख येत दुसरं काहीही नाही. म्हणून आर्या पासून दूर असलेलच बरं. पण तिला ह्यानंतर माझ्या कडून त्रास होत कामा नये ह्याची काळजी घ्यावी लागेल. चला झोपुया परत उद्या सकाळी हॉस्पिटल आहेच. कारण हे माझ्या मुळे झालेलं आहे. ही जबाबदारी मी नाही झटकून देऊ शकत.'
           'सिद्धांत हे काय तू आता ऑफिस चे काम घरी करायला सुरुवात केली. आपलं काय ठरलेलं आहे घरी ऑफिसचं कुठलंही काम करायचं नाही.' 'ए आई, माझं आधी ऐक. मी आज ऑफिसचं काम घरी करतोय कारण, मी आज ऑफिसला न जाता घरूनच काम करणार आहे.' 'काय सिद्धांत बरं आहे ना रे तुला?? म्हणजे ऑफिसला नाही जाणार, म्हणून म्हणत आहे.' 'आई मी बरा आहे. आर्या ला बर नाही.. विसरली का तू? आणि तिला डिस्चार्ज मिळणार आहे, so मला तिकडे जायचं आहे.' 'हो पण तूच का? तिच्या घरचे आहेत ना आणि ते ही सुट्टी घेऊन डिस्चार्जच मिळणार ना आणि तसेही तिचे बाकीचे मित्र -मैत्रिणी असतीलच नं तिच्या सोबत.', सिद्धांत ची आई म्हणाली. 'हे बघ आई कोण आहे, कोण नाही मला ह्या गोष्टींशी काहीही घेणदेण नाही. मला फक्त इतकं कळतं की तिथे माझी गरज आहे आणि मी तिथे असायला हवं. बाय द वे  एरवी तर तू दुसर्यांना मदत करावी अस सांगत असतेस आणि आज इतके का प्रश्न मग? आणि ते ही आर्याच्या बाबतीत? तुला मी तिच्या घरच सगळं सांगितलेलं आहे तरीही?' 'हे बघ मला आनंदच आहे तू त्यांच्या सोबत उभा आहेस खंबीरपणे. पण ह्याआधी तू असं कधी वागलेला नाही म्हणजे हा खूप चांगला बदल आहे तुझ्यातला. कळतंय का तुला?' मी ह्याच प्रश्नाचं उत्तर मिळवण्याचा प्रयत्न करतेय की बदल कशामुळे. जे मला इतक्या वर्षात जमलं नाही ते आर्या ने करून दाखवल.', सिद्धांत ची आई म्हणाली. 'हे बघ आई, तुला काय विचार करायचा तो कर. मी फक्त माणुसकीच्या नात्याने मदत करतोय. बस्स! बर चल मला उशीर होतोय मी निघतो आवरून . तुला सोडायच आहे का?' 'नाही. मला वेळ आहे तू जा तुझा तुझा. मी जाईन माझी गाडी घेऊन.' 'ठीक आहे', सिद्धांत म्हणाला.
        सिद्धांत हॉस्पिटलमध्ये पोहचला. 'काय म्हणतोय पेशंट? बर आहे का?' 'हो बर आहे,', त्याला कॅज्युअलस मध्ये बघून आर्या म्हणाली. 'आणि हे काय सर, आज तुम्ही ऑफिसला नाही जाणार?'  'नाही आज मी घरूनच काम करणार आहे.' 'का तुम्हाला बर वगैरे वाटत नाही का? कारण मी कधीही असं सुट्टी घेताना पाहिलं नाही तुम्हाला.',आर्या ने विचारलं. 'ए मला काही नाही झालं. अगदी ठणठणीत बरा आहे मी. आणि मी सुट्टी नाही घेतली मी घरी बसून काम करणार आहे,कळलं ना.', सिद्धांत म्हणाला. 'बर काकू आणि आयुष कुठे आहे?' आयुषचा आज पेपर आहे तर त्याला जावं लागलं. आणि आई डिस्चार्जची प्रोसिजर करत आहे.' इतक्यात आर्याची आई आली. 'अरे सिद्धांत कधी आला?' 'हे काय इतक्यातच आलो. आणि हे काय काकू तुम्ही  इथे एकट्या होत्या तर तुम्ही मला फोन करायचा ना. मी लवकर आलो असतो.' 'अरे कशाला कोणाला त्रास द्यायचा आणि आम्हाला सवय आहे अरे. नेहमी नेहमी कोणाला त्रास देणार.', तिची आई अगदी सहजपणे म्हणून गेली. पण सिद्धांत ला खूप वाईट वाटलं. त्याने आर्या कडे पाहिलं. तिचा पण चेहरा एकदम उतरला होता. आर्याच्या चेहऱ्यावरचे बदललेले भाव लगेच तिच्या आईने टिपले. आणि विषय बदलण्यासाठी त्या म्हणाल्या, 'चल आर्या जायचं ना घरी? मिळाली सुट्टी. पण डॉक्टरांनी एका अटीवर दिली आहे सुट्टी एकतर वेळेवर जेवण करायचं आणि कसलंही टेन्शन अजिबात घ्यायचं नाही, आणि आता जर तू माझं ऐकलं नाही ना तर मी तुला इथेच आणून ठेवणार मग ठरव काय करायचं ते!' 'आई मी सगळं ऐकेल तुझं पण परत हॉस्पिटल नको', आर्या म्हणाली. तिचा तो चेहरा पाहून सिद्धांत आणि तिची आई दोघंही हसायला लागले. 'चल आर्या', म्हणून त्याने तिला उठायला हात दिला. त्याच्या आधाराने ती उठून उभी राहिली. आणि ते घरी जायला निघाले. ते गाडीत बसले, 'आई तुझं काय आहे तुला आज बँकेत जायचं नाही का?' 'मी आज first half off घेतलाय अगं' आयुष येईल दुपारी. मग मी जाईन.' 'आई खरच काही आवश्यकता नाही आहे. तू नको घेऊ नको सुट्टी वगैरे . आता बर आहे मला. आणि मी थांबू शकते एकटी.' 'हो आर्या मला माहिती आहे तुला एकटी राहायची सवय आहे पण मी काही ह्या परिस्थितीत एकटं सोडणार नाही.' 'काकू जर तुम्हाला काही प्रॉब्लेम नसेल तर मी थांबू का?', सिद्धांत म्हणाला. 'अरे नको तुला कशाला उगाच त्रास? we will manage.', आर्याची आई म्हणाली. 'त्रास कसला आला त्यात? मी असही आज घरी बसूनच काम करणार आहे, तुमच्या कडे बसून करेल त्यात काय? आणि तुम्हाला पण सुट्टी घ्यायची गरज नाही.' 'ठीक आहे. थांब तू. मला काही प्रॉब्लेम नाही.'
क्रमशः