AGENT - X (1) books and stories free download online pdf in Marathi

AGENT - X (1)


१.

साई हॉस्पिटल, स्पेशल वॉर्ड - एक वीस-बावीस वर्षांची मुलगी बेडवर पडून होती. आणि मी आणि मिस्टर वाघ तिच्या समोर उभे होतो. 'सिस्टिक फायबरोसिस' नांवाच्या आजाराने ती ग्रस्त होती. असह्य त्रास असून देखील तिच्या चेहऱ्यावरचं हसू ढळलेलं नव्हतं.
तिच्याकडं पाहत असताना मला एक गोष्ट जाणवली, की ज्या अर्थी मिस्टर वाघ मला या मुलीला भेटवायला घेऊन आला आहे, त्या अर्थी तो पुढं जे काही सांगणार आहे, ते याच मुलीशी संबंधित आहे.
तिला 'बाय' करून मिस्टर वाघ वॉर्डच्या बाहेर पडला. माझ्यासाठी ती मुलगी एक तर अनोळखी होती. तशात तिची ही अशी अवस्था पाहून काय प्रतिक्रिया द्यावी हे मला कळत नसल्यानं मी काहीच न बोलता मिस्टर वाघच्या मागून बाहेर पडलो. पण तिच्या नजरेत माझ्यासाठी खूप आपुलकी मात्र जाणवली मला...
स्वतः सर्वांत अधिक दुःखात असलेली माणसं दुसऱ्यांसाठी खूप प्रेमळ असतात याची प्रचिती मला तिच्या नजरेनं लक्षात आणून दिली.
मिस्टर वाघच्या कस्टमाईज्ड् '69 फोर्ड मस्टँग' मधून आम्ही प्रवास करत होतो. मी त्याला रेकमेंड केलेली जॉन विक फिल्म पाहून चार महिन्यांपूर्वी त्यानं ती अमेरिकेहून इम्पोर्ट केली होती.

(एक्शन फिल्म्सचा तो मोठा चाहता आहे. पण वेळ नसल्यानं त्याला फिल्म्स फॉलो करता येत नाहीत. म्हणून मग तोच कधीतरी वेळ असेल त्यावेळी माझ्या कडून काही फिल्म्स घेतो. असो...)

रस्ताभर मिस्टर वाघ काहीच बोलला नाही. आम्ही त्याच्या घरी आलो. मला माझ्या घरी न सोडता तो तसाच त्याच्या घरी मला घेऊन आला होता. काही क्षणांसाठी वाटलं होतं, की मी सोबत आहे हे तो विसरालाय की काय?
पण नाही! तो मुद्दामच मला त्याच्या घरी घेऊन आला होता. कारण त्याचं कन्फेशन अजून बाकी होतं. म्हणून मला त्यानं घरी जाऊ दिलं नव्हतं.
बाकी याच्या घरात येणं मला अजिबात पसंत नाही. याचं घर म्हणजे भीतीचं माहेर घर! पण स्टेअरिंग त्याच्या हातात होतं आणि शिवाय मला फोर व्हिलर येत नाही. त्यामुळं त्याच्या सोबत त्याच्या घरी येणं मला भाग होतं.
मला आणि त्याला चहा करून तो घेऊन आला. काही सांगायचं असलं, की त्याची सुरुवात ही अशी होते. मिस्टर वाघच्या हातच्या चहाने...
"आपण भेटलो, ती मुलगी कोण माहितेय?" मिस्टर वाघनं चहाचा घोट घेत मला विचारलं.
"हानिया अमीर! त्यांच्या हेल्थ रिपोर्टवर वाचलं." मी उत्तरलो.
"अनादर ब्रेव्ह गर्ल दॅट आय हॅव मेट रिसेंटली! म्हणून म्हंटलं तुझी पण तिच्याशी भेट घालून द्यावी!" तो म्हणाला.

त्यानं असं म्हंटल्यांनंतर मला लगेच ऋतुजा, एलिस व अनुषा यांची आठवण झाली. पण त्या प्रकरणांत पुढं काय झालं ते मिस्टर वाघ मला सांगणार नाही हे मी जाणून होतो. कारण जे काही सांगायचं होतं ते त्यानं आधीच कन्फेस केलं होतं. त्यामुळे ते विषय संपले होते. त्यामुळं त्या संदर्भात पुढं तो काहीच सांगणार नव्हता. आणि आता वेळ आली होती नवीन घटना उलगडण्याची...

"त्यांना झालेला आजार...?" मी वाक्य पूर्ण केलं नाही.
कसं आणि काय विचारावं हे मला समजत नव्हतं. पुढं काय वाढून ठेवलंय हेच सतत डोक्यात घुमत होतं... शिवाय हा आजार कधी न पाहिलेला, कधी न ऐकलेला...
"सिस्टिक फायबरोसिस! वाचले असशीलच तिच्या रिपोर्टवर!" तो म्हणाला.
"हो पण नेमकं काय ते काही नाही कळालं." मी स्पष्ट केलं.
"सिस्टिक फायबरोसिस", मिस्टर वाघने सांगण्यास सुरवात केली...
"हा एक अनुवांशिक आजार आहे, पण वर्षाभरात 10 लाखापेक्षाही कमी केसेस भारतात आढळतात. हा आजार फुफ्फुस, पचनसंस्था, यकृत, स्वादुपिंड, मूत्रपिंड यांना इफेक्ट् करतो. मोस्टली फुफ्फुसांवर इफेक्ट् करत असल्यानं ब्रिदिंग प्रॉब्लेम होतो. सतत बडगा उत्पन्न होतो आणि यामुळं फुफ्फुसांत इन्फेक्शन होत राहतं. योग्य आहार आणि अँटीबायोटिक्सनं याला कंट्रोल करता येतं, पण हा आजार कधीच बरा न होणारा आहे आणि याच्या ट्रिटमेंटचा खर्च न परवडणारा... पूर्वी सिस्टिक फायबरोसिसचे रुग्ण जास्त काळ जगत नसत, पण आता प्रॉपर ट्रीटमेंटनं व मेडिकेशनमुळं लाईफ स्पॅन वाढलाय. आता हे रुग्ण तीस - चाळीस वर्षांपर्यंत जगू शकतात."
मिस्टर वाघचं शेवटचं वाक्य ऐकून मी सुन्न झालो. कारण हानियाचं वय स्पेसिफिक्ली बावीस वर्ष आहे. म्हणजे... म्हणजे ती फार तर अजून आठ ते अठरा वर्षच जगू शकते.
बघायला गेलं, तर हा टाईम स्पॅनही तसा मोठा आहे. पण, मरण म्हंटलं, की माणूस कितीही वर्ष जगू द्या... जीवन कमीच वाटतं...
त्यामुळं मला तिचा मृत्यू जवळ दिसत होता आणि कदाचित तेही त्या हॉस्पिटलच्या बेडवरच... कारण तिला स्वतःचं असं काळजी घेणारं कोणीच नाही...
"मग तिच्या घरच्यांचं काय? तिला कोणीच नाही?" मी मिस्टर वाघला विचारलं.
"नाही!" तो एवढंच म्हणाला. आणि त्यानं आपला नवीन अनुभव सांगायला सुरुवात केली...

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED