true love books and stories free download online pdf in Marathi

झालेलं प्रेम अन नकळत झालेलं प्रेम

माझं नांव सूरज वारे मी राहिला सातपुडा माझें शिक्षण नवं महाराष्ट्र कॉलेज सातपुडा गाव
बारावी वय २३ रंग गोरा मला नेहमी असं वाटतं असायचं
कुणीतरी आपल्या सोबत असावी आपल्या सोबतच गप्पा
मारणारी मस्ती करणारी. चुका करणारी प्रेमात सर्वं सुख
दुःखात सामील होणारी. असं वाटतं असायचं बारावी
पास झाल्यानंतर पुढच्या वर्षाला ऍडमिशन करायला जायचे
होते.मनांत सारखं कुट तरी जागा भरून काढली पाहिजे.
कॉलेज regular batch सुरु होते.

कॉलेज मध्ये सूरज ला एक मुलगी खूप
miss करत असते.सूरज पण एका मुलीला miss करत
असतो ते हिला माहीत नसते.ती कशी दिसायला आहे हे सुध्दा माहित नसतं.ती कुठे राहते कोणत्या गावावरून आली
हें देखील माहित नसतं.

दोघाना एकमेकांचे नावं माहीत नसतात.
सुरज कॉलेज मध्ये त्याला कलेची खुप आवड असते.
तो हुबेहूब चित्र काढत असायचा. एक दिवस त्याला कॉलेजचे प्राध्यापक बोलवून घेतात मला अशी एक
चित्राची प्रिंटींग काढून पाहिजे की डोळ्यासमोरून हटली
नाहीं पाहिजे.सूरज जरा गोंधळून जातो.

सूरज घरीं जातो आणि प्राध्यापक म्हणाले चित्रांची प्रिंटिंग काडून दे कोणतं काढायचं हे ते विचार करत बसतो
सूरज च्या डोक्यात एक चक्र नाहीं दोन असतात.
सूरज सकाळी कॉलेजमध्ये जातो. एक मुलगी
तरंग गोरा डोळे नक्षीदार पाणीदार होट कोमल गोबरे
गाल बॉडी स्लिम फिट असे तिचे वर्णन होते. ती पण त्याच्याच पहिल्या वर्षाला होती. ती कॉट बेसिस मध्ये राहत होती. तिच्या मैत्रिणी सोबत असायच्या त्या तिच्या जीवाला जीव देणाऱ्या होत्या.

सुरचे मित्र कल्पेश अमित दिपक आणि उमेश हे
त्याच्या जवळचे होते सर्वात जवळचा मित्र कल्पेश सुरज च्या
शब्दाबाहेर जात नव्हता. सूरज चा पण त्यांच्या वर खुप जिवलग मित्र होता.

सुरजच सकाळी लवकर कॉलेज वर जातो
आणि मनात ठरवतो आज त्या मुलीचं नावं विचारायचं.त्या दिवशी ती कॉलेजला येत नाही.दोन तीन दिवसानंतर सूरज
तिच्या मैत्रीला विचारु का नको तीचे नाव असं कल्पेश ला विचारतो.तर कल्पेश म्हणतो. थांब थोड लगेच घाई नको.
सूरज नी सकाळी नास्ता केलेला नसतो. कल्पेश
आणि सुरज निसर्ग मिसळ होऊस वर मिसळ खात असताना
सुरज चं लक्ष्य सगळं ती कधी भेटेल कधी मी तिच्याशी ओळख होईल हें प्रश्न मनांत घोळत होते.

घरी जात असताना तीची मैत्रीण कल्पेश ला दिसते हिच असेल का कल्पेशला मनांत थोडी शंका असते तेंव्हा
सुरज वेसपा vespa गाडी घेऊन तिच्या समोर जातो ती तुजी मैत्रीण आली नाही. कुठे गेली आहे सूरज तिला बिचकत विचारतो तेव्हा ती बोलते ती गावी गेली आहे का ?
असे विचारतो. कल्पेश ला नुसते प्रश्न पडत असतात.

अचानक कॉलेजचे जुने मित्र भेटतात प्रतीक आणि स्वप्नील त्यांचा प्लॅन ठरतो या वर्षी पावसात कासे पठार ला
जायचे.हे कल्पेश प्रतीक स्वप्नील याचं बोलणं चालू असत.
सूरज तिच्या मैत्रीनीला मुक्ताला हिच्याशी बोलत असतो.
मुक्ता सांगते तिचे वडील सिरीयस(series) आहे त्यामुळे ती
सकाळी तिच्या सावंतवाडी या गावी गेली आहे.कल्पेश ला वाटतं हिच्या मैत्रिणी शी मैत्री करावी.मुक्ता ही घरीं जाते आणि तिची मैत्रिण पुर्विका हिला फोन लावते तेव्हा तीची आई फोन उचलते.अणि बोलते पुर्विका आहे का तीची आई बोलते. ती तिच्या वडीलांना अल्सर या आजारांनी त्रस्त असतात. मेट्रो हॉस्पिटलमध्ये ऍडमिट तिला पाहून वडिलांच्या डोळ्यातून अश्रू येते. पुर्विका बाबा तुम्हांला लवकर बरे वाटेल तुम्ही काही काळजी करु नका सगळं ठिक होईल.असं बोलून ती घरीं जायला निघते.त्यांत तिला डॉक्टर बोलवून घेतात.डॉक्टर सांगतात की तुज्या वडिलांची
तबेतीची काळजीपूर्वक लक्ष दयाला हवे.कांही दिवस ती घरुन परत आईला सांगते बाबांनकडे लक्ष्य दे ती यांना एकुलती एक असते.वडील वकील असतात आणि आई अकाउंटंट असते छोट्या कंपनीत.

सुरज आणि कल्पेश कॉलेजला जायला निघतात
कल्पेश सुरज ला म्हणतो.तुज्या मैत्रिणीला सांग ना माझ्या बद्दल विचारायला सुरज त्याला बोलतो माझंच कुठं अजून होईना. तु तर् लांबच.

पुर्विका थोडया दिवसानंतर कॉलेजमध्ये येते.
ती घरच्या विचाराने थोडी नाराज होती हें तिच्या चेहऱ्यावर दिसतं होते.

स्वप्निल अणि प्रतीक यांचा प्लॅन झालेला असतो.
मस्त पैकी पावसाचे दिवस सुरु झाले होते. स्वप्नील प्रतीक हें
अख्या कॉलेज मध्ये कुठं हीं जायचं म्हंटलं की आधी यांच
dicission.हें घेत असतात.एक दिवस उजाडतो सर्वं मित्र
फिरायला निघतात स्वप्निल त्यांची स्विफ्ट डिझायर घेऊन
मस्त पावसात एन जॉय करतात.प्रतिक आणि त्यांचा मित्र अजय हा साताऱ्यात हॉटेल ची सोय करतो.कारण प्रतीक
आणि स्वप्निल चा खास मित्र असतो अजय ला खुप आनंद होतो. अजय उलटं वाट पाहत असतो.अजय प्रतीक च्या गळ्यात पडतो.स्वप्नील जुन्या आठवणींना उजाळा देतो.एक
पेंक घेत ओल्ड मंक सिगारेट झुटके मारत.सर्व मित्र पावसात
धबधब्याच्या बाजूला भिजतात.आणि घरी यायला निघतात
अजय ला सांगतात तु गणपतीला ये. अजय म्हणतो सांगायची गरज आहे का.?स्वप्निल मित्र कधीच बदलत नसतात. परिस्थिती बदलत असते.

सूरज आणि कल्पेश ह्यांच्या बरोबर दिपक शी
भेट होते दिपक हा त्यांना अमितच्या ओळखीतून मैत्री होते.
अमित आणि दिपक वेगवेगळ्या ऑफिसमध्ये असतात.
अमित हा सर्वांशी मनमिळाऊ स्वभावाचा मित्र असतो.
एक दिवस सूरज ला मनमोकळ्या गप्पा मारत असताना
सूरज आणि कल्पेश आणि अमित हें दिपक कडे जातात.
दीपक जरा जास्त बोलबचन असतो. सूरज वाटत असतं दिपक कांही सल्ला देईल त्यातून काही मार्ग निघेल.तसं काहीच होत नसत.

कल्पेश हा सर्वांशी पटवून घेणारा आणि सर्वांना
समजून सांगणारा असतो.सुरज ला सारखं सांगत असतो
मुक्ता शी माझी ओळख करून दे.मुक्ता दिसायला चांगली असते.

चार पाच दिवसांनी पुर्विका सुरज ला पाहत असते
सुरज लक्ष्य नसतं.कल्पेश च्या लक्षात येते लेच्चर च्या वेळेला
येते अकाउंटंट चा तास चालू असताना सर कल्पेश ला प्रश्न विचारतात.कल्पेश ला सांगता येत नाही. कारण कल्पेश मुक्ता आली का पाहत असतो.
सुरज वेगळ्या विचारात गडून गेलेला असतो.आधी
एका मुलीच्या प्रेमात असतो.
अमित लग्नाची बोलणी चालू असते.सुरज पुर्विकाची
मैत्रीण भेटते.ती म्हणते पुर्विका दोन दिवसांनी येणार आहे.
अमित ची तारीख त्या दिवशीची होती. सुरज प्रश्न पडतो.
अमित चं लग्न आणि पुर्विका ची भेट.

अमित ची भेट स्वप्नील मुळे होते.स्वप्निल अणि उमेश
हें जिगरी मित्र स्वप्निल अणि अमित आधीचे मित्र.
स्वप्निल ला समजते सूरज आणि कल्पेश चें चक्र काय
चाललय. स्वप्निल यांना अमृततुल्य मध्ये चहा पिऊ म्हणतो.
सूरज म्हणतो स्वप्निल आपल्या कॉलेज मधली एक मुलगी
मला आवडते तीची माहिती काढ.स्वप्नील ठरवतो. सूरजला
तित पर्यंत घेऊन जायच.

कल्पेश हिकडं मुक्ता कड सारखं पाहत असतो.
मुक्ता कांही लक्ष्य देत नाहीं.पुर्विका ही थोडी घाबरून गेलेली असते कारण तिचे वडील शेवटच्या घटका अंथरुणावर मोजत असतात. पुर्विकाची अवस्था पाहून सूरज ला तिला विचारु वाटतं पण तीची मानसिकता तशी नसते. पुर्विकाच्या आईला तिच्या वडलांची काळजी वाटते.

अमितच लग्न अणि पुर्विकाला तिचे वडील सूरज ला
पुर्विका असं कोडं पडलेलं असतं. पुर्विकाच्या वडिलांना
डॉक्टर नी सांगितले असते २० दिवसाची मुदत आहे.
सूरज ला काहीच सुचत नव्हतं काय कराव.पुर्विकाच्या
घरचे ठरवतात की पुर्विकाच्या वडिलांना पुर्विकाचं लग्न
पाहिच तिची आई पुर्विकाला स्थळ पाहिला चालु करते.
पुर्विकाला काहीच माहीत नसते लग्नाचं वगैरे.

सूरज ला अमितच्या लग्नात मिरवणुकीत नाचायचे होते.
कल्पेश ला अमितच्या लग्नात मुक्ताला प्रोपोझ करायचे होते.
सूरज नी अमित शब्द दिला होता आपण खुप एन्जॉय करू
स्वप्नीलच्या लक्षात आले की कल्पय्या हिच्या माग आहे.
पण सूरज चं काय होणार. हें ध्यानात येत नव्हत.
प्रतीक नेहमी त्याची माप काढायची सवय जात नव्हती.
इकडे अमितचे लग्न होते. तिकडे पुर्विकाला तिची स्थळ शोधून काढण्यात तिची आई मग्न होते.

अजुन पर्यंत सूरज नि पुर्विकाला पाहिले नव्हते.
तरी सुरज तिच्यावर प्रेम करत होता.कारण सूरज ला विश्वास होता आज ना उद्या पुर्विका त्यांची होईल.
पुर्विकाला तिच्या लग्नाच् काहीच कळतं नव्हतं.

सूरजचं दुसऱ्या वर्षाला (second year) चालु झाले होते.
कल्पेशचं हळूहळू मुक्ता शी मैत्री झाली होती.स्वप्निल नी कल्पेश ला पाहिलेलं असतं बागेत गप्पा मारताना.
सुरज दिवस रात्र झोप येत नाही.कारण त्याचं पहिलं प्रेम
त्याला चं माहीत नसतं यशस्वी होईल का नाहीं.

मैत्री दिन जवळ आलेला असतो. कल्पेश मुक्ताला म्हणतो मी तुला सरप्राईज देणारं आहे.तो मुक्ताला काहीच सांगत नाही.मुक्ता त्याला सारख विचारत असते सांग ना
तरी कल्पेश काहीच सांगत नाही.

कल्पेश उलट बोलतो तूं मला एक वचन दे
कुणाला सांगणार नाहीं ना?
पुर्विकाला तिच्या आईने एक स्थळ आणलेलं असतं
तें म्हणजे मामाच्या मुलाशी लग्न करून दयाचे.
मामाचा मुलगा आय टी इंजिनिअर असतो.
पुर्विकाच्या घरात काय चालले हे पुर्विकाला काहीच
माहीत नसते. कारण पुर्विकाला तिच्या कॉलेज मधल्या
मुलाशी लग्न करायचे असते असं तिने तिच्या मनाशी
गाठ बांधलेली असते. आणि पुर्विकाची आई सर्वं लग्नाची
तयारी करून ठेवते. तिची तारीख काढते. हें पुर्विकाला समजते त्या दिवसापासून पुर्विकाचा चेहऱ्यावर नाराजी दिसतं असते.
सूरज ला तिचे लग्न ठरते हें माहीत करून देत नाही
कल्पेश. मुक्ताचें दिवस कल्पेश मध्ये रंग भरत चाले होते.
अमित ऑफिस ला जॉईन झाला होता. दिपक त्यांच्या कामात बिझी होता. उमेश गावाला गेला होता. स्वप्नील प्रतीक पिकनिक ला मित्रांसोबत गोव्याला गेले होते.
पुर्विकाच्यां लग्नाचा विधी चालु असतो. कल्पेश
आणि मुक्ता त्या लग्नाला हजेरी लावतात. सुरज
प्राध्यापक यांच्या प्रिंटींग च काम करण्यात व्यस्त असतो.
पुर्विका ही त्या लग्नाला तयार नसतें. तिच्या मनाविरुद्ध होत
आहे हे माहित होतं.मामाच्या मुलाच्या लक्षात येते.
तो पुर्विकाला म्हणतो काय झालं.पुर्विका तू का बोलत नाही
पुर्विका लग्नाच्या रात्री उशिरापर्यंत जागीं राहते.
तो पर्यंत तिचा नवरा झोपी जातो. हीं स्वतःचं जीवन संपवून जाते.तिचे वडील बरें होतात. सूरज सरांचं प्रिंटिंग चं काम संपुन घरीं जाताना त्याला कॉलेज मधला मित्र सांगतो. न कळतं झालेलं प्रेम या जगातून गेलं.कल्पेश याचं न विसरणार प्रेम सगळ्यात जगजाहीर झालं.सुरजला समजते सूरज एकदम त्यांच्या हृदयाला जखम झाल्यासारखं सुंन पडला होता.अक्षरशः रडताना त्यांनी जीव सोडला.

पुर्विका बोलत नव्हती.सूरज पहात होता
बोलत नव्हता. पुर्विका समोरून जायची.
ती बोलू का नको असं घाबरत होती.
तिच्या मनाच्या वाटा तिनें दाबून ठेवली होती.
सुरज नि श्वास रोखुन विश्वास हळूहळू गमावून
बसला होता.शेवटी दोन्ही हीं नाहीं भेटले एकमेकांना
जीवनात प्रेम केले आयुष्य वाया गेले....

?? समाप्त ??

इतर रसदार पर्याय