ना कळले कधी Season 1 - Part 27 Neha Dhole द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

ना कळले कधी Season 1 - Part 27

आर्याला घरी सोडून सिद्धांत घरी आला. 'बरं झालं आर्याशी ह्या विषयावर बोलणं झालं, नाहीतर माझ्या मनावरचं ओझ काही कमी झालं नसत. पण मानलं आर्याला, मी किती घाबरत होतो हा विषय तिच्या समोर काढायला, पण तिने तर अगदी सहज हाताळला. किती सहजपणे तिने माझ्या मनावरचं दडपण हलकं केलं. मी न बोलताही माझ्या मनातलं अगदी सहज हेरलं ग तू.. कस जमलं हे तुला हीच तुझ्या वागण्यातली सहजता मला तुझ्या आणखीन जवळ आणत आहे dear!!!', 'सिद्धांत जेवायला चल', त्याच्या आईने त्याला आवाज दिला आणि त्याची तंद्री भंगली. 'हो आलोच' म्हणून तो जेवायला गेला.
          'बर झालं सिद्धांतशी आज बोलणं झालं नाहीतर बिचारा उगाचच मनावर ओझं घेऊन बसला होता. मला म्हणतो टेन्शन घेत जाऊ नको. स्वतः पण तर घेतोच न किती.. पण आज पुन्हा बोलता बोलता थांबला. हे अर्धवट बोलणं, पुन्हा तो विषयही न काढणं ह्याचाच अर्थ मला उमगत नाही. काय बोलायचं असत अस ह्याला. प्रत्येक शांततेचा अर्थ नाही काढता येत रे मला. हे तुझ्या सारख कसब नाही माझ्याकडे.' ह्याच विचारांनी हल्ली आर्याची झोप उडवली होती.
        आता आर्या पूर्णपणे बरी झाली होती आणि ती तीचं तीचं ऑफिसला येत जात होती. डिसेंबरचा लास्ट वीक असल्यामुळे ऑफिसमध्ये बरेच छोटे छोटे इव्हेंट organize  केले होते आणि सगळे खूप एन्जॉय करत होते. working hours झाल्यावर रोज काहीतरी ऍक्टिव्हिटी असत. आर्याला हे सगळं नवीन होत त्यामुळे ती हे फार enjoy करत होती. सिद्धांत ला मात्र ह्याची सवय झाली होती तो फक्त फॉर्मलिटी म्हणून हे सगळं attend करत होता. आणि आर्या हे सगळं enjoy करतेय हे बघून त्याला आनंद होत होता. 'आर्या  हे बर आहे छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधायचा आणि आनंदी राहायचं', तो तिच्याकडे बघून मनातच म्हणाला. 'काय सिद्धांत तू कधी पासून हे प्रोग्राम्स शेवटपर्यंत attend करायला लागला', विक्रांत त्याला म्हणाला. 'मी दरवर्षीच करतो विक्रांत उगाचच आपलं काहीही बोलत जाऊ नको.' 'तू दरवर्षीच करतो रे, पण असा शेवटपर्यंत थांबत नाही. मी त्याबद्दल बोलतोय.' 'किती चौकश्या असतात रे तुला आणि इतकं बारीक लक्ष ठेवतो जस काय बायको आहे माझी!' ' ए मी काही लक्ष वगैरे नाही ठेवत हा तुझ्यावर. मला दुसरेही काम आहे. बर उद्या पार्टीला येणार आहे न? उद्या रात्री पार्टी ठेवलीय कंपनीने. माहिती आहे न?', विक्रांत त्याला म्हणाला. तसा तो ऑफिस पार्टी टाळायचाच पण ह्या वेळेस आर्या पण असणार म्हणून तो हो म्हणाला. 'आर्याला विचारलं पाहिजे तीचं येण्याचं', तो मनातच म्हणाला.
       दुसऱ्या दिवशी ऑफिसला आल्यावर त्याने आर्याला केबिन मध्ये बोलावले. 'काय आर्या आज संध्याकाळी येणार ना? आज पार्टी आहे न!' 'मला यायचं होत पण मला नाही जमणार.' 'का ग? काही प्रॉब्लेम आहे का?' 'नाही नाही काहीही प्रॉब्लेम नाही पण माझा कॉलेजमधल्या फ्रेंड्स सोबत already प्लॅन फिक्स आहे, so मला नाही जमणार.', आर्या म्हणाली. खरं तर आर्याला तिच्या बाकीच्या friends बरोबर जाणं खूप जीवावर आलं होतं तिला पण पार्टी सिद्धांत सोबत enjoy करायची होती पण तिला ह्या वेळेस प्लॅन कॅन्सल करणं अशक्यच होत. आर्या नाही म्हणाली तर सिद्धांतचा एकदम मूडच ऑफ झाला. 'आर्या अस काय आहे. फर्स्ट पार्टी आहे ही तुझी ऑफिस मधली. फ्रेंड्स सोबत तर काय नेहमीच चालू असतं. त्यांच्या सोबत नंतर जा or postpone  करा प्लॅन.' 'सर मला पण खरंच आवडलं असत यायला माझी स्वतःची इच्छा आहे पण त्यांना आता वेळेवर 'नाही' सांगितलं तर ते लोकही दुखावल्या जातील. सगळ्यांचीच मने सांभाळावी लागतात.', आर्या म्हणाली. 'आणि माझं काय?' सिद्धांत हळू आवाजात म्हणाला. 'काही म्हणालात का सर?', 'नाही काही नाही. मला चांगलं वाटलं असत तू आली असती तर पण ठीक आहे तुझीच इच्छा नाही दिसत आहे.' 'अस खरच काहीही नाही आहे तरीही मी नक्की try करेन म्हणजे तिकडे थोडं लवकर जाऊन मग ही पार्टी जॉईन करेन.', आर्या म्हणाली. सिद्धांत ला खर तर ती अस म्हणाली तर खूप बर वाटलं. पण त्याने तस काही दाखवलं नाही. 'Hmm बघ जमलं तर.' तो फक्त एवढंच म्हणाला. 'sure' अस म्हणून आर्या निघाली.
सिद्धांतला आता पार्टी म्हणजे एक संकटच वाटू लागलं पण त्याने विक्रांतला हो म्हणून सांगितले होते त्यामुळे आता तो cancel करू शकत नव्हता. आता काहीही झालं तरी जाणं भागच होत. 'यार ह्या आर्याने सगळा मूड खराब केला. मी काय विचार केला होता आणि हीचं आपलं वेगळंच काही तरी. म्हणजे हिच्यासाठी friends जास्त महत्त्वाचे आहेत, सगळ्यांची मने सांभाळावी लागतात म्हणे! मग माझ्या मनाचं काय? तो विचार नाही केला तिने. तस ती म्हणाली की यायचं नक्की try करते. पण ती उगाचच मला वाईट नाही वाटावं म्हणून म्हणाली असेल. पण मग अस आशेला तरी का लावून ठेवायचं यायचंच नाही तर. उगाचच खोटा दिलासा द्यायचा आपला! आर्या ला जर माझ्या बद्दल काही वाटत असेल तर ती नक्की येईल आणि आलीच नाही तर!! let's see काय होतंय ते, पण मला तर जावंच लागणार.
         'Hey सिद्धांत!!! केव्हा आलास?', विक्रांत म्हणाला 'आत्ताच आलो.' 'एकटाच आला?' विक्रांतने प्रतिप्रश्न केला. 'मग कोणी येणार होतं का? की कुणाला घेऊन यायचं होतं?' 'अरे आर्या नाही आली तुझ्या सोबत म्हणून विचारलं', विक्रांत म्हणाला. 'अरे ती कशाला येईल माझ्या सोबत.', सिद्धांत म्हणाला. 'तुझ्या सोबत नाही तर मग कोणासोबत येईल रे!' 'ते मला काही माहिती नाही आणि तुझ्या माहिती साठी ती आज येणार नाही.', सिध्दांत त्याला म्हणाला. 'बापरे आर्या येणार नाही तरीही तू आला. great!!आणि का येणार नाही ती? नक्कीच तू काही तरी बोलला असणार. बाकी सगळे प्रोग्राम्स तिने attend केले. तुझ्या मुळेच नाही येणार ती!', विक्रांत म्हणाला. 'ए विक्रांत, तुला एकतर काही महिती नसतं आणि अर्धवट माहितीवरून तू अगदी निष्कर्ष काढून मोकळा होतो. आणि मी उगाचच कशाला रागवेल तिला? तिचा already plan fix होता आणि तो ती  कॅन्सल नव्हती करू शकत thats it! झालं ऐकलं?', सिद्धांत त्याला म्हणाला. 'म्हणजे ती तुला नाही म्हणून दुसऱ्यांसोबत गेली हे चांगलं नाही केलं हा आर्याने.' 'अरे तीचं personal life आहे ती काहीही करेल आणि तिने कुठे जावं कुठे नाही हा सर्वस्वी तिचा निर्णय आहे आणि का करावे तिने माझ्यासाठी तिचे plans cancel? मला नाही पटत हे.', सिद्धांत त्याला म्हणाला. 'धन्य आहेस सिद्धांत तू', विक्रांत म्हणाला. सिद्धांत हे बोलून गेला पण विक्रांत ने नकळत त्याच्या दुखत्या नसेवर हात ठेवला होता. पण तरीही सिद्धांत त्याला आर्याची बाजू समजून सांगत होता. 'येईल का खरंच आर्या? ती म्हणाली तर होती की try करेल. पण काय माहिती मनातून म्हणाली की नुसतंच. मी का विचार करतोय इतका, ती मस्त तिच्या friends सोबत enjoy करत असेल आणि मी उगाचच वाट बघत बसलो. पण आर्या नाही तर मजा पण येत नाही आहे. पण तिला आहे का त्याच काही!!!' 
क्रमशः