TIME TRAVEL PART 2 books and stories free download online pdf in Marathi

टाईम ट्रॅव्हल भाग २

टाईम ट्रॅव्हल भाग २

जेवढी मोहीम कठीण होते..तेवढेच ह्या मोहिमेसाठी निवड होण्याचे निकष कठीण होते..अनेक चाचण्या पार करायच्या होत्या??
निकष होते : अंतराळवीराची उंची पाच फूट सहा इंचापेक्षा जास्त असू नये. जेणेकरून कॅप्सूलमध्ये त्यांना योग्य पद्धतीनं राहात येईल.
आणि ते एअरफोर्समधील उत्कृष्ट पायलट असावेत..

पहिली चाचणी : दिवसाचे ८ ते ९ तास पाण्याखाली राहून वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम..
दुसरी चाचणी : अंतराळात असलेल्या पण पृथ्वीवर कृत्रिमरित्या तयार करण्यात आलेल्या निर्वात पोकळी सारख्या वातावरणात सराव...
तिसरी चाचणी : जे काही अन्न उपलब्ध असेल त्याच्यावर जगता आले पाहिजे...अशा एक ना अनेक चाचण्या पार करून फक्त पाच जण या मोहिमेसाठी निवडले गेले.
त्या पाच हि जणांना सांगितले गेले होते कि या मोहिमेचा शेवट वाईटात वाईट म्हणजे १०० % मृत्यू होता...

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

तारीख : ३१.१२.२०२७

स्थळ : फ्रान्स व स्वित्झर्लॅडच्या सीमेवर जमिनी खाली १७५ मीटरवर प्रयोगशाळा

त्या प्रवासाला आता २ ते २.५ वर्षे उरली होती...हजारो शास्त्रज्ञ दिवस रात्र झटत होते....

मोहिमेचा मुख्य उद्देश होता भविष्यात पुढे जाऊन सर्वोत्तम तंत्रज्ञान मिळवणे आणि त्याचा अभ्यास करणे किंवा भूतकाळात पाठी जाऊन ज्या काही चुका मानवाने केल्या होत्या त्या टाळणे...आणि मुख्य उद्देश समांतर ब्रम्हांडत आपल्या सारख्या ग्रहावर जाऊन तिथल्या मानव संस्कृतीचा अभ्यास करणे..योजना अशी होती त्या २७ किलोमीटरच्या भुयारात एकदा नियंत्रित "कृष्ण-विवर" तयार झाले कि.... सर्व पाच जणांना प्रत्येकी एका मानवी आकाराच्या कुपीत बंदिस्त करायचे...आणि त्या सर्व कुपी एका बस येवढ्या आकाराच्या यानात ठेऊन "कृष्ण-विवर" मध्ये सुरक्षित आणि नियंत्रित वेगाने भिरकावाच्या होत्या..
पण सर्वात मोठा प्रश्न होता संभाषणाचा आणि संदेश वहनाचा ...कारण आतापर्यत वोयजर १ ,वोयजर २ आणि पायोनिर १० आणि पायोनिर ११ मानवनिर्मित यंत्रे यांनीच सर्वात मोठा प्रवास केला होता..आता वोयजर १ ,वोयजर २ आणि पायोनिर १० आणि पायोनिर ११ आपली सूर्यमाला पार करून अनंत विश्वाच्या प्रवासाला गेली होती...आणि आता त्यांच्याकडून काही संदेश हि येत नव्हते ...

मग सर्वानुमते एक "गोल्डन-डिस्क" तयार करण्यात आली...त्यात आपल्या पृथ्वीचे आपल्या आकाशगंगेतले स्थान दर्शविले होते..आपली सूर्यमाला.. पृथ्वीची अनेक छायाचित्रे....काही अतिमहत्वाच्या देशप्रमुखांचे वेगवेगळ्या भाषेतील शुभेच्छा संदेश...पृथ्वीवरील अनेक आवाज...जसे कि बाळाचे रडणे.. लाटांचा आवाज..जगातील अतिउत्तम निवडक संगीत...अंकित करण्यात आले...हेतू हाच कि..जर का आपल्यापेक्षा एखाद्या अतिप्रगत मानव-संस्कृतिला हि "गोल्डन-डिस्क" मिळावी..आणि त्या योगे त्यांनी आपल्याशी संपर्क साधावा..असा प्रयोग वोयजर १ ,वोयजर २ केला गेला होता... त्या "गोल्डन-डिस्क" प्रत्येक कुपीत अगदी व्यवस्थित आणि सुरक्षितपणे ठेवण्यात आल्या....

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

तारीख : ०३.०५.२०२८
स्थळ : हॉस्पिटल..
काही डॉक्टर समोरच्या स्क्रीनवर लक्ष ठेऊन होते ऑपेरेशन यशस्वी झाले होते...सर्व जणांच्या मेंदूमध्ये मोबाईल सिमच्या आकाराची चिप बसवण्यात आली होती..जर तर ती "गोल्डन-डिस्क" कुठेच मिळाली नसती तर हा एक शेवटचा उपाय... त्यात आपल्या पृथ्वीची आपल्या आकाशगंगेतील जागा अंकित करण्यात आली होती..ती अशी

"MIL-EAR-3-TERR" ( MILKYWAY-EARTH-3-TERRA)

MILKYWAY--आपल्या आकाशगंगेचे नाव
EARTH - आपल्या ग्रहाचे नाव.
३--सूर्यापासून ग्रहाचे स्थान
TERRA--आपल्या ग्रहाचे पौराणीक नाव

ह्या मोहिमेवर देखरेख तीन ठिकाणाहून करण्यात येत होती

१ ) अँपोलो कंट्रोल रूम (ह्यूस्टन, टेक्सास)
२) इंटरनॅशनल स्पेस स्टेशन मिशन कंट्रोल (मॉस्को-रशिया)

आणि तिसरे पण सर्वात महत्वाचे ठिकाण नव्याने स्थापित करण्यात आलेले "वर्ल्ड टाईम ट्रॅव्हल मिशन कंट्रोल"...ठिकाण --माऊंट ऑलम्प्स ( उंची : ७२,००० फूट) आपल्या सूर्यमालेतील ज्ञात असलेला सर्वात उंच पर्वत.... पुढचे १५ ते २० दिवस त्यांच्या विविध प्रकारच्या चाचण्या घेण्यात आल्या...त्यांच्या मेंदूंत बसवण्यात आलेल्या चिप योग्य प्रकारे काम करत होत्या तिन्ही कंट्रोल रूमवरून त्या व्यवस्थित डिटेक्ट होत होत्या..
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

तारीख : २६.०५.२०२८
स्थळ : फ्रान्स व स्वित्झर्लॅडच्या सीमेवर जमिनी खाली १७५ मीटरवर प्रयोगशाळा

आता काही तासांतच प्रवासाला सुरुवात होणार होती...मानवी इतिहासातली सर्वात महत्वाची घटना घडायला सुरुवात झाली होती... त्या पाचही जणांना मानवी आकाराच्या कुपीत झोपवण्यात आले....आणि त्या सर्व कुपी बस येवढ्या आकाराच्या यानात..नियंत्रित वातावरण्यात बंदिस्त केल्या गेल्या ...
आणि काही वेळातच ते पाचही जण गाढ झोपी गेले...नाही त्यांना झोपवले गेले....येवढा वेग त्यांना कदाचित सहन झाला नसता..ते झोपले तसे त्यांच्या मेंदूंत बसवण्यात आलेल्या चिपवरून संगणकावर संदेश येणे बंद झाले...आता ते जेव्हा दुसऱ्या "विश्वात" जागे होतील तेव्हा त्यातून संदेश येणे चालू होईल..

क्रमश :

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED