टाईम ट्रॅव्हल भाग ३ MILIND KALPANA RAJARAM DHANAWADE द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 2

    रुद्र अणि श्रेयाचच लग्न झालं होत.... लग्नाला आलेल्या सर्व पा...

  • नियती - भाग 34

    भाग 34बाबाराव....."हे आईचं मंगळसूत्र आहे... तिची फार पूर्वीप...

  • एक अनोखी भेट

     नात्यात भेट होण गरजेच आहे हे मला त्या वेळी समजल.भेटुन बोलता...

  • बांडगूळ

    बांडगूळ                गडमठ पंचक्रोशी शिक्षण प्रसारण मंडळाची...

  • जर ती असती - 2

    स्वरा समारला खूप संजवण्याचं प्रयत्न करत होती, पण समर ला काही...

श्रेणी
शेयर करा

टाईम ट्रॅव्हल भाग ३

टाईम ट्रॅव्हल भाग ३

उलट अंकमोजणी चालू झाली १०...९...८...७...६...५...४...३...२...१ आणि...जोराचा धक्का बसला आणि ते अजस्त्र यंत्र चालू झाले...सात ते आठ आवर्तने झाल्यावर हवा तेवढा वेग प्राप्त झाला...आणि हळूहळू "कृष्ण-विवर" दिसू लागले..हळूहळू "कृष्ण-विवर" मोठे होऊ लागले...आणि ते यान पाच जणांसकट अलगदपणे कृष्ण-विवरच्या दिशेने निघाले...सर्व काही सुरळीत चालले होते...तिन्ही कंट्रोल रूम च्या संगणकावर.. व्यवस्थित नोंदणी होत होती...आणि अचानक कानठळ्या बसवणारा कडकडाट झाला..."कृष्ण-विवराने" अक्राळ - विक्राळ रुप घेतले होते..काहीतरी चुकले होते..अपेक्षेपेक्षा भयंकर असे "कृष्ण-विवर" तयार होत होते...वेग प्रचंड वाढत होता...तिन्ही कंट्रोल रूमवर गडबड उडाली होती.. "कृष्ण-विवर" नियंत्रणाबाहेर जात होते... कदाचित त्याने आपल्या पृथ्वीचा घासच घेतला असता...पण डॉ. अभय अष्टेकरानीं परिस्थिती हाताबाहेर जाण्याअगोदर...त्या यंत्राला वीजपुरवठा करणारे जनरेटर संगणकाच्या साह्याने बंद करून टाकले...सर्व जण गोंधळून गेले होते..काहीच कळत नव्हते....आधी तिथे उपस्थित असलेल्या सर्व जणांची मोजणी सुरु झाली त्या पाच मोहीमवीरांसकट एकूण ४२ जण तिथे हजर होते..काही जखमी झाले होते... पण फक्त ३७ जणच आता तिथे होते...म्हणजे "कृष्ण-विवराने" आपले काम केले होते..ते पाच जण यानासकट कुठेच दिसत नव्हते ...काही कळायला मार्गच नव्हता...त्या यंत्रात फक्त आता अंधार पसरला होता...
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

तारीख : १५.०६.२१३०
स्थळ :HIP 13044--NGC 224 (आपल्या सर्वात जवळच्या आकाशगंगेतील एक ग्रह)

दोन महत्वाच्या बातम्या डिजिटल वर्तमानपत्रात एकसारख्या झळकत होत्या...

पाच हि जण एडवर्ड ,मसुको बेंजामिन ,मॅक आणि व्लादिमिर...निश्चित केलेल्या ठिकाणी फक्त १५ दिवसात पोहचले होते...वीस ते पंचवीस लाख वर्षांचे अंतर फक्त १५ दिवसात कापले गेले होते...सर्व ग्रंहावरून अभिनंदनाचे संदेश येत होते..वेगवेळ्या ग्रंहावरून त्यांचे प्रतिनिधी मंडळ...या ग्रहाला आणि त्यांचा शास्त्रज्ञांना भेट देण्यास उत्सुक होते...

आणि दुसरी बातमी ३०.०५.२१३० दिवशी जे तीन जण मानवी आकाराच्या कुपीत सापडले होते...ते हळूहळू शुद्धीवर येत होते...आणि त्यांच्या कुपीत एक डिस्क सापडली होती.. आणि महत्त्वाचे म्हणजे त्या तिघांच्याही मेंदूत चिप होत्या..त्या सर्वांचे परीक्षण चालू होते...तिघेही आता शुद्धीवर आले होते..

अजून कुठची तरी मानवी संस्कृती त्या ग्रहाच्या संपर्कात येणाच्या प्रयत्न करत होती हे नक्की...
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

तारीख : १५.०६.२०३०
स्थळ : फ्रान्स व स्वित्झर्लॅडच्या सीमेवर जमिनी खाली १७५ मीटरवर प्रयोगशाळा

"कृष्ण-विवर" आणि त्यायोगे "टाईम ट्रॅव्हल"...मोहीम फसली होती... त्या पाच जणांचा कुठेही ठावठिकाणा लागत नव्हता...दोन वर्षे उलटली होती...मोहीम आवरती घेण्याची सूचना आली होती...८ ते ९ वर्षे मेहनत करून संकलित केलेली माहिती आणि निरीक्षणे एकत्र करण्याचे काम चालू होते..डॉ. अभय अष्टेकरांच्या कारकिर्दिचा जवळजवळ शेवट होता..ते खिन्न मनाने आपल्या कक्षात बसून होते...तेवढ्यात त्यांचा समोरील फोन खणाणला...मोहिमेसाठी उभारलेल्या कक्षातून फोन आला होता...काहीतरी गोंधळ उडाला होता त्या कक्षात...नीट काहीच ऐकू आले नाही...अष्टेकर धावत धावत त्या कक्षात गेले..
आत पाय ठेवणार तोच समोर आलेल्या एका शास्त्रज्ञाने त्यांना कडकडून मिठी मारली..अनेक जणांचे हात अभिनंदनासाठी पुढे येत होते...त्यांना काहीच कळत नव्हते...तोच त्यांचे लक्ष समोरच्या अजरस्त्र संगणकाच्या पडद्यावर गेले...पाच पैकी तीन जणांच्या चिप मधून संदेश येत होता...त्यांची नावे होती एडवर्ड ,मसुको बेंजामिन

GALAXY- ANDROMEDA (देवयानी दीर्घिका)
HIP 13044--NGC 224......................

म्हणजे प्रयोग यशस्वी झाला होता???...डॉ. अभय अष्टेकर आता गणिती आकडेमोड करायला लागले होते... GALAXY- ANDROMEDA (देवयानी दीर्घिका) आपल्या MILKYWAY-- (आकाशगंगा दीर्घिका) पासून जवळ जवळ सुमारे २.५ दशलक्ष प्रकाश वर्षे अंतरावर आहे... एका प्रकाशवर्षात ९४,६०,७३,०४,७२,५८०.८ एवढे किलोमीटर असतात म्हणजे जवळ जवळ सुमारे १००००००००००००० लाख कोटी किमी अंतर...आकडेमोड आतापुढे होतच नव्हती....करोडो अब्जो मैलांचे अंतर आपण उण्यापुऱ्या २ वर्षात पार केले होते...कक्षात अनेक टेलीफोन वाजत होते...अभूतपूर्व यश मिळाले होते...

तेवढ्यात "वर्ल्ड टाईम ट्रॅव्हल मिशन कंट्रोल"...ठिकाण --माऊंट ऑलम्प्स (मंगळ) वरून संदेश आला...पाच पैकी दोन मॅक आणि व्लादिमिर ने स्वतःहून संदेश पाठवले होते...त्यांचे स्थान होते....

GALAXY- N....


वाचकांनी ह्या लेखातील सर्व ... वोयजर १ ,वोयजर २ आणि पायोनिर १० आणि पायोनिर ११,फ्रान्स व स्वित्झर्लॅडच्या सीमेवर जमिनी खाली १७५ मीटरवर प्रयोगशाळा ,"गोल्डन-डिस्क"...एकदा गुगल करून पाहावे

समाप्त.