ना कळले कधी Season 1 - Part 31 Neha Dhole द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • रहस्य - 4

    सकाळी हरी आणि सोनू गुजरात ला पोचले आणि पूढे बस ने संध्याकाळ...

  • आर्या... ( भाग १ )

    आर्या ....आर्या ही मुलगी तिच्या आई वडिलांची एकुलती एक मुलगी...

  • गया मावशी

    गया मावशी ....    दिवाळी संपत आली की तिची आठवण हमखास येते…. ...

  • वस्तीची गाडी

                                                  वसतीची  गाडी  ...

  • भुलाये न बने

                  भुलाये न बने .......               १९७0/८0 चे...

श्रेणी
शेयर करा

ना कळले कधी Season 1 - Part 31

दोघंही आपापल्या घरी गेले. आज खूप दिवसांनी दोघांच्याही मनावरचा ताण हलका झाला होता. आणि त्यात दुसऱ्या दिवशी सुट्टी होती त्यामुळे दोघेही आणखीनच relax होते.
        आर्याचा फोन वाजला, 'सिद्धांतचा फोन ह्या वेळेला. आता काय!' तिने call receive केला 'yes sir!!' 'आर्या उद्या सकाळी ऑफिसला यायचं आहे. be on time', सिद्धांत तिला म्हणाला. 'काय!!! उद्या ऑफिस.. उद्या तर सुट्टी आहे ना, मग ऑफिस कस काय??', सिद्धांतला ह्यावेळेस आर्याचा चेहरा कसा झाला असेल हे विचार करूनच हसायला आलं. 'ए रडू नको. उद्या काही ऑफिस वगैरे नाही आहे हा' 'काय सर, घाबरले ना मी! एकच तर दिवस मिळतो तेवढा झोपायला आणि आधी का म्हणालात ऑफिस आहे म्हणून', आर्याने विचारलं. 'ते तू आता seriously yes sir म्हणाली म्हणून, मला पण ऑर्डर द्यावी वाटली. बरं ऐक, उद्याचा काय प्लॅन आहे तुझा झोपण्याचा सोडून?', सिद्धांतने तिला विचारलं. 'कुठून बोलून गेले मी उद्या झोपायचं आता हेच ऐकवत राहील हा.', ती मनातच म्हणाली. 'नाही दुसरा काही नाही.' 'ok मग माझ्या सोबत येशील का?' त्याने विचारलं. 'कुठे जायच?', आर्याने विचारलं. सिद्धांत आज भलताच मूड मध्ये होता त्यामुळे आता त्याने आर्याची आणखीन घ्यायची ठरवली. 'अगं काम आहे. तू येणार का सांग? हो की नाही?', सिद्धांत तिला म्हणाला. 'अस कस? आधी सांगा तर कुठे जायच मग मी सांगेन.', खर तर आर्याला सिध्दांत सोबत कुठेही जाण्याचा काहीच प्रॉब्लेम नव्हता तरी तीही उगाचच विचारत होती. 'अग मला ना उद्या एका मुलीला भेटायला जायचं आहे माझ्या आईने बघितली आहे, तर आता मी टाळू शकत नाही आणि मला एकट्याला जायचा फार कंटाळा आलाय.', सिद्धांतला हे बोलताना फार हसू येत होतं पण तरीही तो खूप कंट्रोल करत हे सगळं फार गंभीरपणे बोलतोय अस दाखवत होता. आर्याला तर सिद्धांतचा इतका राग येत होता, तिला तर फोन कट करावा वाटला पण ती अस काहीही करू शकत नव्हती. 'पण सर मीच का? दुसरं कोणी बघा ना please मला ही फार बोर होतात अश्या meetings.', आर्या म्हणाली. 'हे बघ आर्या, मी सगळ्यांना कॉल केले. सगळ्यांचे काही ना काही प्लॅन होते म्हणून मी सुरवातीलाच विचारलं तुला की काही प्लॅन आहे का आणि तू नाही म्हणाली. म्हणजे बघ तुला नसेल यायचं तर जाईन मी एकटा.. मग काय करणार!' 'यार हा तर फार senti मारतोय!' 'ok ठीक आहे. मी येईन', ती म्हणाली. 'ok then, मग सकाळी 10 ला तयार रहा मी येईल घ्यायला', सिद्धांत म्हणाला. 'काय सकाळी 10 वाजता? इतक्या सकाळी भेटायला are you sure?? आपण भेटायलाच जातोय ना?' आर्याने विचारलं. 'किती प्रश्न असतात राव हिचे', तो मनातच म्हणाला 'हो ग बाई, तू चल ना फक्त सोबत सकाळ दुपार तुला काय फरक पडतो आणि अस कुठे लिहिलं आहे का की सकाळी भेटू नये कोणाला?', सिद्धांत ने विचारलं. 'नाही नाही मला नाही काही प्रॉब्लेम. या तुम्ही.' 'okk मग भेटू सकाळी. bye take care good night.' 'bye good night.'
     'मला कशाला घेऊन जातोय हा काय माहिती. सिध्दांतच ना कधी कधी मला काही कळतच नाही. कधी कधी काय म्हणतेय मी नेहमीच कळत नाही विचित्रच वागतो थोडासा. आता इतक्या वेळ सोबत होतो तर काहीही बोलला नाही. आणि ह्या वेळेला फोन करून सांगतोय की उद्या सोबत चल. पण उद्या सिद्धांत ला खरच ती मुलगी आवडली तर आणि त्याने हो म्हंटल तर!! नाही नाही असं कसं हो म्हणेल, पण बघायला जातोय एखाद्या वेळेस म्हणूं ही शकतो आणि मला तर हा मुद्दामुन घेऊन चालला सोबत मला काही कळत नाही का? तो असाच timepass म्हणूनच बघणार असेल, हो असच असणार ! चला झोपुया सकाळीच उठाव लागेल.'
       'आर्या खरच वेडी आहेस ग तू ! किती सहजपणे विश्वास ठेवते. आताही विचार करत बसली असेल उद्याचा. आता तू असताना कशाला बघेन मी दुसरी साधं इतकेही कळत नाही का ग तुला! चल उद्याचा दिवसच खुप छान असणार आहे, I hope तुला surprise आवडेल!' इतक्यात सिद्धांत ची आई तिथे आली. 'काय रे सिद्धांत, एकटाच का हसतोय, काय झालं?' 'काही नाही गं, बोल काय म्हणते?' 'काही नाही तू आज काही बोलला नाही म्हणून बोलायला आले होते आपलं सहजच. काय मग आर्या कशी आहे ? तिचाच विचार करत होता न आता?' त्याची आई त्याला म्हणाली. 'हिला कस कळलं?मी काय विचार करतोय.' 'आई आहे तुझी मी. तुझ्या मनातलं नाही ओळखणार तर कुणाच्या?' 'बर करत होतो तिचाच विचार बस्स!!!' 'सिद्धांत सांगून टाक ना रे आता. किती वाट बघायची अजून तिने, एकदाचं बोलून मोकळा हो, बस्स झालं आता. आणि आता जर तू बोलला नाही ना लवकर तर मी च तिच्या घरी मागणी घालायला जाईन आणि तिच्या घरचे आणि ती कुणीही नाही म्हणणार नाही ह्याची शाश्वती आहे मला.', त्याची आई ठामपणे म्हणाली. 'ए आई, तू अस काहीही नाही करणार, मी  बोलणार आहे तिला आणि हो अगदी लवकरच फक्त आता मला एकच करू दे बोलायच्या आधी तिच्या बद्दलही काही जाणून घ्यायचं आहे आणि आपल्या बद्दलही तिला फारसं काही माहिती नाही ते ही तिला सांगायला हवं. जर ह्या कश्या मधेही तिला काहीही अडचण नसेल तर मग मी बोलेल, कारण प्रश्न आयुष्याचा आहे तिच्याही आणि माझ्याही म्हणून मला अस वाटत की थोडस जाणून घ्यावं एकमेकांना.', सिद्धांत म्हणाला. 'तू जे बोलतो आहेस ते पटत मला. सिद्धांत मुळात तू चुकीचं काहीही बोलत नाही आहे पण अरे प्रेम ही गोष्ट अस सगळं बघून नसते होत. ती सहज होणारी गोष्ट आहे, इतका विचार नसतो करायचा बाकीच्या गोष्टींचा आणि आर्याला तर तू किती चांगला ओळखतो. ती खरच खूप चांगली आहे.' 'हो आई ती चांगलीच आहे आणि मी तर म्हणेल की सगळ्यात चांगली, पण तिच्याही काही अपेक्षा असतील ना? त्या जाणून घ्यायला नको का? आणि  आधी आपण नात्यांमध्ये जे काही भोगलं आहे त्यामुळे सहजासहजी नाही ठरवता येत गं काही.', तो म्हणाला. 'हो पण सगळे नसतात रे सारखे!', त्याची आई म्हणाली. 'Exactly आई,आर्या मला हेच म्हणत होती, my god काय सारखे विचार आहेत तुमचे!', सिद्धांत म्हणाला. 'चला म्हणजे माझ्या शिवाय तुला आता कुणीतरी समजून सांगणार आहे! बघ विचार कर तू जे करणार ते योग्यच असणार ह्यात मला शंकाच नाही पण लक्षात ठेव आता उशीर नको!' 'yess bosss! आता नाही करणार उशीर पण आधी मी ठरवलं ते करू दे त्या संदर्भातच उद्या तिला भेटणार आहे, मग ठरवू पुढे काय करायचं ते!' 'चला चांगलं आहे. तू स्वतःहून एक पाऊल पुढे टाकतोय ह्याचा आनंद आहे मला. I hope उद्या तुला तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील, ज्यावर तुझा पुढचा निर्णय अवलंबून आहे.', सिद्धांतची आई त्याला म्हणाली. 'हो मलाही तेच वाटतंय', सिद्धांत म्हणाला.
क्रमशः