Pralay - 28 books and stories free download online pdf in Marathi

प्रलय - २८

प्रलय-२८

" मी म्हटलं होतं माझी गरज पडेल तुम्हाला , पडली की नाही......." वेडा आबाजी म्हणजेच विश्वनाथ म्हणाला .
भेटीच्या संरक्षणासाठी वारसदारांची सभा होती कधीकाळी वेडा आबाजी आयुष्यमान प्रमाणेच सभा प्रमुख होता . पण त्याच्या राजकीय महत्त्वाकांक्षेमुळे त्याला सभेतून काढून टाकलं होतं . त्याने भैरव बरोबर हात मिळवणी केली होती . काळी भिंत पाडून देण्यासाठी. काळी भिंत पाडण्याचा अधिकार फक्त रक्षक राज्यातील राजाला , त्याच्या सैन्याला किंवा वारसदारांच्या सभेला होता . इतर कोणीही त्या भिंतीला पडायला गेले तर त्याचा मृत्यू नक्की असायचा . म्हणूनच भैरवने (मारुतांचा पुजारी ) विक्रमा सोबत लांब पल्ल्याची चाल खेळली होती . मात्र तंत्रज्ञ मंदारच्या मुलांनी ऐनवेळी घोळ घातला होता .
त्यामुळे भैरव आणि पार्थ विश्वनाथ कडे आले होते . ज्या बियांची थैली आयुष्यमान भरत कनिष्क आणि चैतन्य उत्तर-दक्षिण टाकत गेले होते . ती बियांची थैली वारसदारांच्या सभेतील एका अत्यंत ज्येष्ठ व जुन्या सदस्याने बनवून मोहिनी च्या घरी ठेवण्यासाठी दिली होती . त्याला म्हणे भविष्यातील काही घटना दिसायच्या . त्यामुळेच मोहिनीला सांगतानाच सांगितलं होतं की ' एके दिवशी योध्या प्रमाणे वेश परिधान केलेल्या युवक येऊन तुला स्वतःहून त्याची मदत देऊ करेल त्यावेळी ही थैली त्याच्या हवाली करायची . पण विश्वनाथने त्यातही मध्ये भेसळ केली होती . बियांमध्ये भेसळ करून त्या बियांचा वापर करून त्याला भिंत पडता येईल अशी व्यवस्था त्याने केली होती . एकदा का त्या बीया वारसदारांच्या हस्ते योग्य जागी पडल्या , की भिंत पाडणं त्याला सहज शक्य होतं .

विश्वनाथने भैरव बरोबर करार केला होता . त्यावेळी त्यांने एक अट घातली होती . वारसदारांच्या सभेतील सर्व ज्येष्ठांना मारून टाकायचं . साऱ्यांचा मृत्यू झाल्यामुळे तरूणांना कोणी मार्गदर्शन करणारा शिल्लक राहिला नाही . ठरल्याप्रमाणे भैरवाने सर्व जेष्ठांचा खात्मा केला . याच मोक्याचा फायदा घेत विश्वनाथने वेडा आबाजी बनत आयुष्यमान ची गाठ घेतली . बियांची पिशवी पश्चिमेकडील काळ्या भिंतीच्या जवळच्या गावातील एका घरांमध्ये असल्याचे सांगितले...

मग ती बियांची पिशवी शोधण्यासाठी ते चार वारसदार काळ्या भिंतीत जवळील सर्व गावांमध्ये फिरू लागले . मात्र बियांची पिशवी मोहिनी कडे होती हे कोणालाच माहीत नव्हतं . जेव्हा आयुष्यमान स्वतःहून त्या ठिकाणी गेला व मोहिनीच्या वडिलांना मदत केली . त्यावेळी त्याला बियांची पिशवी मिळाली . पण त्या बियांच्या पिशवीमध्ये विश्वनाथने भेसळ केली होती .

" चल लवकर आमच्या पुढच्या योजना भिंतीच्या पडण्यावरती अवलंबून आहेत .....
भैरव म्हणाला आणि ते तिघेही काळ्या भिंतीकडे निघाले.....

बाटी जमातीच्या टोळ्या मारूतांच्या जुन्या महालाकडे निघाल्या होत्या . काही दिवसांच्या प्रवासानंतर त्याठिकाणी पोहचल्याही . पण तिथे ना भैरव ( म्हणजेच मुख्य पुजारी ) होता ना पार्थ होता . तरीही बरेच दिवस त्या तिथेच राहिल्या . ज्या टोळीने मारूतांची मदत केली होती ती टोळी फक्त पुरुषांची होती . ज्यांना इतर टोळ्यांमधून काही ना काही करण्यासाठी काढून टाकलं होतं . आता तेच इतर सर्व टोळ्यांवरती हुकूमशाही गाजवत होते . सुरुवातीला इतर टोळ्या त्यांच्या गोड बोलण्याला फसल्या....
" जलधि राज्याने आपल्याला आश्रय दिला आहे खरा पण आपल्याला नागरिकांची वागणूक मिळते का...? त्यांचे लोक आपल्याकडे कोणत्या नजरेने बघतात....
असाच त्यांचा युक्तिवाद असायचा . आणि ते काही प्रमाणात खरेही होतं . पण बाटी जमत पूर्णपणे जलधि राज्यांमध्ये मिसळण्यासाठी काही काळ जाणार होता हे त्यांनाही लक्षात यायला हवं होतं . पण या उग्र वादामुळे बऱ्याच टोळ्या त्यांच्या पाठोपाठ आल्या . मात्र जुन्या महालात पोचल्यावर ती त्या टोळ्यांमध्ये विरोधाचे सूर उमटू लागले . बऱ्याच टोळ्या गुपचूप सोडून निघून गेल्या होत्या व काही जाण्याच्या मार्गात होता .
मात्र आता जुन्या महाला भोवती महाराज विश्वकर्मा व इतर तुकडीने घेराव टाकला होता . पण त्यांना सुरुवातीला स्वतःच्याच राज्यातील लोकांसोबत लढावे लागणार होतं . कारण महालातून टोळ्यांनी जलधि राज्यातील काही नागरिकांना अंधभक्त बनवून त्यांच्यासोबत आणलं होतं . जेव्हा त्यांचा वेढा पडला त्याच वेळी " सिरकोडा इसाड कोते " असे ओरडत भक्तांचा हल्ला झाला . एकेक अंधभक्त चार चार सैनिकांसोबत लढत होता .

मात्र जलधि राज्या सोबतही एक बाटी जमातीची टोळी होती . बासरी वाजवून भक्तांना शांत करण्याची कला या टोळीला अवगत होती . मग महाराज विश्वकर्मा नि तिची युक्ती वापरत जलधि राज्यातील त्या अंध भक्तांना शांत करत पकडलं....

आता मात्र महालातील टोळ्यांना समर्पण करण्यावाचून पर्याय नव्हता . तरीही त्या हरप्रकारे लढण्याचा प्रयत्न करत होत्या. सरतेशेवटी सर्वांना पकडण्यात यश आले . त्यांना पकडून महाराज विश्वकर्मा चा ताफा जलधि राज्याकडे निघाला.....

तंत्रज्ञ मंदार , म्हातारा मांत्रिक , आयुष्यमान व ते दोन बुटके यांचा अग्नेय राज्यातील काम झालं होतं . जाताजाता महाराजांकडे ते भेटायला गेले...
" महाराज तुमच्या अतिथ्याबद्दल मनापासून धन्यवाद . पण अजून एक विनंती आहे .....
तंत्रज्ञ मंदार त्यांना म्हणाला
" प्रलय जागृत करण्यासाठी लागणारी एक गोष्ट जी तुमच्या सुरक्षेत आहे ती एकदा तपासावी म्हणतो.....

" ठीक आहे चला माझ्याबरोबर..... अग्नेय महाराजांबरोबर सर्व निघाले...
अग्नेयांच्या वारसदाराविना त्या वास्तुत प्रवेश करता येत नसे . अग्नेय महाराज पुढे उभारले त्यावेळी ते प्रवेश द्वार उघडले . अग्नेय महाराज आणि पाठोपाठ सर्वजण आत गेले . त्या वर्तुळाकार वास्तूच्या केंद्रस्थानी वर व खाली समान अंतर ठेवून एक पेटी तरंगत होती . महाराज त्या पेटीचा इतिहास सांगत होते . पेटीच्या संरक्षणार्थ केलेल्या गोष्टी , गेलेली जीव या साऱ्या गोष्टी ऐकवीत होते . पण प्रवेशद्वार अजूनही उघडे होते . त्या विशाल प्रवेशद्वारातून सुरुकु सहजपणे आता आला . उडत आलेल्या सुरूकुने पेटी तोंडात पकडली . आयुष्यमान तोपर्यंत गुपचूप बाहेर जाऊन थांबला होता . सुरुकु बाहेर येताच तो सुरुकु बरोबर उडाला . ते दोघेही पेटी घेऊन प्रलयकारिकेकडे निघाले होते

ती पेटी चोरीला जाताच उडत्या बेटांवरती एकच गोंधळ माजला . सर्व सैनिकांना सूचना देण्यात आल्या . सुरुकु वरती नगरातील सर्व तोफा धडाडू लागल्या . पण सुरुकु हा सुरुकुच होता . प्रत्येक तोफेचा मारा चुकवत तो पुढे जात राहिला व शेवटी बेटावरून बाहेर पडला . पण संपूर्ण नगरात आगीचा तांडव मागे राहिला .

" आयुष्यमान का म्हणून असं करेल ..... म्हातारा मांत्रिक म्हणाला
" त्यावर ती नक्कीच प्रलयकारिकेचं नियंत्रण असणार..... महाराज म्हणाले
" पण ते शक्य तरी आहे का ....? पुन्हा एकदा म्हातारा मांत्रिक म्हणाला
" प्रलयकारीकेच शरीर हे मोहिनीचं आहे . ती प्राण्यांना नियंत्रण करू शकत होती . आत्मबलिदानाचा विधी झाल्यानंतर तिच्या शक्तीमध्ये नक्कीच वाढ होऊन ती माणसांनाही नियंत्रण करू शकत असणार . आपल्याला फक्त एवढेच माहिती पाहिजे की आत्मा बलिदानाच्या विधीनंतर तो तिच्यासमोर गेलाय का ......? तंत्रज्ञ मंदार म्हणाला
" हो गेलाय तो . तिला ठार करायला गेला होता . त्यावेळी तो तिच्या नियंत्रणाखाली गेला असावा . पण आता काय करायचं .....? " तो म्हातारा मंत्री काळजीच्या स्वरात म्हणाला .
" आता प्रलय जागृत करण्यासाठी लागणारी गोष्ट तिच्या हाती लागली आहे म्हटल्यावर प्रलय केव्हाही जागृत होऊ शकतो . एकदा का तो जागृत झाला की हळूहळू त्याची शक्ती वाढत जाणार . एकदा तो संपूर्ण शक्तिशाली झाला की मानव संपलाच म्हणून समजायचे . म्हणून तो संपूर्ण शक्तिशाली होण्याअगोदर तीन राजांनी एकत्र यायला हवे , अन्यथा विनाश नक्की आहे ........." तंत्रज्ञ मंदार बोलत होता

राजा अग्नेय अग्नी कक्षात गेला .
" घडलेली घटना अनपेक्षित होती पण अशक्य नव्हती . प्रलयकारीकेला काहीही अशक्य नाही . तीन बहिणी काहीतरी करतीलच पण आपल्यालाही हालचाली कराव्या लागतील . तीन राजांचे एकत्र येणे आता कधी नव्हे ते अत्यंत महत्त्वाचे झालेले आहे .....
ज्वालेतून आवाज येत राहिला
प्रलय जागृत होण्यासाठी आता फार काळ शिल्लक राहिला नव्हता . एकदा प्रलय जागृत झाला की हळूहळू मानवाची मानवता संपणार होती नि एकदा का मानवता संपली की मानव संपणारच....

क्रमःश....

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED