varas - 8 books and stories free download online pdf in Marathi

वारस - भाग 8

8
दुसऱ्या दिवशी रविवार होता.शाळेला सुट्टी असल्याने कविता पण आज घरीच होती.सुमारे सकाळचे अकरा वाजले असणार ,कविता भरभर पावलं टाकत विजूचा घरी जात होती,त्या तशा वातावरणात पण तिला दारुण घाम फुटला होता... घरात घुसत नाही ते लगेच चिमणी दारातच उभी होती,,शाळेत पण तिला शिकवायला कविताच असल्याने दोघींची चांगलीच गट्टी जमली होती,
"तुम्ही विजू दादा साठी आलात ना इथं,,पण विजू दादा तर झोपूनच आहे"
"काय, अकरा वाजता",तिला त्याच्या त्या शहरातल्या या आळशी सवयीचा आधीच राग यायचा आणि त्यात आज तर घाई पण होती.
"चल आपण जाऊन उठवू त्याला",अस म्हणत दोघीही त्याच्या खाटे जवळ गेल्या.आजूबाजूला अनेक पुस्तक अस्ताव्यस्त पडलेले होते.कदाचित रात्रभर काहीतरी वाचत बसला असणार तो.. तिने जोरजोरात हलवून विजूचा उठवलं,तस त्या कुंभकर्णाला उठायला वेळ लागला,पण उठलाच शेवटी.
"विजू एक खूप महत्त्वाची बातमी आहे"
"आता काय झालं?"
"विश्वास पहिलवान आणि बाळू काका रात्रीपासून गायब आहेत,कुणालाच त्यांचा पत्ता ठाऊक नाहीये"
ते ऐकताच विजू ताडकन उठून बसला.
त्याने लगबगीने प्रातः विधी उरकले.तोपर्यंत टाईमपास म्हणून कविता चिमणी सोबत गप्पा मारत बसली.

विजू थोड्या वेळाने तिथे आला,त्याने चिमणीला एक बोरकुट ची गोळी देऊन तिथून जायला लावलं आणि येऊन कविता समक्ष बसला,

"हा तर काय म्हणत होती,धनाजी दादा आणि बाळू काका"
"हो काल रात्रीपासून हरवले आहेत.काल मुसळधार पावसात कुठे गेले कुणास ठाऊक?,,गावात सगळीकडे सापडलं पण त्यांचे देह पण कुठे सापडले नाहीत,म्हणून ते मेले आहेत हे पण म्हणता येणार नाही"
"म्हणजे श्रीधर चा तर्क खरा होता तर"
"कुठला तर्क"
"त्याच्यामते पाटील यांचा हात आहे या सगळ्यामागे,,आणि आता कदाचित बाळू काका आणि विश्वास सुद्धा त्यांना जाऊन मिळाले असावेत"

"काय!!!".
"हो"
आणि विजुने श्रीधर ला जे जे काही वाटत होत ते सर्व कविता ला सांगितलं.

"काही कळेनासं झालंय रे,इतक्या कमी वेळात एव्हढी माहिती झाली आहे ना कि नेमकं काय करावं हे समजत नाहीये.... बरं ते सोड,आता पुढे काय करायचं आपण?"

"मला वाटत आता त्या वाड्याला भेट देण्याची वेळ झालीच आहे"

"म्हणजे?".
"म्हणजे आज आम्ही जाऊन बघतोच कि नेमकं तिथं काय चालू आहे ते!!"

"त्या वाड्यात?नाही ,कशाला!! आधीच लोक बेपत्ता होतंय आणि त्यात तुम्ही तिथं जायचं म्हणताय"

"कुणाला तरी जावंच लागेल ना? आणि तिथे गेल्याविना काही कळणं अवघड आहे!!"

"ठीक आहे,जर का तू ठरवलं असेल तर मी कस अडवणार तुला?,,पण जे करशील ते विचार करून कर म्हणजे झालं"

"चिंता नसावी,,माझ्या डोक्यात एक नामी युक्ती आधीपासूनच तयार आहे,,आता फक्त योग्य वेळेची वाट बघतोय मी.
दुसरा दिवस उजाडला,काल रात्री अजून दोन माणसं गायब झाली होती...ठरल्याप्रमाणे विजू,श्रीधर,सूर्या,तुकाराम आणि महेश,,कुणालाच न कळू देता त्या वाड्याकडे निघाले... दाट आभाळ दाटून आला होत... हलकासा रिमझिम पाऊस सुरु झाला होता.धुक्यानं पूर्ण असमन्त भरून गेला होता..धुकं एव्हढी पसरली होती की पाच फूट दूरवरचा माणूस पण व्यवस्थित दिसणार नाही.बघता बघता जंगल सुरु झालं.सुरुवातीलाच उंच उंच झाडी,त्यात वरून डोंगर उताराचा प्रदेश...आमराई ओलांडल्यानंतर काहीच वेळात ती टेकडी नजरेत आली.बाजूनेच एक ओढा वाहत होता.

"महेश,विजू,सूर्या तुम्ही तिघे ओढ्याच्या बाजूने जावा,मी आणि तुका आणि मी सरळ मार्गाने वर जातो,लक्षात ठेवा अण्णा म्हणजेच माझे वडील,विश्वास दादा आणि बाळू काका यापैकी कुणीही दिसलं तरी लगेचच या जागेवर परत यायचं आणि दुसऱ्या गटाची वाट बघायची,,पण वाड्यात घुसायच नाही"

ठरल्यानुसार सगळे आपापल्या मार्गाने वर निघाले.धुकं अजून सुद्धा ओसरली नव्हती.हवेत गारवा भयानक वाढलेला होता.
विजू,सूर्या आणि महेश आरामात ओढ्याच्या बाजूने निघाले,,त्या ओढ्यात पाय टाकताच हाड गोठवणार थंड पाणी लागलं... तिघेही जण थंडी ने आता थरथर कापत होते.हळूहळू वर वाड्याकडे सरकत होते.
"विज्या वाडा दिसाया लागलाय"
"चालत रहा ,जोपर्यंत कुणी दिसत नाही तोपर्यंत"
पाचच मिनिटांत आता वाड्याचा दक्षिण दरवाजा दिसत होता.बाजूच्या भिंती तर राहिल्याच नव्हत्या...जर का धुकं नसती तर वाड्याच्या आतला भाग आरामात दिसला असता,पण यावेळी काहीच नजरेत भरत नव्हतं.
"काय येळ काढलाय राव तुम्ही,काही दिसत नाहीये"
"अरे आम्हाला काय माहित आज धुकं पडतील ते"
"बरं मग आता काय करायचंय,बाहेरून तर काहीच दिसना गेलं"
"आतमधे जाऊ ना मग"

"आय विज्या,खुळ्यागत काय बोलतंय, श्रीधर नाय बोललाय ना?"

"आर पण पुन्हा माघारी जाऊन पण काही फायदा आहे का?माझं ऐका चला आतमधे"
"आर पण आत मधी ते लालची भूत लागलं तर?"
"काय घाबरट आहे राव तुम्ही दोघ,तुम्ही थांबा इथंच मी जातो पुढं"
आणि एव्हढं बोलून विजू मधे घुसला.आता तो आत गेला म्हंटक्यावर सूर्या आणि महेश ला पण काही पर्याय नव्हता...ते दोघेही त्याच्या मागेमागे चालत आले
"तू लेका विज्या आम्हाला पण मारशील "
"मी आहे ना,,काय चिंता करता तुम्ही,,चला"

तिघेही आतमध्ये घुसले.आता येताच एक कुबट सडलेला वास येत होता.जागोजागी वेली झुडपे वाढली होती.पाऊस झाला असल्याने बऱ्यापैकी चिखल पण होता ..
विजू ने सोबत टॉर्च आणला होता,तो टॉर्च तेवताच वटवाघूळ थव्यानेच बाहेर आले.
"विज्या,मला वाटत आपण निघावं इथून,च्या मारी माझं लगीन पण झालं नाहीये,,इतक्यात मरायचा माझा इरादा नाही बघ"
"सूर्या तू नावाचाच पहिलवान आहे,नुसता घाबरट"
विजू बोलत असताना अचानक त्यांना दोन सावल्या त्यांच्याकडे येताना दिसल्या.
"विज्या...विज्या माग बघ "

मागे बघताच त्या सावल्या त्यांच्याचकडे येत होत्या.जशा त्या सावल्या सरकू लागल्या तसा एक उग्र दर्प येत होता,तिघांनाही नाक बंद करावं लागलं.विजू ने टॉर्च तिकडे वळवली तर ती पण अचानक बंद पडली,,,महेश आणि सूर्या ने सोबत आणलेल्या कुऱ्हाडी बाहेर काढल्या.... पण तो उग्र वास वाढतच होता,,फक्त सावल्याच दिसत होत्या,त्या कुणाच्या आहेत हे मात्र कळत नव्हतं.

"कोण हाय तिकडं?"
समोरून आवाज आला,आणि विशेष म्हणजे तो आवाज पूर्ण वाड्यात घुमत होता....

"विज्या हा आवाज.....अरे हा आवाज तर आपल्या तुक्याचा हाय"
"काय "
"हो,तुक्याचा"
"तुकाराम.....",विजू ने आवाज दिला.आणि जसा आवाज दिला तसे तुकाराम आणि श्रीधर दोघेही बाहेर आले.
"आयला तुम्ही होते का इथे,,मला वाटलं पाटील हाय"

एकमेकांना बघून सगळ्यांच्याच जीवात जीव आला,
"चला आता आपण पाच आहोत,सापडून काढू त्यांना,,ए पण हा घाण वास कसकाय येतोय रे?"
"अरे इथं कुणी येत नाही साफसफाई करायला,म्हणून येत असेल हा वास,,ते सोडा आपण कशासाठी आलोय ते लक्षात आहे ना?"
"तू तुझी ती टॉर्च लाव गड्या, काही दिसत नाहीये,,हा घाण वास एव्हढा वाढलाय ना मला वाटत कुठंतरी हेला हागुण गेलाय,किंवा उंदीर मरून पडलंय, या अंधाराचे पाय पडला तर काही खरं नाही बघ"

विजू टॉर्च ला वरून मारत होता पण ती काही चालू व्हायचं नाव घेत नव्हती.तो उग्र वास वाढतच होता,,अस वाटत होत आता या वासामुळे डोकं फुटतंय अस वाटत होत.
आणि तेव्हढ्यात कुणाचा तरी कण्हण्याचा आवाज येऊ लागला...कुणीतरी सरपटत सरपटत येतंय अस वाटत होत

"ऐकू येतंय का काही,,कुणीतरी आपल्याकडे येतंय,, श्रीधर तुझे अण्णा तर नाही ना …??"

"अण्णा..... विश्वास....बाळू काका ... कोण आहे बाहेर या.आम्ही तुम्हाला घेऊन जायला आलोय",श्रीधर इकडे तिकडे बघत बोलू लागला.

"आह्ह्हह,आयेईई ,अह्हह्ह्ह.... कुणाची हिम्मत झालिया माझ्या वाड्यात यायची....आयेईई",कुणीतरी समोरून कण्हत होत.त्या आवाजात अनंत वेदना होत्या.आवाज तर येत होता पण कुणी दिसतच नव्हतं,

आणि तेव्हढ्यात विजुची टॉर्च सुरु झाली,,आणि समोर जे दृश्य दिसत होतं ते बघून सगळ्यांचेच पारडे फुटले.... डोळ्यांवर कुणाला विश्वास बसत नव्हता
समोर एक चित्र विचित्र जीव होता,,दुरून तर एक माणूस दिसत होता,,सात आठ फूट लांब हात पाय बारीक पण एकदम लम्बट... अमाप केस वाढलेले... तोंडातून दोन सुळे बाहेर आले होते...डोळे एकदम लाल भडक...तो जीव एका माणसावर बसून त्याचे लचके तोडत होता...बाजूला पण एक छिन्न विच्छिन्न देह पडला होता,...त्या जीवाला कदाचित उठता येत नव्हतं...जीव लावून त्याने पुन्हा एकदा तोंड उघडलं,
"आयईईई..... मला लै भूक लागलीया... आता तुम्हाला बी खाणार... अयिईई"
तो जीव बघून सगळ्यांचीच फाटली.समोर तो जीव हळूहळू पुढे सरकत होता,सरकत होता म्हणण्यापेक्षा सरपटत होता असच म्हणावं लागेल.त्याच ते असुरी रूप बघून या पाचही जणांनी लागलीच धूम ठोकली..जिथून तिघे जण आले होते त्याच दिशेने पाचही जण निघाले..आता मात्र टॉर्च मुळे सगळीकडे प्रकाश दिसत होता... अजूबाजू प्रकाशात आता नुसते हाडांचे सापळे दिसत होते...श्रीधर पळता पळता अचानक कशात तरी पाय अडकून खाली पडला...आणि समोर जे बघितलं ते बघून त्याची वाचाच बसली... पाटील,विश्वास आणि बाळू काकांची मुंडके तिथं पडली होती.... श्रीधर ला दरदरून घाम फुटला.
विजू ने लगबग करत कसतरी श्रीधर ला उचललं,श्रीधर ला रडू आवरत नव्हतं,तशा स्थितीत कसतरी करून पाचही जण निसटले... विजू ला अझूनही स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास नव्हता बसत... श्रीधर ला दातखिळी बसली होती... महेश,तुका,आणि सूर्या या तिघांच अझूनही रडणं थांबत नव्हतं.तिघेही दमून भागून ओढ्या शेजारी येऊन पडले.श्रीधर ओढ्यात उतरला आणि त्याने तोंडावर एकदा पाणी मारलं.विजु श्रीधर कडेच बघत होता,नेमकं तो करतोय काय हेच त्याला समजत नव्हतं.

आणि तेव्हढ्यात वाड्यातून जोरजोरात हसायचा आवाज येऊ लागला,
"हि हि हि हि.... माझ्यापासून अजून कितीदा पळणार.... या परत या...लै भूक लागलीया"
आणि तो आवाज येताच महेश,तुका,सूर्या अचानक उठले आणि पळत पळत वाड्याकडे जाऊ लागले.विजू ला कळत नव्हतं हे काय होतंय.तो त्यांना अडवायला गेला तर त्यांनी विजूला सुद्धा ढकलून दिल.श्रीधर ला तर उठायच पण बळ नव्हतं राहील.बघता बघता तिघेही जण वाड्यात घुसले.

"आले पोरानो...या या...आणि तू ...तुला नाय सोडणार,तू पण येशीलच कि आज न उद्या,हि हि हि हि"पुन्हा तोच आवाज वाड्यातून आला.
तिथं काय चालू होत कुणालाच कळालं नाही.पुन्हा त्या वाड्यात जाण्याची हिम्मत उरली नव्हती,इकडे श्रीधर ते सगळं बघून शुद्ध हरपून बसला होता.विजू हळुवार चालत चालत श्रीधर कडे आला... त्याने अलगद त्याला उचललं,अंगात होते नव्हते तेव्हढं त्राण घेऊन कसाबसा तो गावाकडे निघाला



इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED