varas - 6 books and stories free download online pdf in Marathi

वारस - भाग 6

6
सरांनी हि पूर्ण कहाणी सांगितली अन एक सुस्कारा टाकला.त्यांनी हळुवार प्रत्येकाकडे बघितल.महेश,सूर्या, तुका ,कविता यांच्या चेहऱ्यावर गोंधळ स्पष्ट दिसत होता.आपल्या गावात अस काही झालं असेल याची कल्पनाहि त्यांनी कधी केली नसणार,,श्रीधर ला अनेक प्रश्न पडले अस वाटत होत,,तर विजू,विजूच्या चेहऱ्यावरची लकेर सुद्धा बदलली नव्हती,

इकडे श्रीधर ने त्यात प्रश्न टाकला,"सर पण जर का तो वाड्यात कैद आहे,मग त्याने वाड्याच्या बाहेर येऊन हत्या कशा केल्या?"

"हा चांगला प्रश्न विचारलास बेटा.काय आहे ना कुठलंही मायाजाल असलं ना तरी त्याची एक कमजोर कडी असतेच...तो त्या वाड्यात कैद आहे असं म्हणण्यापेक्षा तो तिथून बाहेर पडू शकत नाही. बाहेरचा प्रकाश मग तो कुठलाही असो त्याला अडवून ठेवतो,पावसाळ्यात बऱ्याचदा आभाळ दाटून आलेलं असत,आणि जर का त्यात अमावस्या असली तर मग प्रकाश नाहीच.अशावेळी मध्यरात्रीला तो बाहेर पडतो... जरी त्याच्याकडे सम्पत्ती असली तरी लालच मात्र जात नाही ना... त्याच खाण्याच लालच पण सुटलं नाहीये... म्हणून मग आम्ही त्याला पावसाळ्यात अमावस्येला बोकुड देतो...जेणेकरून त्याला खाण्यात त्याचा वेळ निघून जातो.आम्ही नेहमी बोकुड संध्याकाळी ठेवतो,गावाच्या सरपंचांचा हा मान असतो,मान म्हणण्यापेक्षा दुर्दैव.पण यावेळी मात्र हेच दुर्दैव त्यांच्यावर तुटून पडलं आणि त्यांचा मृत्यू झाला आणि त्यांनतर च तर सगळंच तुम्हाला माहित आहेच"

सरांचं बोलणं समाप्त होत नाही ते लागलीच विजू ओरडला,"परफेक्ट,एकदम परफेक्ट"

"काय झालं रे तुला?"

"अरे महेश हि एकदम परफेक्ट स्टोरी आहे बघ...मी शहरात जाऊन अरकेओलॉजिस्ट झालो.अशा अनेक ठिकाणी जाण्याचा योग मला आलेला आहे.बऱ्याच पुरातन जागा जिथे काहीतरी विशेष माहिती लुप्त असेल ना त्या ठिकाणी अशा कथा आहेच.मग त्यामुळे सामान्य जनता त्याठिकाणी जात नाही,, कुणी त्या जागेला हात लावायची हिम्मत करत नाही आणि तिथे जो काही ठेवा आहे तो अबाधित राहतो.खरंतर भूत प्रेत काही अस्तित्वात नसतात.. हो पण अशा कथा त्यांना जन्म देतात आणि त्यात झालेले भास,कुणी पसेवलेल्या अफवा अजून तेल ओटायचं काम करतात.
सर मला सांगा हे पुस्तक जे आहे ते कुणी लिहिलंय?"

"अरे विजू ते तर माहित नाही.मी जेव्हा तुमच्या वयाचा झालो तेव्हा मला हे वरीष्टांकडून कळालं."

"आणि अजून कुणाला माहित आहे याबद्दल?"

"म्हणजे बघ गावातले वरिष्ठ लोकच याबद्दल जाणतात,,मी ,सरपंच,तात्याराव जे आता हयात नाही,विजुचे बाबा जे सुद्धा हयात नाही,आणि पाटील"

"काय पाटील सुद्धा?"
"हो का नाही,ते सुद्धा एक वरिष्टच आहेत ना?"

"म्हणजे बघा,माझ्या बोलण्याचा रुख तुम्हाला कळत आहे ना?हि माहिती मुद्दाम लुप्त ठेवली,,आणि अशाच लोकांना कळवली गेली जे वरिष्ठ आहे आणि ते प्रामाणिक राहतील.मी पक्क सांगू शकतो की तिथे भूत प्रेत काहीच नाही."
"म्हणजे तुला नेमकं काय म्हणायचं आहे?"
"म्हणजे मला म्हणायचं आहे की हे सगळं कुणीतरी त्या सम्पत्ती साठी करत आहे...कुणाच्या तरी आड माझे बाबा आले असतील,किंवा सरपंच किंवा नकळत गण्या.त्यामुळे त्यांचा काटा काढला गेला.मला वाटत गावात आणखीन काही मृत्यू होतील,,आपल्याला त्या वाड्यात जाऊन बघावच लागेल की तिथं नेमकं चालू काय आहे"

"विजुच बोलणं सुद्धा खरं असू शकत,,इतिहासात सुद्धा अशे बरेच उदाहरण आहेत",कविता विजू ला दुजोरा देत म्हणाली.

"ते सगळं ठीक आहे पोरी,पण फक्त तुमच्या तर्काच्या जोरावर जी एव्हढी मोठी कथा आहे ती तर नजरेआड टाकू नाही शकत ना आपण?"

"हो तुमचं हि बरोबर आहे,,पण उपाय तर करावाच लागेल"

"बघा पोरानो,,तुम्हाला जे पण काही करायचं आहे ते सुरक्षा बाळगून करा.इतक्यात तुमचे वरू चौफेर उधळू देऊ नका,तिथे आधीच फार मृत्यू झाले आहेत.लोकांनी डोळ्याने चित्र विचित्र गोष्टी बघितल्या आहेत... सगळे जण सोबत रहा,तुमच्यातील कुणी गमावन परवडणार नाही,,,आणि हो आता रात्र फार झाली आहे,मला वाटत तुम्ही सगळ्यांनी निघावं आता इथून...आणि हो एकट्या दुकट्याने तिथं जण टाळा... विशेषतः विजू... "

हे सगळं ऐकल्यानंतर पोरांनी सरचा निरोप घेतला आणि प्रत्येक जण आपापल्या घरी निघालं.बरेच जण गोंधळले होते,नेमकं ती कथा खरी का विजू चा तर्क यामध्ये त्यांची गफलत चालू होती.विजू मात्र खूप आत्मविश्वासी वाटत होता.
जाता जाता कविता अचानक विजू जवळ येऊन म्हणाली,
"विजय राव,,आज आई बाबांनी घरी जेवायला बोलावलं आहे तुला.विसरले तर नाही ना?"

"अरेच्या.. मी काका काकूंना सांगितलंच नाही बघ... आता ते पण वाट बघत असतील.. आई बाबांना सांग ना नंतर कधी येईल म्हणून"

"काय बोलतोस,,होणारा जावई येतोय म्हणून पुरणपोळी बनलिये घरी,,आणि तू येत नाही... बघ विचार कर,आज नकार दिला तर दुसरी मुलगी शोधावी लागेल"

"ऐ कविता,अस नको बोलुस यार"

"मग ठरव नेमकं काय करायचं ते"

"ठीक आहे बाबा येतो जेवायला.",मग ते दोघे काकांकडे परवानगी मागायला गेले.सरळ होणारी सून जर विचारत असेल तर कोण नकार देणार ना!! काका आणि काकूंनी परवानगी दिली आणि मग काय आज आज होणाऱ्या सासरीच ताव मारला जाणार होता.

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED