varas - 10 books and stories free download online pdf in Marathi

वारस - भाग 10

10

दुसरा दिवस उजाडला,,त्या दिवसाप्रमाणेच आज तिघेच पहाटे पहाटे वाड्याकडे निघाले होते.आज तस वातावरण साफ वाटत होत... गारवा पण कमी होता.हळूहळू करत करत तिघेही टेकडीच्या पायथ्याशी पोहोचले.मागच्या वेळेसच अनुभव आजही श्रीधरच्या अंगावर काटा आणत होता.
"लक्षात ठेवा आपण चाललो तर आहे,तिघे जात आहोत,येताना एकत्र तिघेही येउ नाहीतर एकही नाही,,कारण तिघांपैकी एकजण जरी वाचलो तरी त्या प्रसंगाची आठवण आपल्याला आतुन मारून टाकेल",श्रीधरच्या बोलण्याचं दुःख कळून येत होत.

विजू त्याला उत्तर देत बोलला,"आज नाही श्रीधर ,आज मी तसा प्रसंग पुन्हा येऊच देणार नाही"
झालं तर मग,विठ्ठलाचं नाव घेऊन तिघेही निघाले टेकडी चढायला ,टेकडी चढताच समोर वाडा उभा होता.वाड्यात आतमधे घुसणार तोच कविताने मृगरस तिघांवर सुद्धा शिंपडला,त्याचा वास तसा फारच वाईट होता,पण आतमधे जो दर्प येणार होता त्यापेक्षा तरी सुवासिक.

त्यांनतर तिघेही एकदाच आतमधे शिरले,आतमधे घुसताच पुन्हा तेच सुरु झालं,,तोच उग्र डोकं फिरवणार घाणेरडा वास...विजू आणि श्रीधर ने सोबत आणलेल्या कुऱ्हाडी बाहेर काढल्या.कविता ने पण त्या दृष्ट शक्तीला आटोक्यात आणायचं म्हणून जे काही सामान पाहिजे होत ते तयार ठेवलं होतं.

हळूहळू जस ते त्या वाड्याच्या मधोमध जात होते तसतसा तो उग्र दर्प वाढत चालला होता.पण आज बरच चालल्यानंतर पण तो जीव काही दिसला नव्हता.आता तर ते त्याच जागी आले होते जिथे मागच्या वेळी त्याचा सामना झाला होता.पण नवल म्हणजे इथंही कोणीच नव्हत.
"विजू ,कुठं लपून बसला असावा तो?"

"माहित नाही रे,,पाहिजेल तर इथेच होता,चल अजून आतमधे जाऊयात"
आणि ते तिघेही वाड्याच्या आणखी मध्ये जाऊ लागले.दोघांच्या मधात बरोबर कविता उभी होती....
वाड्यावर ठिकठिकाणी वेली झुडपं उगलेली होती.कोळ्याने जाळी तयार केली होती.चालता चालता ते आता वाड्याच्या विरुद्ध दिशेला आले होते... कुणीच दिसत नाही म्हणून तिघेही परेशान झाले.त्या ठिकाणी असणाऱ्या विहिरी शेजारी जाऊन उभे राहिले.काही वेळ असाच गेला कुणीच दिसला नाही... आणि एकाएकी अचानक त्या घाणेरड्या वासाच प्रमाण भसकन वाढलं.डोकं फुटून मेंदू बाहेर येतो का काय अस वाटत होत...आणि पुन्हा तोच जुना कण्हण्याचा आवाज सुरु झाला.
"अन्नन्नन्न...."

"आई....काय आहे हे",कविता ने जोरात किंचाळी मांडली... पुन्हा समोर तोच जीव होता.पण यावेळी तो अझूनच लांबलचक दिसत होता.
श्रीधर ने तिला मागे ओढत कुर्हाड त्या जिवा समोर धरली,

"हि हि हि हि....अन्नन्नन्न... मला मारशील पोरा..या वाड्यात फक्त माझंच राज्य चालत...हि हि हि हि... ये माझ्याकडं...मला भूक लागलीया... ये... तू त्या दिवशी ओढ्याच्या पाणी पिऊन सुटला पर आज नाय सुटायचा...ये"

"अरे हाड... गटारीच्या सडक्या किड्या... आज तुझा ती डाव नाही चालणार माझ्यावर... आमच्याकडं मृगरस आहे.. तुझे शब्द आज निरर्थक आहे...आज तुझी खांडोळी करीन मी.. माझ्या बा ला खाल्लं...महेश,तुक्या, सूर्या याना पण खाल्लं.. "
,श्रीधर चे डोळे लाल भडक झाले होते ,त्याच्या आतली बदल्याची आग आज बाहेर येऊ भडकली होती.

तेव्हढ्यात विजू कुर्हाड घेऊन पुढे आला.... आणि.. आणि...आणि त्यांनी ती कुर्हाड वर उचलून सरळ श्रीधर च्या डोक्यात घातली.क्षणार्धात कपाळमोक्ष झाला..रक्तच रक्त जागोजागी दिसत होतं...विजू ने श्रीधर वर ज्याप्रमाणे वार केला ते बघून कविता ला स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता,,ती एकाएकी बेंबीच्या देठापासून ओरडली

"श्रीधर.....!!!!!!,विजू काय केलंस हे,श्रीधर ला मारलं?",आणि किंकाळी मारतच ती मटकन खाली बसली.

"हि हि हि हि... मला माराया निघाला होता.. ये तुझं धड खातो मी आता",पुन्हा तो जीव ओरडायला लागला.कविता डोळे बंद करून बसली होती...विजूला नेमकं काय झालं होत??...बराच वेळ शांततेत गेला,तो जीव जीवाचं रान करून श्रीधर च्या शरीरा जवळ आला होता,त्याचा लचका तोडणार तेव्हढ्यात आतापर्यंत शांत असलेला विजू बोलला,

"अहो बस झालं बाबा... किती माणसं खाणार?तुम्हाला जे तेहतीस भोग चढवले ते बस नाही का झाले जे आता माझ्या मित्राला पण खाणार"
त्याने एका हाताने कविताला पकडलं आणि पुन्हा बोलायला सुरवात केली,"हि बघा ,तुमच्या मुक्तीची आणि मला ही सगळी सम्पत्ती मिळवण्याची चावी"

"सोड विजू मला..आणि हे काय बरळतोय तू?"

"का चुकीचं बोललो?तूच आहेस ना शेवन्ताची वारस,म्हणजे या सम्पत्तीची चावी!!"
त्याने हातात असलेली कुर्हाड उचलली आणि हवेत भिरकावून सरळ त्या चित्र विचित्र जिवाच्या मानेवर चालवत धडापासून वेगळी केली.

ते मुंडक वेगळं होताच त्यातून आवाज आला,"हि हि हि हि ,लालची साला,,तूझ बी माझ्याप्रमाणेच हाल हुनार, हि हि हि हि",अन एव्हढं बोलून त्याने डोळे बंद केले.

"विजू काय चालू आहे हे,,आणि तू काय केलंस हे?"

"सांगतो ,,सगळं सांगतो...
ती कथा आठवते जी आपल्याला सरांनी सांगितली होती,,तीचा थोडंफार भाग सोडला ना तर ती पूर्णतः बरोबर होती.
सरांचं म्हणणं बरोबर होत,सम्पत्ती शेवन्ताची होती.आणि तिची मालकी तिच्या वारसांकडे सरकली,,पण सर हे सांगायचं विसरले कि मकरंद ला सुद्धा वारस होतेच,,आणि जशी शेवन्ताची वारस तू तसाच मकरंद चा वारस म्हणजे मी आहे...

"काय...काय बोलतोय विजू"

"खरं बोलतोय मी,

एव्हढी मोठी सम्पत्ती आणि आणि ती शापित राहावी हे कधी पटलच नाही,,ना मला,,ना माझ्या बापाला,,आणि ना कधी माझ्या आजोबाला.
माझे आजोबा हे त्या मकरंद चे तिसऱ्या पिढीचे वारस होते.वारस कसा ठरतो हे तर मला माहित नाही...किंबहुना ते मला कळलं नाही कारण त्या पुस्तकाचा पुढचा भाग त्या त्या ग्रँथालयात कुठं लपून राहिला ते कळलंच नाही मला पण त्याचा जास्त काही फरक पडणार नाही,असो

पण त्या मकरंद चे सर्व अवगुण आमच्यात जशास तसे उतरले..खरंतर वारस असणं म्हणजे पण एक प्रकारचा शापच.त्या मकरंद ची असंतुष्ट इच्छेचे दृष्टांत मला विनाकारण येतात.. कितीही दुर्लक्ष केलं ना तरी त्या वाड्यातल्या प्रतिमा स्वप्नात येतात,,तो मकरंद आम्हाला आवाहन करत असतो कि या...वाड्यात येऊन आपली सम्पत्ती गोळा करा.. ती गडगन्ज सम्पत्ती रोज स्वप्नात दिसते,,मग तिचा उपभोग तर घेतलाच पाहिजे ना!! या सगळ्या दृष्टांताची सुरुवात झाली माझ्या आजोबा पासून,,त्यांनाच सगळ्यात पहिले ती सम्पत्ती स्वप्नात दिसायची पण माझे आजोबा म्हणजे सगळ्यात मूर्ख माणूस... त्यांना फक्त एव्हढंच माहित होत की या वाड्यात गडगन्ज सम्पत्ती आहे..मग काय तो माणूस थेट वाड्यात माझ्या आजीला घेऊन आला,त्याला वाटलं की दोघेही सम्पत्ती घेऊन राजा राणी सारखे त्या वाड्यात राहतील ,पण सम्पत्ती मिळवणं इतकं सोपं असतंय व्हय,, तो जसा इथे आला तसा त्यांचा सामना झाला मकरंद च्या लालची अत्मेशी.खरतर ती आत्मा बऱ्याच दिवसांपासून कैद होती... त्याला तर फक्त मुक्त व्हायचं होत,..तो सरळ आजोबाला घेऊन त्या खजिन्याकड गेला ,, माझ्या आजोबांची लालच म्हणजे मोठी कमजोरी,,सोन बघताच तो खुश झाला आणि सरळ जाऊन त्याच्यावर लोळू लागला... मकरंद ला हेच तर पाहिजे होत.जसा त्या सोन्याला स्पर्श झाला त्याच क्षणी त्या खजिन्याचा कैदी झाला माझा आजोबा आणि मकरंद मुक्त... त्या खजिन्याचा कैदी होणं म्हणजे नरकच.. माणसाच शरीर माती होऊन जात,जेमतेम मुंडक मात्र उरत,आजोबा सोबत पण तेच झालं,त्या शरीराची माती होत असताना आजी ने एका हाताने आजोबाला पकडलं होत आणि त्यामुळे आजीचा एक हात पण गेला..आणि या धक्यात तिची वाचा पण गेली.

मग काय आजी घरी पळून आली आणि आजोबा एक सडकी,अपरिपूर्ण शरीर बनून तिथेच वावरू लागले....

त्यानंतर चे वारस म्हणजे माझे वडील...माझा बा... माझा बा म्हणजे महाकपटी आणि हुशार माणूस..जगाला दाखवण्यासाठी अतिशय चांगला,प्रेमळ पण आतून तेवढाच खालच्या पातळीचा... ते हुशार होते,त्यावेळेस शाळेचे मुख्यध्यापक.त्याना सम्पत्ती मिळवायची होती पण ते असाच नाही गेले ... त्यानी बराच अभ्यास आधी केला..त्या वाड्याची सर्व माहिती मिळवली... माझ्या आजोबाला येऊन दररोज भेटून त्याने अनेक प्रश्न विचारले,पूर्ण वाडा पिंजला आणि त्याना जे काही कळालं ते सगळं एका पुस्तकात लिहून ठेवलं.. त्या पुस्तकाचे दोन भाग केले.. एक भाग जो ती कथा आहे आणि दुसरा भाग जो तुला सापडला...
त्यांना हे सुद्धा कळालं कि जी व्यक्ती या सम्पत्ती मुले कैद होते त्यांना जर का तेहत्तीस मनुष्यांच भोग चढवला तर ते एका पूर्ण शरीरात येऊ शकतात,,भलेही ते शरीर मग अस सडक का असेना... त्यांचं माझ्या आजोबांवर थोडं तरी प्रेम होत..त्यांची अशी अवस्था बघवत नसल्याने त्यांनी तेहत्तीस माणसांचे भोग चढवून आजोबांना एका शरीरात आणलं आणि मग त्यांचा जीव घेऊन मुक्त केलं....
त्यांनी मग सम्पत्ती मिळवण्यासाठी पण तेच केलं.माझ्या आईला घेऊन ते या वाड्यात आले... पण यावेळी त्यांना सत्य पूर्णपणे माहिती होत...तो खजिना निमंत्रिक करायला रक्त पाहिजे होत आणि ते म्हणजे अशा स्त्री च रक्त जी शेवंतांची वारस आहे.आणि माझी आई पण वारस होती शेवन्ताची.त्यांनी ते रक्त सम्पत्ती वर सांडून तिला स्पर्श केला....त्यांना वाटलं आता सम्पत्ती आपली झाली पण यावेळी सुद्धा जे व्हायचं तेच झालं.कुठेतरी माझा बा चुकला होता.आता यावेळी कैदी बनला होता माझा बा आणि त्यांनी पहिलं शिकार केली ती माझ्या आईची.

माझ्या बा नन्तर चा वारस मात्र मी.....मी लहान असतानाच माझ्या वडिलांचं अस झालं.पण मी खचलो नाही,काहीही करून ती सम्पत्ती मिळवायची अस ठरवलं होतं...मी माझ्या वडिलांकडून एक गोष्ट शिकलो होतो ती म्हणजे कुणावरही जीव ओवाळायचा नाही.
सर्वप्रथम मी ते पुस्तक ग्रंथालयातून चोरल.पण नशीब खराब म्हणून तो एकच भाग होता...मग मी अरकेओलॉजिस्ट ची डिग्री घेतली.भारतात असणाऱ्या अशा अनेक विक्षिप्त वास्तूंची माहिती घेतली,आणि शिक्षण सम्पवून सरळ धडकलो गावामध्ये.गावात यायच्या आधी सरळ जाऊन मी वाड्यात गेलो... तिथं माझ्या बा च असलं सडक शरीर दिसलं.तेव्हा तर एक मुंडक मात्र तिथं होत.मी त्यांना सम्पत्ती बद्दल विचारलं तर त्यांनी मला हा सगळा इतिहास सांगून दूर जायला लावलं...पण मला माहित होत,मी त्यांच्यापेक्षा एक पाऊल नक्कीच पुढं होतो... मला फक्त ती एक गोष्ट माहित करून घ्यायची होती की ज्यामुळे माझे वडील अपयशी झाले... पण ते काही सांगायला तयार नव्हते.मग मी पण त्यांना एक करार करायला भाग पाडल.

क्रमश:


इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED