'अरे यार ह्याला राग आला वाटतं, श्शी.. काय करु आता? तो पण बरोबर म्हणतोय तो थोडीच दरवर्षी राहणार आहे, पण त्यानेही समजून घ्यायला नको का की असेल मला काम? पण विहान चिडला, सहसा तो चिडत नाही, काय मागत होता तो मला थोडासा वेळच ना! काय झालं असतं मी हो म्हणाले असते तर? उगाचच नाही म्हणाले. काय करू विहान सोबत जाऊ का? हो जातेच. तो पुन्हा पुन्हा नाही येणार इथे.', अाणि तिने विहानला कॉल केला, त्याने तो कट केला. 'बापरे विहान अस कधी करत नाही. आज भलताच राग आलेला दिसतो ह्याला.' विहान please pick up the phone तिने message ड्रॉप केला. 'चलो म्हणजे मैथिलीला फरक पडतो मला काय वाटत ह्याचा. तीर तो निशाने पर लगा हेैे boss! I know मैथिली तू मला नाही म्हणू शकणार नाही आणि आज तर तू येणारच!', मैथिलीने परत फोन केला आता विहानने उचलला. 'का फोन करत आहेस मैथिली? मला एकदा सांगितलेलं कळालं गं की तू नाही येणार मग परत परत तेच का?', विहान तिला थोडं रागातच म्हणाला. 'विहान आधी ऐकून घे मी काय म्हणते, मी येतेय.. कुठे आणि किती वाजता ते सांग फक्त', मैथिली म्हणाली. 'काही गरज नाही. नको उगाचच तुझे काम सोडून येऊ. असाही मी कोण आहे?', विहान म्हणाला. 'विहान sorry ना! सोड ना आता राग. मी येत आहे न!', 'मैथिली चक्क sorry म्हणतिये. चला दगडाला पण पाझर फुटतो हे ऐकलं होतं, आज अनुभवतोय.', विहान मनातच म्हणाला, 'अरे विहान काहीतरी बोल', मैथिली म्हणाली. 'नाही नको अग खरंच, मी कॅन्सल केला आता प्लॅन', विहान म्हणाला. खर तर आता त्यालाही जायचं होतं पण इतक्या लवकर मानणार तो विहान कसला. 'बर ठीक आहे', मैथिली म्हणाली. 'अरे यार आता ही ठेवते की काय? थोडं जास्तच ताणल का आपण?', विहानला टेन्शनच आलं. 'माझ्या सोबत नाही येणार का? मला शिकायचं आहे पतंग कसा उडवायचा?', मैथिली म्हणाली. 'ohh hoo मैथिली well played!', विहान मनातच म्हणाला. आता तो तिला नाही म्हणू शकणार नव्हता, 'ठीक आहे, मी text करतो तुला. पोहोच तिथे.' 'मैथिली great आहेस हा तू मानलं तुला! बरोबर कळलं तुला कस हो म्हणून घ्यायचं, चला त्या निमित्याने हे ही कळलं की मला राग आला की फरक पडतो तुला', विहान मनातच विचार करत होता.
ठरलेल्या ठिकाणी विहान आणि मैथिली आले. आज मैथिलीने खूप छान काळ्या रंगाचा चुडीदार घातला होता आणि त्यावर काळ्या रंगाचे झुब्बे तिचं सौंदर्य आणखीनच वाढवत होते. विहान तर तिच्याकडे बघतच राहिला. 'Hii विहान, काय बघतोय?', मैथिली म्हणाली. 'मैथिलीची वाट पाहतोय अजून ती आलेली नाही.' विहान म्हणाला. 'ए, तो डोळ्यांवरचा गॉगल काढ आणि चष्मा लाव तुझा. मी मैथिलीच आहे.', ती म्हणाली. 'अरे तूच का? मी ओळखलंच नाही बघ तुला, म्हणजे तुला अस पाहायची सवय नाही आहे न', तो म्हणाला. 'तू परत सुरू झाला', मैथिली म्हणाली. 'एकही संधी सोडत नाही तू विहान', मैथिली म्हणाली. 'अग मैथिली पण माझ्या साठी इतकं तयार होऊन यायची गरज नाही गं. मला तशीही तू आवडते', विहान म्हणाला. 'किती flirt करतो रे तू. सगळ्या मुलींसोबत असाच बोलतो का? आणि मुळात मी तुझ्यासाठी नाही आलीये तयार होवून.', मैथिली म्हणाली. 'सगळ्यांशी का बोलू? अस मला थोडी सगळ्या आवडतात. मला तर तूच आवडते आणि माझ्यासाठी नाही तर कुणासाठी झालीयेस गं मग तयार', विहान म्हनाला. 'अरे सण आहे आज आणि सणाच्या दिवशी सगळेच तयार होतात हं. आणि आता माझी मस्करी पुरे. चल पतंग उडवायचा ना?', मैथिली म्हणाली. 'अरे ही तर मला थोडही seriously घेत नाही, अवघड झालंय विहान तुझं आता!', तो स्वतःलाच म्हणाला. 'अरे एकटा काय बडबड करतोय. अवघड झालंय विहान तुझं आता' मैथिली म्हणाली. 'exactly मी हेच म्हणत होतो. अवघड झालं माझं! पण तुला कस कळाल?' विहान थोडा confuse होऊन म्हणाला. 'ते सोड रे. तू शिकवणार आहे की नाही मला ते सांग?', मैथिली म्हणाली. हो शिकवतो ना पतंग,चक्री कुठे आहे पण? विहान ने विचारले. मी नाही आणलं काही मैथिली म्हणाली. व्वा...हुशारच आहेस मैथिली तू तुझं म्हणजे कस झालं न खिशात नाही दमडी आणि बाजारात चालली शेमडी ! ऐ असल्या काय म्हनी वापरतो, नक्की scotland ला च असतो ना? आणि मला वाटलं तूच घेऊन येशील सगळ म्हणून आले मी तशीच! मैथिली म्हणाली. काय संबंधमाझा म्हणी वापरण्याचा आणि स्कॉटलंड ला राहण्याचा आणि म्हणी वापरण्याचा माझं मराठी च ज्ञान मुळात चांगलं आहे. आणि पतंगाच म्हणशील मला तर उडवायचा च नव्हता तुलाच शिकायचं होत ना? विहान म्हणाला. आता काय करायचं चल घेऊन येवू मैथिली म्हणाली. wait मॅडम मला वाटलंच तू हात हलवत येशील म्हणून मीच घेऊन आलो. थांब गाडीतून आणतो काढून,विहान म्हणाला. wow विहान किती गोड आहेस तू तिने उत्साहाने त्याला मिठीच मारली. ऐ चान्स नको मारू ह! विहान तिला म्हणाला. काहीही काय विहान, मैथिली म्हणाली.बर चल झालं असेल तुझं तर विहान म्हणाला. विहान ने तिला पतंग ला दोर बांधून दिला उडव आता तो म्हणाला. मला नाही येत रे ती म्हणाली. येत काय ग मग तुला आण तो पतंग इकडे.अस म्हणून त्याने तिच्या हातातून पतंग घेतला. आणि त्याने उडवला त्याचा पतंग जसा जसा उंच उंच जात होता तसा तसा तो आणखीनच खुश होत होता, आणि मैथिली त्याला पाहून विहान खरच किती निरागस आहे, किती छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंदी होतो, तो मौथिली ला बोलवत होता ती मात्र त्याच्या विचारांमध्ये हरवून गेली, ऐ मैथिली घे हा दोरा हातात त्याच्या ओरडण्याने ती भानावर आली घे ना आणि त्याने तिच्या हातात दिला. मैथिली खिच खिच तो अजूनही ,ओरडतच होता, तिला काहीच समजत नव्हते तो तिच्या जवळ आला तिचा हात पकडून तिला तिला पतंग उडवायला सांगत होता. विहान च्या स्पर्शाने ती पुन्हा स्तब्ध झाली, कुठेतरी हा स्पर्श तिला सुखावणारा होता ती मात्र आता ते अनुभवण्यातच हरवून गेली . त्याने तिच्या कडे पाहिलं अग काय बघतीयेस ढील दे तो तिला म्हणाला. ती अजूनही भानावर नाही आली, मागून काटे चा आवाज आला, काय यार मैथिली तुझ्या मुळे माझा पतंग कटला हे मी नाही उडवणार जा आता तो वैतागला, आणि त्या आवाजाणे मैथिली भानावर आली. ढील द्यायची ना काहीतरी बोलायचं म्हणून ती बोलली, काय ढील देणार काटला त्यांनी पतंग तुझ्याच मुळे झालं हे तो म्हणाला. तू ना मैथिली काहीच कामाची नाही ना स्वतः उडवला ना माझा उडू दिला. अरे यार sorry दुसरा आता ऐकेन मी तुझं.ती म्हणाली. बघ बर हा जर नीट नाही उडवला ना तर निघून जाईन मी त्याने जवळजवळ धमकीच दिली. आणि दुसरा पतंग दिला तिला आता मात्र मैथिलीने स्वतःला कंट्रोल करत उडवला आता विहान जवळ असूनही तिने पतंगा वर लक्ष केंद्रित केले.अखेर विहानच्या मदतीने मैथिलीने पतंग उडवला. 'बघ माझा पतंग किती उंच गेला', मैथिली त्याला म्हणाली, 'जाणारच!! कारण त्याचा दोर माझ्या हातात आहे', विहान म्हणाला. 'बघ मैथिली माझ्या हातात तुझ्या पतंगाचा दोर देऊन तू उंचच जाणार.', विहान तिला पुढे म्हणाला. इतक्या वेळ त्याच्या कडे बघणाऱ्या मैथिलीने आता मात्र नजर चोरली. विहानने ही ते हेरलं आणि तो शांत झाला आणि पुन्हा दोघेही जण पतंग उडवण्यात मग्न झाले.