रंग हे नवे नवे - भाग-3 Neha Dhole द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

रंग हे नवे नवे - भाग-3

शेवटी दोघांच्याही भेटीचा दिवस उजाडला. 'मैथिली अगं थोडं तरी तयार होऊन जा.' तिची आई म्हणाली. 'आई मी जात आहे हेच खुप नाही आहे का तुझ्यासाठी.', ती म्हणाली. 'बर जा बाई, तुला जे करायचं ते कर.' तिची आई म्हणाली. मैथिली तिथे पोहचली. आदितीने दोघांनाही एकमेकांचे contact नंबर दिले होते. तिथे कुणीही दिसलं नाही, म्हणून मैथिलीने कॉल केला. विहान आतमध्येच बसून होता त्याने तिला ती exact कुठे आहे ते सांगितलं आणि ती तिथे गेली. तो त्याच्या mobile मध्ये गुंग होता. तीच त्याच्या समोर जाऊन उभी राहिली 'Hii, I'm मैथिली.' त्याने वर पाहिलं आणि मैथिली जवळजवळ ओरडलीच 'तू...…..इथे.', 'तू आहेस मैथिली???', तो म्हणाला. 'अरे यार! चला आता भेटायचा काही संबंधच नाही. निघुया.', तो म्हणाला. 'हो मला जर माहिती असत ना की तू आहे तर इथपर्यंत आलेच नसते उगाचच माझं petrol वाया गेल.', मैथिली म्हणाली. 'तुझं तरी फक्त पेट्रोल माझा तर पेट्रोल आणि वेळ दोन्ही वाया गेल आणि तुझ्या सारख्या मुलीवर तेही.' 'what you mean तुझ्यासारख्या? मीच मूर्ख होते इच्छा नसताना आलेय.', तो हसायला लागला . 'काय झालं आता हासायला?', ती अजूनच चिडून म्हणाली. 'तू मान्य केलं ना की तू मूर्ख आहेस!' 'Now you are crossing your limits हा!' मैथिली म्हणाली. 'बर मला काय वाटतं आलीच आहेस तर कॉफी घेऊन जाऊ म्हणजे घरी जाऊन परत घरचे प्रश्न विचारतील मग काही तरी हवं ना सांगायला.' तो म्हणाला. मैथिलीने विचार केला 'तसं हा बरोबर बोलतोय. असंही ही नंतर ह्याच तोंडही पाहायचं नाही. okk मला काही प्रॉब्लेम नाही.' असं म्हणून दोघंही बसले. त्याने दोन कॉफी ऑर्डर केल्या. 'वा! पहिली भेट लक्षात राहील ह माझ्या तो काहीतरी बोलायचं म्हणून बोलला.' 'शेवटची पण!', ती म्हणाली. 'म्हणजे तुला नीट बोलताच येत नाही का ग?' तो म्हणाला. 'नाही.. असच बोलता येत मला. बस्स.. झालं.', ती अजूनही रागातच होती. 'तुझ्याशी बोलून काही फायदाच नाही' आणि मग पुढे तो काहीही बोलला नाही. त्यांची कॉफी आली तो त्याच्या फोन मध्येच गुंतून गेला. मैथिलीला थोडं वाईट वाटल 'अस नव्हतं बोलायला पाहिजे उगाचच बोलले मी. नीट विचारत होता हा! बोलू का? हा बोलतेच, मग काय करतो तू??', तिने विचारलं. 'का लग्न करायचं आहे का माझ्याशी?', तो खूप rudely बोलला. 'नाही', ती म्हणाली. 'मग इतक्या चौकश्या कशाला.', तो अजूनही तसाच बोलत होता. मैथिलीला खूप राग आला त्याच्या अश्या वागण्याचा तिची एव्हाना कॉफी घेऊन झाली होती. ती ने निघायचा विचार केला. आणि ती निघण्यासाठी उठली. तितक्यात तो म्हणाला 'कॉफीचे पैसे कोण देणार. मी माझंच बिल pay करणार आहे. तुझं बघ तू!' आता तर मैथिलीचा डोकच सरकल ! तिने रागारागात जाऊन दोघांचंही बिल pay केलं आणि receipt त्याच्या समोर आपटली. 'घे पुन्हा एकदा दान तुला.', अस म्हणून ती निघाली. 'काय समजतो कोण स्वतःला. किती attitude. मुलींशी साधं कस वागायचं इतकही manners नकोत ह्याला. कुठे दुष्यंत कुठे हा!' 'परत पैसे देऊन माझा insult करून गेली समजते कोण ही स्वतःला. मूर्ख मुलगी! इतका कुठला attitude भरला काय माहिती.' मैथिली तणतण करतच घरी आली. 'काय ग मैथिली काय झालं?' इतकी रागात का आली. 'आई तो मुलगा एक नंबरचा आगाऊ, वाया गेलेला, उद्धट, अजून काय, manners less आहे. त्याच्याशी लग्न तर काय भेटणार पण नाही. अग त्याने मला कॉफीचे पैसे मागितले. खर तर माझंच चुकलं मीच आधी द्यायला हवे होते.', मैथिलीने रागारागातच सांगितलं. 'काय असा वागला तुझ्याशी तो. नकोच मग. जाऊ दे सोड त्याचा विचार. तू तुझ्या अभ्यासावर लक्ष केंद्रित कर.' 'काय कशी झाली मीटिंग विहान' त्याच्या आईने विचारलं. 'आई खूप घाण. म्हणजे दुसरा शब्दच नाही आता माझ्या कडे. अग किती attitude तीच्या मध्ये. संस्कार, नम्रता ह्या गोष्टींचा आणि तिचा काहीही एक संबंध नाही, अग जाताना माझे आणि तिचे कॉफीचे पैसे दिले आणि वर म्हणाली पण पुन्हा एकदा दया दाखवली तुझ्यावर! ही काही पद्धत झाली का वागण्याची.' तो म्हणाला. 'बापरे अशी आहे ती. नकोच तिच्या भानगडीत पडायला.' दोघांनीही जितकं वाईट सांगता येईल तितकं वाईट सांगितलं एकमेकांबद्दल.
बरेच दिवस निघून गेले, दोघांनाही झालेल्या घटनेचा विसर पडत होता. मैथिली खूप छान paintings काढायची आणि अशातच एक exhibition लागणार होतं. आणि मैथिली साठी हा खूप छान platform होता त्यामुळे तिला हे मिस नव्हतं करायचं. आणि मौथिलीच्या paintings तिथे असणार आणि आदिती जाणार नाही असं शक्यच नव्हतं. 'आदिती मला काय वाटत की exhibition बघायला विहानला पण घेऊन जायचं का? कारण त्याला खूप आवड आहे. आणि मुळात तो एक उत्तम चित्रकार आहे.', दुष्यंत अदितीला म्हणाला. 'हो मला काहीही प्रॉब्लेम नाही, पण तिथे मैथिली ही असणार', आदितीने शंका व्यक्त केली. 'हो पण आता त्या गोष्टीला बरेच दिवस झाले. विसरले असतील एव्हाना', दुष्यंत म्हणाला. 'ठीक आहे, बोलव मग' अदितीने संमती दिली. ते ठरलेल्या दिवशी exhibition बघायला गेले. विहान एक एक painting बघून थक्कच होत होता. तो एका painting जवळ आला आणि थबकलाच, 'wow!! its really amazing! कुणी काढलं हे', त्याने खाली मैथिली नाव बघितलं. 'बापरे मैथिली नावाच्या मुली हे पण करू शकतात. तो तिरसट पणे म्हणाला.' 'shut up विहान!' आदीती त्याला थोडं रागानेच म्हणाली. 'सॉरी तुझी बहीण होती ना ती विसरलोच होतो मी.' 'हे painting पण तिचच आहे' आदीती म्हणाली. 'काय!!! हे तिने काढलेलं आहे. बापरे तिला भांडणाशिवाय हे ही उत्तम जमत म्हणजे.', विहान म्हणाला. 'तुला अस वाटत नाही आहे का की तू थोडा जास्तच बोलतो आहे तिच्या बद्दल. dont judge her! she is perfect example of beauty with brain.', दुष्यंन्त त्याला म्हणाला. विहान मिश्कील हसला. 'आता काय झालं?', अदितीने विचारलं. 'काही नाही brain आणि मैथिली चा काय संबंध हा विचार करत होतो.' 'sorry आदिती', आणि तो परत हसायला लागला. 'ए आता अति होतंय हे हं. तू तिला अजिबात ओळखत नाही आणि तू जस घरी सांगितलं ना तशी तर ती मुळीच नाही. तू चूक केली तिला ओळखण्यात!', दुष्यंत बोलला. 'तू नक्की माझा भाऊ आहे की तिचा. माझी बाजू घ्यायची सोडुन तिची काय घेतोय आणि माझ्या कडे रेकॉर्डिंग नाही रे, नाही तर दाखवलं असत कशी बोलली ती मला!', विहान म्हणाला. 'अरे तू पण काही कमी नाही आहे. नक्कीच तू काही तरी बोलला असणार. उगाचच ती react नाही होणार.', दुष्यंत म्हणाला. 'मला काय वाटतंय की तू तिची माफी मागावी म्हणजे कस सगळं नीट होईन कारण ती खरच खूप छान मुलगी आहे', दुष्यंत पुढे म्हणाला. 'डोक्यावर पडला का? मी आणि तिची माफी.. sorry ते सोडून तू काहीही सांग', विहान म्हणाला. 'बर नको म्हणू तिला sorry, पण आज तिला भेटल्यावर किमान नीट बोल. आजचा दिवस महत्त्वाचा आहे तिच्यासाठी. आज काही भांडणाच मूळ काढू नको.', आदिती म्हणाली. 'बर बरं.. आज मी काहीही नाही बोलणार, मग तर झालं. पण ती नाही बोलायला पाहिजे हं!', विहान म्हणाला. इतक्यात मौथिली आली तिथे, आदिती आणि तीच बोलणं चाललं. तीच लक्ष सोबत असलेल्या विहान कडे गेलं पण तीने पाहून ignore केलं, कारण तिला ही आपला दिवस खराब करून घ्यायचा नव्हता. दुष्यंतने अदितीला कोणाला तरी भेटण्यासाठी बोलावले 'मिथु, २ मिनिटं हं. आलेच मी.' आता तिथे हे दोघेच होते, 'खूप छान आहे तुझे paintings! everyting is perfect!', विहान तिला म्हणाला. 'thank you!' ती म्हणाली. 'बाप रे आज इतका चांगला कसकाय बोलतोय हा!' मैथिलीने विचार केला. त्याने मात्र भरभरून तिच्या painting च कौतुक केलं. 'खूप बारीक निरीक्षण केलल दिसत आहे तू बरंच knowledge दिसतंय तुला ह्या विषयात.', मैथिली म्हणाली. 'हो मलाही आवडतात चित्रे काढायला. पण छंद म्हणून', विहान म्हणाला. मग त्यांनी बराच वेळ त्यावर गप्पा मारल्या. मैथिली ला जाणवलं 'आपण त्या दिवशी भेटलेला आणि आजचा हा किती वेगळा आहे. किती ज्ञान आहे ह्याच्याकडे. पण नक्की हा खरा की तो!', 'कसला विचार करतीये', विहान तिला म्हणाला. 'काही नाही असाच.' 'दुष्यंत बरोबर म्हणत होता मी मैथिलीला चुकीचं judge केलं. she is interesting! भेटायला हवं पुन्हा.', तो मनातच विचार करत होता.