रंग हे नवे नवे - भाग-8 Neha Dhole द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

रंग हे नवे नवे - भाग-8

'मैथिली मला आता जाम भूक लागली आहे. चल काहीतरी खाऊ', विहान म्हणाला. 'किती भुक्कड आहेस रे तू!', मैथिली म्हणाली. 'ए बाई तुझं भरलं असेल पतंग उडवून पोट. माझं नाही भरलं मला खायलाच लागतं', विहान म्हणाला. 'बर चल.', आणि ते तिथून निघाले. एका रेस्टॉरंटमध्ये त्यांनी order दिलीे. 'चला खाऊन घ्या काही दिवसांनी हेच खुप मिस करणार', विहान म्हणाला. 'म्हणजे??', मैथिली म्हणाली. 'अग मला जायचं आहे न परत अस काय करते!', विहान म्हणाला. 'तू चेष्टा करतोय ना!', मैथिली थोडं गंभीर होत म्हणाली. 'नाही मैथिली मी जाण्याविषयी चेष्टा का करणार? अडीच महिने होऊन गेले, मॅडम आता निघायला हवं.', तो म्हणाला. मैथिलीचा चेहराच उतरला. इतक्या वेळ छान फुलासारखी टवटवीत दिसणारी मैथिली एकदम विहान जाणार म्हंटल्यावर कोमेजून गेली आणि तिला अस पाहून विहान पण हळवा होत होता पण त्याने ते दाखवलं नाही. त्यांची ऑर्डर आली दोघांनीही फक्त खायचं म्हणून खाल्लं. 'काय झालं मैथिली इतकी का शांत आहे?', विहान म्हणाला. 'मी नेहमीच शांत असते. तूच बडबड करतो. तूच बराच वेळ झाला शांत आहे', ती म्हणाली. 'तुला त्रास होतो ना माझ्या बोलण्याचा, म्हणून शांत बसलो मी, ए मैथिली तुला भारी वाटत असेल न मनातुन की मी चाललो तर तुझ्या डोक्यामागचा एक भुंगा गेल्यासारखा वाटेल, हो ना!', तो तिला म्हणाला. 'गप रे! काहीही काय, please आता हा जाण्याचा विषय बंद कर ना!', मैथिली म्हणाली. 'बघ मैथिली, मी जाण्याच्या विचारांनीच तुला किती त्रास होतोय कशी राहणार माझ्याशिवाय?', तो थोडासा गंभीर होत तिच्याकडे पाहून म्हणाला. तिने त्याच्या कडे पाहिलं आणि तो नेहमीचंच मिश्कील हसला. मैथिली मात्र ह्यावर विचार करत होती. 'चल निघायचं?', तो म्हणाला. 'हो चल', आणि ते दोघेही निघाले.
मैथिली घरी आली. तिचा मूड खूप ऑफ होता, खरं तर विहानच्या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा ती प्रयत्न करत होती. ती घरी आली तेव्हा तिच्या आई च्या मैत्रिणी आलेल्या होत्या ती त्यांच्याकडे पाहून जुजबी हसली आणि तिच्या आईने तिला त्यांच्या मध्येच बसायला लावले. तिचा नाईलाज होता. ती आपल्या फोन मध्ये timepss करत होती. मग त्यांचा परत तोच लग्नाचा विषय निघाला. त्यावर मैथिलीची आई लगेच सुरू झाली, 'आज काल च्या मुलांचा काहीही भरवसा नाही आपण आपलं म्हणून बघतो आणि काय असतात एक एक मुलं, आता परवाच दुष्यंतचा भाऊ काय कुठे स्कॉटलँडला असतो म्हणे. आमची मैथिली त्याला भेटायला गेली तर चक्क त्याने तिला कॉफीचे पैसे मागितले.' आणि त्यांचे बरेच विहानचे उणे दुणे काढणं सुरू झालं. आता मेथीलीचा पारा चढत होता. 'अरे किती वाईट बोलताहेत हे विहानबद्दल, ह्यांना काय माहिती आहे त्याच्याबद्दल.' 'आई, का बोलते आहेस त्याच्या बद्दल इतकं? तुला काही माहिती आहे का?', मैथिली चिडूनच तिच्या आईला बोलली.'अग तूच नाही का सांगितलंस तो असा आहे मला काय माहिती.', तिची आई म्हणाली. 'हे बघ आई मला अस वाटत की आपण अस उगाचच दुसऱ्यांबद्दल वाईट बोलू नये. हा.. माझे आणि त्याचे मतभेत झालेत म्हणून तो वाईटच आहे असं नाही न आणि जर तो खरच वाईट मुलगा असता ना तर अदितीने मला भेटायला ही नसत जाऊ दिल आणि आता please हा विषय बंद करा.', मैथिली अस थोडं चिडूनच बोलली आणि आत मध्ये निघून झाली. 'हिला काय झालं? आज इतका काय त्याचा पुळका आला? त्या दिवशी तर किती बोलत होती. हल्ली ना मला मैथिलीच काही कळतच नाही आहे', तिची आई बोलत होती. इकडे विहान घरी आला त्याचंही मन कशातच लागत नव्हत. खरं तर आता जाण्याचा दिवस जसा जसा जवळ येत होता तस तस त्याच टेन्शन आणखीन वाढत होत. 'मैथिलीला बोलावं लागेल आता लवकर.' आज तिचाही मूड खूप ऑफ झाला होता हे काही विहानच्या नजरेतून सुटलं नव्हतं. पण मी जाणार तर मैथिलीचा होकार घेऊनच जाणार हे त्याने मनोमन ठरवले होते.