Prema tujha rang konta - 1 books and stories free download online pdf in Marathi

प्रेमा तुझा रंग कोणता... - १

प्रेमा तुझा रंग कोणता.... - १

गिरीजा ला १२व्वीत उत्तम मार्क मिळाले आणि तिला एका नामांकित इंजिनीअरिंग कॉलेज ला आरामात प्रवेश मिळाला... तिला इंजिनीअरिंग करण्यात काही रस न्हवता पण इतके चांगले मार्क मिळाले म्हणून तिच्या आई वडिलांना वाटल तिनी इंजिनीअरिंग कराव. दोघांच्या आग्रहास्तव तिला इंजिनीअरिंग ला प्रवेश घेतला!! खर तर, मनातून तिला आर्ट्स घेऊन पूर्ण वेळ उत्तम लिखाण करायचं होत!! लेखिका होण तिच स्वप्न होत! ते स्वप्न तिनी खूप लहानपणीच पाहिलं होत!! पण तिच्या आई वडिलांची काही वेगळीच इच्छा होती! आपली मुलगी इंजिनीअर झाली कि तिला चांगला जॉब मिळेल आणि पुढे लग्नासाठीसुद्धा काही अडचण येणार नाही असा विचार करून तिच्या आई वडिलांनी तिला काय करायचं आहे हि गोष्ट लक्षात न घेता तिला इंजिनीअरिंग करायला आग्रह केला.. आई वडिलांचं म्हणण गिरीजा नी टाळल नाही आणि तिनी हि इंजिनीअरिंग ला प्रवेश घेतला... मनाविरुद्ध पण तिनी विरोध नाही केला!

गिरीजा च कॉलेज चालू झाल.. ती अभ्यासात हुशार होतीच पण तरीही तिचा कल जास्ती करून आर्ट्स च्या विषयातच होता! तिला वेगवेगळ्या विषयांवर लिखाण करण्यात खूप रस होता!! इंजिनीअरिंग कॉलेज मध्ये सुद्धा तिनी ज्यांना कलेत रस आहे अश्या लोकांशीच मैत्री केली... अभ्यासाबरोबरच तिनी तिची आवड जपली! इंजिनीअरिंग कॉलेज मध्ये तिनी रायटिंग कॉम्पिटीशन मध्ये भाग घ्यायची आणि तिला तिची आवड जपण्यात यश मिळत राहील! तिच्या आई वडिलांच्या मताप्रमाणे तिनी इंजिनीअरिंग पूर्ण केल... आणि त्याचबरोबर आवडीलाही मुरड घातली नाही!

इंजिनीअरिंग कॉलेज मध्ये तिचा असा वेगळाच ग्रुप असल्यामुळे इतर मुलांशी तिच कधी बोलणं सुद्धा झाल नाही... आपसूकच बरीचशी मुल तिच्यासाठी अनोळखीच राहिली होती! एकाच वर्गात असून सुद्धा तिला वर्गातली बरीच मुल माहिती पण न्हवती!

पाहता पाहता कॉलेज संपायची वेळ आली... गिरीजा आणि रोहित एका क्लास मधेच पण दोघांच कधी बोलण झाल न्हवत.. दोघ आपापल्या ग्रुप मध्ये बिझी असायचे.. इतर कुणाकडे पाहण्यात दोघांनाही रस आणि वेळही नसायचा!! गिरीजाचा ग्रुप म्हणजे कलेत रस असणाऱ्यांचा..आणि रोहित चा ग्रुप म्हणजे नाविन्याकडे भर असणाऱ्यांचा... दोन्ही ग्रुप्स चा एकमेकांशी फार संबंध यायचाच नाही! गिरीजा आणि रोहित दोघ विरुद्ध स्वभावाचे.. इतकी वर्ष दोघांना एकमेकांकडे पाहायलाही वेळ झाला न्हवता! पण दोघांची कॉलेज संपतांना धडक झाली.. दोघ गडबडीत होते आणि रोहित घाई घाई कुठेतरी जात होता! समोर न पाहिल्यामुळे रोहित येऊन गिरिजाला धडकला...दोघाची पहिली समोर समोरची भेट होती ती.. रोहित गिरिजाला धडकल्यामुळे गिरीजा जरा चिडली आणि चिडून बोलली,

“ए,लक्ष कुठे आहे? जरा समोर पाहत जा... मी आत्ता पडले असते..”

“ओह!!!... आय अॅम सॉरी..माझ लक्ष न्हवत...मी चुकून धडकलो तुला.. बाय द वे,सेम क्लास? मी तुझी बोललो आहे अस वाटत नाही... सो विचारतो आहे!”

“तू वेगळ्या क्लासरूमला आहेस मग इथे का आला आहेस? नाही ना... आता आपण इथेच धडकलो म्हणजे एकाच क्लास मधेच असणार ना...” गिरीजा खडूसपणे म्हणाली!

“हो? बरोबर आहे तुझा मुद्दा! मी वेगळ्या क्लास रूम मध्ये जाऊन कसा बसेन? हाहा! पण आपण एका क्लास मध्ये असून मी तुला ह्या आधी भेटलो कसा नाही...” जरासा विचार करून आणि आश्यर्यचकित होऊन रोहित बोलला..

“मला काय माहित.. तुला मी माहित नाही मग मी काय करू? तसही मलाही तू ह्याच क्लास मध्ये आहेस हे मलाही आत्ताच कळलय! अस नाहीये कि मी तुला पाहिलं होत... खर तर, मला तर कोणाकडे पाहायलाही वेळ नसतो.. माझे बरेच उद्योग चालू असतात.. सो...” गिरीजा चिडून बोलली...ती गोष्ट रोहित च्या लक्षात आल पण त्याकडे दुर्लक्ष करत आणि गालातल्या गालात हसत रोहित नी गिरीजा ला विचारलं.....

“ओह.. पण तू मला कधी दिसलीही नाहीस वर्गात...कॉलेज ला यायचीस कि नाही? आय नो,प्रॉक्सी लावत असेल कोणीतरी.. हाहा!”

“प्रॉक्सी... हाहा..." गिरीजा उपहासानी हसली... "मी हसू?” आणि वैतागून बोलली..

“हास कि..हसण इज गुड फॉर हेल्थ...! आणि उपहासानी हसती आहेस? खर हास कि...हाहा! बाय द वे, डोंट माइंड बर का... तू अशीच सारखी चिडत असतेस का? तुला हसता येताच नाही कि काय?"

"काय? मला हसता येत नाही? मला तू किती ओळखतोस? आत्ताच आली भेट झाली ना? आणि तरी सुद्धा तू इतक्या आत्मविश्वासानी कसा बोलू शकतोस.."

"मला वाटल म्हणून विचारतो आहे... आपण १० मिनिटांपूर्वी भेटलो पण तेव्हा पासून मी तुला एकदाही हसतांना पाहिलं नाहीये! तू वैतागलेली आणि चिडलेली च आहेस.. म्हणून कोणालाही तस वाटण साहजिकच आहे ना?"

गिरीजा नी थोडा विचार केला.. खरच रोहित शी बोलताना ती एकदाही हसली न्हवती!! तिचा स्वभाव तसा नसून पण ती तशी का वागली ह्याचा विचार ती करायला लागली... थोडा वेळ ती काही बोलली नाही हे पाहून रोहित पुन्हा बोलयला लागला...

"माझ बोलण इतक पटल कि त्यावर तू इतका खोल विचार करायला लागली आहेस? हाहा!"

"तू सारखा हसत असतोस का रे? काही कारणाशिवाय?..कारण तर हवय कि नाही हसायला? कि उगाच हसत राहायचं? तू काय असाच सारखा हसत असतोस? विचित्र वाटत नाही का?" गिरीजा गालातल्या गालात हसत बोलली!

"मे बी! हाहा! विचित्र काय वाटायचं? मी नेहमीच कारण न शोधता हसत असतो... मी हसराच आहे... आणि तुलाही हसता येत कि! हसत जा! बाय द वे, आता प्लीज चिडू नको!!! तुझा फोन नंबर देऊ शकतेस? इतके वर्ष एकाच क्लास मध्ये होतो तरी आपण एकदा सुद्धा बोललो नाही... आपण एकमेकांना ओळखतहि नाही..गम्मत आहे! आता परीक्षा झाली कि कॉलेज संपेल.. तुझा नंबर दिलास तर कॉलेज नंतर आपण कधीतरी भेटू शकतो..!”

“अक्चुअलि...यु आर करेक्ट! आय अग्री! बरोबर आहे! इतकी वर्ष आपण एकाच क्लास मध्ये असून आपण एकदाही बोललो नाही! आय कॅन शेअर माय नंबर! पण परीक्षेच्या वेळी मात्र मला तुला भेटता येणार नाही.. शेवटच वर्ष आहे आणि शेवटची परीक्षा त्याचबरोबर प्रॉजे्क्ट सबमिशन... मला आता भेटायला वेळ मिळणार नाहीये.. आणि सॉरी..मला तुझ नाव हि माहित नाहीये! तुझ नाव?”

“हो हो! सगळ संपला कि तर भेटू शकतो! मी कुठे म्हणलो..लगेच भेटू? परीक्षा माझ्यासाठी पण महत्वाची आहे... आणि मला सुद्धा प्रॉजे्क्ट सबमिशन आहेच कि! मी रोहित...आणि तू?”

“ओह रोहित! मी गिरीजा... माझा नंबर लिहून घे... तुला नंबर मिळाली कि मग मला मिस्ड कॉल कर..”

गिरीजा नी तिचा नंबर रोहित ला दिला... रोहित नी गिरीजा ला मिस्ड कॉल दिला...

“थॅंक्स...नंबर मिळाला...” गिरीजा म्हणाली...

“चलो बोलू कधीतरी... आता मी पळतो... मित्रांशी बोलायचं जरा... ते ओरडतायत माझ्या नावानी! आपण बराच वेळ गप्पा मारतोय! पण आता जायला हव! होप टू सी यु सून...”

“ओके... बाय.. नाइस टॉकिंग टू यु!”

“सेम हिअर! बाय..”

इतक बोलून दोघ आपापल्या मित्र मैत्रिणींबरोबर निघून गेले आणि आपल काम करायला लागले!...

दिवस पटापट पुढे गेले. कॉलेज संपल... दोघांनाही उत्तम मार्क्स मिळाले... पण परत दोघांची कधी भेट झाली नाही! आणि फोन नंबर असून सुद्धा दोघांमध्ये बोलण झाल नाही! गिरीजा आणि रोहित च्या ग्रुप मधले सगळे विखुरले.. गिरीजा आणि रोहित एकमेकांना विसरून गेले होते.. रोहित ला एका नामांकित कंपनी मध्ये जॉब मिळाला! त्याच्या अगदी मनासारखा जॉब! रोहित त्याच्या जॉब मध्ये बिझी झाला. गिरीजा ला जॉब करण्यात काही रस न्हवता पण गिरीजानी लिहायला चालू केलेलं.. पेपर,मासिका मध्ये तिचे लेख झळकायला लागले...

-----------------------------------------------------------------------------------------------

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED