प्रेमा तुझा रंग कोणता..-५
गिरीजा सगळ सामान घेऊन थेट आईकडे गेली..तिनी तिच्या घरची बेल दाबली..दार आईनी उघडल..गिरीजा सामान घेऊन आलेली पाहून आई बुचकळ्यात पडली..
“आई...बाजूला हो... मला सामान ठेऊ दे माझ्या रूम मध्ये..”
“काय झाल गिरीजा...एकदम सामान घेऊन का आलीस?” आश्यर्यचकित होऊन गिरीजच्या आईनी गिरिजाला प्रश्न केला..
“नंतर सांगते ग आई.. आधी मला जाऊदे माझ्या रुममध्ये... आणि जरा वेळ प्लीज डिस्टर्ब करू नकोस..मला कादंबरी लिहायला चालू करायचीये.. एका महिन्यात प्रकाशित करायची आहे..”
“ठीके..बोलू नंतर...आणि लिही शांतपणे कादंबरी..”
गिरीजा तिच्या रूम मध्ये गेली आणि दार लाऊन लिहायला लागली... तिनी कॉम्पुटर लावला आणि तिनी लिहायला चालू केल..तिला काय लिहाव हे सुचत न्हवत आणि तितक्यात बीप आवाज झाला...तिनी पाहिलं एक न्यू मेल... तिनी ते मेल वाचायसाठी उघडल...त्यात लिहील होत,
“मॅडम,बरेच दिवसात तुमचे नवीन लेख वाचण्यात नाही आले... हल्ली लिहित नाही का? तुमच्या नवीन लेखाच्या प्रतीक्षेत...”
तिला मेल पाहून बर वाटल.. खरच बरेच दिवसात तिनी काहीच लिहील न्हवत.. पण तरीही लोक तिच्या लेखांची वाट पाहतात हे बघून तिला हुरूप आला...तिनी मेल ला उत्तर दिल... “थॅंक्यू! माझ लिखाण वाचता...सध्या लेख नाही लिहिते पण सध्या कादंबरीवर लक्ष केंद्रित केलाय...लवकरच तुमच्यासाठी कादंबरी प्रसिद्ध होईल..” आणि मेल कोणी पाठवलय त्यांच नाव कुठे दिसतय का ते पाहायला लागली...पण मेल कुणी पाठवलय त्यांच नाव कुठेच न्हवत.. त्यामुळे तिनी ते मेल सेंड केल आणि परत कादंबरीचा विचार करायला लागली...
बराच वेळ विचार करूनही गिरीजा ला मनासारखा काही सुचत न्हवत.. आता कॉम्पुटर बंद करून निवांत बसून विचार करू असा विचार करत ती कॉम्पुटर बंद करायला लागली..तितक्यात तिला मेलबॉक्स मध्ये एक मेल दिसलं...तिनी उत्सुकतेनी ते मेल उघडल.. मगाशी आलेल्या इमेल अॅड्रेस वरूनच तिला अजून एक मेल आलेलं.. तिनी ते मेल उघडल..आणि ती ते पत्र वाचायला लागली,
“वा..कादंबरी!! तुम्ही लिहिलेली कादंबरी वाचायला मी उत्सुक आहे..”
तिनी नकळत त्या मेल ला उत्तर दिल,
“मी लिहायचा प्रयत्न करतीये पण काही सुचतच नाहीये..”
“मॅडम मी काही मदत करू?” गिरीजा च मेल गेल्यानंतर लगेचच त्याला उत्तर आल...
गिरीजा नी जरा वेळ विचार केला आणि उत्तर दिल, “चालेल...”
मध्ये जरा वेळ गेला...गिरीजा ला काही उत्तर आल न्हवत... आपण उगाच अनोळखी माणसाला “चालेल” बोलून गेलो अस वाटून ती कॉम्पुटर बंद करायला लागली..पण तितक्यात तिच्या मेल ला उत्तर आलेलं तिनी पाहिलं...तिनी काय लिहील असेल हे पाहायला मेल उघडल,
“मॅडम,तुमच्या आयुष्याची गोष्ट लिहा.. म्हणजे ती थीम घेऊन..गोष्ट मस्त होईल....प्रत्येकाच आयुष्य वेगवेगळ्या रंगानी भरलेल असतच... आणि सॉरी...तुमच्या सारख्या प्रसिद्ध लेखिकेला मी काही मदत करू का हे विचारण मूर्खपणाच होत..पण मी स्वताला थांबवू शकलो नाही.. खर तर,आम्हाला वाटल तरी आम्ही लिहू शकत नाही..आम्ही आपले सतत कामात मग्न.... आणि बरेच दिवस तुमच्याशी बोलायला होत पण दरवेळी ते राहून जात होत! तुमची कादंबरी लिहून झाली कि नक्की सांगा..”
तिनी मेल वाचल आणि तिचे डोळे लकाकायला लागले...तिला अनोळखी माणसाकडून आलेला सल्ला मनापासून आवडला... तिनी त्या मेल ला थॅंक्यू च मेल पाठवलं आणि ती लिहायला बसली... लिहिता लिहिता अनोळखी लोक पण किती मदत करतात आणि रोहित असा कसा वागला असा विचार करत ती परत खट्टू झाली... पण आपला मूड फ्रेश करत तिनी लिखाण चालू केल.. तिनी मेल पाठवणाऱ्या व्यक्तीचे मनोमन धन्यवाद मानले..पण तिला तितक्यात जाणवलं,आपण मेल कोणी पाठवलाय त्याचं नावही विचारलं नाही...तिनी मेलबॉक्स उघडला आणि त्या व्यक्तीला तीच नाव विचारलं... तिनी बराच वेळ वाट पहिली पण तिला काही उत्तर आल नाही... जरा वेळानी ती खोलीच्या बाहेर गेली आणि आईशी बोलायला लागली..
“आई..खायला दे ग काहीतरी...”
“आलीस का...काय देऊ खायला?? जेवायच्या वेळेसही बाहेर आली नाहीस..आता काय खाणार?”
“नाहीये ग इच्छा जेवायची...चमचमीत काहीतरी दे..”
“ठीके..मी तुझी आवडती कांदा भजी करते..”
आईनी भजी केली आणि ती घेऊन गिरीजा कडे आली,
“गिरीजा..आता सांग...काय झालाय? अचानक सामान घेऊन घरी कशी आलीस?”
“माझ आणि रोहित च भांडण झालाय.. म्हणजे भांडण रोजच होत! आज खूपच भांडलो आम्ही आणि मी आपल्या घरी यायचा निर्णय घेतला! एक महिना इथे राहणारे..मला माझी कादंबरी पण पूर्ण करायचीये आणि शांतता हवी आहे.. एक महिन्यानी कादंबरी प्रकाशित झाली कि आम्ही ठरवू..एकत्र राहायचं आहे कि नाही...” कांदा भजी खात गिरीजा आईला शांतपणे म्हणाली..
“तुमच पटत नाही? तू कधी बोलली नाहीस मला.. आणि पटत नसल तरी संसार मोडायला विचार करू नका! ”
“हो ग आई... आमच पटत नाहीये! आणि बघू १ महिन्यानी आम्ही काय तो निर्णय घेऊ... मला माझ्या निर्णयात तुमची साथ लागेल...चल मला वेळ नाहीये...भजी खाऊन परत जायचय कादंबरी लिहायला... एक महिन्यात पूर्ण करायचीये कादंबरी...आणि कांदा भजी मस्त झाली..”
“ठीके...”
भजी संपवून गिरीजा तिच्या रूम मध्ये जाऊन कादंबरी लिहायला लागली...कादंबरी लिहिताना तिच्या मनात सतत रोहित चा विचार चालू होता..आणि तिला सारख वाटत होत,आपण वागलो ते चुकीच कि बरोबर..आपण टोकाचे वागलो का काय अशी शंकाही तिच्या मनात आला पण ते विचार बाजूला सारून तिनी कादंबरीवर लक्ष केंद्रित केल...ती मध्ये मध्ये मेल पाहत होती पण त्या अनोळखी व्यक्तीकडून काही उत्तर आलेलं न्हवत...
बघता बघता गिरीजा ची कादंबरी लिहून पूर्ण झाली.. तिनी कादंबरीला नाव दिल, “प्रेमा तुझा रंग कोणता....” नाव ठरवतांना तिला रोहित ची आठवण येत होती पण तिनी मुद्दाम त्याला फोन करणं टाळल होत... रोहितनी ही एका महिन्यात गिरीजा शी बोलायला एकदाही फोन किंवा मेसेज केला न्हवता.. पुस्तक प्रकाशनाचा दिवस ठरला... तिनी आठवणीनी तिला मदत केलेल्या अनोळखी व्यक्ती ला पुस्तक प्रकाशनाला यायचं निमंत्रण दिल...तिला उत्तर आल, "थॅंक्यू...मी येतो..”
पुस्तक प्रकाशनाचा दिवस उजाडला.. पण गिरीजा खुश दिसत न्हवती.. तिला रोहित ची खूप आठवण येत होती.. पण तिनी त्याला आमंत्रण दिल न्हवत.. पुस्तक प्रकाशित झाल... नंतर वेळ मिळाल्यावर ती डोळे मिटून शांत बसून राहिली.. तिनी डोळे उघले पण तेव्हा तिच्या डोळ्यातून अश्रू बाहेर पडले.. आपले अश्रू पुसत ती शांत बसून राहिली... तितक्यात समोरून रोहित येतांना तिनी पाहिलं.. त्याला पाहून गिरीजा आश्यर्यचकीत झाली... तो गिरीजा कडे आला.. त्यानी गिरिजाला पुष्पगुच्छ दिला आणि तीच अभिनंदन केल.. आणि हळू आवाजात बोलला..
“मॅडम,तुमच्या आयुष्याची गोष्ट हि थीम घेऊन कादंबरी लिहायची आयडिया कशी वाटली?”
गिरीजा एकदम स्तब्ध झाली...तिला काय बोलाव कळेना..तिनी रोहित कडे पाहिलं आणि तिच्या डोळ्यात पुन्हा एकदा अश्रू तरळले...ती रोहित ला म्हणाली,
“तूच होतास ज्यानी मला माझ्या आयुष्यावर लिहिण्याबद्दल सांगितलं? आणि तू माझे सगळे लेख वाचत होतास ना...तरी तू खोट का बोललास? आपल्यात मुद्दाम गैरसमज का निर्माण केलास रे? मी नाव विचारलं होत तेव्हा हि तू उत्तर दिल नाहीस..आणि नाव कळू नये म्हणून नवीन मेल अड्रेस वरून मला पत्र पाठवलस.. का वागलास अस?”
“हाहा! हो...आधी घरी चल मग सांगतो सगळ..हि योग्य जागा नाहीये..”
“ठीके..माझ इथल काम लगेचच आवरेल आणि आपण जाऊ घरी..”
“कोणाच्या घरी?” मिश्कीलपणे रोहित म्हणाला..
“माझ्या...हाहा!”
"ओह..तुझ्या!! आय सी!”
गिरीजा काम आटपून रोहित बरोबर घरी जायला निघाली..दोघ घरी पोचले.. घरी पोचल्या पोचल्या गिरीजा नी भांडायला सुरु केल..
“तू चुकीच वागलास रोहित.. आणि तुझ वागण मला कळलच नाही... आधी भांडलास.. आणि मग मेल केलस! मी आई कडे जाते म्हणाले तेव्हा एकदाही जाऊ नकोस नाही म्हणालास...” गिरीजा ला पुढे काहीही न बोलू देता रोहित नी गिरीजाच्या तोंडावर हात ठेवला आणि तिच्या कानात म्हणाला..
“आय अॅम वेरी सॉरी..आणि आय लव यु अलॉट... आय मिस्ड यु.. आता अजिबात भांडू नकोस!!!” मग हळुवारपणे तोंडावरच हात बाजूला काढला..
गिरीजा लाजून लाल झाली...तिचा हात हातात घेत रोहित म्हणाला,
“मला सोडून प्लीज कधी दूर निघून नको जाऊस कधी..कितीही राग आला तरी! भांडण होणारच... पण लगेच आईकडे जाऊ नकोस... मी तुला किती मिस केल.. पण मी सॉरी म्हणालो असतो तरी तुझा राग गेला नसता... म्हणून आयडिया केली!”
“ओह.. तू आयडिया केलीस! गुड गुड! आणि नाही जाणार आता चिडून आईकडे! पण तुही मला वेळ देत जा... मी पण तुला खूप मिस केल... आणि मी पण सॉरी आहे.. मी इतक चिडायला नको होत!” गिरीजा इतक बोलली आणि हसत हसत रोहित बरोबर बेडरूम मध्ये शिरली...
***The end***
अनुजा कुलकर्णी.