ट्रिंग...ट्रिंग...ट्रिंग...
' फोन ची बेल वाजत होती. " एवढ्या सकाळी कोण असावे ? जाऊदे फोन बंद करून ठेवतो. आज तरी कोणाचा डिस्टर्ब नको.ऐन डिसेंबर, बाहेर मस्त पाऊस ! आहाहा सोने को और क्या चाहिए. तसा पण विकेंड आहे. मस्त ताणून देण्याचा मुड."
पण फोन हातात घेऊन Switch off करण्याच्या आत डिस्प्ले वरती आलेला आयरा चां फोटो पाहून माझी इच्छा होईना.मी क्षणाचाही विलंब न करता फोन उचलून कानाला लावला.
" हैलो ब्युटी."
" सिद meet me, it's urgent ! "
"ए हैलो ! काय urgent ? आणि गुड मॉर्निंग वगैरे काही म्हणण्याची पद्धत आहे की नाही?"
"तु झोपलेला आहेस म्हणजे मॉर्निंग झाली का ? It's afternoon dear. आणि हो काहितरी सिरीअस आहे. एवढ समजू शकतो ना तु ? ये ! "
एकुणच काय ! तर तिचा आवाज थोडा चिडका वाटत होता. आणि लवकर ये ही माझ्यासाठी अज्ञाच होती. चार शब्द ऐकून घेण्यापेक्षा मी ही 'हो येतो' म्हणालो'आज तसही विकेंड असल्याने मेड येणार नाही. चला स्पॉन्सर मिळाली. पोटा-पाण्याचा प्रश्न अधिक महत्त्वाचा आहे. मस्त इंडियन रेस्टॉरंट मध्ये जाऊन इंडियन फुड enjoy करायला मिळेल. बाकी urgent काय असेल ते नंतर बघू'. या विचारात मी झटपट तयार होऊन निघलो देखील.
ओल्ड क्यूबेक मधील Spice of India नुसत नाव ऐकून तोंडाला पाणी सुटलं ? भजा सारखा नुसता आकार बाकी टेस्टचे काही गन नाही, चपट गोल आकाराचे वडे.... बेसनात बटाटा की बटाटया मध्ये बेसन काही थांग पत्ता लागायचा नाही. दिसायला पांढराशुभ्र रंग, म्हणून डोसे. आम्ही ते डोसे ढोसायचो. बाकी तांदळा मध्ये उडदाची डाळ घालतात की मूगाची, हे ज्ञान पाजळवत बसण्यात कोणाला वेळ नसायचा. तेवढच जरा नावात इंडियन म्हणून आम्ही बापडे उठ-सुठ पळायचो. दिसायला तरी इंडियन पदार्थांची रेलचेल होती. म्हणून तेवढ नेत्र सुख त्यामुळे माझं ही आवडत होटेल ? म्हणायला हरकत नाही.
'आईचा नेहमीचा उपदेश कुठेही हात हलवत जाऊ (रिकामे) नये,म्हणुन सोबत ऑर्किड ची पांढरीशुभ्र आणि ऑर्किड रंगाची फुल घेऊन मी होटेल मध्ये ईन्ट्री केली. पण आज माझा अंदाज मात्र चुकला होता. मला आयरा एकटीच अपेक्षित होती, पण तीच्या बरोबर माझी जाई,जुई,चाफा म्हणजेच माझं क्रश जाई होती. माझ्या वाढलेल्या दाढी वरून हात फिरवत मी स्वतःच्याच डोक्यात एक टपली मारली. काय वेंधळेट आहे मी ! ना परफ्यूम, ना प्रॉपर शेवींग आलो तसाच उठून. काश ! जाई येणार आहे, हे मला आधीच माहित झालं असतं तर .शिटट , स्वतःला कोसत मी टेबलाजवळ पोहोचलो. पण मी दिलेल्या स्माईल ला कोणाची काहीच रिॲक्शन आली नाही. खरंच काही तरी गंभीर प्रकरण आहे तर....'' ....मी स्वतःच्याच विचारात !
फुलांचा गुच्छ टेबलवर ठेवून मी बसणार तेवढ्यात जाई च्या हुंदक्यांची सुरुवात झाली. काय झालं ते कळेना! ती एकसारखी फुलांचा गुच्छ बघून रडत होती. आणि आयरा तीच सांत्वन करत होती, "जाई कुल डाऊन, काम डाऊन" वगैरे वगैरे. काय झालं विचारुन मी ही formality केली. पण काही समजेना. हि फुल तर जाईला आवडतात, तीला आवडतात म्हणून मलाही आवडला लागली आहेत. मग ही फुलांकडे बघुन का बर रडत असावी? माझे मलाच प्रश्न चालू होते. बिच्चारी फुल, मला त्यांची दया येत होती. हि आपली गळा काढून-काढुन एका सुरात रडत होती. एका क्षणासाठी तर मला असं वाटायला लागलं होतं की, 'जणू काय मी शोकसभेला आलो आहे'.
दोन वर्षांपूर्वी भारतात असतानाचा एक प्रसंग मला आठवला. 'एक दुरचे मामा वारले होते. मी आई बरोबर मामींना भेटायला गेलो होतो. आईचाच आग्रह. तेव्हा मामी मामांच्या फोटोकडे बघुन जसं रडत होती, तसं आता जाई या फुलांकडे बघुन रडतं होती'. काय बोलावं सुचेना. बाकी आजूबाजूला येणारे खमंग वास स्वस्थ बसू देत नव्हते. ही रडारड संपल्यावर काय काय ओर्डर करावी हाही विचार मनात येऊन गेला. तरीही जाई बद्दल माझ्या मनात आधी पासून सोफ्ट कोर्नर होताच. नक्की काय झालं असावं हे जाणून घेणे देखील तेवढेच गरजेचे होते. शेवटी कसनुस जाईच्या जवळ सरकत (तेवढीच जवळीक) मी प्रश्न केला. काय झालं जाई? मी काही मदत करु का? पण व्यर्थ ची माझी बडबड.काही उत्तर नाही.
मी आयराकडे बघत नजरेनेच प्रश्न केला. ती देखील काही बोलायला तयार न्हवती.
"फूल आवडली नाही ना तुला? वेटरला सांगतो घेऊन जायला" ! म्हणत मी वेटरला हात केला.आता मात्र माझा पारा चढला होता, आणि ते माझ्या चेहऱ्यावरील हावभाव स्पष्ट दाखवत होते.
वेटर आमच्या दिशेने येत होता. ईतक्यात जाईने, "नाही सिद्ध्या राहुदे ती फुल मला आवडतात." म्हणत ती फुल उचलुन स्वतः जवळ ठेवली.कसेबसे स्वत:ला सावरुन तीने डोळे पुसले. ' मी परत प्रश्नार्थक नजरेने एकदा जाई एकदा आयरा दोघीनकडे पाहु लागलो. 'आता काही खाण्याचा मुड तर अजीबात न्हवता . " अरे मला काहीच सांगायचे नाही तर बोलावल का ? " म्हणत मी उठणार एवढ्यात ऑर्डर आली. आयराने मला खुनेनेच बसायला सांगीतले . आणि जाईने घडला प्रकार सांगायला सुरुवात केली.
*****
रात्री बेडवर पडून मी विचार करत होतो . ' जाई आणि मी कॉलेज फ्रेंड . ३ वर्षा पुर्वी जॉब साठी कॅनडाला आलो . खुपदा भेटत असतो आणि इन्डियन म्हणुन आपुलकी ही आहे . माझ मात्र तीच्यावर एकतर्फी प्रेम आहे . गम्मत अशी की, तीला हे कधी समजल नाही . आणि मी केव्हा सांगण्याचा प्रयत्नही केला नाही. मी फक्त वाट बघत राहीलो , for perfect time आणि आता इकडे माझी वाट लागायची वेळ आली आहे .
तीने सकाळी हॉटेल मध्ये असताना जे काही सांगीतले त्याने माझी झोपच ऊडाली . मागच्या एका वर्षांपासून ती कोणाच्या तरी प्रेमात आहे . ते पण कॅनडीयन ऑनलाईन डेटिंग साईडवर....तीच्या मते हे अगदी सिरियस मॅटर आहे . मेसेजेस, चॅट वगैरे सगळेच ऑनलाईन... प्रत्यक्षात कधी भेटलेच नाहीत.... पण हे मॅटर एवढ पुढे गेल की, आता तीला त्या मुलाची सवय झाली आहे.... तो मुलगा ही सिरिअस होता म्हणे.... तो जर्मनीला असतो म्हणुन भेटायचा योग आला नाही. पण दोघानी आपापल्या प्रेमाची कबुली दिली.
पण खरा सिन तर वेगळाच झाला. आता जेव्हा जाईने एक स्टेप पुढे घेत भेटण्याची गळ घातली तर तो तीचा ऑनलाईन बिएफ वेळ नसल्याच कारण देत असतो . आणि आता तो मुलगा चक्क तीला ईग्नोर करायला लागलाय. मेसेज , कॉलला रिप्लाय करत नाही . म्हणुन ही बाई रडुन-रडुन लाल झाली होती . वरती म्हणते , रडुन मन हलक झाल म्हणुन . हे मॅटर एवढ पुढे गेल , तेव्हा कुठे मॅडमना आमची आठवण झाली . माझ्या तर स्वप्नात सुद्धा तीच्या बद्दल असा काहीही विचार केव्हा आला नाही . किती साधी भोळी ती अगदी नावाप्रमाने होती. तीच्याबद्दल वाईट वाटाव, की स्वतःबद्दल हेच मला कळेना . एक मात्र खर की , माझ्या आजच्या हॅपी संन्डेची तर पद्धतशीरपणे वाट लागली होती . तरीही डोक्यातील विचार स्वस्थ बसु देईनात आणि जाईला अश्या सिचुएशनमध्ये पहावत नव्हत.
शेवटी न रहावुन मी तीचा नंबर डाईल केला .
" हॅलो , how are you जाई ? "
" i'm ok सिद्धु ... सध्यातरी ठीक आहे."
" take care "
" नाही रे सिद्धु , माझच चुकल ना ? मी अस कोणत्याही ऑनलाईन साईडवर कोणावर विश्वास ठेवायला नको होता . माझ्याच चुकीमुळे मी फसले.
तीचा आवाज अगदी कापरा झाला होता .
" जाई ऐक ना | नाव किवा त्याचा पत्ता असेल तर मला शेअर करु शकतेस का ? मी कॉन्टाक्ट करतो आणि ...."
माझ वाक्य पुर्ण व्हायच्या आतच तीने सुरुवात केली.
" सिद्धु तुला काय वाटत ? मी काही शोधण्याचा प्रयत्न केला नाही का ? आयरा आणि मी गेल्या काही दिवसात खुप शोधाशोध केली . त्याने दिलेली सगळीच माहिती खोटी निघाली , तो काम करत असलेल्या कंपनीच नाव देखिल कुणी ऐकलेल नाहीय. त्याच्या स्वत:च्या नावा पलिकडे मला काहीही माहीत नाही. कदाचित तेही खोट असाव. पुढे काय शोधणार आपण ? पण.... पण तो खुप छान बोलायचा रे .... आमचे बरेचसे विचार जुळायचेही . माझ्या साधेपणाचा फायदा घेतला, त्यामुळेच त्याने मला सहज चिट केल. काल तर शेवटी त्याने मला ब्लॉकच केल रे ....आणि... आणि... " जाईला पुढे बोलवेना . ईतका वेळ अडवून ठेवलेले तीचे अनावर हुंदके शेवटी बाहेर आलेच.
' २१ व शतक आहे . जग एवढ पुढे गेलय . पण हे लोक .... असे ऑनलाईन प्रेमात पडतात आणि लग्नाचे डिसिजन्स ही घेउन मोकळे होतात. ते पण प्रत्यक्ष एकदाही न भेटता.... प्रगती म्हणावी , की अधोगती ?
इकडे साला आपण आत्तापर्यंत मुलींच्या मागे-पुढेच करत राहीलो. ४ -५ वर्षात एकदाही सांगण्याची हिम्मत नाही, की माझ तुझ्यावर प्रेम आहे.
आयला हे लोक पोहोचले चंद्रावर आणि आम्ही अजुन बंदरावरच आहोत. '
मी स्वतःच्याच विचारात मग्न होतो , आणि पलिकडून जाई राहुन-राहून सारखी रडत होती .
" जाई प्लिज शांत हो . मी काही मदत करु शकतो का ? तु लवकरात लवकर या सगळ्यातुन बाहेर निघ . हव तर त्याला ब्लॉक कर . म्हणजे तुला याचा त्रास होणार नाही . जर तो मुलगा खरच तुझ्या बाबतीत सिरीअस असेल, तर तो स्वत:हुन तुला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करेल ."
बास्स मी एवढच बोललो आणि कल्याण झाल . आता तिच्यामुसुमुसु रडण्याचा भोंगा झाला होता .
" अॅ....ह्या ..... मॅडी ने काल रात्रीच मला ब्लॉक केलय सिद्धु . आणि मी सुद्धा त्याला माझे खर नाव सांगीतले नाहीय . मी सुद्धा खोट्याच नावाने चॅट करायची . but i am so serious about him त्याला सगळ खर सांगायच होत म्हणुन भेटायला बोलावत होते . पण त्याने मला ब्कॉक केल रे ." ( परत भोंगा चालू)
मला त्याच नाव ऐकुनच ४४० चा करंट लागला.
" व्काय नाव म्हणालीस ? मॅडी ? पुढे काय ?
" मॅडी बिच...पण इट्स ओके सिद्धु... मी यातुन बाहेर पडायच ठरवलय... तु नको टेन्शन घेऊ .... माझा डीसिजन झाला आहे. "
मॅडी बिच नाव ऐकुन मला एक क्षण वाटल, माझ्या मेंदूचा थंड गोळा होतो का काय . ती पुढे काय बोलली ते मी ऐकलच नाही.... मी पुन्हा तीला प्रश्न केला.
" आणि तु मघाशी म्हणालीस की, तु सुद्ध्या त्याला फेक नावाने डेट करत होतीस, आय मीन चॅट करत होतीस ( मी माझ सेंटेंस करेक्ट केल ). ते नाव कोणत ?
" मी पॉला नावाने. बट दॉट्स इनफ....नो मोअर डिस्कशन....मी माझा डिसीजन घेतलाय रे...."
' पुढे ती काय बोलते मी ऐकलेच नाही माझ्या हातातून फोन गळून पडला....उभ्याउभाच मी सरळ खाली कोसळलो . भोगा आता आपल्या कर्माची फळ.'
(क्रमश)
(माझे लिखाण इतरस्त्र कोठेही कॉपी पेस्ट करु नये - सिद्धि चव्हाण - https://siddhic.blogspot.com)