माझा कोपरा भाग दूसरा PrevailArtist द्वारा सामाजिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • रहस्य - 4

    सकाळी हरी आणि सोनू गुजरात ला पोचले आणि पूढे बस ने संध्याकाळ...

  • आर्या... ( भाग १ )

    आर्या ....आर्या ही मुलगी तिच्या आई वडिलांची एकुलती एक मुलगी...

  • गया मावशी

    गया मावशी ....    दिवाळी संपत आली की तिची आठवण हमखास येते…. ...

  • वस्तीची गाडी

                                                  वसतीची  गाडी  ...

  • भुलाये न बने

                  भुलाये न बने .......               १९७0/८0 चे...

श्रेणी
शेयर करा

माझा कोपरा भाग दूसरा

माझी लहान बहीण बोलायची कि कोण मुलगी जेव्हा तुला आवडेल तेव्हा तुझा जीव धडधडत राहील . तेव्हा समजलं की मी प्रेमात पडलोय, मी माझ्या ग्रुप मध्ये सांगितलं की मला ती आवडलीय तर बोलले कि चालेल

तुला आवडलीय ना मग एक काम कर तिला तू प्रपोझ कसा करशील काय अर्ध्या मुली तर तुझं नाव ऐकून पळतात , किती ते मोठं नाव आहे ??
म्हणूनच आपण तुझं नाव चेंज करू या चेंज म्हणजे काय तर तुझं नाव आपण वेगळं ठेवूया तर तुझं नाव आपण प्रदीप ठेवूया म्हणजे कसा आहे ते घ्यायला ही बरं वाटतं आणि बोलायला ही बरं वाटतं,

मी पण त्यांच्यात बोलण्यात आलो कारण तेव्हा आपल्या जवळचे सल्लागार तर आपले मित्रच असतात आणि आपल्याला पण त्यांचे सगळे विचार पटतात


चला उद्यापासून आपण तयारीला लागुया उद्याचा दिवस उजाडतो आणि तर ती नसते मग कळतं तिला यायला उशीर होणार आणि आम्ही आमचा प्लान आहे तसाच ठेवतो थोड्यावेळाने ती जेव्हा येते (ते म्हणजेच ती उशिरानेच येते )आणि नेमका त्यादिवशी व्हॅलेंटाईन डे असतो आणि सगळं कसं जुळून आलेले असतात आणि याचाच फायदा मी घेतो
तिला बाहेर बोलवतो कारण सगळ्यांसमोर प्रपोज करण्याची हिम्मत होत नसते म्हणून तिला एका कोपऱ्यात घेतो आणि आपल्या मनातलं सगळं खरं सांगतो फक्त माझं नाव बदलून तिला मी विचारतो ,कि माझं तुझ्यावर प्रेम आहे तर तुझं असेल तर सांगशील का म्हणजे होकार असेल तर डोळ्यांची पापणीने सांग" ती फक्त एकदा माझ्याकडे बघते आणि पापणी बंद करून होकार कळवते तेव्हा मला कळत कि तिला हि मी आवडतो आणि त्या दिवसापासून तीही माझ्या प्रेमात पडते.
अचानक माझ्यासमोर येणारी व्यक्ती तिच अचानक माझ्या प्रेमात पडणं मी जास्त कष्ट न घेता तेव्हा मला खूप कम्फर्टेबल वाटल आणि म्हणूनच आपण हिच्या सोबत आयुष्यभर राहू असे मी स्वतःच्या मनातल्या मनात बोलतो कुरकुर एका गोष्टीची लागते की आपण खरं नाव नाही सांगितलं पण ह्या दिवसापासून माझ्या प्रेमाची सुरुवात होते तर मला खूप आनंद झालेला असतो कारण मला समजून घेणारी व्यक्ती सापडलेली असते आणि तेच महत्त्वाचं असतं खूप दिवस जातात आम्ही एकमेकांशी खूप बोलतो,आम्ही भेटतो,एकत्र जेवायला जातो,समजून घेतो पण म्हणतात ना की सुखाचे दिवस नंतर दुःखाचीही दिवस येतच राहतात

एक दिवस मी असाच कॅफेमध्ये बसलेला असतो तिच्यासोबत आणि अचानक मला कोणीतरी हाक मारत आवाज ओळखीचा वाटतो पण म्हटलं कोणतरी असेल मला गांगरलेला बघून ती सुद्धा गांगरते. ती गांगरते कारण मला गंगारलेलं बघून ती मला विचारणार तेवढ्यात जी हाक मारणारी व्यक्ती समोर येते "काय रे कारट्या काय करतोयस इथे कॉलेज नाही काय तुझं चंद्रशेखर...?"
"ओ तुम्हाला काय करायचं तो काय पण करेल इथे आणि हां चंद्रशेखर नाही आहे कळलं तेव्हा तुम्ही जावा" ती बोलते
मी तिच्याकडे बघून इशारे करतो (हात जोडून) अग बाई बस कर माझे बाबा आहेत ते
"अच्छा तर मग ह्याच नाव काय आहे कळेल का मला" बाबा

"ह्याच नाव आहे प्रदीप घाडगे आहे ओके कळालं ना आता मग तुम्ही इथून जा तुमचा मुलगा असेल तिथे दुसरीकडे जाऊन शोधा कोणत्या तरी टवाळक्या मुलीसोबत जावा इथून आम्हाला privacy हवीय"

privacy हे ऐकल्यावर माझ्या बाबांचा पारा अजून वाढला आणि
मी हिला इतकं आवरायचं नाव घेतो तर ही आवरतच नाही माझ्या जीवाची धडधड वाढत जात होती मी नुसता तोंडावर हात ठेवून बसलो होतो तेवढ्यात बाबांनी माझा कान जोरात पिळला आणि
"अरे ऐ कारट्या कॉलेज सोडून तू इथे गप्पा मारतोयस मुलीशी आणि स्वतःच्या नावाची लाज वाटते काय तुला म्हणून तू प्रदीप नाव ठेवलस आ तू काही बोलणार आहेस कि मी अजून काय बोलू"