कानोसा पाकिस्तानचा डिसेंबर २०१९ Shashikant Oak द्वारा नियतकालिक मराठी में पीडीएफ

Featured Books
  • तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 2

    रुद्र अणि श्रेयाचच लग्न झालं होत.... लग्नाला आलेल्या सर्व पा...

  • नियती - भाग 34

    भाग 34बाबाराव....."हे आईचं मंगळसूत्र आहे... तिची फार पूर्वीप...

  • एक अनोखी भेट

     नात्यात भेट होण गरजेच आहे हे मला त्या वेळी समजल.भेटुन बोलता...

  • बांडगूळ

    बांडगूळ                गडमठ पंचक्रोशी शिक्षण प्रसारण मंडळाची...

  • जर ती असती - 2

    स्वरा समारला खूप संजवण्याचं प्रयत्न करत होती, पण समर ला काही...

श्रेणी
शेयर करा

कानोसा पाकिस्तानचा डिसेंबर २०१९

कानोसा पाकिस्तानचा

सध्या काय काय चाललय आपल्या शेजारी राष्ट्रात? पाकिस्तानी मिडियावर, तेथील विचारक, संरक्षण तज्ज्ञ, जेष्ठ पत्रकार यांच्या चर्चांमधून भारताबद्दल काय बोलले जाते? याचा संक्षिप्त आढावा.




"मी तिथे येऊन हुकूम देईपर्यंत कोणीही एलओसी ओलांडून भारत व्याप्त काश्मीर मध्ये जायचे नाही!" ही गर्जना 'वझीरे आझम' इमरान खान यांनी युनोत अमेरिकेहून केली आणि मोठा गोंधळ उडाला…!


दिनांक ५ ऑगस्ट २०१९ नंतर काश्मीरचा प्रश्न आता उरला आहे काय? असेल तर त्यावर पाकिस्तानने काय करायला हवे? यावरील चर्चेत युनोत हा प्रश्न लावून धरणे इतकेच आपण करू शकतो. युद्ध तर आत्ताच्या 'हालात' मधे शक्य नाही. कश्कोल हातात घेऊन देशोदेशी फिरत असताना एका बाजूला आम्ही अण्वस्त्रेधारी आहोत. ती वेळ पडलीच तर वापरू वगैरे वल्गना करत राहून काय उपयोग? असे फटकळपणे म्हणणार्‍या काही पत्रकारांना हळूहळू घरी बसवले जात आहे. त्यातील एक आहेत - मोहतरम जनाब नजम सेठी. त्यांच्यावर इमरान खान यांनी कोटी रुपयांचा मानहानीचा दावा ठोकल्यानंतर कोणी त्यांना टीव्हीवर बोलवेना!



निष्पक्षपणे बोलणारे म्हणून प्रसिद्ध पाकिस्तानातून यूट्युबवर ‘नजम सेठी से सवाल’ खाजगी कार्यक्रमात विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देताना ते म्हणाले, 'इमरान खान यांनी एलओसी ओलांडू नका म्हणणे मला बरोबर वाटले. मग एकानी म्हटले, 'अहो ७२ वर्षे आवामला कश्मीर रगरग मधे बसलेली असताना आता तिथे जाऊ नये हे सांगून जनतेने ऐकले नाही तर फार मोठी पंचाईत होऊन बसेल. 'एवढा खटाटोप केला होता कशाला' ? हजारो कोटी वाया गेले, हजारोंनी आपली जाने गमावली त्याचे काय? अशा सवालाला उभे केले जाऊन इमरानखान यांची कुर्सी गमवायची वेळ येईल का? यावर 'सध्या तरी नाही वाटत' असे ते म्हणाले.





कार्यक्रमात दुसऱ्याला बोलू न देणार्‍या इर्शाद भट्टीनी आपल्या इस्टाईलमधे इमरान खान कसा आधीचे निर्णय फिरवण्यात पटाईत आहे याचे एक एक यु टर्न किस्से गिनतात आणि म्हणतात, 'कुछ भी हो सकता है!'




एक आहेत निवृत्त एयर मार्शल शाहीद लतीफ़. पाकिस्तानच्या हवाईदलाने भारतीय विंग कमांडर अभिनंदनाचे विमानखाली पाडल्याबद्दल बोलताना म्हणाले, 'मिग २१ (बायझन) जुनाट विमान आणि एक सु ३० आम्ही पाडले. त्याच्या जवळचे नकाशे, ब्रीफींगच्या झडतीनंतर आम्हाला वाटले की हा तर एखादा 'लिंबूटिंबू पायलट' होता! असेच बाकीचे असतील तर आमचे तैय्यारे उन्हें खा जाएंगे!' वगैरे म्हणून भारताचा पाणउतारा केला! आपल्या पाकिस्तानच्या एफ १६ विमानांना तोड नाही! पण स्पेयर पार्ट्स नाहीत. अशी खंत व्यक्त केली.

त्यांचे म्हणणे पडले की आज ना उद्या पाकिस्तानला कश्मीरमधे घुसावे लागेल…






पाकिस्तानी बोलघेवड्या न्यूज एंकरमधे डॉ फीज़ा अकबर मोहतरमा पुढे असतात. यांच्या 'ऐसे नहीं चलेगा' नावाच्या कार्यक्रमात भारताबद्दल, मोदींच्या नावाने खूप बोल लावले जातात. त्यांच्या चॅनलचे नावच ‘बोल न्यूज’ आहे. भारतातील मुस्लिमांना जगणे कसे मुश्किल झाले आहे हे रंगवून सांगायला आवडते. मात्र त्यांना पानपट्ट्या खाऊन लाल दात दाखवणार्‍या मुल्ला-मौलवींचा तिटकारा आहे.





भारताकडून निवृत्त लेफ्टनंट जनरल राज कादियान तिच्या तंगड्या तिच्या गळ्यात अडकवायचे काम आपल्या धीरगंभीर आवाजात करत असतात. 'आमच्याशी जंग करायच्या आधी तुम्ही तुमची औकात ओळखा. काश्मीर तर विसरा. आझाद काश्मीरचे लोक उठाव करून आम्हाला मिळतील. काटेरी कुंपण ओलांडून यायचे असेल तर जरूर या. लाशकरून परत जायची हमी हम देते हैं' अशा आशयात त्यांचे स्पष्ट बोल असतात.


इमरान खान पुन्हा पलटी खाणार किंवा नाही हे काळ ठरवेल…!

परवेझ़ मुशर्रफ यांना घसीटकर पाकिस्तानात आणावे आणि इस्लामाााबादच्या डी त्यांची ' लाश' ३ दिवस लटकवून ठेवून नंतर फाशी द्यावी! हा फैैसला पाकिस्तानी जज वकार सेठ यांनी दिल्यानंतर आता आर्मीचा रोष न्यायालयातील वरिष्ठ जज लोकांवर निर्माण झाला आहे!