Toch chandrama - 5 books and stories free download online pdf in Marathi

तोच चंद्रमा.. - 5

जुनी कहाणी

त्या चंद्रावरच्या कृत्रिम बागेत हा असा कृत्रिम मानव समोर नि मी माझ्या अकृत्रिम भावना त्याला सांगतोय. म्हणजे त्या माझ्या जुन्या लव्हस्टोरीनी सुरूवात करायला हवी!

"तुला लव्हस्टोरी म्हणजे काय हे तर ठाऊक असेल ना राॅबिन?"

"आॅफकोर्स! आधी नव्हते माहिती पण आता टीव्हीवरच्या सिरीयल्स बघून शिकतोय मी!"

"म्हणजे? तू टीव्ही बघतोस?"

"अर्थात. घरी असलो की. त्यात सीरियलचा मुख्य विषयच असतो तो. प्रेमकथा. ती मुख्य कथा तरी असते नाहीतर कुठल्याही कथेचा साईड भाग तरी. एवढे कळलेय मला. अर्थात हे प्रेम म्हणजे काय हे नाही मला ठाऊक!"

"मी सांगायचा प्रयत्न करू का? मला वाटतेय तुला काही प्रमाणात ठाऊक आहे ते.."

"मला? मला ठाऊक आहे हे मलाच ठाऊक नाही?"

"होय.. ऐक हां.."

"बोल.. ब्रो."

"मी आलो तेव्हा तुला वाटले होते ना की आई माझ्यासाठी स्वतः जेवण बनवेल.. ते का वाटले तुला? अर्थातच तुला आईचे प्रेम कळले असणार .. एवढेच नाही.. आई वडील आणि त्यांचा मुलगा.. ही नाती सुद्धा."

"नाती?"

राॅबिन हातातील मशीन मध्ये शोधत क्षणार्धात म्हणाला, "ओह.. किथ अँड कीन्स.. एवढे शिकलो आहे मी! तरीही .."

"मला एक सांग, तू बाबांकडे चार वर्षे झालीत आहेस.. त्यांना काही झाले तर तुला काय वाटेल .."

"काय अंबर.. काहीही बोलतोस तू. शुभ बोल तर म्हणे!"

"हेच! हेच ते प्रेम. अफेक्शन. लव्ह.."

"पण सिरीयल मध्ये .."

"तो तरूण आणि तरूणींतला प्रेमकथेचा वेगळा भाग झाला. ते ही प्रेमच. खरे सांगू आज वाटतेय.. हे जगच प्रेमावर चालते सारे. तुला ते गाणे माहितीय.. साँसोंपे नहीं, कदमोंपे नहीं.. मोहब्बत पे चलती है दुनिया.."

राॅबिन आपल्या हातातल्या मशीन कडे पाहात म्हणाला, "ओह! मोहब्बत.. म्हणजे प्रेम!"

"छान आहे रे हे.." मी त्या मशीनकडे पाहात म्हणालो, "सगळ्या भाषांतले शब्द आहेत यात?"

"नाही .. सगळ्याच नाही.. आम्ही ज्यांच्याकडे कामाला आहोत ती आणि त्याच्याशी संलग्न भाषा.. म्हणजे मराठी संस्कृतातून आलीय.. तिच्यासारखी हिंदी, गुजराती .. हिंदी आली तर थोडे उर्दू .."

"छान. तर सांगत होतो ते प्रेमाबद्दल .. तरूण वयातील प्रेम हे अॅट्रॅक्शन.. इनफॅच्युएशन.. नि मग प्रेम .."

"ती थियरी सोड अंबर ब्रो.. गो अहेड विथ युवर ओन लव्हस्टोरी! मला आवडेल ऐकायला .."

"हुं.. राईट यू आर. लोकांना आवडतात प्रेमकथा. पण रोबोंनाही आवडू लागल्या म्हणजे .."

"खरेय तुझे.. पण वुई आर नेक्स्ट जेन रोबोस.. ह्युमनाॅईड्स .. ते सोड. टेल युवर स्टोरी!"

"विश आय हॅड समथिंग टू टेल डिअर! राॅबिन, मी म्हणतो म्हणून लव्हस्टोरी! आणि ब्रेकअप!"

"म्हणजे?"

"माझा ब्रेकअप झाला.. विदाऊट एनी लव्हस्टोरी!"

"म्हणजे?"

"म्हणजे ऐक.. आमची एक ज्युन होती.."

"ज्युन?"

"ज्युनिअर रे.. शाॅर्टफाॅर्म मध्ये ज्युन. तर मी सेकंड इयरला होतो. ती फर्स्ट. वर्षा काळे. छान होती. गोड म्हणावी अशी .. गायची छान. आवडायची मला."

"मग?"

"काही नाही. मी लायब्ररीत बसून पाहात राहायचो. तिच्यामागे एकदा नकळत तिच्या घरापर्यंतही जाऊन आलो. तिची सगळी माहिती होती माझ्याकडे. नाव, गाव, पत्ता, फोन नंबर .. वगैरे इन्क्युडिंग वाढदिवस .."

"वाढदिवस म्हणजे बर्थडे.. राईट?"

"यस्स.. दोन अडीच वर्षे स्वप्ने पाहिली तिची."

"मग?"

"मग काही नाही! दोन चार वेळा बोललो असेन तिच्याशी. पण तेवढयाने काय होतेय?"

"मग अजून बोलायचं ना?"

"छे रे! माझा स्वभाव आड येतो. मी तसा मुलखाचा लाजाळू."

"लाजाळू .. हां शाय!"

"यस्स."

"पण म्हणून काय झाले. तू सोडून दिलेस तिला?"

"सोडून? पकडले कधी तर सोडेन? पुढे काहीच घडले नाही. काॅलेज संपले नि स्टोरी संपली. वन सायडेड. म्हटले ना.. मी म्हणतो म्हणून तिला प्रेमकथा नि ब्रेकअप म्हणायचे."

"पण टेल मी ब्रो.. हे शाय.. लाजाळूपण.. शब्द करेक्ट आहे ना.. कशाला. मनात आहे ते सांगून टाकायचे!"

"नि ती नाही म्हणाली तर?"

"ओह ब्रदर.. व्हाॅट लाॅजिक.. असेही ती कुठे हो म्हणालीय तुला?"

"हुं, तेही खरंच."

"तर हे शायबिय असणे.. कान्ट अन्डरस्टँड.."

"अरे, तुला नाही कळणार.. तो प्रोग्राम टाकला तर कदाचित कळेल तुला."

"ते ही खरेच ब्रो. पण एक झाले आता.. यू हॅव अ क्लीन स्लेट राईट?"

"हुं.."

"अरे, रोजचा दिवस नवा. काल गेला भूतकाळात. असेही पृथ्वी सोडून आलायस.. आता इथे नवीन कहाणी .."

"आम्ही लहान होतो ना तेव्हा खेळताना म्हणायचो, नवा भिडू नवे राज्य .. तसे नवी जागा नवी स्टोरी!"

"अंबर ब्रदर, जस्ट डू इट. आणि विसरू नकोस.. युवर फ्रेंड राॅबिन इज देअर विथ यू!"

"ओह! थ्यांक्स! चल. उशीर होईल. अाई वाट पाहेल घरी."

"चल."

आम्ही निघालो. बोलता बोलता त्याला मी लहानपणीच्या आठवणी सांगू लागलो. आई आणि बाबा .. माझी मोठी बहीण.. आता लग्न होऊन सासरी नांदणारी.. सगळ्याबद्दल. लहानपणीच्या भांडणांबद्दल.. तर राॅबिन म्हणाला,

"ओह! आय मिस दिस.. ह्युमनाॅईड्स विल नेव्हर हॅव चाईल्डहूड.. विश कुड हॅव.."

"खरेय राॅबिन ब्रो."

रस्त्यात शेजारच्या घरातील रोबो भेटली. क्युरी. शेजारील वर्मांच्याकडे असते ती.

"हाय! क्युरी.. कहां चली?"

"इधरही यार. थोडा काम है.. वेदर अाॅल क्लियर है पर शर्माके घरवाले थोडा आलसी हैं.. नाॅट दॅट आय माईंड गोईंग आऊट.. पर आदमियोंको थोडा तो एक्सरसाईझ चाहिए ना? गुड फाॅर देअर हेल्थ."

"हुं..सही बात है क्युरी .. चल. चलता हूं.."

"अरे राॅब, हू इज धिस बाॅय? कभी देखा नहीं?"

"अरे क्युरी.. नया ही है यहां.. ये हमारे सर का बेटा.. अंबर.. अबही आया है.. अर्थसे."

"हाय! वाॅव! हाऊ डू यू फाईंड इट हिअर?"

क्यूरीने 'हाय' म्हणत हस्तांदोलन केले. राॅबिन नि क्युरी दोघांच्या हाताचा स्पर्श एकसारखाच होता! थंडगार!

"थोडी अादत डाल रहा हूं.. वहांसे अलग है ना सब.." मी म्हणालो.

"चलो मादाम क्युरी .. हम निकलते हैं.."

राॅबिन म्हणाला नि आम्ही निघालो. उगाच राॅबिनची ताणावी म्हणून म्हणालो, "क्युरी इज युवर गर्लफ्रेंड?"

"हा! हा! इतना हमारा नसीब कहां?"

"वाॅव! रोबो लोग भी नसीब की बातें करने लगे आजकल?"

"हा! हा! नसीब! पण तुझ्या कहाण्या ऐकून वाटतेय.. विश वुई आय हॅड वन इन अवर प्रोग्राम!"

"काय? नसीब?"

"काय काय विचारतोयस.. गर्लफ्रेंड यार!"

"वा! राॅबिन इज बिकमिंग रोमँटिक.. आज टीव्हीवरफफ न्यूज येणार बघ.. ब्रेकिंग न्यूज.. ह्युमनाॅईड फाॅलिंग इन लव्ह! आज चांदपर घटी सत्य कहानी.. राॅबिन नामके एक ह्युमनाॅईड ने किया क्युरी नामक दुसरे शी ह्युमनाॅईडको प्रपोज..देखते रहिए हमारा स्पेशल रिपोर्ट.. सिर्फ चांद अब तक पर.."

"गुड इमॅजिनेशन यार.. "

"नाॅट इमॅजिनेशन.. इट्स काॅल्ड फँटसी.."

"व्हाॅट एव्हर डिअर.. फँटास्टिक फँटसी.. आता अंबर ब्रदर घरी चला.. युवर मदर इज वेटिंग!"

इतर रसदार पर्याय