पॅरलल जग - Sci fi कथा Dhanashree Salunke द्वारा साहसी कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

पॅरलल जग - Sci fi कथा

“ पॅरलल जग Sci -Fi कथा”

बरीच रात्र झाली होती . आज घड्याळाचा काटा दहाच्या पुढे गेला तरी धनश्री आणि तिच्या टीमचे काम अविरत चालूच होते . सगळ्यांची मान कॉम्पुटर मध्ये खुपसलेली होती. कीबोर्डवर चालेल्या बोटांचाच काय तो खट-खट आवाज बे मध्ये येत होता. टार्गेट वेळेत पूर्ण करण्यासाठी एका सुप्रसिद्ध आय.टी कंपनी मधील त्यांची ती सगळी टीम अविरत कामात जुंपली होती. इतक्यात धनश्रीच्या मनगटावरील फिट बँडमध्ये (डिजिटल घड्याळामध्ये) बीप-बीप आवाज येऊन लाल रंगाची LED लाईट लुकलुकू लागलली . लगबगीने तिने फिट बँडचे एक बटन दाबले. तो आवाज बंद झाला. तिने स्वेड शिर्ट्ची टोपी पाठीवर टाकली.कॉम्पुटर लॉक केला आणि खुर्ची मागे सारून ती जागेवर उभी राहिली.

" गाईज लेट्स टेक अ फिफ्टीन मिनिट्स कॉफी ब्रेक " तीने टीमला सूचना दिली आणि एकाएकी सगळ्यांचे कीबोर्डवर चालणारे हात थांबले.

"ओह थँक्स धना सगळे एकसाथ बोलले.
मग काही जण खुर्चीवर बसल्या-बसल्या तात्काळलेले हात-पाय तानू लागले तर काही डेस्कवर डोके ठेऊन लगेच झोपी गेले. ती टेबल पासून लांब जाताना तिची नजर तिच्यापासून दोन सिस्टिम्स सोडून बसलेल्या अभिषेक (अभी) कडे गेली. तो तिच्याकडे संशयास्पद नजरेने पाहत होता.तिलाही ते जाणवलं तरीसुद्धा ती बळचं ओठ ताणून हसली आणि बाहेर पडली.
शेवटच्या विसाव्या मजल्यावर त्यांची कंपनी स्थित होती. आठ वाजताच कामाचे तास संपले होते आणि इतर टीम्स मधील लोक घरी निघून गेले होते. अख्या मजल्यावर फक्त त्यांचा केबिनची लाईट चालू होती. ती व्हरांड्यात आली आणि उजव्याबाजूला वळली.ती निघून जाताच सगळ्यांनी आपापसात गॉसिप्स करायला सुरवात केली .

"विचित्रच आहे ना हि जरा , कामाव्यतिरिक्त कोणाशी जास्त बोलत नाही ,बसत नाही , कधी टीम आऊटींगला येत नाही" नीरज म्हणाला .

"अरे ती कोठे राहते ते देखील कोणी पाहिले नाही अजून ,ऑफिसला दिलेल्या पत्त्यावर जास्त नसतेच ती " मनीष बोलला.

"तुला कसं माहिती" अभीने विचारले.

"तिच्या बिल्डिंग मध्ये मित्र राहतो रे एक मग काढली माहिती" डोळा मारत मनीष बोलला.

"सोशल मीडियावरही नाही" वनिता म्हणाली.

"पण तिला टीम लीड कसं बनवलं मग" अभीने उत्सुकतेने विचारलं .

"कारण तीच नॉलेज छान आहे ,ती खूप हार्ड वर्किंग आहे , वेळे आधी काम पूर्ण असतं तीच ,काम करण्यात आणि करून घेण्यात ती पटाईत आहे" विराज बोलला.
आठवडा भरापूर्वीच नव्याने टीम मध्ये आलेल्या अभीच्या मनात पहिल्या दिवसापासून तिच्या विषयी एक कुतूहल होते. एकदा त्याच्या हाती तिच्या डेस्कवरची एक डायरी लागली आणि तिच्या नकळत त्याने ती चाळली.त्यातल्याकोडवर्ड प्रमाण लिहिलेल्या नोंदी त्याला कळणाऱ्याच नाही. दिवसेंदिवस तिच्या विषयी कुतूहल वाढत गेले.

"अभ्या स्मोक" वनिताने हाताने खून करत अभीला विचारले

"आय डोन्ट स्मोक , तुम्ही या जाऊन मी कॉफी घेतो" तो टीमकडे पाहत म्हणाला.
सगळे व्हरांड्यातून डाव्याबाजूला स्मोकिंग झोनकडे जायला वळले. ते जाताच अभी लगबगीने बाहेर आला आणि उजव्या बाजूला गेला. धनश्री नक्की कुठे गेली आहे हे त्याला पाहायचे होते.तो पॅसेजच्या शेवटाला पोहचला तिथून टेरेसला जायला एक जिना होता.तो दबक्या पावलाने टेरेसच्या दरवाज्या पर्यंत गेला पण आत जायची त्याची हिम्मत झाली नाही .नेहमी कुलूपबंद असणाऱ्या पण आता अर्धवट उघड्या असलेल्या दरवाज्यातून तो आत पाहू
लागला. टेरेसवर दिवे न्हवते पण शेजारील समान उंचीच्या इमारतीवर लावलेल्या बॅनरच्या दिव्याचा थोडा उजेड टेरेसवर येत होता. त्या उजेडात ती चालणाऱ्या सावली प्रमाणे त्याला दिसत होती. ती टेरेसच्या कठड्या जवळ गेली आणि काहीच वेळात तिथे अगदी तळहातावर बसेल इतके छोटे ड्रोन उडत आले. आता पुढे काय होणार या उत्सुकते पोटी तो एकटक पाहत होता.तिने ड्रोनवरील एक बटन दाबले आणि एक छोटा कप्पा उघडला त्यातून तिने एक चिट्ठी काढली आणि पटकन खिशात टाकली. ड्रोनचा कप्पा बंद झाला आणि ते पुन्हा आलं त्या दिशेने असून गेलं. आता धनश्रीचं काम झालेलं दिसतंय आणि ती परत येईल. या विचाराने तो पटकन
जिन्यावरून उतरून कॅफेटेरियच्या दिशेने वळला. कॉफीमशीन मधून कॉफी घेऊ लागला वारंवार मागे व्हरांड्यातपाहत होता आणि काही क्षणातच ती व्हरांड्यात आली.तिने जाता-जाता अभीला कॅफेटेरिया मध्ये पहिले पण न थांबता केबिन मध्ये वळली . अजून कोणीच परतलं न्हवतं . ती तिच्या सिस्टिमपाशी जाऊन बसली. अभी कॉफी घेऊन परतला. त्याच्याकडे लक्ष न देता ती स्वतःच काम करू लागली.

"अजून पाच मिनिट वेळ आहे ब्रेक संपायला" तिच्याजवळ येत तो बोलला.

"आय नो ,फोर मिनिट्स अँड ट्वेंटी सेकंड्स आर लेफ्ट" ती सिस्टिम मधून मान बाहेर न काढताच बोलली.त्याच्या कपाळावर आट्या पडल्या. तिला त्याच्याशी बोलण्यात काही रस न्हवता हे त्यालाही जाणवले.

"युअर फिट बॅन्ड वॉच इस वन ऑफ इट्स काईन्ड ,जस काही खास ऑर्डर देऊन डिसाईन केलय आणि तुझे स्पोर्ट शूज , धावपळ कारण्यासाठी अगदी योग्य” अभीच्या त्या निरीक्षण युक्त टिप्पणीने तिने त्याच्याकडे मान
वळवली.

"येस इट इस अ स्पेशिअली डिसाईन्ड बँड आणि मला स्पोर्ट शूज वापरायला आवडतात , गोष्टी फिरवू नकोस रे तुला काही विचायच असेल तर स्पष्ट विचार , मला असा शब्दांचा खेळ नाही आवडत" धनश्री त्याच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाली. तो काहीसा ओशाळला आणि त्याच्या जागेवर जाऊ लागला .

"आणि अभी टेरेसची चावी माझ्याकडे असते कोणाला माहित नाही हे पण जर तुला कधी लागली तर सांग" धनश्रीच्या बोलली आणि काय बोलावे त्याला कळेना . तो गप्प होता तितक्यात टीम मधले सगळे आले. काम पुन्हा सुरु झालं . आता मात्र त्याने तिच्याकडे एकदाही पाहिलं नाही.रात्रीचा एक वाजला , काम थांबलं आणि सगळे घरी जाण्यासाठी निघाले . सर्व फिमेल स्टाफ साठी कंपनीची कॅब आली.पण धनश्री तिच्या इको फ्रेंडली गाडी मधून आली होती कारण आज घरी जाण्याआधी तिला आणखीन बरीच कामं करायची होती .

"मनीष तुझी बाईक मी नेतो आज तू माझी कार नेशील का ? "अभीने विचारले.

"हो चालेल पण काही काम आहे का ? "

"हो रे जरा काम आहे , तुझं हेल्मेट आणि जर्किनही दे " अभी बोलला आणि त्याची बाईक घेऊन निघून गेला.अर्थात धनश्रीच्या गाडीच्या मागे.सगळं पार्किंग मोकळं झाल्यावर धनश्रीने तिची गाडी काढली आणि मुख्य रस्त्याला लागताच गाडीने वेग धरला. मग रस्त्याला कडेला तिची वाट पाहत थांबलेला अभी तिचा पाठलाग करू लागला.हेल्मेट आणि जर्किन घातल्याने तो अभी आहे हे ओळखू येत न्हवतं. एका सार्वजनिक पार्किंग मध्ये धनश्रीने गाडी पार्क केली आणि तिथे पार्क केलेलं केलेली इ- बाईक घेऊन ती पुन्हा रस्त्यावर आली. या वेळी तिचा अर्धा चेहरा कापडाच्या मास्कने झाकलेला होता आणि डोक्यावर तिने हुडी चढवली होती.आता दोन वाजायला आले होते. त्या अरुंद रस्त्याला उजव्याबाजूला एक छोटा रस्ता फुटला ती तिथे
थांबली.ह्या रस्त्याचाच्या दुतर्फा बंगले , रो होऊस होते आणि दोन्ही बाजूला तीन-तीन अश्या सहा स्ट्रीटलाईट्स होत्या. तिने तिची साईट बॅग खोलली आणि त्यातून टेबल टेनिसच्या चेंडूच्या आकाराचा एक चेंडू समान वस्तू बाहेर कधी . तिने बटन दाबताच त्यात लाईट लागली मग तळ हातावर तिने तो चेंडू ठेवला.तो हातावर तरंगू लागला.तिने सहा चेंडू बाहेर काढलेते सगळे प्रकाशित चेंडू हवे मध्ये तरंगत होते.तिने खिशातून रिमोट काढले आणि एक एक करत ते सगळे प्रकाशित चेंडू प्रत्येक स्ट्रीट लाईटवर जेथे "सेन्सर "" असतं तेथे नेले. ह्या सेन्सरवर जेव्हा उजेड पडतो तेव्हा त्याला वाटत कि आता सकाळ झाली आहे आणि मग ते स्ट्रीट लाईट्स बंद
करतात. त्यामुळेच सकाळ होताच स्ट्रीट लाईट्स आपोआप बंद होतात आणि धनश्रीने प्रकाशित चेंडू सेन्सर वर नेऊन सगळ्या स्ट्रीट लाईट्स बंद पडल्या. त्या रस्त्यावर लख्ख काळोख पसरला. मग एकदा आजू बाजूला पाहत ती त्या रस्त्यावर चालत गेली. गाडी तिने बाहेरच ठेवली. अभी तेथे एका पार्क केलेल्या कार मागे लपून पाहत होता . त्याने बाईक तिथेच लावली.पण हेल्मेट चेहऱ्यावर तशेच ठेवत तो जिथे धनश्रीची बाईक उभी होती तिथे आला आणि बाईकमागे खाली लपून बसला. अंधारात त्याला काही दिसत न्हवत तितक्यात त्या अंधारातला रस्त्याला
T आकारात क्रॉस करणाऱ्या रस्त्यावरून एक कार गेली.त्याच्या उजेड तिच्या बॅग वरील रिफ्लेक्टर स्टिकर वर पडला आणि तो काही क्षणासाठी प्रकाशित झाला . आता अभीला अंदाज आला ती कुठे आहे याचा. एका अंधुकसश्या हलणाऱ्या , आकाराचा अंदाज न येणाऱ्या आकृती प्रमाणे ती दिसू लागली.आता ती डाव्याबाजूला असणाऱ्या दुसऱ्या इमारती जवळ आली आणि पाईप आणि इतर अडथळ्यांच्या साहाय्याने वर चढत दुसऱ्या मजल्याच्या बाल्कनी मध्ये शिरली.अभी तिला आणखीन जवळून पाहण्यासाठी इमारती जवळ आला . दहा मिनिटे काही हालचाल न्हवती मग काही तरी पडण्याचा आवाज आला आणि ती बाल्कनी मध्ये परत आली.तिच्या हातात एक छोटा लॅपटॉप होता तो तिने पटकन बॅगे मध्ये टाकला तिच्या मागोमाग एक तरुणआतून धावत बाल्कनी मध्ये आला . त्याने तिच्यावर झडप घातली.अभी त्याच्या नकळत इमारतीच्या दिशेने तिला वाचवायला धावला पण लगेच तो भानावर आला आणि अजून थोडा वेळ वाट पाहण्यासाठी जागेवरच थांबला. वर काय होतंय ते तो अस्वस्थेने पाहू लागला.धनश्रीने स्वतःला त्याच्या तावडीतून सहज सोडवले आणि दुसऱ्या क्षणात त्याला उचलून आपटले. मग बाल्कनी मध्ये वाळत असलेली ओढणी घेऊन तिने त्याचे हात पाठी मागे बांधले. त्याच्या तोंडात रुमाल कोंबला आणि आणि सरसर खाली उतरू लागली. हे सगळं खालून पाहणारा अभी श्वास रोखुन हे पाहत होता. ती खाली येतीये हे दिसताच तो त्याच्या गाडीच्या दिशेने धावला. कार मागे लपून बसला.तिने रिमोट्चे बटण दाबून सगळे चेंडू गोळा केले आणि ती निघून गेली. आता अभी पूर्ण विचारात हरवून गेला.

'हि आहे तरी कोण ? एका ट्रेनिंग घेतलेल्या सराईत फायटर प्रमाणे हि त्या तरुणाला भिडली.असे-असे गॅजेट्स आहेत तिच्याकडे जे सहजा-सहजी नाही मिळत.आज ही दिवसाढवळ्या काही स्त्रिया एकट्या दुकट्या नाही फिरत आणि हि भर रात्रीच्या बेफिकीर फिरते. ऑफिस मध्येही कोणाला काहीच माहित नाही' थोडावेळ विचारात गेला मग तो घरी जाण्यासाठी निघाला.तो घरी पोहचला आणि तिच्याच विचारातच त्याने घराचा दरवाजा खोलला आणि आश्चर्याचा धक्का त्याला बसला.

"ओह शीट SSS" तो किंचाळला. कारण सोफ्यावर धनश्री त्याची वाट पहात होती.

"रिलॅक्स अभी , मी सांगते तुला सगळं , मला माहितीये तुझ्या मनात खूप प्रश्न असतील आणि मी त्याची उत्तरं द्यायलाच मी इथे आले आहे " अभीने दरवाजा लावून घेतला तरीही दरवाज्यात खिळून थांबला होता. पाच मिनिटे तो काहीच बोलला नाही .
हिची कशी हिम्मत झाली माझ्या घरात घुसायची , या विचाराने राग.
चावी नसताना हि आठव्या मजल्यावर कशी आली असेल , या विचाराने उत्सुकता.
हिचे इथे येण्याचे कारण काय असेल , या विचाराने शंका अशा मिश्र भावनांचे तो निशब्द झाला होता.

"तू फ्रेश होऊन ये मग बोलू आपण"

"हॅलो तू माझा घरात बसलीये , मी काय करायचं ते नको सांगूस मला आणि तू इथे आलीच कशी ? "

"बाल्कनी मधून" ती थंडपणे बोलली.

"सिरिअसली ? अगं नवव्या मजल्यावर राहतो मी .. आणि असं दुस्र्याचा घरात घुसणं योग्य आहे का ?" तो चिडून

"मग दुसऱ्याचा त्याचा नकळत पाठलाग करणं योग्य आहे का ?" तिने विचारले आणि तो ओशाळला.
"तुला कसं कळलं ? "

"सात दिवस पूर्वी जेव्हा तू ऑफिस जॉईन केलंस तेव्हा पासून मी ओब्सर्व करतीये तुला , टेबलवर विसरलेली माझी डायरी तू माझ्या नकळत वाचायचा प्रयत्न केलास ,मग माझ्या हालचालींवर नजर ठेऊन होतास, तिसऱ्या दिवशीच माझ्या घरापर्यंत पोहचलास , मग काय करणार जे माझा पाठलाग करतात असं मला जाणवतं त्यांचा पाठलाग मला करायला लागतो , सगळी माहिती मिळवायला लागते"

"पण का " त्याने वैतागून विचारले.तितक्यात डूअर बेल वाजली.डिलिव्हरी बॉय खाण्याची ऑर्डर घेऊन दारात उभा होता.

"आपण आज खूप मेहनत घेतलीये ना मग भूकपण खूप लागलीये म्हणून येता-येता तुझ्या नेहमीच्या रेस्टोरेंटवर ऑर्डर देऊन आले होते" खाण्याचे बॉक्सेस आत घेत ती बोलली .

"खाल्यावर सांगते सगळं" तिने पदार्थाचे बॉक्स डायनिंग टेबल वर ठेवले. अभीने खांद्यावरची बॅग सोफ्यावर आपटली आणि फ्रेश व्हायला गेला. तो परत आला तोपर्यंत तिने तिच्या वाटेचं जेवण संपवलं होतं. काहीच न बोलता तो जेवत होता. ती बाल्कनी मध्ये जाऊन थांबली.त्याच झाल्यावर तो बाल्कनीमध्ये आला.

"आता तरी बोलशील का ?"

"तुला काय वाटतं आपल्या नेहमीच्या चाकोरीच्या आयुष्यात आपण इतरांचं काही लागतो का ?"

"हो नक्कीच , प्रत्येक माणसाने समाजाच मी स्वतः लहान मुलांच्या एन. जी.ओ साठी काम करतो , माझे मित्र आहेत ते गावातल्या स्त्रियांना रोजगार द्यायला काम करतात आम्ही रस्त्यावरील प्राण्यांसाठी adoption कॅम्प ऑर्गनाईझ करतो, Being human we should stand for each other"

"And what अबाऊट our mother earth ?"

"तिची काळजी घेणंही जवाबदारी आहे आपली , मी वर्षातून कमीत कमी शंभर झाडे रोपण करतो"

"खूप छान , तुला जाणीव तर आहे, पण तुला वाटतं ते पुरेसा आहे ?"

"नक्कीच नाही... पण माझा खारीचा वाटा "

"तुझ्या सारख्या लोकांचं खरंच कौतुक वाटतं , ज्यांना घेतलेल्या गोष्टींची जाण आहे , आणि आम्हाला तुझ्या सारख्या लोकांची गरज आहे "

"तुम्हाला म्हणजे नक्की कोणाला ?"

"एका हजारो वर्षांपासून चालत आलेल्या आणि धरतीची सेवा करण्यास आपले जीवन अर्पण केलेल्या आमच्या पंथाला"

“नीट एक्सप्लेन सांग ना तुम्ही को आहात ... आणि मी काय करू शकतो तुमच्यासाठी ते "

"तू आमच्या पंथामध्ये सहभागी होऊ शकतोस ... या जगात असे खूप लोक , खूपं गट आहेत ज्यांनी कोणाच्याही नकळत या पृथ्वीची जवाबदारी आपल्या खांद्यावर उचलली आहे आणि आमचा त्यातलाच एक कोणाच्याही नजरेत न येता एक पॅरलल जग बनवून आम्ही काम करतोय , जीव तळहातावर घेऊन लढत आहोत ... जीव अर्पण करत आहेत आणि जसजसा वेळ जाईल अधिकाधिक लोकांनी हि जवाबदारी घेणं गरजेचं आहे"

"पण तुम्ही नक्की करता काय , Is it a सम काईन्ड ऑफ सिक्रेट एजन्सी? आणि तू जो लॅपटॉप त्या माणसाकडून..... ? "

"सध्या साठी एवढी माहिती बास ... "ती त्याच बोलणं खोडून बोलली.

"तुला मी सात दिवसांचा वेळ देते , तू रिसर्च कर.... कोणत्या दिशेने आपली पृथ्वी चालली आहे त्याचा अभ्यास कर ... तुझ्या सारख्या लोकांची खूप गरज आहे ... तू जर तुझ्या या खारीच्या वाटेला सिंहवाचा वाटा बनवण्यास तयार झालास तर मी सगळं सांगेल तुला , नाही तर माझ्याविषयी माहिती काढणं तुला थांबवाव लागेल" ती बोलाली आणि दरवाज्याच्या दिशेने
निघाली. जायच्या आधी तिने एक पुस्तक त्याच्या हातात दिले.धनश्री निघून जाताच त्याने ते पुस्तक चाळायला सुरवात गेली. पुस्तकाचा कव्हर फोटो पाहून तो हळहळला. एका मोठ्या समुद्र पक्ष्याच्या चेहऱ्यावर पॉलीथिनची पिशवी गुंडाळली गेली होती. पिशवीतून फक्त त्याची चोच बाहेर आली होती पण अख्खा चेहरा आणि शरीराचा काही भाग त्या पिशवीत बंधिस्त झाला होता. कोणाकडून तरी निष्काळीजेने समुद्रात किंवा समुद्र किनारी टाकलेली ती पिशवी पक्षाच्या संपर्कात येऊन त्याच्या जीवानिशी उठली होती. त्याने पान पलटले पुढच्या पानावर
एका कारखान्यातील विषारी पाण्याने प्रदूषित झालेल्या नदीचे चित्र होते जिच्या किनारी हजारो मासे मृत अवस्थेत पडले होते.त्याच्या पुढील पानावर गाईच्या आणि बकरीच्या पोटातून काढलेले प्लास्टिकचे छायाचित्र होते . त्यानंरचे चित्र पाहून तो त्याच्या डोळ्यातले पाणी अडवू शकला नाही . त्या चित्रात कितीतरी मोर रखरखत्या रानात मारून पडले होते प्यायला पाणी न मिळाल्यामुळे. पुढील चित्रं पहाणे शक्य न झाल्याने त्याने पुस्तक बंद केले आणि विचार करू लागला.
'कोणत्या जगात राहतो आपण , इथे लोकांना चिंता आहे फक्त स्वतःच्या कुटुंबांची वयक्तिक,आर्थिक प्रगतीची , चंगळवादाच्या या जगात आपण निसर्गाचे काही देणे लागतो याच कोणाला काही नाही , मीही त्यातलाच एक आहे का ? ' विचारात त्याला झोप कधी लागली कळालंच नाही.
पुढील सहा दिवस तो याच गोष्टीवर विचार करत होता .आज सातवा दिवस होता त्याचा निर्णय तो धनश्रीला सांगणार होता.दोघेही ऑफिस मधून लवकर निघाले.

"इलेकट्रीक कार"गाडी मध्ये बसताच अभी बोलला.

"येस" गाडी चालू करत धनश्री बोलली.

"मीही बुक केलीये तू दिलेल्या मॅगझीन मधील पाचवे आर्टिकल वाचून" अभी कौतुकाने बोलला. धनश्री समाधानाने हसली. तिला पहिल्यांदाच हसताना तो पाहत होता.काहीक्षण पाहताच राहिला.

"आपण कुठे चाललोय ? "

"सरप्राईझ" धनश्री त्या काहीच काहीच सांगता बोलली.

बराच वेळ गाडी चालवल्या नंतर गाडी अनेक जहाज उभे असलेल्या डॉक पाशी आली. दोघेही खाली उतरले .आपण इथे का आलोय याची उत्सुकता अभीला लागून राहिली होती.धनश्रीने गाडीचे मागचे दार उघडले आणि एक भली मोठी बॅग बाहेर काढली. त्या नंतर एक सॅक बाहेर काढली आणि अभी जवळ दिली. तितक्यात तिथे एकी चाळिशीतला इसम आला.

" आलीस धना , चल आपली 'याच' (स्वयंचलित बोट) वाट पाहतीये " तो इसम धनश्रीला बोलला.

"थँक्स विनायक दादा" ती हसत बोली मग तिघे चालू लागले. अभीने ओब्सर्व केले की विनायकाच्या हातातही धनश्री घालते तसाच घड्याळ होतं पण त्या मानाने त्याचं राहणीमान तसं साधं होतं.चालत चालत ते एका तात्पुरत्या उभ्या केलेल्या आणि छोटासा दरवाजा असलेल्या कॅबिनेट पाशी आली.

"दादा तुम्ही सेटअप लावा मी येतेच" असं बोलून धनश्री बॅग घेऊन केबिनेट मध्ये गेली. बॅगेमध्ये स्कुबा डायविंगचा पोशाख होता तो घातला आणि बोटीपाशी आली .

"ओह माय गुडनेस , आर यु गोइंग टू डाइव्ह नाउ ? अँड व्हाय ?" आश्चर्याने अभीने विचारले.

"येस सर , कळेल तुला लवकरच"ती बोलली. विनायकाने बॅगेतून लॅपटॉप काढून बोटीच्या कोपऱ्यात ठेवलाहोता. लॅपटॉप आणि बरेच इक्विपमेंट बसतील असे कप्पे तिथे दिसत होते २० फूट लांब या बोटीला वरून छत होते आणि बाकी बोट काचेच्या खिडक्यांनी ती बंदिस्थ होती. आत लोकांसाठी बसायला आरामदायी सीट्स होत्या.मागच्या बाजूला छत नसलेली उघडी जागा होती जिथे तीन चार माणसे सहाच उभी राहू शकत होती. विशेष
म्हणजे हि चकचकीत बोट सौर्य उर्जेवर चालणारी होती.इतरवेळी पर्यटकांना या बोटीतून समुद्रचे दर्शन घडवून आणायचा विनायकाचा धंदा होता.

"दादा लोकेशन डिटेक्ट झालं पहा .." लॅपटॉप मध्ये पहात धनश्री बोलली आणि विनायकने बोट गतिमान केली.
समुद्राच्या मधोमध बोट थांबली.धनश्रीने सॅक मधून एक टॅबलेट बाहेर काढली आणि अभीला दिली.

"यात तुला माझा लाईव्ह इव्हेंट दिसले" ती बोलली मग . खाली बसून तिने पायात फिन्स चढवले जे पाण्याखाली माश्याच्या कल्ल्यांसारखे पोहण्यास कामी येतात . मग आय मास्क , ग्लोव्हस ,बांगडीच्या आकारा एवढा डाइव्ह कंप्युटर ,ऑक्सिजनचा सिलेंडर आणि इतर इक्विपमेंन्ट घेतले. डोक्यावर बेल्ट असलेला कॅमेरा चढवला. कमरेभोवती एक छोटी बॅग लपेटली आणि बोटीचा दरवाजा उघडून बोटीच्या मागच्या सपाट बाजूला आली , अभीही तिच्या मागे आला.

"जपून जा"तो बोलला तिने होकारार्थी मान हलवली. मग बोटीच्या संरक्षण रॉडवरून पलीकडे गेली आणि थेट समुद्रात सूर मारला. ती पाण्याच्या आत जाताच त्या जागी त पाण्याच्या तरंगांनी तयार झालेल्या रिंगला तो विरेपर्यंत पाहतहोता.पाहत अभी काही वेळ तिथेच उभा राहिला. मग त्याला टॅब्लेटची आठवण झाली तो दरवाज्यातून आत आलात्याने टॅबलेट विनायकाच्या लॅपटॉप शेजारी उभी केली आणि दोघे लाईव्ह इव्हेंट पाहू लागले . फक्त पाणीच पाणी दिसत होते.विनायक लॅपटॉप मध्ये पाहून तिला गाईड करत तिला. हेडफोनवर भेटनाऱ्या कमांड्स
ती फॉलो करत होती. लॅपटॉपच्या स्क्रिनवर एका लाल ठिपक्या जवळ निळा ठिपका जात होता. निळा ठिपका हे धनश्रीचे लोकेशन दर्शवत होते. अभी पुन्हा टॅबलेट मध्ये पाहू लागला. आता ती इतक्या खाली आली होती कि तिच्या आजू-बाजूने छोट्या मास्यांचे थवे जात होते . पण उजेड कमी कमी होत चालला होता . मग धनश्रीने डोक्यावरील दिवा लावला ज्यामुळे तिच्या समोरील काही अंतरापर्यंत उजेड पसंत होता.

"धनश्री चेक" विनायक बोलला.
धनश्रीने हात कॅमेऱ्या समोर नेऊन ओके असा संकेत दिला दिला आणि थांबली आता तिला आजू बाजूलामोठं-मोठे खडक , समुद्री वनस्पती आणि पाण्यात मुक्त संचार करणारे रंगी बेरंगी मासे दिसू लागले. फिन्स हलवत धनश्री त्याच उंचीवर पोहत आजू बाजूला पाहत होती.

"डाव्या बाजूच्या खडकाला क्रॉस कर" विनायक कडून सूचना मिळाली आणि लॅपटॉपवर लाल ठिपका आणि निळा ठिपका एकत्र झाला. अभीने टॅब मधून पहिले समोर एक व्हेल मासा ज्याची लांबी पंधरा वीस-मीटर असेल तो एका मासेमारीच्या कोणी तरी तरी समुद्रात टाकून दिलेल्या , काही ठिकाणी तुलेल्या जाळीत फसून तड-फडत होता.जाळीचा एक भाग खडकात अडकला होता. माश्याचा पुढील अर्धा भाग उघड होता पण कल्ल्यांपासून खालचा सगळा भाग जाळीत कैद होता. माश्याला त्या अवस्थेत पाहून अभी हळहळला.धनश्रीच्या उंचीपेक्षा
तिप्पट लांब असणाऱ्या माश्याला बघून त्याला धनश्रीचीही काळजी वाटली. धनश्रीने आजू बाजूला पहिले तिला दोन खडकांमध्ये लपण्यासाठी तिच्या उंची एवढी जागा मिळाली. म्हणजे मास्याला जाळीतून मोकळा केलं कि ती तिथे तो लांब जाई पर्यंत लपू शकत होती.नाही तर माश्याच्या शेपटीचा जोरदार फटका बसून ती तिथेच समुद्रवासी होण्याची शक्यता होती.ती माश्याच्या अवती-भवती फिरून जाळी नक्की कशी फसलीये याचा अंदाज घेऊ लागली. एका आईस क्रिमच्या कोनाच्या आकाराची ती जाळी दिसत होती. तिच्या लक्षात आले कि माश्याचे
कल्ले जाळीतून मुक्त केले कि तो स्वतःला बाहेर काढू शकेल . मग तिने कमरेला लटकवलेल्या बॅगेतून कटर काढले. एका बाजूच्या कल्ल्या खालची थोडी जाळी कापून काढली आणि दूर झाली. मासा त्याचा मोकळा झालेला कल्ला फडफडू लागला . मग ती दुसऱ्या बाजूला आली. तिने एकदा मागे पहिले . जिथे तिला लपायला जायचे होते त्या अंतराचा अंदाज घेलातला. जाळीचे दोरे कापत-कापत शेवटी एकच दोरा राहिला. ती थोडी दूर गेली. तिने हात लांब करत तो डोरा कापला आणि पटकन मागे खडकांच्या फटी मध्ये जाऊन लपली. मासा जाळीतून सुटला आणि त्याची स्वतंत्रतेच जलोष करत समुद्रात दूर पोहत गेला. इथे अभीने सुटकेचा निश्वास सोडला. मासा दूर जाताच धनश्री जाळी जवळ आली आणि कटरने पूर्ण जाळी कापून काढली. ती गोळा गेली आणि तिचा एक भाग कमरेला बांधुन ओढत ओढत बाहेर नेऊ लागली कारण हि जाळी इतर समुद्री जीवांना धोका ठरली असती. थोडा वेळात धनश्री समुद्राच्या पातळीवर आली अभी धावत डेक वर गेला तिला हात ठेऊन बोटीवर घेतले आणि त्याच्या नकळत मिठी मारली.

"यु आर अ ब्रेव्ह वूमन धना , यु सेव्हड हिज लाईफ"

"थँकssss युss " तोंडातला ऑक्सिजन पाईप काढत धनश्री बोलली. धनश्रीने कमरेचे जाळीचे टोक काढले . अभीने जाळीचा उर्वरित भाग पाण्यातून ओढून वर काढला .ती भली मोठी जाळी घेऊन दोघेही आत आले.
"माणसांच्या निष्काळजीपणाने जात असलेला अजून एक जीव तू वाचवलास धना" विनायक बोलला. धनश्री समाधानाने हसली.तिने सगळे इक्विपमेंट्स काढून ठेवले. टॉवेलने डोके कोरडे केले.
"आम्ही डेकवर जातो " धनश्री विनायकला बोलली. अभी आणि धनश्री डेकवर आले. पाण्यावर तरंगणाऱ्या त्यांच्या बोटाच्या अवती भोवती दूर दूर कोणतेच जहाज किंवा बोट न्हवती. थोडाच वेळात सूर्य मावळणार होता. दोघ बराच वेळ फक्त लाटांकडे पाहत होते.

"तू तुझा निर्णय मला कळवन्या आधी तुला कामाचं स्वरूप कळावं हा इथे आणण्या मागचा हेतू कारण तुझा होकार मिळाला तर तुला मागे वळता येणार नाही हे काम थांबवता येणार नाही कारण तुझ्याशी अशा गोष्टी शेअर केल्या जाणार आहेत ज्या खूप खूप कॉन्फिडेन्शिअल आहेत तुझ्या मनात आलं तरी नाही समजतंय ना"

"मला नक्की आवडेल तुमच्या कम्युनिटीमध्ये यायला पण मला अजून माहिती हवी आहे आफ्टर ऑल आय एम गोइंग टू रिस्क माय लाईफ" अभी बोलला. धनश्री काही वेळ विचार करत बसली.

"ठीक आहे तुला पूर्ण इनसाइट्स नाही देऊ शकत मी पण थोडक्यात सांगते , बिकॉज आय ट्रस्ट यु "

"ओह हो रिऍली" डोळा मारत अभि बोलला.

"येस कारण तुला जो सात दिवसाचा वेळ दिला होता तो फक्त तुझ्यासाठी नाही तर आमच्यासाठीही होता"

"म्हणजे"

"आय एम सॉरी पण तुझ्या जन्मापासूनची सगळी माहिती काढली आम्ही तुझ्या नकळत , आणि माणूस म्हणून तू अगदी तसा आहेस जसा एक "प्रयुत्सुवीर" हवा "

"प्रयुत्सुवीर ? हे काय नवीन ?"अभीने कौतुकाने विचारले.

"सुरवातीपासून सांगते हजारो वर्षा पूर्वीच प्रयुत्सुपंथाची स्थापना झाली आहे प्रयुत्सु म्हणजे पृथ्वी , हा पंथ आधीपासूनच गुप्त ठेवण्यात आला होता कारण आम्ही गनिमी काव्याने काम करतो , सामन्यात वावरणारे असामान्य लोकच याचे दिक्षुक असतात "पृथ्वीचे संवर्धन प्राणीमात्रांचे रक्षण" या तत्वाचे पालन करणारे आम्ही , या पंथात कोणतीही घराणे शाही नाही जो योग्य वाटेल त्याची पारख करून त्याला घेतलं गेलं त्या मूळे अनेकानेक माणसे जोडली गेली ,या पंथाची स्थापना केली होती मंदरा यांनी, त्या काळात लोकांना शिकार करण्यापासून परावृत्त करणे ,युद्धाच्या काळात जास्त जंगल तोड होऊ नये यासाठी प्रयत्न करणे , युद्धच होऊ
नये या साठी युक्त्या लढवणे, जखमी पशूंवर उपाय करून त्यांना वाचवणे , पशुपक्षांसाठी नैसर्गिक जलसाठे निर्माण करणे अशी कामे ते करत असत जस जसा काळ बदलत गेला पंथाची कर्तव्य वाढत गेली उद्देश तोच राहिला संकट वाढत गेली आणि आज या जगात या पंथाची खूप गरज आहे. मंदरा यांनी दिक्षुकांसाठी लिहून ठेवलं होतं की काळाबरोबर तुमची पृथ्वी हि माणसं बदवतील स्वतःबरोबर इतर प्राणी,मात्रांचे नुकसान करतील पण तुम्ही योध्या प्रमाणे बौद्धिक आणि शारीरिक लढाया लढत आपली पृथ्वी आहे तशी ठेवायचा प्रयत्न करा हि फक्त तुमची नाही सगळ्या प्राणी मात्रांची आहे आणि आमचा आता प्रयत्न आहे पृथ्वीला तिच्या पहिल्या
रुपाकडे न्यायचा" धनश्री सांगून मोकळी झाली. अभी तिच्याकडे तसाच पाहत निशब्द होऊन थांबला.

"ओह माय गॉड , धिस साऊंड्स इंटरेस्टिंग अजून काही कळेल का थोडस प्लिज"

"एका बाजूला निसर्गाच्या ऱ्हासाला कारणीभूत ठरणाऱ्या पुढारी , बिसनेसमॅन आणि माफियाशी लढताना त्यांच्या कारवायांवर याला घालताना दुसरीकडे जशी पृथ्वी आम्हाला बनवायची आहे तिची सुरवात प्रत्येक देशात काही जमिनींवर आम्ही केली आहे , टेक्नॉलॉजि आणि निसर्ग याची सांगड घालून कसं पुढे जा जाता येईल या साठी छोटे छोटे शहरच आम्ही वसवले आहेत , एक पॅरलल जग आहे ज्याची या जगाला माहिती नाही आणि हळू-हळू अख्या जगाला आम्ही तसं बनवणार आहे" धनश्री बोलली.

"आर यु सिरियस म्हणजे आपल्या इथे पण जवळपास पण तुम्ही तसं शहर बसवलाय ..... ?"

"हो"

"प्लिज तू मला घेऊन जाशील त्या पॅरलल जगात , मी एकदा ते पाहिलं आणि माझा निर्णय कळवेल"

"मला माहित आहे तू अशी मागणी करशील अँड येस वि विल गो देअर ...."

त्यानंतर अभी आणि धनश्रीने ऑफिसला सात दिवसांची सुट्टी टाकली आणि पॅरलल जगाच्या प्रवासाला सुरवात झाली. मुंबई मधून गोव्याला चाललेल्या क्रूझ (शिप) मध्ये ते चढले.धनश्रीने आधीच बुकिंग करून ठेवलं होतं. दोघेही त्याच्या तिसऱ्या डेकवरील ( मजल्यावरील) खोली मध्ये आले. आलिशान अशा त्या बहुमजली पंचतारांकित जहाजाचाची ती खोलीही अगदी चकचकीत आणि आरामदायी होती .विशेष म्हणजे खोलीच्या समुद्राच्या दिशेने असलेल्या बाजूस पोर्थहोल्स होते ज्यातून समुद्राचे विहंगम दृश्य दिसत होते. अभीने बॅग्स कडेला ठेवली आणि बेडवर जाऊन पडला.

"आता गोवा आल्यावरच उठव गं मला" आळस देत तो बोलला. धनश्रीकडून काही प्रतिसाद न आल्याने त्याने तिच्याकडे पहिले. पेनाच्या आकाराचे कसले तरी डिवाइस घेऊन ती खोली भर फिरली मग त्याचे बटन बंद करून पुन्हा बॅगेत टाकले.

"हे काय आता ? " त्याने विचारले.

"कॅमेरा डिटेक्टर आहे हे , आजूबाजूला कोणता कॅमेरा किंवा व्हॉइस रेकॉर्डर असेल तर यावर डिटेक्ट होता , खात्री करून घेतली कि हि खोली आपल्यासाठी सुरक्षित आहे , नाऊ वी कॅन टॉक"

"भारीच , प्रत्येक पावलावर एक नवीन गोष्ट होतीये..... हे सगळं थ्रिलिंग आहे , बाय द वे आपण गोव्याला का चालतोय"

"तुला कोण म्हणलं कीआपण गोव्याला चाललोय... आपण रस्त्यात उतरणार आहोत आणि गोव्याला जायचं असतं तर प्लेनने नसतो का गेलो"

"सॉरी , व्हाट ? आपल्यासाठी शिप मध्येच थांबणार आणि भर समुद्रात आपण करायचं काय ?"

"कळेल तुला तुला लवकरच"

नेहमी प्रमाणे पूर्ण माहिती न देऊन तिने अनेक प्रश्न अभीच्या मनात निर्माण केले. पोर्टहोल जवळ टीपॉय मांडला होता.त्याच्या अवती-भोवती खुर्च्या होता.क्रूझचा स्टाफ जेवण मांडून निघून गेला. जेवण झाल्यानंतर दोघेही शिपच्या वरील बाजूला आले. छान वारा वाहत होता. शिप पुढे-पुढे जाताना मागे-मागे राहत जाणाऱ्या समुद्राकडे पाहत दोघं प्रोटेक्शन रॉड जवळ थांबले.

"किती सुंदर निसर्ग दिलाय ना देवाने आपल्याला पण हळू हळू सगळं प्रदूषित होऊ शकत , कुरूप होत जाणारा निसर्ग इतर प्राणी मात्रांना आणि शेवटी मानवाला संपवून टाकेल"

"खरं आहे गं तुझं आणि जोपर्यंत गोष्टी गळ्यापर्यंत येत नाहीत येत नाही तोपर्यंत कोणीच काही करणार नाही"

"हो आता स्वतःची सोय आणि फायदा करणे चालू आहे त्यामुळे या गोष्टी नजरअंदाज केल्या जातात , कारखान्यातील प्रदूषित पाणी शुद्धीकरण न करता नद्यांमध्यें मध्ये सोडून दिले जाते , या इंडस्ट्रियालिस्टना पुढाऱ्यांचा वरदहस्त असतो, आता ते पाणी प्रोसेस करायची अजिबात जवाबदारी वाटत नाही, ते प्रदूषित पाणी प्रोसेस करणं हि त्यांना स्वतःची जवाबदारी अजिबात वाटत नाही , जंगल उध्वस्त करून तिथे वस्त्या , कारखाने बांधताना जेवढी झाडे तोडली आहेत तेवढी दुसरीकडे रोपन करायची जवाबदारी कोण घेत नाही , वाहन ,फॅक्टरी मधून निघणारा धूर या मुळे वातावरणातील कार्बन डाय ऑक्सडचे वाढते प्रमाण ग्लोबल वार्मिंगला कारणीभूत ठरत आहे , म्हणून जास्तीत जास्त झाडे लावायला हवी जेणे करून काही अंशी ते प्रमाण कमी होईल , ह्या ग्लोबल वॉर्मिंग मुळे हिमनग वितळून समुद्राच्या पाण्याची पातळी दिवसेंदिवस वाढत आहे , पातळी वाढली म्हणजे आपल्या जमिनी हळू हळू समुद्राच्या पाण्याखाली जाणार , काही शेकडो वर्षांनी पृथ्वीवरची सगळी
जमीन आणि जीवसृष्टीची" धनश्री भावनाविवश होऊन सांगत होती.अभीही गंभीर झाला. ती पुढे बोलू लागली

"भूतान सारख्या देशाचे मला खूप कौतुक वाटते देशातील ६५% जमिनीवर झाडे हवीच हा कायदा आहे तिथे"

"सगळ्या देशांमध्ये हा कायदा हवा ना , नेत्यांना ह्या गोष्टीची जास्त गरज वाटत नाही" अभी बोलला

"नुसत्या राजकारणांवर रोष ओढवून काही नाही आपला सामान्य माणूस तरी काय करतोय , प्लास्टिकबंदी साठी सरकारने नाही नागरिकांनी प्रयत्न करायला हवेत , प्लॅस्टिकच्या कॅरीबॅगचा वापर कमी किंवा बंद करायचं तर बाजूलाच पण वस्तू घेताना आणखीन एक एक्स्ट्रा कॅरीबॅग मागून घेतेता , आता घरातून निघताना कापडी पिशव्या सोबत नेने किती अवघड आहे , पण कोणती तरी वस्तू सामानाबरोबर मिळतिये हे त्यांना सोयीचं वाटतं , मग अश्या असंख्य पॉलीथीनच्या बॅग्स रस्त्याने चरणाऱ्या बिचाऱ्या प्राण्यांच्या पोटात जातात , समुद्राच्या
पाण्यात तर असंख्य पॉलीथिन्स रोज डम्प केल्या जातात त्यामुळे समुद्री जीवांचे प्रचंड नुकसान होत आहे त्यांच्या शरीराभोवती या बॅग्स लपेटल्या जाऊन त्यांना जीव गमवायला लागतोय ,एका रिसर्च मध्ये समोर आलय की आता त्याच्या पोटातही प्लास्टिकचा अंश मिळू लागलाय , अनेक तडफडून मरणाऱ्या निरागस जीवांना बघून लाज वाटते मला स्वतःला माणूस म्हणून घेयची " बोलता-बोलता तिचा कंठ दाटून आला. अभीने
तिच्या हातावर हात ठेवला.

"कोणी बदलू आगर न बदलू आपण लढायचं , वेगवेगळ्या देशातील निसर्गाविषयी तळमळ असणारे खूप लोक आता आमच्या पंथात सहभागी झाले आहेत त्या मध्ये मोठंमोठे व्यापारी , साईन्टिस्ट ते अगदी सामान्य माणसांपर्यंत सगळ्या वर्गा तिल माणसे आहेत , विशेष म्हणजे हे हे बिझनेसमन फंडिंग तर करतातच पण इको फ्रेंडली बिझनेस मॉडेल ही अमलात आणतात "

"साउंड्स ग्रेट कोणतीही गोष्ट करायला आर्थिक पाठबळ लागतेच"अभी बोलला.

"मुंबईतला समुद्र सगळ्यात कुरूप कधी दिसतो माहितीये? " धनश्री ने विचारले.

"कधी ? "

"गणपती विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी.. एकीकडे बाप्पाच्या मूर्तीचे हात पडलेले असतात दुसरी कडे बाकीचे तुकडे , प्रत्येक गणेश मंडळांची वरचढ चाललेली असते कोणाची मूर्ती किती मोठी , पण मूर्तीच्या आकारासोबत वाढत जाते पाण्यात न विरघळणाऱ्या प्लास्टर ऑफ पॅरिसचे प्रमाण , दहादिवस रोज बाप्पाची मनोभावे पूजा करणाऱ्या सगळ्यांना कोणालाच विसर्जनानंतर बाप्पाच्या मूर्तीचे होणारे हाल माहित नसतील का ? सगळं माहिती पण स्वतःच मानसिक समाधान त्यांना जास्त महत्वाचं वाटतं,मग खरे भक्त कोण रे जे दहा दिवस देवाची
उपासना करतात का दुसऱ्या दिवशी स्वयंसेवी बनून किनाऱ्यावरील मूर्तीचे तुकडे गोळा करतात ? यावर उपाय म्हणून आम्ही एक छोटासा उपक्रम तयार केला आहे ज्याचं नाव आहे “पुनर्निर्माण" विसर्जनाच्या दिवशी आमच्या अनेक मशिन्स समुद्र किनारी आम्ही लावतो ज्या दोन फुटपासून अगदी साठ फूट पर्यंत उंच असतात , आम्ही लोकांना कन्व्हिन्स करतो कि त्यांनी त्यांची मूर्ती रिसायकलिंगला द्यावी , जे तयार होतात त्यांच्या बाप्पाच्या मूर्तीवर समुद्राचे थोडे पाणी शिंपडून विसर्जनाचा विधी उरकला जातो , मग मूर्ती सेटअप मध्ये ठेऊन तिचे पावडर मध्ये रूपांतर केले जाते , ती पावडर वर्कशॉप पाठवली जाते जिथे रासायनिक प्रक्रिया करून पुन्हा वापरण्या जोगे pop तयारकेले जाते जे निशुल्क मूर्तिकारांला दिले जाते त्यातून नव्या मुर्त्या घडतात”

"वाह अतिशय स्तुत्य उपक्रम" अभी कौतुकाने बोलला.

"पण या मुळे तुम्हाला अनेकजणांच्या रोषाला समोर जावं लागत असेल ना ? "ने विचारलं .

"हो रे खूप , दोन गट पडले , एकाने ज्या संस्थेच्या अंडर आम्ही हा उपक्रम राबवत होतो तिचं कौतुक केलं दुसऱ्यांकडून तिला धर्म विरोधी आणि बराच काही बोलण्यात आलं"

"यु गाईज आर डुईंग अ गुड जॉब इट टेक्स अ करेज"

" ते तर आहेच , प्रतुत्त्सुवीर बनणं म्हणजे धाडस हवच आणि तुझ्यातही ते आहे"

"तुला का वाटतं असं ? तू माझ्याविषयी फार लवकर निर्णय घेतला असं नाही वाटत का तुला ? "

"नाही ,आधी तुझ्याविषयी सगळं माहिती काढली , साल २०१७ ट्रेकिंगला गेलेलं असताना पाय घसरून तोल गेलेल्या एका तरुणाला जीव धोक्यात घालून वाचवलंस... ह्यालाच धाडस म्हणतात "अभी तिच्याकडे एकटक पहात राहिला.

"मानलं पाहिजे तुम्हाला खरंच , बाकी तुमचं काम कसं चालतं ? आणि जे तू मला त्या दिवशी सांगितलं होतंस कि तुम्हाला सगळं जग पॅरलल जगाच्या समान बनवायचं आहे ते तुम्ही कसं करणार? "

"तुझ्या पहिल्या प्रश्नच उत्तर आहे कि प्रत्येक गोष्टीचा एक विभाग आहे आणि योग्यतेनुसार त्या
त्या विभागात प्रत्युत्सु वीरांला विभागलं जातं सगळ्यात मुख्य विभाग हा रिसर्च अँड डेव्हलोपमेंट आहे , तुला विश्वास नाही बसणार पण जगातले बेस्ट सायन्टिस्ट आमच्याकडे आहे , ते त्यांच्या देशासाठीपण काम करतात आणि आमच्यासाठीही तस पहिला गेलं तर हे फार अवघड आहे कारण कोणत्याही देशाचा सायंटिस्टने त्याची रिसर्च देशाबाहेर कोणाशी तरी शेअर करणं हे देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने बरे नाही म्हणून त्यांच्यावर कडी नजर असते पण 'प्र-वेव्स' मुळे आमचं कम्युनिकेशन सुरक्षित आहे"

"प्र-वेव्स... ? "

"हो ज्याद्वारे पॅरलल जगाचं आणि प्रत्युत्सुवीरांच कम्युनिकेशन होतं , मी जे हे घड्याळ घातलय
त्यावर सगळी माहिती प्र-वेव्स द्वारा ट्रान्समीट आणि रिसिस्व्ह होते , ह्या वेव्सची frequency
कोणीच डिटेक्ट करू शकत नाही त्यामुळे आमचे कम्युनिकेशन कधीच ट्रॅक होत नाही शिवाय
समुद्राखालीदेखील ह्या वेव्स प्रवास करू शकतात , आठवतायना विनायक दादा मला पाण्याखाली मायक्रोफोन वरून सूचना देत होते"

"बापरे हा तर क्रांतिकारी शोध आहे पण मग ह्या म्युनिकेशनसाठी लागणार सॅटेलाईट ? "

"बी रेडी फॉर वन मोअर शॉक ... आम्ही आमचं प्र-सॅटेलाईट केव्हाच लाँच केलंय "

"काय ? हे अशक्य आहे , तू खोटं बोलती आहेस , हा काही खेळ नाही ,तसं असतं तर तुमचं
सॅटेलाईट केव्हाच ISRO, NASA आणि इतर स्पेस रिसर्च सेंटर्सकडून ट्रॅक केलं गेलं असत "

" हो जर प्र-बबल्स ने ते प्रोटेक्टेड नसतं"

"आता प्र-बबल्स काय आहे ? "

"सांगते , आधी तू मला सांग की आम्ही जे पॅरेलल जग बनवलं आहे ते GPS द्वारे अजून डिटेक्ट का नाही झालं ? जगावर नजर ठेवणाऱ्या GPS द्वारे त्याच्या इमेजेस का नाही घेतल्या गेल्या ?"

" खरंतर हा प्रश्न मला बऱ्याचदा पडला , लवकर उत्तर सांग "

"कारण ज्या ज्या ठिकानी पॅरलल जग आहे ते सगळे आणि प्र-सॅटेलाईट हे प्र-बबल्स ने आच्छादले गेले आहे प्र-बबल्स हे प्र-वेव्सचा वापर करून बनवले जातात एका बुडबुड्या सारखे , त्याच्या आत कोणत्याच इतर वेव्हस जाऊ शकत नाही शिवाय बाहेरच्या बाजूस हवी तशी प्रतिमा तयार करू शकतो , म्हणजे प्र-सॅटेलाईट भोवती प्र-बबल्आहे ज्यावर आकाशाच्या पोकळीची प्रतिमा आहे त्यामुळे ते दुसऱ्या सॅटेलाईट इमेज मध्ये कोणाला दिसत नाही आणि आत कोणते वेव्हस जाऊ न शकल्याने ते डीटेकत होत नाही"

"हूश्श ......... मग आता पुढचा प्लॅन काय आहे माझ्या दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर , तुम्ही तुमचं गोल कसं अचिव्ह करणार"

“जगाच्या कान्या कोपऱ्यामध्ये आमचं नेटवर्क असणं गरजेचे आहे जेणेकरून आम्ही जगाच्या प्रत्येक ठिकाणच्या वायू , जल प्रदूषणाची आकडेवारी, तेथील झाडांचे कमी-जास्त होणारे प्रमाण , प्लास्टिक वापराचे प्रमाण हा डाटा गोळा करणे मग आमच्या सॅटेलाईट मधून तिथले ईमेज सॅंपल्स मिळवणे या गोष्टी यशस्वीपणे करू शकू. त्या नंतर वेगवेगळे भाग पाडून प्रत्येक भागासाठी एक मास्टर प्लान बनवण्यात येईल पण ते पुढे सध्याचं मुख्य उदीष्ट आहे जगभर नेटवर्क पसरवणे”

"पण तुम्ही जगाच्या कान्याकोपऱ्यात पोहचणार कसं ?"

“तुरळक लोकसंख्या , कींवा मानववस्ती नसलेल्या ठिकाणी आम्ही प्र-ड्रॉन पाठवूनही माहिती मिळवू शकतो पण जास्त लोकसंख्या असलेल्या ठिकाणी ते अवघड आहे , यावर काय करायचं हा विचार चालू असतानाच एका इको- फ्रेंडली वाहनांच्या निर्मात्याने जो स्वतः प्रयुत्सूवीर आहे त्याने एक खूप छान कल्पना दिली , जगभरात त्याच्या इलेकट्रीसिटी आणि सौर उर्जेवर चालणाऱ्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची अगदी स्वस्तात विक्री करायची आणि त्या प्रत्येक गाडीच्या इंजिन मध्ये शिताफीने ट्रेकर्स लपवायचे ह्या गाड्या जगभरात धावतील आणि सगळी माहिती मिळत राहील ह्या प्लानचा दुसरा आम्हाला फायदा असा होईल कि मोठ्या प्रमाणात पेट्रोल / डिझेल चा वापर आणि पर्यायाने कार्बन डाय ऑक्सीडचे प्रमाण कमी होईल "

" दॅट वास ब्रिलियंट आयडिया , मग तुमचं काम सोपं होईल "

"२०१८च्या जपान मध्ये झालेल्या “save earth with technologies" या इव्हेंट मध्ये त्या बिजनेसमनच्या कंपनीने कमी किमतीचे दुचाकी आणि चारचाकी मॉडेल्स प्रेसेंट केले , जगभरात सध्या उपलब्ध असणाऱ्या वाहनांच्या किमतीच्या तुलनेने अतिशय रास्त आणि टिकाऊ , इतकी कमी किंमत पाहून जगातल्या सगळ्या लोकांचे त्याकडे लक्ष गेले , मग हि वाहने प्रत्येक देशाच्या गव्हर्मेन्टने विकत घ्यावीआणि जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहचवावी हे प्रोपोसलं कंपनीने मांडले आणि सगळ्या देशांकडून मिळून पन्नास लाख वाहनांचीं मागणी करण्यात आली आणि कॉन्ट्रॅकट साठी सगळे जण भारतात येणार आहेत या कॉन्ट्रॅकटकडे जग भराचे लक्ष लागले आहे "

" भारीच... तो कॉन्ट्रॅक्ट पास झाला कि तुमचं काम सुरु होईल"

"गोष्टी इतक्या सोप्या आणि विना अडथळ्याच्या असत्या तर किती बरं झालं असतं ना"

" म्हणजे ?"

";पेट्रोल विरहित विरहित गाड्या धावणार म्हणजे कच्च्या तेलाची आयत बऱ्याचप्रमाणात कमी होणार आणि पेट्रोलच्या गाड्या बनवणाऱ्या कंपन्यांचा तोटा कारण त्याचीहि विक्री कमी होणार "

"हा ते तर आहेच मग? "

"त्या पैकी पेट्रोलच्या गाड्या बनवणाऱ्या कंपन्यांनी नवीन मशिनरी आणून इको फ्रेंडली बाईकच्या काही भागांच्या निर्मितीची जवाबदारी घ्यावी आणि विक्रीतून येणारा नफाही घ्यावा हे सरकारकडून सांगण्यात आलं , काहीश्या नाराजीतच पण कंपन्यांनी ते तात्पुरतं मान्य केलंय , पण कच्च्या तेलाबाबत तसं झालं नाही"

"म्हणजे नक्की काय झालं ?"

"ह्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये बदलकरण्याची किंवा रद्द करण्याची जवाबदारी ज्या मिस्टर निर्वानांकडे आहे त्याला कच्चे तेल निर्यात करणाऱ्या आखाती देशातील लोकांनी विकत घेतलं कारण ह्या कॉन्ट्रॅक्टचा खूप तोटा कच्च्या तेलाची निर्यात कमी होऊन त्यांना सहन करावा लागणार होता"

"ओह नो मग कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल केला का त्याने? "

"नाही ते शक्यच नाही कारण त्यासाठी काही तरी ठोस कारण त्याला द्यावे लागले असते जे त्याच्या कडे नाही"

"मग काय केले त्याने ?"

"प्रत्येक देशाच्या गव्हर्मेंट मध्ये मिस्टर निर्वाण सारखा विकला जाणारा माणूस असतो , कॉन्ट्रॅक्टशी रिलेटेड अशा लोकांशी त्याने संपर्क केला आणि पन्नास लाख गाड्यांचे कॉन्ट्रॅक्ट पन्नास हजारांवर आणले आणि सरकारला कारण दिले कि पाच वर्ष हा उपक्रम यशस्वी होतोय का ते पहावे मग वाहनांची संख्या वाढवावी आणि आश्चर्य म्हणजे सगळ्यांना ते पटले , ज्यांना नाही पटले त्यांना टेबल खालून पटवून दिले"'

" सच अ शेम... मग आता काय होणार ? "

" कॉन्ट्रॅक्ट तर पन्नास लाख वाहनांचाच होणार "

" ते कस काय ? "

"त्यासाठी प्लॅन बनवला आहे कळेल तुला लवकरच , तुला आठवतायना मी तो लॅपटॉप त्या घरातून आणला होता"

"हो तू ते का केलं हा प्रश्न अजून छळतोय मला "

"मिस्टर निर्वानांच्या या कृतीची माहिती खूप जणांना होती आणि कोणीतरी एका सिक्रेट एजन्सीज द्वारे त्याच्या विरोधात पुरावे गोळा करून त्याला ब्लॅकमेल करायच्या प्रयत्नात होते ,ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून त्याचा जुना पी.ए होता आणि सगळे पुरावे त्याच्या लॅपटॉप मध्ये आहे हि माहिती आम्हाला कळली , मग त्यादिवशी ऑफिसच्या टेरेस वर जे ड्रोन आलं होतं त्यात त्याचा पत्ता दिला होता , अशा गोष्टी कधीच आम्ही मोबाईलवर शेअर करत नाही नाहीतर लपून काहीच राहणार नाही म्हणूनच ड्रोन किंवा प्र-वेव्ह चा वापर करून माहितीची देवाण घेवाण केली जाते .. तर तो लॅपटॉप आता तावडीत आला आहे , आमच्या हेकेर्सने तो अनलॉक
केला आहे अँड नाऊ वि हॅव ऑल द प्रूफस , पण हे असं सगळ्यांसमोर मांडता येणार नाही , नाहीतर जगभरात देशाची प्रतिमा खराब होईल शिवाय कॉन्ट्रॅक्टहि रद्द होईल म्हणून एक मास्टर प्लॅन बनवला आहे ...... "

" काय आहे सांगना"

"अरे बोललं ना कळेल तुला लवकरच किती घाई "धनश्री त्याच्याकडे पाहून हसली. तिच्या घड्याळात बीप-बीप आवाज आला.

"चल निघावं लागेल आपल्याला" धनश्री अभीला घेऊन आधी रूम मध्ये गेली तिने सगळं सामान घेतलं मग ते जहाजाच्या तळ मजल्यावर गेले.कोणी तरी तिथे त्यांची वाट पाहत होतं .ती व्यक्ती त्यांना जहाजाच्या शेवटाला घेऊन गेली , गोडाऊन सारखी फार मोकळी पण बाकी जहाँच्या तुलनेने अस्वछ होती ती जागा, जिथून मोठा माल ने आन करता येईल. तिथे मोठा दरवाजा होतो जो समुद्राच्या पातळीसाच्या समान अंतरावर उघडत होता आणि दरवाज्यातून समुद्रात उतरणीचा प्लॅटफॉर्म होता.त्या गोडाऊन मध्ये दोन माणसांसाठी जागा असलेली
स्पीड बोट होती. तिघांनी ढकलत ती दरवाज्यापाशीही आणली. धनश्री आणि अभी त्यात बसले दोघांनी लाईफ जॅकेट घातल. उतरणीवरून त्या इसमाने स्पिडबोटला धक्का दिला आणि धनश्रीने पाण्यात स्पिडबोट येताच ती चालू केली. इसमाने दरवाजा बंद केला.
स्पीड बोटने काही वेळातच दोघे एका आयलंड जवळ पोहचतात. दूर दूर पर्यंत अभीला खडकांशिवाय आणि झाडांव्यतिरिक्त काहीच दिसत न्हवतं. धनश्रीने तिच्या घड्याळातले बटन दाबले आणि खडकापलीकडून एक स्वयंचलित पॅरामोटर आली ज्यामध्ये दोन जणांचा बसायला जागा होती. पॅरामोटरच्या समोरील बाजूला असलेल्या रेटिना स्कॅनरने धनश्रीच्या डोळ्यांची टेस्ट केली.
"access granted for two people dhanashree and her guest " पॅराकॅप्टर मधून व्होईस आनउंसमेंट आली.दोघेही त्यात बसले सुरवातीला ते जमिनीवर धावू लागले मग त्याने हवेत उडायला लागले.

"वेलकम टु द पॅरलल वर्ड ssssss" खडकांची रांग पार होताच धनश्री ओरडली.
“वू हूsssssss” अभीही एकसाईटेड होऊन ओरडला चौबाजूंनी खडकांनी बंदिस्त या छोट्यासह्या जगाचे अभी पाचशे फुटांवरून दर्शन घेत होता. जागोजागी हिरवळ ,
स्वछ जलसाठे , प्लास्टिकमुक्त , पेट्रोल डिझेल मुक्त वाहने , कारखान्यातून बाहेरपडणारे दूषित पाणी रिसायकल करणारे , ईवेस्ट रिसायकल करणारे प्लांट्स , आंनदाने प्रदूषणमुक्त वातावरणात बागडणारे पक्षी , लोप पावत जाणारे जंगलांमध्ये संवर्धन केलेले प्राणी आणि खूप सारा शुद्ध ऑक्सिजन .धनश्रीने एका टेकडीवर पॅरामोटार थांबवली दोघेही उतरले.

"हा माझ्या आयुष्यातला सगळ्यात बेस्ट एक्सपीरिअन्स होता ... मी शब्दात नाही मांडू शकत " अभी भावुक होऊन बोलला.

"मग असच वातावरण असलेलं जग बनवायला तुझा वाटा द्यायला तू तयार आहेस ? "

"डेफिनेटली हो" आत्मविश्वासाने अभी बोलला आणि धनश्रीला खूप आनंद झाला.

"थँक यु सो मच अभिषेक ...." तिने त्याला साईड ह्ग केले

" आय एम इन .. पण मला अजूनही काही प्रश्नांची उत्तर हवी आहेत "

" नक्कीच आता मी सगळ्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकते"

"इथे नक्की राहतं तरी कोण"अभीने विचारले.

"प्रत्येक प्रतुस्तुवीर काही एकटे काही कुटुंब सोबत इथे वर्षातला एक महिना घालवतात , प्रत्येकाच्या आयडियाज , सूचना घेतल्या जातात , नवीन प्रतुस्तुवीरांना प्रशिक्षण दिलं जातं "

"दुसरा प्रश्न , तो मासा पाण्याखाली हे तुला कसं कळलं ?"

"सगळ्या समुद्रांमध्ये , बाहेरून माशासारखे दिसणारे लाखो ऍक्वाबॉट्स ( पाण्यातील रोबोट्स ) आम्ही सोडले आहे जे रडार मध्येच नाही दिसत अर्थातच आता का हे उत्तर तुला माहित आहे , जर समुद्री जीवांमध्ये सस्पेशीअसं हालचाल डिटेक्ट झाली तर सिस्टिम मध्ये अलर्ट येतो आणि रिस्ट्रिक्टेड एरिया नसेल तर प्रत्युत्सुवीरांद्वारे त्यांना मदत केली जाते"

"शेवटचा प्रश्न , तुम्ही तो कॉन्ट्रॅक्ट कसा मिळवणार आहात"धनश्री दोन मिनिट काहीच बोलली नाही.

"मी आणि माझी टीम यांच्यावर हि जवाबदारी आहे"

"पण काय करणार आहात तुम्ही , इस इट सेफ ?"

"नॊ इट्स नॉट सेफ , पण करावं लागेल ........ काय ते आत्ता नाही सांगू शकत पण प्लान B पण आहे जर काही गडबड झाली तर ... " अभीच्या चेहऱ्यावर ती चिंता स्पष्ट पाहू शकत होती.

"मरावे परी पृथ्वीरूपी उरावे" ती बोलली.

"काही नाही होणार तुला स्टुपिड , यु आर अ ब्रेव्ह गर्ल यु विल कम बॅक सेफ"अभीने तिला मिठी मारली आणि
दोघांनाही त्या मिठीतुन विलग होउशी वाटलं नाही. आसवं मात्र दोघांच्याही डोळ्यातून विलग झाली.

अभीने प्रत्युत्सु पंथाची दीक्षा घेतली.आता तो महिनाभर तिथेच राहणार होता. ठरलेल्या दिवशी.
धनश्रीला निघावं लागलं. विमानाने तिने थेट दिल्ली गाठली.तेथील काही प्रतुस्तुविरांचा समूह तिची आधीच वाट पाहत होता. त्यांची सगळी टीम मिळून हि कामगिरी पार पडणार होते. ज्या हॉटेलच्या कॉन्फरन्स रूममध्ये करार पास होणार होता त्या भव्य हॉटेलच्या जवळपास त्यांची कॅरावॅन आली .त्या सप्ततारिका हॉटेलची सुरक्षा खूप कडक होती आणि अनोळखी माणसांना आत प्रवेश मिळणे अशक्य होते.पण धनश्रीच्या टीमचा प्लॅन आधीच तयार होता. निमंत्रितांपैकी एका महिला पत्रकाराला तिच्या टीमने आधीच कैद करून ठेवले होते जिची शरीरयष्टी धनश्री सारखीच होती . हि महिला पञकार हा करार किती योग्य आहे हे जगासमोर प्रेसेंट करणार होती. अर्थातच ती विकली गेली होती. कॅरावॅन मध्ये धनश्रीने तिच्या प्रमाणे पेहराव आणि वेशभूषा केली.पत्रकाराचे व्हॉइस सॅम्पल्स आणि तिने घेतलेल्या इंटरव्यूचे आधीच धनश्रीने पहिले होते आणि तिच्याप्रमाणे बोलण्याचा आणो तिच्या बॉडी लँगव्हेजचा सराव केला होता. मेकअप आर्टिस्टने धनश्रीच्या चेहऱ्याला अगदी त्या पत्रकारा सारखा लूक दिला. मग तिच्या दोन्ही हातांवर ट्रान्सपरेंट आणि अतिशय पात्तळ आर्टिफिशिअल त्वचा चढवली जिच्यामुळे तिच्या हाताचे फिंगरस्कॅन पत्रकाराच्या स्कॅन सोबत मॅच होईल. तो पेनड्राइव्ह ज्याच्यामध्ये सगळी माहिती होती तो एका विशिष्ट इडिबल मेणामध्ये सील केला होता. धनश्रीने डोळे मिटले आणि मेणाच्या गोळ्यात बंधिस्त असणारा स पेनड्राईव तिने गिळला. पेनड्राईव लपवून न्हेने गरजेचे होते.अथवा तो जप्त झाला असता. बाकी सगळी टीम कॅरावॅन मध्ये बसली.धनश्रीने जो पत्रकार सारखा चष्मा घातला होता त्यात अतिहय सूक्ष्म कॅमेरा होता ज्यामुळे तिची टीम घडणाऱ्या घटना थेट पाहू शकत होती. तिने हॉटेल मध्ये प्रवेश केला. फिंगरस्कॅन यशस्वीवणे मॅच झाला. ज्या मजल्यावर कॉन्फेरेंस होती ती तेथे पोहचली .भव्य अशा कॉफरन्स रूम मध्ये विविध व्यापारी ,नेते देशी आणि विदेशी पत्रकार होते. ती कॉन्फरेन्स रूमच्या वॉशरूममध्ये गेली. आजूबाजूला पहिले कोणीच न्हवते . वॉशबेसीनपाशी येऊन तिने उलटी काढाली मेणामध्ये सील केलेला पेन ड्राइव्ह उलटीद्वारे बाहेर आला. तिने तो धुतला , मेण काढून डस्टबिन मध्ये टाकले.पेनड्राइव्ह मेणामध्ये असल्यामुळे कोरडा होता. तिने साबणाने स्वछ हात धुतले आणि बाहेर आली . तिच्या कॅमेरामनने तिला हाताने खुणावून बोलावले. धनश्रीने त्याचा आधीच फोटो पहिला होता त्यामुळे तिने त्याला ओळखले. एक एक करून रेप्रेन्सेंटीटिव्स त्यांचे त्यांचे प्रेसेंटेशन देऊन गेले. . पन्नासलाखांच्या जागी फक्त पन्नास हजारांच्या गाड्यांच्या झालेल्या करारावर ते फुशारकी मारत होते. तेवढ्या वेळात धनश्रीने तिथे जे-जे प्रामाणिक पत्रकार होते त्याच्याकडे जाऊन तिच्या पेनड्राइव्ह मधले प्रेझेन्टेशन कॉपी करून दिले त्यात काही विदेशी पत्रकारही होते .काही कारणाने तिला प्रेसेंटेशन पूर्ण करता आले नाही तरी सगळी माहिती जगा समोर यावी हा त्या मागचा हेतू होता. आता धनश्रीचा नंबर होता.

"यु आर नेक्स्ट मिस्सेस सिन्हा" तिला कोणीतरी सांगून गेलं . तिने काही सेकंदांसाठी डोळे मिटले दीर्घ श्वास घेतला आणि समोरच्या मंचाकडे पाहिले आणि मंचाच्या दिशेने निघाली. टेकनिशीअन ने तिचे प्रेझेन्टेशन त्याच्या सिस्टिम मध्ये लोड केले. तिने त्याच्या हातून सिस्टमचा रिमोट घेतला.
"आय विल ऑपरेट इट बाय मे सेल्फ" ती बोलली.
थेट प्रसारण होत असलेल्या त्या कराराकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होत . तिने प्रेसेंटेशन सुरु केले.ते इंग्रजीत होतं. एक एक स्लाईड पुढे जाताना मिस्टर निर्वाणांनी केलेल्या घोटाळ्याचा परदा फाश होत होता आणि घोटाळ्यामुळे निसर्गाचा होणारा तोटा सगळ्या जागामोर पुराव्यांनिशी ठेवण्यात येत होता.मिस्टर निर्वाणांच्या डोळ्यासमोर घडत असलेल्या गोष्टींवर त्यांचा विश्वासच बसत न्हवता . समोर मीडिया असल्याने ते काहीच हालचाल करू शकत न्हवते, त्यांना दरदरून घाम फुटला . त्याने इशारा करून पी.ए ला बोलावले. पी.ए ने तिच्या मीडिया हाऊसला फोन लावला तेव्हा कळलं चार की तासापासून तिच्याशी संपर्क होऊ शकत नाहीये.पी.ए ला कल्पना आली त्यांनी त्यांनी सिक्युरिटी इन्चार्ज संपर्क साधला आणि पत्रकाराच्या जागी आलेल्या बहिरूप तिला पकडण्यात आले. तो पर्यंत प्रेझेन्टेशन संपले होते. सर्वत्र कुजबुज सुरु झाली .ब्रेकिंग न्युज सगळीकडे पसरली.धनश्रीला पोलिसांच्या तावडीत देण्यात आले. पण सगळ्या पत्रकारांकडे पुराव्यानिशी माहिती पोहचली होती. जे रिप्रेसेन्टीटीव्हीस करारासाठी आले होते त्यांनी काही वेळ चर्चा केली आणि पन्नास लाख गाड्यांचाच कॉन्ट्रॅक्ट त्या कंपनीला देण्यात आला. मिस्टर निर्वाण डोक्याला हात लावून जागेवर बसले. पुढच्या कार्यवाहीसाठी त्यांना तयार राहायला लागणार होतं.धनश्रीची कामगिरी फत्ते झाली होती.
टीव्हीवर धनश्रीला अटक झालेलं पाहून अभी आणि इतर सर्व जण खूप दुःखी झाले पण त्या
सगळ्यांच्या चेहऱ्यावर गर्व होता.तिची ओळख जगासमोर आली तर ती पुन्हा पहिल्या सारखं आयुष्य जगू
शकणार न्हवती. शिवाय मिस्टर निर्वाण आणि इतर लोक जे पकडले गेले होते त्यांच्या माणसांकडून तिच्या जीवाला धोका होता.काही वेळात अभीच्या घड्याळावर मेसेज आला .
'प्लॅन बी सक्सेसफुल'

तो वाचून त्याने जागेवर उडी मारली. आता पॅरलल जगातले सगळे वाट पहात होते धनश्री परतण्याची. पॅरलल नेटवर्क लवकरच जगभर पसरणार होतं. पृथ्वीला मोकळा श्वास घेता यावा या उद्देशाने टाकेलले प्रत्युत्सुवीरांनी टाकलेलं पाऊल यशस्वी झाले होते.

***समाप्त ***
© धनश्री साळुंके

(कापडी पिशव्यांचा वापर करा , प्लॅस्टिकच्या कॅरीबॅग्स कमीतकमी वापरा , पाणी जपून वापरा कथा आवडल्यास कमेंट आणि शेअर नक्की करा )