प्रेमाचं अस्तित्व कार्तिक हजारे द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

प्रेमाचं अस्तित्व

प्रेमाचं अस्तित्व

१) गावात आगमन

प्रेमाचं अस्तित्व नाव वाचूनच ही कहाणी चांगली आहे असं म्हणण्यात काही अर्थ नाही.वाचून त्याची आपल्या मनात काय पूर्तता येते ही खरी वाचकांची भर असते.आणि त्यांनी ती स्पष्टपणे मांडावी हीच माझी इच्छा.कारण वाचकांच्या चुका मनात धरुनच कुणीही लेखक नव्याने शुरुवात करीत असतो.

आपल्या कथेला शुरुवात करण्या अगोदर सांगू इच्छितो की अंकिता आणि केशव हे आजही मला तिथे दिसतात. कसं आहे..सगळ्यांनी ऐकलंच असेल की खरं प्रेम करणारे असले की निसर्ग त्यांना हवी तेवढी मदत करतोच.पण त्यावेळी के घडलं ते फार भयानक होतं.आणि त्याच निसर्गाने माझ्याकडून हे घडविलं होतं.आणि यातच मी स्वतःला सर्वश्रेष्ठ मानत आहे.ज्या स्थळी मला ते मिळाले आजही कधी मी जाऊन त्यांची भेट घेत असतो.ही एक निसर्गाची चूक होती की न्याय चक्राच योगायोग जे आजतागायत न उलगडणारे कोडेच आहे.पण आज ते स्वतःच्या एका वेगळ्या विश्वात सुखी आहेत.आणि मी पण आपल्या विश्वात.आणि खरं म्हणजे मी त्यांच्याच प्रेमाचं उदाहरण ठेवून मी प्रेमाला अस्तित्वातुन सत्यात आणलं.त्याबद्दल ही एक छोटीशी गोष्ट.

मी ईश्वर शिवाडकर.ग्रामीण भागात असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातला एका छोट्याश्या गावातला रहिवाशी.घरात एकुलता एक असल्यामुळे सगळ्याच गोष्टीचं प्राधान्य.पण मी कधी त्याचं उलट केलं नाही.पण अंतरा वरूनही मी ते नाते अलगद जपत होतो.अंतर म्हणजे कशाचा जरा त्याचं स्पष्टीकरण बघू.

माझं फक्त जन्म तेव्हढाच गावात झालं.शिक्षणातली हुशारी बघून स्कॉलरशिप पास केली.आणि त्याच स्कॉलरशिप च्या आधारावर गेली कित्येक वर्ष हॉस्टेलवर राहून मी शिक्षण घेतलं.कधी लहर आली की तेव्हाच सुट्टी काढून घरी जायचं.अन्यथा अभ्यासाचं कारण काढून रूमवर पडून राहायचं.आईवडील माझे साधेच.माझ्या इच्छेच्या विरुद्ध ते कधी वागलेच नाहीत.नाहीतर शाळेच्या नावाखाली दांडी मारलेल्या पोरांना चांगलं चोप देत नेणाऱ्या अश्या कित्येकांना मी बघितलं आहे.

आणि खरं सांगायचं म्हणजे माझं बालपण असं एन्जॉय करण्यात कधी गेलाच नाही.सतत कुणाचातरी आदर्श ठेवून शिक्षणात हरवत राहिलो.त्यामुळे जगात असलेल्या इतर कसल्याही भावनांची मला जाण नव्हती.

तालुक्याला चांगली टक्केवारी बघून बाबांनी मला चंद्रपूरला पाठवलं.पुढे मी जसजशा त्या शिक्षणाच्या पायऱ्या चढत गेलो.तसतसा गावातील दुरावा वाढत गेला.शिक्षण पूर्ण करून मग मी एका ऑफरच्या आधाराने ‌‌‌‌‌‌औरंगाबाद येथे कनक पाईप अग्रोला मॅनेजर या पदावर स्थित झालो.आणि गेली आठ वर्षे मी तिथे कार्यरत आहे.

घरी येण्याचं कारण म्हणजे त्यादिवशी वडिलांचा आजार जरा जास्तच बळकावला होता.आणि गेल्या पाच वर्षांपासून मी पैसे पाठवण्याचा व्यतिरिक्त मी काही गेलेलो नव्हतो.त्यामुळे आता गावाकडची आठवणही आता उभारून येत होती.आणि माझ्या आदर्श वडिलांसाठी तर मला जाणेच होते.

सरांना सुट्टिविषयी सांगून पाहिलं.तर त्यांनी सुट्टी तर दिलीच पण तशी कामेही सोपली.काही दिवसांपूर्वी मी त्यांच्यासोबत एका विषयावर बोललो होतो.माझं लांब येणं होत असल्यामुळे चंद्रपूरला का नाही फॅक्टरी उभारत म्हणून.कारण मलाही फार काळ राहणं तिथं जमणार नव्हतं.आणि जास्त देवाणघेवाण ही विदर्भातून असायची.

सरांनी सुट्टी सोबत तर नाही दिली पण त्या कामाव्यतिरिक्त ती माझ्यामते सुट्टीच होती.त्यांनी चंद्रपूरला फॅक्टरी उभा करण्याचा निर्णय घेतला होता.आणि त्यासाठी त्यांनी माझी नेमणूक ही तिथेच केली होती. अख्खी फॅक्टरी उभी होईपर्यंत सगळी जबाबदारी त्यांनी माझ्यावर टाकली होती.मी कसं तरी हो म्हणत त्यांचा निरोप घेतला आणि परतीच्या प्रवासाला निघालो.रिझर्व्हेशन ऑलरेडी झाल्यामुळे १२:५० ची नंदीग्राम एक्स्प्रेस पकडली आणि गावाकडे निघालो.


आज कितीतरी दिवसांनी मी गावाकडे निघालो होतो.घर सोडून शेजारी १०-१२ घरे वगळली तर कुणी मला ओळखेल असं वाटत नव्हतं. सायंकाळ ला जवळपास ७-८ वाजताच्या दरम्यान मी घरी येऊन पोचलो.आईवडील दारात वाटच बघत होते.आज कितीतरी दिवसांनी मी त्यांना असं स्पष्ट असं बघत होतो.आजही त्यांचं ओरडणं जरा भीतीदायक वाटत होतं.जसं बालपणी वाटत होतं

इतका वेळ कसा झाला रे?....

बाबा ...बसणे आलोय...विमानाने नाही..आणि बस जरी उशिरा असेल तर मला पण उशीर होईलच ना..

बरं बरं...घे त्या बॅगा आत.आणि जरा फ्रेश हो.भूक लागलीय आता...तुझीच वाट बघत होतो.

जेवण झाल्यावर पवार सरांचा फोन आला.आणि अर्धा तास लॅपटॉपवर मी त्यांचंच अनुकरण करत बसलो.येत्या १५ दिवसांत फॅक्टरी साठी त्वरित जागा बघा अशी तंबी ते देत होते.आणि हे सगळं लवकरात लवकर होईल असे आश्वासन देऊन मी फोन ठेवला.आणि इकडे तिकडे जरा फिरू लागलो.

आज कितीतरी दिवसांनी जरा विचित्रच वाटत होतं.घरच्यांसोबत वेळ घालवणे कशाला म्हणतात हे अनुभवत होतो.सगळ्यांची विचारपूस करताना,सगळे एकत्र जेवण करताना जणू काय पहिल्यांदाच हा आनंद जीवनात येतो आहे. असं वाटत होतं.

आजही माझी रूम माझ्यासाठी जशीच्या तशीच वाटत होती.एकदम छोटेखानी
बेडची जागा सोडली तर दोन तीन लोक फिरतील एव्हढंच.आणि ती खिडकी..
दरवाजा लावला की परसदारी ती खिडकी उघडायची आणि मनसोक्त वारा आत घ्यायचा.त्या नैसर्गिक मय वातावरणामुळे मी आजही तिथं पंखा लावत नाही.म्हणून सहजच खिडकी उघडली आणि तेव्हढ्यात बाबा आले.

म्हटलं....फ्री आहेस ना! आराम करत असशील तर जाऊ देत...आपण उद्या बोलू ....

अहो नाही बाबा...या ना आत..बसा जरा...आज इतक्या दिवसांनी आलोय..एका वडीलाला त्याच्या मुलाशी खूप काही बोलायचे असेल ..तर मग परवानगी कशाला?

तसं नाही.....मी बोलावं असं वाटत पण नाही पण उद्या तुझ्या नजरेत मी कमी नको पडायला...म्हणून बोलावं की नकोय हा विचार मनात गुंततो....

बाबा इतका विचार नका करू...उगाच पुन्हा त्रास वाढेल.बोला आता..

ईश्वरा... तू येणार म्हणून अख्ख्या गावाला ही गोष्ट कडलीय.त्यामुळे शेजारची शांता मावशी आली होती सकाळी.चांगलं स्थळ घेऊन.म्हणाली माझ्या ओळखीत एक छान मुलगी आहे.अगदी आपल्या ईश्वराला शोभेल अशी.जर त्याची लग्न करायची इच्छा असेल तर सांगा मला भेटायला..
आता तुझी काय इच्छा आहे ...?
नाही म्हणजे तसं मला तिकडे बोलायला बरं होईल.आणि तुझं एकदाचं लग्न झालं की मी मारायला मोकळा...

बाबा तुमचं म्हणणं बरोबर आहे पण इतक्यात घाई नको.आणि असं चुकूनही माझ्यासमोर अभद्र बोलू नका.कुठेही जायचं नाही तुम्हाला.इथेच आणि माझ्याच जवळ रहायचंय तुम्हाला. कळलं..आणि करूयात ना तुमच्या मनासारखं पण आता सध्यातरी नको.

बाळा काही प्रेमप्रकरण नाही ना.आणि तसं असेलही तरी मला सांग.माझी काहीच हरकत नाही.पण फक्त तुला शोभेल अशी बघ.

बाबा.... तसलं काही नाही.मला वाटेल तेव्हा मी तुम्हाला सांगेन...जा आता..झोप निवांत.

आज पहिल्यांदा वडील एका मित्राप्रमाणे माझ्याशी बोलताना बघून मला फार नवल वाटत होतं.हेच का ते ? ज्यांनी मला लहानपणापासून धाकात वाढविला.स्वतः ओरडू ओरडू ज्यांनी मला माझ्या पायावर उभं केलं.विचार करता करता केव्हा झोप आली.काही कळलंच नाही.

सकाळच्याला डोळे उघडले ते कुणाच्यातरी पैजनाच्या आवाजाने. छम छम् करीत तो आवाज माझ्या बेडपर्यंत आला.बहुतेक सकाळचे आठ वाजले असतील.आणि जरा आळस देत मी डोळे उघडले.

आणि अचानक घाबरल्यागत बेडवर उठून बसलो.कुणीतरी मुलगी माझ्याकडे बघून हसत होती.काळ्याभोर केसांवरून तिने एकवार हात फिरवला आणि अपसरेसारखी अलगद पापण्या मिटून हळूच स्वतःचे स्मितहास्य थांबवले.आणि आपल्या नाजूक ओठांचा चंबू करत ती म्हणाली.

तू....


......ह.......(मानेनेच)

अरे उठलास का?...दोनदा चक्कर मारून गेले मी.आणि तू आत्ताशी उठला
..बघ सूर्य किती डोक्यावर आलंय.तिथेही असाच झोपत असशील का ?अरे असं का बघत आहेस? ओळखलं नाही का?

खरतर मी ओळखलं नव्हतच.पण ती घरात येऊन माझ्याशी बोलतेय म्हणजे नक्कीच कुणीतरी ओळखीचीच असणार असं गृहीत धरलं.आणि परत मानेनेच न ओळखण्याची खूण केली.

अय्या...हो की .... तू तर सगळंच विसरलास.अरे मी स्मिता....स्मिता देसाई..आत्ता ओळखलस

(थोडं विचार करून) हं...ओळखलं...

आधी फ्रेश हो...मग नंतर येते...आणि परत मागल्या पायी छमं छम् आवाज करत निघून चालली गेली.

ती माझी आत्तापर्यंतची खास बाल मैत्रीण होती. आणि तरीच वाटलं होतं..वरचेवर बोलणारी ही कोण?तिच्यासोबत बोलताना अख्खं बालपण आठवलं.परसदारी कितीतरी खेळ खेळायचो आम्ही.एव्हाना मी हॉस्टेलला जाईपर्यंत फार थट्टा करायचो आम्ही.ज्यावेळेस मी घरातून बाहेर पडलो.इवलिशी दिसत होती ती.पण आता तीच आता इतकी देखणी आणि रुबाबदार दिसली की काही क्षण मी तिला ओळखलेच नाही.

असो थोडं फ्रेश झाल्यावर मग मी फेरफटका मारण्यासाठी गावातून निघालो.एक लक्षात आलं.लाख विदेश फिराल तरी पण आपल्या गावची मजा काही औरच असते.दोन दिवसात बरेच काही गावात अनुभवायला मिळालं होतं.

गावातील सावकाराची वाड्यातील भिंती बऱ्याच गळून पडल्या होत्या.घरापाशी असलेलं नारळाचं झाड बराच लांब गेला होता. टक लावून नारळ माझ्याकडे बघत उन्हात चमकत होती.नव्या पिढीच्या सरपंचाने गावात बराच बदल घडवून आणला होता.आता घराघरांत नळ आलं होतं.रात्री सौरऊर्जेवर गाव उजलुन निघत होतं.बरेच बदल गावात दिसून पडत होते.

हॉटेल म्हणजे चौकात गवताची झोपडी होती.आज तिथे विटा रेतीचं रूम काढल्या आहेत.पहिल्यांदा गेलो तेव्हा कुणी ओळखलं तर नाहीच.पण नंतर सगळ्यांनी जरा हसून माझी गम्मत केली.गावात असं जिवाभावाचा देणा असं कितीतरी दिवसानंतर येत होतं.


२)केशवची भेट



सरांनी सांगितल्यानुसार मी काही डीलर्स ना कॉन्टॅक्ट केलं होतं.आणि त्यानुसार आज एका डीलर्स चा फोन आला होता.त्याने प्लॉटची परीक्षा घेण्याकरिता दुसऱ्या दिवशी चंद्रपूरला बोलावलं होतं.तत्क्षणी मी सरांना फोन लावून बातमी कडवली आणि त्यांना निघायला सांगितलं.सरांनी काही फेक्टरीची नक्षा पाठवली.त्यानुसार मी लॅपटॉपवर फेरबदल करीत राहिलो.तेव्हढ्यात स्मिता आली.

हल्ली माझं मन नेहमीच कामात व्यस्त असायचं.आणि वैयक्तिकरित्या किंवा मानसिकरीत्या काम आणि घर एवढंच होतं.कुण्या स्त्रीच्या वासना किंवा त्यांचं रूप यांचा कसलाही प्रभाव माझ्यावर नव्हतच कधी.प्रेम ,मैत्री,भावना हे पाझ्येशिव प्रश्न माझ्यात नव्हतेच कधी.स्त्रीचं स्पर्श काय असतं हे कधी मी जाण लाच नाही.त्यामुळे प्रत्येकवेळी मी स्त्रीच्या पासून जरा लांबच असायचो. आणि कुणी मुलगी माझ्यासोबत असणे हे मला कधी आवडायचा नाही.माझं चाललेलं काम स्मिता मोठ्या कुतूहल नजरेने बघत होती.

अचानक तिच्याकडे लक्ष गेली.आणि ती बोलायला लागली.

लहान असताना ना ईश्वरा...अशीच तुला एकटं राहण्याची सवय होती...म्हणून तुला सगळे एकलकोंडी या नावाने डिवचत असत.आणि मी तुला आवर्जून खेळायला घेऊन जायची.
बाय द व्हे उद्या कुठे चाललास?

चंद्रपूरला चाललोय...

मी येऊ का??

कशाला?

फिरायला...

पण मी फिरायला नाही चाललोय...कामाकरीता चाललोय...आणि बाबांची काही औषधी पण आणायची आहेत...

चालेल मला...मला फक्त मोबाईल घ्यायचं आहे ...घेऊन देणार ना..

पण तुला मोबाईल हवाच कशाला?? तुला काम तरी काय???

घेऊन देणार असशील तर तसं सांग...नाही म्हटलं तर एकटी जाणारच आहे..

(इतकी मोठी झाली पण राग अजुनही नाकावरच आहे.) हो...हो...चल.पण मी ट्रेनने चाललोय. चालेल.

चालेल..आणि ती निघून गेली.मी मात्र काय हे...म्हणून बघत राहिलो.

वडिलांचं आजार थोडं बऱ्यात होतं.पण ते इकडे तिकडे फिरायला कमी करत नव्हते.त्यांना आराम करायला सांगावं तर सवय नाही म्हणायचे.आणि जर का त्यांच्या पक्काचं मागं लागावे तर त्यांचं एकच उदाहरण..

तू लग्न कर..मगच मला आराम मिळेल.मलाच गप्प करून टाकीत असत.

सकाळच्याला दोनदा डीलर्स चा फोन येऊन गेला आणि मी त्यांना येत आहे म्हणून खोटेच मोबाईलवर सांगत राहिलो.या स्मीताची ना..तयारीच व्हायला खूप वेळ लागत होता. इतकं त्रास आलं होतं ना की एकटाच चाललं जावं.पण तिने आधीच मला थांबवून ठेवलं होतं.इटक्यांने बरे झाले की ट्रेनचा टाईम गेल्यावरही एक सुपर बस थांबून होती.आणि तेव्हढ्याच वेळात आम्ही तिथे पोहचलो.

खरंच पहिल्यांदा एका मुलीमुळे मला इतका उशीर झाला होता.त्यामुळे थोडाफार राग होताच तिच्यावर.पण कौतुकही वाटायचं.कारण ती दुतर्फा होती.राग तर आणायची पण तेव्हढ्याच वेळात हसवायची देखील.त्यामुळे ती असावी जवळ असं वाटायच.हळू हळू का होईना पण मला वाटत होतं की मी तिच्या मोहात पडतोय.

डीलर्स केव्हापासून रेल्वे स्टेशनवर माझी वाट बघत होता.त्याला शोधायला ही फारसा वेळ लागला नाही.कारण वाट पाहून त्रासलेल्या चेहऱ्यात त्याचाच अव्वल नंबर होता.त्याचा राग शांत करण्यासाठी म्हटलं चला आधी चहा घेऊ आणि मग डिस्कस करू.तोपर्यंत सर येतीलच...शेवटी तो मान्य झाला.

चाय पिता पिता त्याने चारही प्लॉटची नक्षी दाखवली.एव्हाना तोपर्यंत शेअर लोकेशन च्या आधारावर सरहि येऊन पोचलेच होते.मला रेल्वे लाईनच्या जवळ असलेला प्लॉट आवडला होता.म्हणून मी त्याच जागेचा नक्षा बघत होतो. आवारही जरा मोठाच होता.आणि समोर हायवे व मागे ट्रेन होती.थोडक्यात फार चांगली जागा होतो.सरांना सुद्धा मी हेच पटवून देत होतो.सर म्हणाले...

अरे तुला आवडली ना....मग ठीक आहे.चल आपण डोळ्यांनी बघून घेऊया...(स्मिताला काही तिथलं कळेना.ती फक्त सोबत चालत होती.)
सरांनी तिच्याबद्दल विचारलं..


कोण रे ही ? लग्न करतोयस का ? छान मुलगी आहे...

सर तसं काही नाही.घराशेजारी राहते मैत्रीण आहे.तुला काही काम आहे म्हणून ती माझ्या बरोबर आली.बाकी काही नाही...

हो..का...सॉरी बरं का ताई....

गप्पा करता करता थोड्याच वेळात आम्ही तिथे जाऊन पोहचलो.

सध्यातरी प्लॉट फार खराब अवस्थेत होता.जागोजागी काचेच्या बाटल्या,पिशव्यांचे ढग,कचऱ्याने करकचून होता.पण सगळ्या सोयींनी व्यवस्थित होतं.

मग काय ईश्वरा..मस्त नजर आहे तुझी..मलापण प्लॉट आवडला..( डीलर्स कडे बघत.) मग काय ?.. डील पक्की..
लवकरात लवकर कागदपत्रे तयार करा आणि तसं कळवा.आणि काही वाटलच तर ईश्वर आहेच.ओके मी निघतो आता.

सर घाईघाईने निघून गेल्यावर मी डीलर्स ला भेटण्याची तारीख दिली आणि जे काही कागदपत्रे आहे ते तयार करायला सांगितले.आणि हात मिळवून एकमेकांचा निरोप घेतला.

फू....
(सुटकेचा निःश्वास घेत.) एकदाचा प्लॉट मिळाला.आता सगळं काही व्यवस्थित होऊ दे.स्मिता हसत माझ्याकडे बघत होती.चल काहीतरी नाश्ता घेऊया.मग जे काही घ्यायचं आहे ते घेतलं की निघायचं.

माहीत नाही पण तिच्यासोबत फिरताना मला वेगळंच काही वाटत होतं.आज पहिल्यांदाच मी कुणाच्यातरी सोबतीने फिरत होतो.सगळं उरकल्यावर परतीच्या प्रवासाला तिची काही वेगळीच साद होती.येताना बडबड करून डोकं दुःखविला.आणि आता जाताना त्या मोबाईल ला डिवचत होती.बालपणीच्या मैत्रिणीच्या नात्यांचा आता हळूहळू विसर पडू लागला होता.

दोन दिवसांनी जागा सरांच्या नावे करून भूमिपूजन करायचं होतं. आणि आता कामाला शुरुवात पण करायची होती.दोन दिवसांत मी सुद्धा प्रेझेंटेशन ला शुरुवात केली होती.आता हळूहळू स्मिता माझ्यात येऊ लागली होती. तसं तिच्या घरी माझं येणं जाण चालूच होतं.तिच्यासोबत इकडे तिकडे फिरणे सगळं कसं बालपणी सारखं वाटत होतं.


जेव्हापासून मी स्मिताच्या संनिध्यात आलो होतो.कितीतरी नोबेल वाचून काढल्या होत्या.पण आमच्यात प्रेमाची कबुली कोण देणार हा एक मोठा पेचाचं प्रश्न होतं. आणि तिच्या मनात असलं काही नसलं तर नातंही तुटायचा.वर घरीपण तोंड नसायचं.कित्येक लवगुरूंचा सल्ला मागितला पण तिच्या समोर माझं तोंडच उघडेणा.आणि वर ती इतकी बडबड करायची की काय बोलावे तेही सुचेना.

कुठे बाहेर जावे तर वरचेवर फोन एसएमएस तिचे येताच असायचे.घराच्या जवळ घर असूनही रात्रीला..काय करत आहेस? झोपला का नाही?असे एसएमएस येत असत.

डीलर्स चा फोन आला.सर चंद्रपूरला लॉज मध्येच थांबून होते.आज भूमिपूजन करायचं असल्यामुळे आमच्या स्टॉप चे काही लोक पण आले होते.सरांनी सगळ्यांना मी दिलेलं फॅक्टारीचा फेरबदल केलेला नक्षा प्रत्येकाला दिला आणि प्रत्येकाला त्याचे काम दिले. बेलदर,वेल्डर सगळ्यांना ज्यांचे त्यांचे काम वाटप केले.भूमिपूजन झाल्यावर ले आऊट झालं आणि खोदकाम चालू झालं.

सगळं काही माझ्या मनासारखं होत होतं आणि सरांची पण इच्छा होतीच.
त्यामुळे लवकरात लवकर काम चालू झाले होते.आणि प्रदूषणाचा फारसा त्रास नसल्यामुळे लवकरच परवानगी पण मिळणार होती.

सगळ्यांना कामाच्या सूचना देत सरांनी परतीचा मार्ग धरला.आणि कामाची शुरुवात करत मी तिथेच थांबून राहिलो.कारण मला जायला अजून खूप उशीर होता. रेल्वेही उशिराच होती.

खोदकाम चालू असताना अचानक एका इसमाचा ओरडण्याचा आवाज आला.
सर इथे कुणालातरी पुरले आहे...नुसती हाडे आहेत...

त्याचा आवाज बघून सगळेच कामगार तिथे जमा झाले.कुणालातरी मर्णवस्थेत तिथे पुरलेले होतं.कुबट असा वास सगळ्यांच्या नाकात कोंबत होता.एका कामगाराने ती हाडे एका पिशवीत जमा केली आणि माझ्याकडे दिली.मी ती बाजुला फेकून दिली.

ट्रेनला यायला अजुन २०-२५ मिनिटे बाकी होती म्हणून रेल्वे पट्रीवर जाऊन बसलो.एकांतात सांज गरव्याची थंडी वारा बोचत होती.

बाजूला एक तरुण बसला होता.अचानक माझ्याकडे मिश्कीलपणे बघत अनामिक हास्य दिले.आणि म्हणाला...

काय फॅक्टरी तयारीची शुरुवात दिसतेय??

हो औरंगाबाद वरून हे फ्युचर आणला गेला.आता तिथला काम तिथे आणि इकडचं इकडे.बाय द व्हे तू कोण?

मी...केशव

छान नाव आहे ..कुठे राहतोस?

इथेच...

इथेच म्हणजे ..मी नाही समजलो..

मी जिथे आहे ..तिथेच राहतो..आणि केव्हाही इथेच भेटेन...केव्हाही हाक मार..( आणि बघता बघता तो अदृश्य झाला.)

तो अचानकच असा गायब झाला. तसं मला धस्स झालं.आणि मी पटकन उठून उभा झालो.एव्हाना ट्रेनचा ताईमही झाला होता.आणि म्हणून घाईघाईने जरा तिकीट काढून की स्टेशनवर येऊन बसलो.

मनात त्याचाच विचार चालू होता.कोण होता तो ? असं एकाएकी कुणी अदृश्य होऊ शकते का? नक्की काही तरी भुताटकीच्या प्रकार आहे?होऊ शकते मला कुणी घबरावण्याचा प्रयत्न करत असेल? प्रश्नांचा भडीमार डोक्यावर चालू लागला होता.आणि त्यामुळे मी त्याकडे दुर्लक्ष केलं.

जसजसं फॅक्टरी चे काम वाढणार होतं. तसेच माझेही काम वाढणार होते.पण सहज कुतूहल म्हणून मी दरवाजाच्या बाहेर निघून जिथे केशव दिसला तिथे बघू लागलो.तो तिथेच बसून होता.अगदीं त्या जागेवरून ट्रेन निघून गेली तेव्हासुद्धा...


३) केशव आणि अंकिताची लव्हस्टोरी


सरांनी सांगितल्यानुसार रोज फॅक्टरी कडे जाणे.कामाच्या चौकशा करणे आणि सगळे डिटेल लिहून सरांना पाठवणे.आता सध्यातरी माझ्या मागे हेच काम होते.

माझ्या छोट्याश्या खोलीत दिवसभराच्या दिनचर्या पर्द्यावरच्या सिनसारखी उतरत होती.हळूच केशवचा चेहरा त्यात अलगद आला आणि मी उठून बसलो.क्षणभर का होईना मनात आता त्याच्याबद्दल धास्ती जाणत होती.खरंच असं होऊ शकते काय? काहीही करून मला त्याचा उलगडा लावणे आवश्यक होतं.म्हणून परत दुसऱ्या दिवशी मी थोडा लवकरच गेलो.कालच्या सारखंच सायंकाळची हवा बोचत होती.आसपास कुणीच नव्हतं.मनात सारा धीर एकवटून केशव म्हणून हाक मारली.

अचानकच तो समोर प्रकटला.पण त्याची लक्ष मात्र माझ्याकडे नव्हती.क्षणांवर क्षण जात होती.पण त्याच्यात मात्र कसलीही प्रतिक्रिया होत नव्हती.दूरवर कुठेतरी तो शून्यात हरवला होता.न राहवून मग मीच त्याला विचारलं

तू काय जादूगार आहे का केशव?... कधी दिसतोस तर कधी अदृश्य होतोस...

मी भूत आहे...तुमच्या भाषेत..( हळूच माझ्याकडे मान वळवत तो म्हणाला.)

(मला हसूच आलं) गम्मत करायला तुला काय मीच भेटलो काय केशव?

तू विश्वास ठेव अथवा नको ठेवू...पण जे सत्य आहे.तेच तुला सांगतोय...

बरं बाबा...तुझं खरं..पण तू राहतोस कुठे? तुझं घर कुठंय?

सांगितलं ना...इथेच राहतो मी...तूच तर मला उठवलं आहेस..आता कुठे जाणार आहे मी...

इट्स वर्किंग यार...मी कशाला तुला उठवेन.

.......( काही क्षण शांततेत)

( त्याला समजावण्यासाठी.) बरं बाबा पुरे...तू इथे कुणाला भेटायला येतो का? कारण मलाही असं एकटक राहायला खूप आवडतं.

आवड करून आता काहीही अर्थ नाही ईश्वरा.फक्त एक इच्छा राहिली आहे.न जाणे ती केव्हा पूर्ण होईल.

अच्छा म्हणजे तुझं प्रेम होतं काय? पण आता ती कुठे आहे?

( तो परत शांततेत गेला.पण यावेळी तो डोळे झाकून रडत होता.त्याचं रडणं बघून मलाही थोडं विचित्रच वाटत होतं.मग थोड्या सांत्वणेसाठी त्याला म्हटलं.)

बरं बाबा तुझी इच्छा...आता परत काही नाही विचारणार...ओके

आणि काय आश्चर्य.ओके म्हणतच असता तो परत गायब झाला.त्याला त्याच्या प्रेमाविषयी विचारलं तर तो गायब. खरं म्हणजे थोडं का होईना त्याच्यावर माझं विश्वास होत होतं.कारण प्रात्यक्षिक बघावं तर मी त्याला कुठून येताना किंवा जाताना असं कधी त्याला बघितलेच नाही.आणि अदृश्य असाच माणूस होऊ शकते ज्याचं काही अस्तित्वच नाही.पण या वेळेस मला भीती वाटली नाही.उलट त्याला रडताना बघून सहानुभूती वाटत होती.

त्याच्या या भुटतकिवर माझा आजपर्यंत कधी विश्वास नव्हता.पण म्हणतात ना अनुभव घेतल्या शिवाय माणूस समोर जात नाही. तसचं माझ्याही बाबतीत झालं.ते म्हणजे कसं...

त्यादिवशी गावात शेजारची आजीबाई मरण पावली होती.आणि गावात कसे आहे अजुनही जुण्यातल्या खुळ्या परंपरा चालतात. तिचं मरणं म्हणजे सामोरी ती कोणत्या जन्माला जाईल याची विचारपूस करायला आम्ही शेजारी असलेल्या एक पुजर्याकडे गेलो होतो.तेव्हा मी त्यांना कुतूहलाने विचारलं होतं की खरंच असं होऊ शकते का? माणूस विना इच्छेने का मोक्ष होत नाही? त्याची आत्मा हे भुलोक सोडत नाही? त्यावेळेस तो पुजारी के बोलला ते फार विचित्रच वाटलं होतं.

या सगळ्याची तुला काहीही आवश्यकता नाही पोरा.कारण तुझ्या आयुष्यात अश्याच काही गोष्टी आहेत ज्या तुला लवकरच कळून येतील.आणि खरं काय खोटं काय तू स्वतःच समजशिल.आज ज्या गोष्टीचं तुला कुतूहल वाटतंय समोर त्याच गोष्टीत तुला स्वारस्य येईल.हा एक असा योग आहे पोरा जो एका विशिष्ट व्यक्तीलाच मिळत असतो.मी सगळं माझ्या या डोळ्यांनी बघतोय. कसं तू मदत करणार त्यांची..!!!

त्यावेळेस मला त्यांची भाषा उमगली नव्हती.पण आता असं वाटतं की हो न हो काहीतरी गोष्ट नक्की आहे जी माझ्याशी निगडित आहे.आणि याचं उत्तर फक्त ते पुजारी गुरुजींचं देऊ शकतात.

घरी आल्यावर स्मिता घरीच बसली होती.खास माझ्यासाठी तिने मेठीबोंड (गावखेड्यातील एक फराळ.) बनवून आणले होते.पण आज माझ्या मनात केशवबद्दल विचार होता.त्यामुळे मी तिच्याशी फार न बोलता गुरुजींच्या आश्रमाकडे जाण्याची वाट पकडली.त्यावेळेस स्मिताचा चेहऱ्यावर नाराजी दिसत होती.पण माझं लक्ष तेव्हा तिच्याकडं नव्हतं.

भगव्या रंगाची वस्त्रे परिधान केलेले गुरुजी आंगणात ध्यानस्थ बसून होते.त्यांची पांढरी फटक दाढी हळूच हवेने झुलत होती.डोक्यावर भगव्या रंगांचा फेटा साईबाबांची मूर्त दाखवत होता.शांत निरागस चेहरा मौन वृत्तीत शांततेत परिधान होता.हळूच गुरुजी म्हणून हाक मारली.कुशलता पूर्वक त्यांनी त्यांचे डोळे उघडले आणि माझ्याकडे लक्ष जाताच त्यांच्या चेहऱ्यावर गड जिंकल्याची स्मित मुद्रा अवतरली.आणि म्हणाले..

आलास पोरा..चल फिरून येऊ
(मी हळूच त्यांना उठायला आधार देऊ लागलो.ओम नमः शिवाय म्हणत ते उठून उभे झाले.आणि मी त्यांच्या मागोमाग चालू लागलो.)

मला खात्रीच होती पोरा...तू येशील म्हणून..आणि यासाठीच मी तुला इकडे एकांतात घेऊन आलो.नाहीतर लोक आपल्याला वेडेच समजले असते.बरं ते जाऊ दे...

केशव भेटला ? काय म्हणाला ?

गुरुजी.......( आश्चर्यचकित होऊन.)
तुम्ही ओळखता त्याला ? भेटलात तुम्ही त्यांना ? पण कसे काय ?

पोरा हीच तर गोष्ट आहे ज्याचं योग तुला अनुभवायचे आहे.अस्तित्व नसलेल्या हवेवर आपण जगतो.पण तो तुला दिसतो.कारण त्या हवेसारखाच त्यालापण अस्तित्व नाही.तुझं योग हे आहे की तू त्यांना बघू शकतोस.तू त्यांचं मन भेद .त्याला समजून घे.त्यांची इच्छा समजून तू त्यांची मदत कर.कारण ते फक्त तुलाच दिसू शकतात.इतर कुणालाच नाही.

म्हणजे याचा अर्थ...

हो ती जिवंत नाहीत...ज्याच्याशी तू बोललास ती त्याची अतृप्त असलेली आत्मा आहे.आणि त्यांना मोक्ष देणे हे फक्त तुझ्याच हातात आहे.निसर्गाकडून झालेल्या चुकीमुळे त्याचं निसर्गाने तुला ही संधी दिलीय.त्याचा उपयोग कर.आणि त्यांना मोक्ष देऊन माणुसकी जपण्याचं तू प्रयत्न कर.जा केशवला भेट.तुला सगळं कळेल...

घरी आल्यावर मी परत विचार करू लागलो.हे काय प्रकरण माथी पडलंय.मदतही करायची ती पण अश्या लोकांची ज्यांचं काही अस्तित्वच नाही.पण काय इच्छा असेल त्यांची.एकतर हे प्रकरण कुणाला सांगावं तर लोक मला वेड्यात काढतील.काय आहे ते एकदाचं त्याला विचारून बघावं.इतक्यात आता फॅक्ट्रीच कामही आता जरा वाढला होता. त्यामुळे मी एकटा फार वेळ देऊ शकत नव्हतो.आणि आता हे प्रकरण.

कामाची सगळी रूपरेषा सांभाळत मी तिथे जाऊन बसलो.रोजच्यासारखाच तोही तिथे बसून होता.कुठेतरी शून्यात हरवलेला.अचानक माझी चाहूल लागल्यागत माझ्याकडे बघू लागला.आणि मी बोलायला शुरुवात केली.

सॉरी केशव..

कशाबद्दल ??

तुझ्यावर विश्वास न ठेवल्याबद्दल आणि तुझी थट्टा केल्याबद्दल..

इतरांना न दिसता काही बोलण्यापेक्षा तुझं थट्टा करून तरी बोललेल बरं.कारण तुच असा आहेस जो मला बघू शाकलास.त्यामुळे जे काही आहे ते आता तुझ्यावरच.मग काय बोलणार..

अरे पण तू सांगायचास ना ...म्हणजे मी तुला उठवलं..म्हणजे मातीत पुरलेला तुझं शव मी फेकला...निदान तेव्हा तरी..

हम....

अरे मग सांगायचास ना...

किती प्रयत्न करू..कुणाला दिसेन..
कुणाला जाईल माझं आवाज..कुणाला कळेल की इथे मी ना जाणे किती दिवस बंदिस्तात आहे.त्या दिवशी तू भेटलास ..बोललास..मनात एक आशा उठली..पण तुझी थट्टा करून विरली..
आणि मी परत माघार घेतली.

मी तुझी मदत करणार केशव.आणि त्यासाठीच मी इथे आहे.मला माहित नाही की हा कसला योग आहे पण मी तुझी मदत करणार.पण आधी तुला सांगायला हवं केशव.जे सगळं कसं घडलाय? काय झालंय? सांग मित्रा ..सगळं एकदा नव्याने सांग..कारण तेव्हाच मी तुझी मदत करू शकेन...

माझं त्याला फोर्स करणं चालूच होतं.पण तो मात्र खूप दूर गेला होता आठवणीत.आणि रडू लागला परत त्या आठवणीत.जिथे तो आजतागायत सत्यात होता.प्रेम विरसारखा जगत होता.क्षणभर तो खूप रडला आणि मग सांगू लागला.

ते कॉलेजचे दिवस होते.मी पहिल्यांदा अँकिताला बघितलं होतं.कॉलेजच्या गेटमधून आपल्या कुरळ्या केसांन्ना सावरत तिने आतमध्ये प्रवेश केला.गोल चेहऱ्याची एकदम साधी भोळी,बघताक्षणी कुणीही प्रेमात पडावं अशी ती होती.

शुरुवा तीला मी फार घाबरत होतो तिच्याशी बोलताना पण कित्येकदा तिची अन् माझी गाठ पडायची.त्यामुळे हाय हॅलो वाढत गेलं. नकलत मैत्री झाली.आणि पुढे त्याच मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले.

मी आणि अंकिता आम्ही एकमेकांवर फार प्रेम करायचो.इतर लोकांसारखे आम्ही पण प्रेमात फार गम्मत जम्मत केली.कधी बीचवर जाणे,कधी ओल्या पावसात भिजणे वगैरे चालायचं.पण इतर लोक करतात तसा स्वार्थी प्रेम माझं केव्हाही नव्हतच.

असं वाटायच जणू तिचा साथ ह्या श्वासा बरोबर चालला आहे तू कधी एक दिवस जरी कॉलेजला नसली की वाटायचं आज जीवनच संपलं माझं.आणि तिच्याही बाबतीत तेच होतं.हळूहळू अख्ख्या कॉलेजात आमची प्रेमकिर्ती पसरली होती.

तिच्या आजही नुसत्या आठवणीत मी इथे आहे आणि खात्री आहे जिथे कुठे तू असेल तीही सारखी माझीच आठवण करत असेल.

कॉलेज झालं आणि आम्ही एकमेकांच्या घरी लग्नासाठी अपील केलं.पण तिच्या वडिलांचं दिला.माझ्या घरचं असं कुणीच नव्हतं.नुकताच दोन वर्षात आई वडिलांचा अपघात होऊन मी पोरका झालो होतो.म्हणून मी स्वतः त्या अँकिताच्या घरी गेलो पण तिच्या वडिलांनी मला हाकलून लावले.

आमची मने आता जुळली होती.आणि एकमेकांशिवाय राहणं फार कठीण होत होतं.म्हणून आदल्या रात्री प्लॅन करून आम्ही पळण्याचा निर्णय घेतला.रात्रभर मित्राच्या रूमवर राहून सकाळच्या ट्रेनने चंद्रपूरला आलो.सगळी तयारी झालीच होती.आता कुणीही आम्हास विरह देऊ शकले नसते.आता फक्त एकमेकांच्या बंधनात आजीवन राहणार होतो. सकळच्याला छान तयारी झाली.आणि शुभ पर्वाच्या शुभ मुहूर्तावर १०:३५ ला चंद्रपूरच्या महाकल्कांदिरत लग्न झालं.एकमेकांवर आम्ही इतके खुश होतो की आता सुखाने मरून जरी गेलो असतो तरी काही गम नव्हता.पण कुणाला काय माहित होतं की आमचं सुख हे तेव्हढ्या पुरताच होतं म्हणून.दुपारच्या गाडीने आम्ही बल्लारशहावरून दुसरी ट्रेन पकडून बाहेर जाणार होतो.अगदी नव्या जगात.नवीन आपला संसार मांडण्यासाठी.

पण नियातीसुद्धा काय अजीब खेळ खेळते.तिच्या वडिलांनी काही गुंड आणून आमचा पाठलाग चालू केला होता.इकडे आमच्या जगण्या मरणाच्या शपथा चालू होत्या आणि तिकडे आमची शोधाशोध चालू होती.

त्या दिवशीही ट्रेन बरीच उशिरा होती.आणि मलापण कळलं नाही की तिच्या वडिलांना आमचा पत्ता कसा काय कळाला ते? स्टेशनवर आमची लक्ष नसतानाच त्यांनी आम्हाला पकडलं.आणि दोघांनाही फरफटत त्यांनी इथे आणले.( बोट दाखवत.)

इथेच त्याने गुंडांना मला मारण्यासाठी नजरेने इशारा केला.आणि तिच्या वडिलांनी तिला खेचत नेले. गुंड मला मारत होते आणि मी मात्र तिच्यासाठी ओरडत होतो.जाताना तिच्या डोळ्यातील अश्रूंची नदी वाहत होती.पण त्या नराधमाला बहुधा त्याची तमा नसावी.लग्न झालं असूनहीत्याने हा अन्याय बळकावला.शेवटपर्यंत अगदी शेवटपर्यंत मी तिचं नाव ओरडू ओरडू अख्ख्या जगाला कळवत होतो.शेवटी रक्तस्त्राव जास्त झाल्याने डोळ्यावर अंधारी आली आणि नजरेतून माझी अंकिता पुसटशी झाली.अगदी शेवटचं तिला हाक मारलं आणि मी माझे डोळे मिटले.

मग त्या गुंडांनी परत खात्री करून चाकुचे वारंवार वर केले आणि जिथे तुला माझी अस्थी मिळाली तिथे नेऊन पुरले.बस इतकीच माझी कहाणी. नाही मी तिला अडवू शकलो आणि नाही स्वतःला वाचवू पण शकलो.आणि इथून मी कुठे जाऊही शकत नाही.कारण एखाद्या आत्म्याचा शरीर जिथे असते ना तिथेच ती आत्मा भटकत असते.


आजपर्यंत या वाटेला डोळे लावून आहे.कधीतरी ती येईल या आशेने.दोघेही हातात हात घालून आपल्या अलग विश्वात जाऊ म्हणून.पण ते कधी साध्य झालच नाही .मी इथे येणाऱ्या प्रत्येकाला विचारायचो.पण पण जिथं मी कुणाला दिसुच शकत नाही.ते काय मदत करणार माझं..

मला तिला एकदाच भेटायचंय.माझं अपूर्ण राहिलेले प्रेम तिच्याजवळ व्यक्त करायचे आहे.ती माझी आहे असं तिला हक्काने सांगायचंय.तिचा हात हातात घेऊन फिरायचे आहे.पण एकदाच तिला भेटायचंय.प्लीज ईश्वरा काहीही कर.पण मला तिची भेट घालव.ज्यादिवशी ती मला भेटल मी आपोआप मोक्ष होईन.अनंतात चाललं जाईन.

इतकं सगळं ऐकून मलाच रडायला आलं होतं.आणि खरंच कुणीही ऐकलं असतं तर त्यालाही हीच फिलिंग आली असती.आणि त्याला आधार द्यायचा होता म्हणून म्हटलं
.
तुला वचन देतो मित्रा की ती कुठेही असेल तरी मी तिचा शोध लाविन.पण तुझी भेट घालवणार.आता फक्त इतकाच सांग की ती कुठे राहते? तिचा पत्ता मला सांग..

आज तिथून निघताना फारच वेगळा वाटत होतं.आपण कुणाची तरी मदत करतोय.आणि तेही एका आत्म्याचा.आज मी त्यांचं मन जिंकून त्यांची कहाणी ऐकली होती.आणि आता काहीही करून मला त्यांची भेट घालवून द्यायची होती.

४) अंकिताचा शोध



घरी गेल्यावर अँकिताचा पत्ता वाचला आणि विचार करू लागलो.इतकी वर्ष झालीत.ती आता असेल का? कारण इतकं सगळं झाल्यावर कोणताही वडील तिचं लग्न केल्याशिवाय जाऊ देणार नव्हता.मग ती फायनली काय करू शकते.फार तर त्याचा शोध घेईल.त्याला घेऊन जा म्हणण्यासाठी प्रयत्न करेल.. धडपड्या दिवा नाखूष होऊन कुणाच्यातरी संसारात तेवेल.नाहीतर काय एकाच उपाय... स्वतःचं जीवन संपविण्यासाठी आत्महत्या करेल...पण प्रयत्न करायला काय जाते? असं होऊ पण शकते आणि नाही पण होऊ शकत.तितक्यात स्मिता आली.

काय चाललंय रे? कसला विचार करतोयस?

काही नाही कामाचं थोडं डिप्रेशन...

अरे स्वतःचं पण भान ठेवत जा..

तू स्वतःचं मोबाईल बघ ना...कशाला माझ्याकडे बघते...

( मनात) मी का तुला बघते ते पण नाही कळत...

आत्ता काय झालं...

मोबाईल घरच्यांसाठी होता.इतर मुलींसरखी मला नको समजू.मला त्यात इंटरेस्ट नाही...

मग कश्यात आहे?

अरे सहज भेटायला आले आणि तू उलट पुलट बोलतोयस.नाही आवडत ना बोलायला तर चल मी जाते.

तितक्यात आठवण आली.अंकिताची मैत्रीण म्हणून विचारपूस करायला न्यायला हिला काय हरकत आहे.

ए....अगं ....ऐक ना स्मिता?

काय आहे? काय ऐकु..तुझं उलट पुलट बोलणं..?

ऐक ना ...तुझ्याशी एक काम आहे...उद्या कुठे जाणार आहेस का?

काय झालं? तुला काय काम आहे माझ्याशी? मी तशी मुलगी नाही आहे...लक्ष्यात ठेव..

ए...मी तसलं काही विचारत पण नाही आहे..नसेल इच्छा तर राहू देत..मी बघेन कुणी दुसरं..

अरे बोल ना..सॉरी यार...कुठे जायचयं..सांग ना .

उद्या एका पत्त्यावर जायचयं...ऑफिसचा काही काम आहे..म्हटलं फ्री असशील तर चल फिरायला..

ठीक आहे येईन..किती वाजता निघायचं आहे.

सकाळी १०:०० वाजेपर्यंत निघू.

ठीक आहे..पण तसलं काही नाही ना...

ए..जा निघ तू..येऊच नको..

एे....मुलगी आहे ..खात्री नको का करायला? बाय द व्हे एका मुलासोबत चालली आहे.( जाता जाता)

हम..म्हणे मुलासोबत चालली आहे.थोबाड बघितलं का आरश्यात?

फॅक्टरी च्या कामाचं तुटवडा पडू नये म्हणून मी सगळं अभ्यास रात्री करायचो. तसं सरांना तेव्हढा विश्वास होताच माझ्यावर.तर सप्ताहाला ते मला पैसे पाठवायचे.आणि मी ते सगळ्या वर्कर ना वाटोप करायचे.वडिलांच्या तब्ब्येतीत झालेली सुधारणा बघून ते कित्येकदा मला म्हणायचे..

ईश्वरा..खूप झाली रे धावपळ आता..आता तरी लग्न कर बाबा.

त्यांनी असं म्हटलं की मी त्यांना टाळून द्यायचो.पण ज्या अर्थी ते म्हणत होते. त्यांचं सगळं बरोबरच होतं.पण हे सांगणं आवश्यक नव्हतं.

सकाळच्याला तर ९:०० वाजताच स्मिताचि स्वरी तैय्यार.मी नुकताच जेवण करून सरांशी बोलत बसलो होतो.ती आल्या आल्याचं चालू झालं तिचं बडबड.आणि मला लवकर तयारी करावी लागली.

अरे ..गाडी काढली..आणि स्वारी तैय्यार..


जवळपास एक दीड तासाचा तिचा भाषण ऐकत मी त्या अंकिताच्या पत्त्यावर येऊन पोहचलो.शेवटीं तिचा तिचा घर मिळालं आणि मी बेल वाजवली.५५_६० वयाचा आडदांड गृहस्थांनी दरवाजा उघडला.

तुम्ही अशोक गायकवाड का?

नाही..

इथे मला त्यांचा पत्ता मिळाला.( चिठ्ठी दाखवत)

नाही..इथे १४ वर्षे झालीत.आम्हीच राहतोय.याआधी कोणी राहत असेल त्याची माहिती आम्हाला नाही.आम्हाला एका डीलर्स ने हे घर विकलं होतं.

मला जरा त्या डीलर्स च नंबर देता का ?

हो देतो ना..तुम्ही आत या ना..

नाही नको..मी जरा घाईत आहे..नंबर घेतलं की निघतो..

( अगं ती डायरी आन बरं टीव्हीच्या बाजूची.आणि पाने चाळत.)
ह...घ्या..

धन्यवाद करत मी तिथून निघालो.मात्र स्मितची बडबड काही बंद होईना.तिच्या इच्चेसाठी मला सतत होकार द्यावा लागायचा.नाहीतर गाडीच्या खाली उतरवावे असं वाटत होतं.त्यांनी दिलेल्या नंबरवर फोन करताच एक इसम बोलला.

हॅलो..डीलर्स राघवेंद्र

हो.. तुम्ही कोण?

मी ईश्वर शिवडकर बोलतोय..तुमची एक मदत हवी होती.

बोला ना..

नाही फोनवर नाही.. मी इथेच आहे..तुम्ही मला भेटू शकता का?

ठीक आहे.गांधी चौकात एक सुंदर हॉटेल आहे.तिथे या मी पोहचत आहे.

ठीक आहे या.

शोधायला तसा काही फारसा वेळ लागला नाही.कारण आजकाल इंटरनेटचा जमाना असल्या कारणाने सगळं काही मॅप वर दिसतं.त्यामुळे थोड्याच वेळात मी सुंदर हॉटेल गाठलं.नाश्ता पण करायचं होतं.त्यामुळे त्यांची वाट बघत मी तीन प्लेटची आर्डर दिली.तितक्यातच ईश्वर शीवडकर ओरडत तो आला.

केशवने सांगितलेलं पत्ता मी राघवेंद्र जवळ दिला आणि सांगितलं.या पत्त्यावर अशोक गायकवाड राहत होते.तुम्ही म्हणे तो प्लॉट दुसऱ्या कुणाला विकलाय.पण काही माहिती आहे का अशोक गायकवाड कुठे गेलेत...

अहो कुण्या माणसाचं नाव घेतलं तुम्ही..त्या एरियात डॉन माणूस होता तो.आज कुण जर त्याला बोट दाखवलं तर उद्या तो माणूस खल्लास.आता जवळपास १५_१६ वर्षे होत आहेत.त्याच्याच कुणी गुंडांनी त्याला लुटला आणि त्याच्यावर हल्ला करून त्याचं पाय पण मोडून ठेवलं.जाताना हे प्लॉट स्वस्त किमतीत मला देऊन माहीत नाही कुठे गेला तर.त्यावेळेस मलापण थोडं विचित्र वाटायचं.कारण प्रत्येकाला त्याची भीती वाटायची.पण एखाद्याने शस्त्र टाकून युद्धातून पलायन करावे अशी त्याची अवस्था वाटत होती.

असं होय..नाही का! आणि हो त्यांना अंकिता नावाची मुलगी होती..? ती कुठे राहते? तिच्याबद्दल काही माहिती असेल ना...

अहो..इथे सगळ्यांनाच माहिती आहे.फार छान गोंडस मुलगी होती हो.ते म्हणतात ना कमळ कधिही चिखलात उगवते.हे फुल त्याच्या उदरी कसं गेलं कुणास ठावूक पण त्याच्या भयाने सदा त्या बीचारीच्या गती.धड तिला जीवन जगताच आलं नाही.नंतर माहीत झाले की तिचे प्रेम प्रकरण होतं म्हणे.असं बायकांच्या तोंडून मी ऐकलं होतं.आणि हेसुद्धा ऐकलं की तिच्या वडिलांनीच तिला जिवंत मारले म्हणून.आता काय खरे ते कुणालाच माहीत नाही.पण फार वाईट झालं हो त्या पोरीचं.कुणाला विचारलं तर ती फक्त पळून गेल्याचीच वार्ता कळेल.बाकी काही माहिती नाही.

हम...फारच वाईट झालं..पण तो कुठे गेला असेल?याची काही माहिती असेल ना तुम्हाला?

माहिती नाही साहेब.या शहरात लाखो लोक येतात जातात.कुणी गावातून पोट भरण्यासाठी येतात.तर कुणी गावाकडे जातात.त्यातलाच तो एक असेल.

राघवेंद्रला धन्यवाद करत मी तिच्या कॉलेजची मदत घ्यायचा प्रयत्न केला.परंतु प्रत्येकाच्या तोंडून ती पळून गेल्या नंतर कुणाच्या नजरेतच आली नाही.मित्र मैत्रिणी,एव्हाना शेजारी..सगळ्यांबद्दल विचारलं.पण काहीच माहिती नाही कुणाला . पदरी थोडी निराशा घेऊन मी गावाकडे निघालो.

परतीच्या प्रवासाला मात्र स्मिटाची बडबड बंद होती.तिच्या मनात एकतर्फी हा काहूर माजला होता.तिला असं वाटतं होतं.की कोण असेल ही अंकिता?काय ती माझी गर्लफ्रेंड तर नसेल? का मी तिचा शोध करतोय?कारण तिने एकदाच नव्हे तर दोनतीनदा मला विचारलं होतं पण मी काय सांगणार तिला.काहीतरी सबबी सांगून मी तिला टाळून द्यायचो.आणि ती शांततेत परत विचारात हरवून जायची.

तिला सांगावं तरी काय? हाही प्रश्न मनाला भडीमार करत होता.कारण मनात निराशा जी पडली होती.घरी आल्यावर स्मिता काहीच न बोलता घराकडे निघून गेली.तिचं असं माझ्यावर नाराज होणं साहजिकच होतं.पण त्या वेळेत तिला काय सांगावं ? काहीच कळत नव्हते?

सी आय डी सारखं एकच प्रश्न मला सतावत होता.ते म्हणजे चंद्रपूर वरून निघालेली अंकिता ही तिच्या वडील सोबत होती.मग काय असे झाले की ती घरी पोहचली नाही? घरी तिचे वडील असताना ती गेली कुठे असेल.रस्त्यात कुठे मारलं नसेल ना तिला.देव करो असं नको व्हायला.पण प्रश्नच ते.नको नको ते येणारच.

जवळपास दोन ते तीन दिवसानंतर मी परत फॅक्टरी मध्ये गेलो.रोजच्या सारखेच तो तिथे बसून होता.रेल्वे पत्रीवर बैठक मांडून.उजवा हात हनुवटीला आधार देत.अंकिता गेली त्या दिशेला शून्यात बघत.

मला बघितल्यावर त्याला थोडं का होईना त्याला हर्ष आला.

बोल ईश्वरा काही माहिती केलंस ?

क्षणभर त्याला सांगावं की नको असं वाटतं होतं.पण प्रश्नही तोच करत होतं आणि उत्तरेही तोच देत होता.

तुझं चेहरा बघून असं वाटत नाही ईश्वरा.
की तुला अंकिताबद्दल काही माहिती मिळाली असेल.

केशव आता ती त्या पत्त्यावर नाही राहत.मी खूप प्रयत्न केला पण प्लॉट विकून ती कुठे गेलीत. याचं काहीच पत्ता लागत नाही.

....ह....मग आता कुठे असेल ती..

केशव जरा विचार कर..कधीतरी तिने तुला सांगितलेले असेल की ती मूळची कुठली आहे.तिचं खरं गाव कोणतं म्हणून..कधीतरी...जरा आठवून बघ...

(तो विचारमग्न व्यस्त)

( फोर्स करत) आठव केशव आठव..

( आनंदाने) हो आठवते..दिवाळी.. पोळा..यासारख्या सणाला ती जायची.काहीतरी सितापुर...ह... सितापुरची ती.

केशव धीर ठेव...मिळेल रे ती.. असं उदास नको होऊ..मी घेऊन येईन तुला..विश्वास ठेव माझ्यावर...

विश्वास ठेवून न ठेवून आता काही उपाय आहे का?कारण तुझ्याशिवाय हे कुणी करू पण शकते काय? जा माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे...कसलाही आक्षेप नाही.

स्वतःला आवरत मी घरी आलो.इतक्यात माझं थोडं कमावरूनही लक्ष उडाले होते.काहीवेळा स्वतःच्या विचारात मग्न असताना पवार सरांचा सुद्धा फोन उचलत नव्हतो.सतत अंकिता शोधाच्या सदरात असायचो.त्यादिवशी सरांनी जरा धास्तावताच विचारलं..

गेले दोन तीन दिवस तू साईडवर नाहीस..कशाबद्दल काही डिप्रेशन आहे का ? कामाबाबत काही तक्रार?

नाही सर

मग काही ताण तणाव?

नाही सर ..फक्त थोडी विश्रांती हवीय..काही दिवस.. प्लीज सर

बरं बरं ...काही हरकत नाही..प्लीज म्हणू नकोस..बरं निदान कुन्यावेली तरी रूपरेषा बघायला येत जाशील ना ..

बघेन सर

ठीक आहे मी करेन काहीतरी..पण जरा लवकर ये.गरज लागेल तुझी..ओके .. बाय

बाय सर

इकडे ज्या दिवसापासून स्मिताला अँकिताबद्दल कळलं.त्या दिवसापासून तिचं येणच बंद पडलं होतं.नक्की तिचं काय प्रकार आहे हे बघण्यासाठी मी तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला.पण ती त्याही तयारीत नव्हती.फोन केला तर उचलत नव्हती.चार चौघात गम्मत करून टाळून द्यायची मला.सहज मी तिची गम्मत करून घ्यायची ठरविली...

तिला जळवण्यासाठी शांता मावशीला त्यांनी बघितलेल्या मुलीचा फोटो आणायला पाठवला.त्या छोट्याश्या गमतीने ती इतकी जळली की सायंकाळी घरीच आली..आई बाबा कुणाशीच न बोलता..डायरेक्ट माझ्याजवळ..

ए....तुला काही कामधंदे नसतात का.? नको तेव्हा मला जळवत असतो..

ए...मी तुला जळवात नाहीये..फक्त खात्री करून घेतली की शांता मावशींनी बघितलेली मुलगी मला शोभते की नाही ते..

काऊन...तिचा शोध संपलय वाटतं...स्वारी फोटोंच्या शोधात आली तर..

शोध...कायम राहील...कारण मला पाहिजे ती ..पण निवड नको ना चुकायला..

अरे तुला काहीच कसं नाही वाटतं.एक सुंदर मुलगी तुझ्या पाठीमागे उभी आहे.आणि तू तिला नकार देत आहेस.बेकॉज आय लव हर

(आश्चर्यचकित होऊन) हां...परत एकदा म्हण..

आय लव यू ना रे..का तू असं वागतोस माझ्याशी..

अगं पगले .. आय लव यू टू..

( ती पण आश्चर्याने) आ....काय म्हणालास?

अग खरंच .. आय स्टील लव यू..

मग ते फोटो..

हो तुला जलवण्यासाठीच हे सगळं होतं..

आणि ती अंकिता मग कोण आहे?

त्याचंही उत्तर तुला लवकरच मिळेल.जी वेळ योग्य नाही सांगण्यासाठी.पण थँक्यू कर तिलाच .कारण त्यामुळेच मी आज तुझं प्रेम समजू शकलो.

ठीक आहे..नको सांगू..आणि आता मला त्याची गरजही नाही..

उदयाला कुठे चाललीस ? येणार माझ्यासोबत?

कुठे(परत डोळे मोठे करत)

तुझी सौतन आणायला.. नुसतं बडबड करायला आवडतं तुला..पण समजून काही घेणारच नाही..

मी येणारच नाही..

मी परत विचारणार सुद्धा नाही..
र आणि सरळ घेऊन जाणार..कसलाही विचार न करता
उचलणार ..

५) परत एकदा निराशा


जरा लांब जायचं होतं म्हणून सकाळी सकाळीच निघालो. एकदाचं नदी नाल्या पर करत शेवटी सितापुरात पोहचलो.काय सुरेख छोटेखानी गाव होतं.डोंगर कपाळात वसलेलं.अगदी वर्दळीच्य लांब.शांत एकांतात.छानसा गेट कुणाच्यातरी स्मृतिप्रीत्यर्थ उभे होतं स्वागताला.थंडगार हवेचे झोके घेत मी आत प्रवेश केला.समोर लोकांची वर्दळ येताना दिसली.अचानक राम नाम सत्य है असं आवाज कानी पडले.समजूनच आलं की कुणाची तरी शव यात्रा निघत आहे म्हणून. गडीतूनच मी हात जोडला आणि सामोरी निघालो.स्मिता मात्र हे सगळं मजेने बघत होती.सगळ्यांचं पांढरं घोळका संपल्यावर एकदाचं गावात गेलो.रस्त्यावर असलेल्या एका टपरीवर असणाऱ्याला विचारलं.इथे अशोक गायकवाड कुठे राहतात.आणि पत्ता मिळताच परत त्याच्या शोधात निघालो.

दाराजवळ गाडी जाताच कळलं की ज्या घरचं पत्ता मिळाला आहे नेमकं त्याचं घरचं कुणीतरी स्वर्गवासी झाले आहे.गावात गाड्यांची अशी सवय नसल्यामुळे कुणी गाडीजवळ येऊन बघत असत.काही स्त्रिया अंगणात रडत बसल्या होत्या.दाराजवळ गाडी थांबली म्हणजे काही काम असेल म्हणून त्या रडणाऱ्या स्त्रियापैकी एक स्त्री उठली आणि माझ्याजवळ आली.

अशोक गायकवाड इथेच राहतात का?

हो इथेच...काही काम होतं का?

हो त्यांना भेटायचं होतं..

पण आता तर ते कुणालाच भेटू शकणार नाही.(डोळ्याला पदर लावत ती बोलली.)

काय झालं?

आत्ता जी अंत्ययात्रा निघाली..तेच अशोक गायकवाड होते... जळण होतही असेल त्यांचं.

त्यांची पत्नी किंवा मुलगी असेल ना..

नाही आत्ता त्यांची कुणीच नाही..मुलीला जन्मतःच काही दिवसांनी तिची आई तिला सोडून गेली.काही वर्षांपूर्वी ते शहरात स्थायिक झाले.तेव्हाची घटना ही.काही वर्षांत त्यांची मुलगी सुद्धा पळून गेली.मग त्यांच्याच माणसांनी त्यांना हाणामारी करून लुटून टाकले.त्या हाणामारीत त्यांच्या एका पायाला जबर जखम झाली.त्यामुळे स्वतःची कीव त्यांना स्वतः येऊ लागली.सगळं विकून ते इथे आले.आणि आज सकाळीच त्यांचे देहांत झाले.

अटलस्त त्यांच्या मुलीचा काही अत्ता पत्ता असेल ना.

नाही ती पळून गेल्यानंतर ती कुठे असते म्हणून आम्ही कितीदा त्यांना विचारलं पण त्यांनी कधीच काही सांगितलं नाही.

धन्यवाद करत परत मी निघालो. आशेची ही एक किरण सापडली होती.आणि इथेपण पदरी निराशाच आली. हॉर्न मारत असताना काचात गाडीमध्ये कुणी धावत असल्याचा भास झाला.मी गाडी एका बाजूला वळवून थांबविले तर तो इसम गुपचूप जवळ आला आणि म्हणाला

साहेब जे ऐकलं ते सगळं खरं आहे.अंकिता पळून जरूर गेली होती पण आता ती जिवंत नाही.

(आश्चर्याने) हे तू कसं म्हणू शकतोस?

त्या दिवशी ट्रेनमध्ये अंकिताला वापस आणला होता.पण खुद्द तिच्या वडिलांनीच तिला मारलं..आणि हे मी स्वतः माझ्या कानांनी ऐकलं आहे.

चंद्रपूर वरून अंकिता वापस आली येवढं मलाही माहित आहे.कारण केशवला तिथंच मारल्या गेले आहे.मग अंकीताला कुठे मारलं? कसं मारलं? याबद्दल तुला काही माहिती आहे का?

नाही साहेब कारण त्या दिवशी मी गावाकडे आलो होतो.पण जेव्हा परत गेलो त्या दिवशी अशोकलाच फोनवर हे सांगताना लपून ऐकत होतो.म्हणून मला माहित झालं.फक्त माझं नाव सांगू नका साहेब कुणाला

नाही सांगणार हा...तू


निराशेचा डोंगर चढत मी परत गावाकडे निघालो.आता काय करावं हेच सुचत नव्हते.कारण अंकीताला शोधण्याचा हाच सगळ्यात शेवटचा पर्याय होता.आणि तोही आज सकाळीच गमावला.म्हणतात ना शेवटी कितीही प्रयत्न करावे कुठे तरी कमी पडतेच.पण कुठे कमी पडतंय ते सुद्धा कळत नव्हते.आता हे सगळं माझ्या मनस्थितीचा बाहेर होतं.माझं असं मानसिक तणाव बघून स्मिताला बघवेनासे झाले होते.कारण माझं असं टेन्शन घेणे हे तिला आवडत नव्हतं.आज तिला पहिल्यांदाच माझ्यावर हक्काने ओरडताना बघत होतो.

अरे कोण ती अंकिता?आणि का तिच्यासाठी तू सैरभैर पळत आहेस?ती मरण पावली आहे हे दोनदा क्लिअर झालं असूनही तू का परत तिची शोधाशोध करत आहेस?

रोडच्या काठाला गाडी लावली आणि थोडंसं हताश होऊन मी शे.... म्हणत बाहेर निघालो. खिशातून सिगरेट काढत सवय नसताना पण फुंकत होतो.तेही आज कधीतरी पहिल्यांदाच.ते पाहून परत स्मिताला राग आला.

अरे काय आहे हे अंकिता प्रकरण? आज तुला सांगायलाच हवं...तुला शपथ आहे माझी..( इतक्या शपथेत जाण्यासारखे नव्हतं.पण तिच्यासाठी तेव्हढे अनपेक्षित होतं)

जानायचय ना तुला...ऐकायचं ना तुला?तर ऐक...ज्या अंकिताला आपण शोधत आहोत ना ती मरूनसुद्धा मेलेली नाहीत.

व्हॉट यू मीन? ती मरूनसुद्धा मेलेली नाही..?

तुला माहित आहे..मरणाऱ्यांची एक शेवटची इच्छा असते.आणि ती अर्धवट असल्यामुळे त्यांना आजीवन मोक्ष मिळत नाहीत.हे तेच प्रकरण आहे.ज्याबद्दल तुझ्या मनात शंका आहेत.ही अंकिता आणि केशव.प्रेमाचं एक फार मोठं उदाहरण आहेत. जितकं प्रेम माणूस अस्तित्वावर राहून करतो ना...त्याच्या पलीकडेही ते प्रेम चालू आहे.शरीर नष्ट झालं.स्वातंत्र्यही संपलं.तरीपण आस अजुनही आहे.अजुनही वाट बघत आहेत एकमेकांची.

पळून गेल्यावर तिच्या वडिलांनी त्याला मारून आम्ही जी फॅक्टरी उभारतोय नाही तिथे नेऊन पूरला. केशवलं तिथे पुरले आणि अंकिताला कुठे नेले,मारले तेच माहिती नाही.आणि जोपर्यंत ते मिळणार नाहीत ना स्मिता.तोपर्यंत त्यांना मोक्ष नाही.आणि हे सगळं मीच करू शकतो.कारण ती फक्त मलाच दिसतात.हे कसलं योग आहे ते मला माहित नाही पण हे सगळं खरं आहे...तू विश्वास ठेव अगर नको ठेवू.

काही क्षण शांततेत गेले.जणू काय बोलावं किंवा काय नको हे कुणालाच कळत नव्हते.

शेवटी स्मिताच म्हणाली...सॉरी यार मला माहीतच नव्हतं..पण माझं अगदी शेवटपर्यंत तुझ्यावर विश्वास आहे.( आणि तिने मला मिठी मारली.)

आज पहिल्यांदा मारलेली तिची ही पहिलीच मिठी.सगळं विसरून विश्वासाने मारलेली पहिल्या प्रेमाची ही पहिलीच मिठी.फार छान वाटत होतं. असं वाटत होतं की हा क्षण कधी संपूच नये.उराशी उर बाळगता,श्वासही गळून पडे.ओठांत प्रेमसरी वाहू लागल्या होत्या पलीकडचं काही नव्हतं.फक्त ती आणि मी.. नुसतं अंधकार.ना क श्याची चिंता आणि नव्हता कशाचा करार.एकमेकांच्या मनात धुंद कसलेली मिठी न जाणे कितीवेळ प्रितीची लख्तर तोडत असती.पण समोरुन एका गाडीचा हॉर्न जोरात वाजलं आणि त्यामुळे आम्ही हायवे वर असल्याची जाणीव झाली.

या नंतर स्मिता मला कधीच बडबड करताना दिसली नाही.माझ्याबद्दल तिच्या मनात एक वेगळाच आदरभाव निर्माण झाला होता.पण तिचं अजुनही राग यायला लागलं होतं.आणि ते म्हणजे तिने परत केशवल बघण्याचा हत्तच धरला होता.शेवटी काय स्त्रिहट्टासमोर पुरुष जात नतमस्तक.कारण आत्ता कुठे ती माझ्यात आली होती.माझी व्हायला,खरंच तिच्या सोबतचा हा प्रवास सगळी निराशाच घालवून गेला.

दुसऱ्या दिवशी स्मिताला घेऊन केशवकडे निघालो. तसं माझी निराशा त्याने दूरवरून च ओळखली होती.पण आज माझ्या सोबत कुणीतरी आहे म्हणून तो सहजच बघत बसला.

काय रे आनंदाची वार्ता आजही तुझ्या चेहऱ्यावर नाही.परत माघार घेतलीय ना..

काय करू केशव...प्रयत्न फार करतोय..पण निराशाच पदरी पडतेय.मी सितापुरात...( आणि मी सगळं कथन केलं)

वाटतंय माझ्या नशिबात मोक्षच लिहिला नाही.( आणि दुखी मुद्रा करून वाटेला डोळे लावून बसला.तितक्यात स्मीताच म्हणाली.)

जरा ऐकता का...( इकडे तिकडे बघत) मी तुम्हाला बघू तर शकत नाही.पण तुमच्या प्रेमामुळेच आज माझं प्रेम इथे उभा आहे.त्यामुळे जेव्हढा विश्वास मला माझ्या प्रेमावर आहे.तेव्हढीच खात्री आहे की अंकिता जरूर मिळेल.कारण जे खरं प्रेम करतात ना त्यांना नेहमीच विरहाच्या वाटेवरून जावे लागते.त्यामुळे धीर धरा..विश्वास ठेवा..कारण विश्वास आहे तर अख्खं जग आहे.

तुमचं म्हणणं बरोबर आहे..पण आता मला एकांत हवा आहे.प्लीज तुम्ही जा इथून.( त्याचं ऐकलेले तिला समजावत मी बाजूला नेले.कारण केशवचि ती दुखी मुद्रा मी बघू शकत नव्हतो.)

ज्या दिशेला केशवचे अस्थिपंजर मी फेकले होते.त्या दिशेकडे मी स्मिताला घेऊन गेलो.बघ स्मिता..अशी अवस्था होते प्रेम करणाऱ्यांची..

का माणूस इतका स्वार्थी होतो? का विसरतो की तेही आपल्याच रक्ताचे आहेत? का त्यांना जीवन जगण्याची संधी देत नाही? त्यांचा गुन्हा काय तर त्यांनी प्रेम केलं?आई वडिलांचं नाव कापलं? पण जर त्यांनीच त्याला समजून घेतलं तर काय ते सुखी राहू शकत नाही काय? आणि हे असले भयानक कृत्य करून ते कोणत्या जगाचं आनंद मिळवतात? का त्यांची एवढ्या निष्ठुर्तेने हत्या करतात? का विसरून जातात की त्यांनाही मन आहेत? स्वतंत्र जीवन जगण्याची त्यांनाही आकांक्षा आहे..मग का असं करतात?

माझ्या मनाला फार लागलं होतं हे.आणि हेच भावनेच्या भरात मी ओरडत होतो.स्मिता मला सांभाळत होती.

बघ ईश्वरा जे झालंय.त्यात तुझी काही चुकी नाही.उलट तू त्यांची मदत करत आहेस.काहीतरी मार्ग मिळेल.तू हताश होऊ नकोस.बघ निसर्गाने तुला संधी दिलीय.हा योग दिलाय.मग त्याचं मार्ग पण तोच देईल..तू सांभाळ स्वतःला.

कसतरी मनाला आवर घालीत उठलो आणि घरी आलो पण चिंता ती कायमचीच.आणि कसं असतं जेव्हा माणसाकडे काहीच पर्याय नसतो मनात नुसती ताणतणावाच्या शंका असतात.कुणी बोललं तर आपल्याला त्याचच राग येतो.आणि ताणतणाव मध्ये शांति ही कधी लुप्त होते काही कळतच नाही.

माझ्या मनाला धीर देत स्मिता घराकडे चालली गेली.आणि नंतर मला गुरुजींची आठवण झाली की केशावची भेट आणि त्याबद्दल मला त्यांनीच सांगितलं होतं.मग अंकिता बद्दलही त्यांनाच माहिती असेल.मला परत एकदा गुरुजिकडे जाऊन यायला हवं.


एरवी सायंकाळी मी फक गावातच फेरफटका मारीत असे.पण इतक्यात माझे काय उद्योगधंदे चाललेत घरी काही शंका नव्हती.मी लगबगीने घराच्या बाहेर पडलो.कुणाला काहीही न बोलता.ही गोष्ट आई वडिलांना लागली होती.

सायंकाळच्या रम्य परिसरात गुरुजी स्वतःच्या ध्यान मग्नात स्थित होते.यावेळेस मी आवाज न मारताच त्यांनी डोळे उघडले.आजूबाजूल कुणी नाही असे बघत त्यांनी बोलायला शुरुवात केली.

इतक्यात हार मानली पोरा.निसर्गाने योग दिलाय ते त्याची त्रुटी घालवण्यासाठी.असं स्वतःची शांती भंग करण्यासाठी नाही.काय अवस्था केलीस बघ स्वतःची.

मग काय करू गुरुजी.मला त्याची अवस्था बघणे नाही होत.इतके प्रयत्न करूनही जेव्हा मी असफल झालो.त्यामुळे स्वतःचा तिटकारा व्हायला लागला आहे.

मी आधीच सांगितलं पोरा तुला.ती सजीव नाहीत.आणि जर तू सजिवांत त्यांना शोधत असशील तर ते तुला कदापि मिळणार नाहीत.आधी स्वतःला शांत कर.निर्मळ हो.आपोआप सगळे प्रश्न सुटतील.तुला तिची हाक मिळेल.आपोआप तू तिच्या पर्यंत पोहाचशिल.पण आधी तुला सावरायला हवं...


गुरुजींचं बोलणं अगदी तंतोतंत असायचं.आणि त्यामुळे मला त्यांचा राग यायचा नाही.त्यांची गोष्ट अगदी मनापासून लागायची.इतक्या दिवसांच्या ताणतणाव जरा अती झालं होतं. असं वाटत होतं.दोन जीवांचे मेल घालवण्यासाठी मी स्वतःचाच अस्तित्व विसरून जात होतो.विसरून जात होतो की मी एक सत्य आहे.अस्तित्व नाही .आता थोडं समाधान घेऊन घरी परतत आहे असं प्रतीत होत होतं.


६) मोक्ष आणि शेवट (अंतिम भाग)




इतक्यात घरिपण थोडं वातावरण बिघडलं नव्हतं असं नाही.मी आल्या आल्या खोलीत नसले ते उद्योगधंदे करायचो.कसले कसले पत्ते आणि कुठे कुठे अनोळखी नंबर लिहिले असायचे. तसं घरी कुणी म्हणाले नाहीत पण आदल्या रात्री वडिलच म्हणाले...

हल्ली तू पोरा...काय करतोयस ते मला माहित नाही.पण जे काही चाललंय ना.ते जरा अती होतंय.स्वतःला थोडं आवर.जून्यात ये.एखादी गोष्ट मिळवायची असेल ना...तर तिच्या मागे धावण्यापेक्षा तिच्या लायक असणे हे आधी महत्त्वाचे ठरते.त्यामुळे जरा धीराने घे पोरा.स्वतःलाही त्रास करवून घेऊ नकोस..आणि इतरांनाही त्रास देऊ नकोस.

त्यांना प्रतिउत्तर काय द्यावं हेच मला कळत नव्हते.पण प्रत्येकजण मला शांतीची आणि धीराची फीलासापी देत होता आणि ते ऐकूनच माझा राग पार मस्तकात जायचा.

आज खूप दिवस खाली होती.कामावर पण लक्ष नव्हतं.मध्यंतर स्मिता येऊन थोडं वेळ मनाला सांत्वन करून जायची.इतक्या दिवसांत मी काही कामाची प्रचिती बघितली नव्हती.फार समोर काम गेल्याची खात्री करत मी घरच्या आवारात..गावातल्या काही अल्लड गमती जमती त शांतीचा निर्वाहन करत होतो.

आज सकाळी जेव्हा मी उठलो.मनात कसलीही उणीव नव्हती.कुठे जायचं म्हटलं तरी इच्छा नव्हती.पाय वळतील त्या दिशेला एका वेड्यासारखा चालत होतो.पण आज पाय रेल्वे स्टेशनवर वडले होते.मन जाग्यावर नसल्यासारखे मी आपोआप तिथे चाललोय असं वाटतं होतं.इकडे तिकडे बघत मी तिथे असलेल्या एका रिकाम्या खुर्चीवर जाऊन बसलो.नुसता शांतपणे बसून स्टेशनवर चाललेली मजा बघत होतो.

लोकांची वर्दळ,मुलींना टमाटर,मा म्हणणारी टपरी मुलं,समोसे पाणी बॉटल विकणाऱ्या लोकांची आवाज कानावर पडत होती.मध्येच कुणी कुणी गाणे म्हणून भीक मागत होता.वगैरे वगैरे बराच काही चालला होतं.आज तीच गम्मत मी बघत होतो.

आज कधीतरी कानात हेड फोन टाकून संगीत ऐकण्याचा मुड झाला होता.आज कधीतरी मी पूर्ण सिनेमा ऑनलाईन बघितलं होता.दिवस कसा जात होता हे काही कळतच नव्हते.आणि हे सगळं चालत असताना मनात परत झाली ती कुतूहल,जिज्ञासा.केशव आणि अंकीताबद्दल.आणि परत चेहऱ्यावर विषण्ण छाया उमटली.

कारण ज्या बाकावर मी बसून होतो.दुपारच्या ट्रेनने काही महिला तिथे उतरल्या.बहुतेक स्टेशनवर कामाला असतील. बाकाच्या मागे गुलमोहर नावाचे मोठे झाड होते.त्याच्या त्या विशाल सावलीत त्या जेवायला बसल्या.

कसं आहे आपण दोघे चौघे जेव्हा बसतो.तेव्हा अचानक एखादा टॉपिक निघतो.आणि प्रत्येकाच्या तोंडून एखादी दंतकथा किंवा त्याच्या अनुभवाच्या गोष्टी तो शेअर करत असतो.आणि अश्या कामात स्त्रिया अग्रेसर असतात.( माझ्या मते)

हनामारीच जेव्हा विषय निघालं तेव्हा एक डाव्या बाजूची महिला इतरांना सांगू लागली.

अग काही वर्षापूर्वीची च गोष्ट आहे.नवीनच होते मी दिवटिवर.चंद्रपूर वरून येताना लोकल डब्यात चढून गेले.काय सुरेख मुलगी होती हो.आणि ते तिचे वडील असतील.तिला सारख्या शिव्या देत होते.असं वाटत होतं की ती पळून कुठेतरी गेली असेल.कारण अगदी नवरीबाई सजली होती.

शुरूवातीला तो फक्त शिव्याशाप देत होता.पण नंतर काय झाले कुणास काय ठावूक? सगळ्यांसमोर त्याने चाकू काढला आणि सपासप तिच्यावर वार केले.तिचं ओरडणं ऐकून आजही अंगावर काटा उभा राहतो.बघ ना लोकलचा तेव्हढा डब्बा लोकांनी भरून सुद्धा होता.तरीपण कुणी त्यांना आडवा झालं नाही.बिचाऱ्या त्या मुलीचा नाहक मृत्यू झाला.


मग काय झालं ग?

काय होणार ...पण निर्दयी च म्हणावं त्याला.आता तिचं क्रियाकर्म तरी करायला हवं ना.तर समोर आल्या नदीत त्यांनी तिला फेकून दिले.

कुणी इतक्याही निर्दयतेने असं जीव घेतो का?

अग हे पुरुषी लोक ना..फारच अहंकारी असतात.( आणि त्या परत आपल्या गप्पात रमल्या.)

परत एकदा मनात विचार आला.की जर ती अंकिता असेल तर.मी अजून काही विचार करणार तितक्यात स्मिताचाच फोन आला.

हॅलो

हॅलो..काय रे? कुठे आहेस दिवसभर? दोनदा आई येऊन गेलीय घराकडे? असं न सांगता कुठे गेलायस?

अग इथेच आहे रेल्वे स्टेशनवर..आणि तुझ्यासाठी एक गुड न्यूज आहे.

आणि काय आहे ती गुड न्यूज?

अंकीताचा शोध सापडला!!!

काय सांगतोस?

हो...तू येशील का? ट्रेनला अजून अर्धा तास वेळ आहे.

हो..अरे थांब मी येत आहे.

ये लवकर..

( काही क्षणांत स्मिता तेथे हजर झाली आणि मी तिला समजावून सांगू लागलो.)

बघ त्या बाईने सांगितल्यानुसार त्या दिवशी केशव आणि अंकीताच लग्न झालं होतं.आणि त्याच दिवशी तिला वापस आणण्यात आलं.आणि त्या दिवशी पण अंकिता नवरीच्या वेशात होती. तर होऊ शकते ती अंकिताचं असेल.

आणि इतरांनी जसं सांगितलंय की अंकिता चंद्रपूर वरून निघाली पण गावी ती कधीच पोहचली नाही.आणि नंतरही तिला कोणीच बघितलं नाही.तर परत त्या बाईच्या माहितीनुसार त्या मुलीला अर्ध रस्त्यात नदीत फेकले आहे.तर होऊ शकते ती अँकिताचं असेल.आणि माझं मनही सारखं म्हणत आहे की ती अंकीताचं आहे म्हणून.

केव्हा एकदाची ट्रेन येते आणि आम्ही त्या नदीजवळ जातो असं झालं होतं.

बहुधा सायंकाळचे ५:०० वाजले असतील.जेव्हा आम्ही स्टेशनवर उतरलो.पण घाई होती ती फक्त नदीवर जायची.एक दीड किलोमीटरचा पायी प्रवास केल्यावर शेवटीं ती नदी दिसायला लागली.


अंकिता ....

एक आर्त स्वतःची किंकाळी दिली.पण काहीच उपयोग झाला नाही. तसपण नदीला फारसे पाणी नसल्यामुळे आरामात माणूस नदी ओलांडू शकत होता.हळूहळू सूर्य अस्ताला जात होता.पण शोध काही संपत नव्हता. बरच शोधल्यावराही जेव्हा हाती काहीच लागलं नाही.तेव्हा परत एकदा निराशेने मी रेल्वे पत्रीवर् जाऊन बसलो.

शेवटी स्मिता आली आणि मला भास झाला असेल म्हणून परत तिने मला जाण्यासाठी कन्व्हेअन्स केले.दोन पावले चाललोच असेन.तितक्यात ट्रेन आली.आम्ही परतीला चालतच होतो.

जशी रेल्वे नदीच्या पुलावरून चालत होती.अचानक कुणी नदीत उडी घेतली असावी.तसा पाण्याचा धडाम आवाज माझ्या कानी आला.मी मागे फिरून बघितले.रेल्वे निघून गेली होती.धावतच मी परत एकदा नदीच्या काठावर गेलो.कारण हे भास नव्हतं.मी खरंच कुणाचं तरी उडी मारण्याचं आवाज ऐकलं होतं.आणि खरं बघावं तर नदीला तेव्हढा पाणीही नव्हतच.


स्मिताला वाटलं परत मला भास होत आहेत.कारण घडलेल्या संवेदना फक्त मलाच जाणवत होत्या.तिला नाही आणि म्हणून ती सारखी मला परत नेण्याचा प्रयत्न करत होती.

जेव्हा अशी कुठलीच लहर किंव्हा वर्तुळ कसलंच काही दिसलं नाही.तेव्हा मलाही ते एक भास असावं.. असच वाटायला लागलं होतं.आणि मी परत माघारी फिरत आहे तितक्यात कुणाच्यातरी रडण्याचा आवाज स्पष्टपणे मला जाणवत होता.आणि जसजसं मी चालू लागलो तसतसं तो आवाज तीव्र होवून परत एकदा धडाम असा आवाज आला.


एक नजर मी स्मितकडे बघितलं..ती काय झाले? असा काय बघतोस ? याच आविर्भावात होती.स्मिता..ती अँकीताचं आहे असं उद्देशून मी आवाजाच्या दिशेने धाव घेतली.

आत्तापर्यंत खाली असलेली नदी भरभरून वाहत होती.आणि अंकिता च देह त्यावर रक्ताच्या थारोळ्यात तरंगत होतं.एकवार स्मिताला बघितलं आणि म्हणालो स्मिता ती बघ अंकिता...पाण्यावर तिचं मृतदेह तरंगत आहे.पण तिला तर काहीच दिसत नव्हते. अधाश्याने ती फक्त इकडे तिकडे बघत होती.अचानक पुन्हा ते शव अदृश्य झाले.

तिच्या अनामिक शक्तीची लहर ती मला दाखवत होती.अचानक ती अदृश्य झाली हे पाहून मी तिला परत हाक मारू लागलो.आणि इकडे तिकडे शोधू लागलो.

अंकिता... ए...अंकिता

मी तुझ्यासाठीच आलोय...अंकिता...

Plz...अशी घाबरवू नकोस..

माझ्या समोर ये अंकिता...

एव्हाना अंधारायला लागलं होतं.त्यामुळे आता डोळ्यांना पाहिजे तेव्हढा स्पष्ट काही दिसणार नव्हतं.पण तरीही मी तिला हाक मारून शोधत होतो.अचानक परत त्या आर्त स्वराची उमड कानात दुमदुमली.पण यावेळेस ती शांत वाटत होती.आतापर्यंत भयानक असलेलं वातावरण शांत वाटत होतं.

नदीच्या काठावर फार मोठी शिला होती.त्या शिलेवर पांढऱ्या फटक पोशाखात ती केशवसारखी कुठेतरी शून्यात हरवून बघत होती.हवेने तिचे केस इतस्ततः पसरत होते.आणि हुंदक्याचा तिचा आवाज मनाला आवर घालत होता.

मी जरा धावतच तिच्यापाशी गेलो.पण ती काही माझ्याकडे वळून बघायला तयार नव्हती.

अंकिता....

मी हळूच तिला हाक मारली.तिने हळूच शून्यातून नजर काढली आणि एका अनामिक मुद्रेने ती माझ्याकडे बघू लागली.आजही ती वाट पाहून थकलेली नजर अपरिचित नव्हती.आणि खरंच केशवने सांगितल्यानुसार कोणीही तिच्या प्रेमात पडावं...इतकी ती सुंदर होतीच.

मी तुलाच म्हणतोय अंकिता..इथे मी फक्त तुझ्यासाठीच आलोय..तुलाच भेटायला...

( ती आश्चर्याने) पण तू मला कसा काय बघू शकतोस? कारण मी तर ..

( स्मिता माझं हात घट्ट अवळत होती )
हो अंकिता..तू जिवंत नाहीस.पण मी जिवंत आहे.आणि तुला बघू शकतो.ही निसर्गाची झालेली त्रुटी आहे ज्याला पूर्ण करण्यासाठी मला ही संधी मिळाली आहे... केशवला ओळखतोस??

केशव...(हळवी मुद्रा उफाणून बाहेर येत होती.). केशव...कुठे गेला असेल..कुण्यातरी जन्माला गेलेला असेल अजूनपर्यंत..मला त्याला सांगायचं होतं.की शेवटपर्यंत ही अंकिता त्याचीच होती.लग्न झालं होतं.सप्तपदीच वचन घेतलं होतं.इतक्यात तोडायला नाही तर आजीवन सुखात असण्यासाठी.पण बघ ना...नियतीने आज आम्हाला इतक्या दूर लोटले आहे की एकमेकांची भेट्सुद्धा नाही होऊ शकली आमची.चेजरासुद्धा नाही दिसला एकमेकांना.मला तर वाटते की त्याने जन्मच नाकारले असेन.

अग अंकिता..आज त्याच नियतीने तुमची इच्छापूर्ती केलीय.प्रेम जितकं ते खरं असते ना तितकीच त्याची परीक्षा ही कठोर असते.कित्येकदा माणूस हरतो ग त्यात.तुला माहित आहे श्रीकृष्ण जेव्हा रुख्मिणी रागाला आली तेव्हा स्वतःचा प्रेम सिद्ध करण्यासाठी श्रीकृष्णाला इंद्रशी युद्ध खेळावे लागले पण पारिजातकाच्या झाडाला तिच्या बगीच्यात आणावे लागले.देव दानव सुद्धा हरले ग त्या प्रेमात.मग तुम्हीच काय? तुमची परीक्षा आता समाप्त झाली आहे..मी भेटून आलोय केशवला.

काय माझं केशू जिवंत आहे..कसा आहे तो..मला फक्त एकदा त्याच्याकडे ने..मी आजीवन तुझी आभारी असेन.

अग ऐक ऐक...तो आता जिवंत नाही.पण तुझ्यासारखा च अस्तित्वाच्या पलीकडे जाऊन तुझी वाट बघतेय.आणि त्याच्या मुळेच मी आज तुझ्यापर्यंत पोहचलो.मी तुला न्यायलाच आलो आहे.पण तुझं शरीर कुठे आहे.

त्यादिवशी वडिलांनी मला मेलेलं समजून..धावत्या गाडीतून याच नदीत फेकले..कितीतरी दिवस या झुडपांना मी अडखळून राहिले.आणि पाण्यातील जीवांनी मला खावून टाकले.फक्त अस्थिपंजार तेव्हढा उरलाय.तो बघ त्या वाळूच्या ढगात रुतून आहे..फक्त काही भाग वर आहे.

मी तिचं देह रेतीतून उकरून काढला. छिन्नविछिन्न असलेल्या त्या हाडांना एका गाठोड्यात बांधून आम्ही रेल्वे स्टेशनवर आलो.स्मिताने सुचवलं की चंद्रपूर कडे जाणारी शेवटची ट्रेन आता लवकरच येईल.त्यामुळे वाट बघत स्टेशनवर थांबलो.

चंद्रपूरला पोहचल्यावर जवळपास ११:०० वाजले असतील.सगळं शांत शांत वातावरण होतं.फक्त चालू होती ती रातकिड्यांची किर्र किर्र....अचानक हाक दिली...केशव...आणि रोजच्यासारखा तो प्रकटला.पण यावेळेस त्याने माझा चेहरा जणू वाचलेला होता.मिश्कीलपणे हसत त्याने म्हटले..शेवटी यश आलं तुझ्या वाट्याला...कुठंय माझी अंकिता??

जरा तुझ्या मागे बघ केशव???..

क्षणाचाही विलंब न लावता त्याने मागे बघितले.त्याच्या त्या स्वप्नराणीचा रूप तेव्हा अगदी अक्षम्य होतं त्याच्यासाठी.न जाणे दोन्ही डोळ्यांच्या सागरात जणू ते कित्येक वेळ हरवत होते.दोघांच्याही मनात आज शुद्ध नव्हती.समोर अँकिताला बघून केशव इतका आनंदला होतं की त्याने तिला मिठीच मारली.त्यांचं ते असीम प्रेम बघून माझ्याही डोळ्यात पाणी आले.स्मिता खांद्यावर हात ठेवत म्हणाली...आता रडु नको...कारण तू त्यांना एकत्र केलंय..बघ कसे आता आनंदाच्या मिठीत आहेत.

हे काय ? तू त्यांना बघू शकतेस????

हो बघत आहे .कारण ते स्वतः मला दाखवत आहेत.आता तरी हस ईश्वरा.खूप दिवस झाले रे. तुला हसताना नाही बघितलं

हो.......

अंकिता आणि केशव आज खूप खुश होते.दोघेही वारंवार अभर मानत होते.

केशव म्हणाला..आम्ही तुम्हाला काही देऊ शकत तर नाही.पण तू केव्हाही हाक मार.तुला मदत मिळेल.जशी आज मिळेल.त्याची काही आवश्यकता नाही असे म्हणत मी त्यांचे देह जमा केले आणि जाळण्याची तयारी केली.

जसजशी ती जळत गेली.दोघेही मोक्ष होत गेली.आज त्यांच्यामुळे आम्हीपण एकत्र आलो.पण एक कळत नव्हते.केशवने आज कोणती मदत केलीय. जसं आज केलंय म्हणत होता.मग त्याचं अस्थिविसर्जन करून त्यांना मोक्ष दिलं आणि सकाळच्या ट्रेनने घराकडे वडलो.


स्मिताच्या आईवडील माझ्याच घरी होते.सगळे मात्र हसत होते.कारण काहीच कळत नव्हते.मी आणि स्मिता अवाक होऊन सगळे बघत होतो.माझे वडील बाहेर आले.आणि म्हणाले..

मी म्हटलं तर सांगितलं नाही आणि आता मुलगीही पसंद केली तरी सांगायचं नाही का?

बाबा..ते...

बास आता...

स्मिताचे वडील म्हणाले
आणि तू ग.. तूही हस फसवलं.आमच्यापासून सगळं लपवलं.अग पण इतकं लपवायची काही गरज नव्हती.एकदा सांगितलं असतं तरी झालं असतं.

आई.... बाबा....ते...ते..

अग बास झालं आता.झालं या विषयावर आमचं बोलून.आम्हाला मान्य आहे हे नातं.काय इनबाई??

हो ना...आम्ही तयारच आहोत..

आम्ही फक्त एकमेकांकडे बघत होतो.खरतर जे नकळत प्रेम झालं.ते खरं तर होतच.पण सिद्ध कसे करायचे हाही प्रश्न होताच.पण करताच आलं असतं काहीतरी.आणि हे इतक्या सहज झालं.पण आम्ही यायच्या आत हे घडलं कसं.हा विचार आम्हा दोघांनाही दाटत होता.दोघेही विचारू लागलो.की हे सगळं तुम्हाला कसं माहीत??

अरे रात्री...काय नाव त्यांचं केशव आणि अंकिता हेच नाव सांगशील म्हणे तुम्हाला.ते आले होते घरी.त्यांनी दोन्ही घरच्यांना उठवले आणि तुमच्याबद्दल हर एक गोष्ट त्यांनी सांगितली..त्यांनी समजावल..प्रेमात जात पात महत्वाची नसून मन महत्त्वाचं आहे.पैसा महत्त्वाचा नसून सुख महत्त्वाचं आहे.आणि खरं म्हणजे त्यांनीच या लग्नासाठी आम्हाला कन्व्हेअन्स केले.तुमचं हा फोटोपण त्यांनीच दिला.

आम्ही तो फोटो बघितला..तर तोच तो फोटो होता.ज्यावेळी सितपुरहून येतना रस्त्यात आम्ही मिठीत होतो.आणि दुरून कुठूनतरी केशव आणि अंकिताचा हसण्याचा आवाज येत होता.

आणि अश्या पद्धतीने सगळं पार पडले. आमचं सुखाचा संसार पाडून अंकिता आणि केशव मोक्ष झाले.पण कधी आजही दिसतात.जिथं ते शेवटचे भेटले.कधी डोळ्यांत डोळे घालून तर कधी मिठींत मिठी घालून.एक अस्तित्वात नसलेलं सत्य प्रेमप्रकरण उदाहरण बनून.आणि आता ती खुश आहेत.एका वेगळ्याच दुनियेत आपल्या प्रेमजगात.