कुंडली मध्ये एकंदर बारा भाव असतात.प्रश्न पाहताना कोणता भाव पहावा हे माहीत असणे जरूर आहे.
१) प्रथम भाव :-तनु अथवा लग्न भाव:-लग्न म्हणजे पूर्व दिशा.या भावावरून व्यक्तीची आवड निवड,स्वभाव,शरीराची ठेवण.मन, डोके,आयुष्य.आईचे वडील,वाडीलांचीआई.मुलांचे लांबचे प्रवास.सामाजिक प्रतिष्ठा कीर्ती.प्रथम संततीचे शिक्षण याचा विचार होतो
द्वितीय भाव:--सांपत्ति स्थिती,नफा,नुकसान
लेखन,वक्तृत्व,पूर्वार्जित धन,खाद्य पदार्थ,सोने व रत्न याची प्राप्ती.मृत्यूदायक प्रसंग.पतीच्या कुंडलीत पत्नीचा व पत्नीच्या कुंडलीत पतीचा मृत्यू याचा विचार करतात.नोकरी,पेन्शन,ग्र्याचुटी,बुद्धी,जेवणाची पद्धत'बँका, राष्ट्रीय मालमत्ता.चव,मिळणारे उत्पन्न या बाबीचा विचार करतात.
तृतीय भाव:---सहजभाव पराक्रमस्थान:-- धाकटा भाऊ,बहीण,पराक्रम, कर्तबगारी, साहस,बाहू,बोटे,खांदे,लेखन,अक्षराचे वळण,छपाई,स्टेशनरी,कॅमेरा,पोस्ट ऑफिस, आकाशवानी, टी. व्ही.जाहिराती,वर्तमान पत्रे,
दूर संचार,करार,मुलाखती ,जाहिरात यंत्रणा श्रवण यंत्र,तसेच श्वसन संस्था,,मज्जा संस्थितां.कर्ण भूषणे,काना संबंधी रोग इत्यादींचा विचार या भावा वरून होतो.
चतुर्थ भाव:--मातृभाव:--याभवा वरून मातृ सौख्य,माता ,शेती वाडी,घरदार, वाहन सौख्य,स्थावर मालमत्ता,छाती,वक्ष स्थल, स्थान,पॉट,आईचा स्वभाव,पदवी पर्यंतचे शिक्षण,शिक्षण मंडळ,सार्वजनिक संस्था,शेती,कृषि खाते, थंड पेय,दूध,पाणी,इत्यादींचा विचार होतो.
पंचम भाव- सूत भाव:- या स्थानावरून संतीतीचा,तसेच विद्या,मंत्र उपासना,पाठीचा कणा,हृदय,लॉटरी,रेस,शेअर बाजार,,खेळ, नाट्य,नृत्य,कला ,खेळांचे साहित्य,खेळणी,
बाल संगोपन केन्द्र, कोर्ट,कचेरी,निकाल याचा विचार या स्थानावरून होतो.
षष्ठभाव-रोग स्थान, या स्थानास रिपू स्थान असेही म्हणतात.पॉट,जठर,पचन संस्था सर्व
आजार,मामा,मावशी,नोकर चाकर,शत्रू सावत्र आई,अपघात,गुह्य रोग,कंबर,पाळीव जनावरे,कांमगार,,स्पर्धा परीक्षेत यश,राहत्या
जागेतील बदल,अन्नधान्याची कोठारे,कर्ज,
निवडणूकीतील यश हा विचार या भावावरून केला जातो.
--या स्थानास विवाह स्थान ,पत्नी
संपतं भाव अर्थात सप्तम स्थान याला विवाह स्थान किंवा जाया स्थान म्हणतात. या स्थानावरून विवाह,स्त्री सौख्य,भागीदारी,कोर्ट,कोर्टातील खटले, तसेच व्यवसाय,शेतकी व्यवसाय,प्रतिस्पर्धी,कामगार युनियन,संघटना याचा विचार होती.शुक्र जंतू,ओटीपोट,मूत्राशय याचाही विचार करतात.
अष्टम भाव:-मृत्यू स्थाब:-- हुंडा,ठेव,अचानक धन प्राप्ती,वारसा हक्काने अथवा मृत्यूपत्र द्वारे मिळणारी मालमत्ता याचा विचार करतात.,मृत्यूची कारणे, वडिलार्जित धन,कर्ज,हेर खाते,शल्य विशारद,गुप्त कारवाया याचा विचार करतात.
नवम भाव:-नवम स्थाब अर्थात भाग्यस्थान:-
या भावावरून भाग्य,तप, कीर्ती,यश,तीर्थ यात्रा,परोपकार,दीक्षा, तत्व ज्ञान,बुद्धी मत्ता, ग्रंथ प्रकाशन,देवळे,धार्मिक स्थळे,दैवि शक्ती,न्यायाधीश,न्यायालये,कायदा,कोर्ट केसेसचा निकाल,प्रबंध लेखन,शिक्षणातील उच्चतम् पदवी,पूर्व पुण्य,आराध्यदैवत, ईश्वरी ज्ञान,ईश्वरी संकेत,वेद शास्र,धर्म शास्र याचा विचार करतात.मित्राचे लाभ,धार्मिक संस्था.
याचा विचार होतो.
दशम भाव अर्थात कर्म भाव:--मान,सन्मान,नोकरी,बढती,उद्योग धंदा,अधिकार,कीर्ती,वैभव,मंत्रिपद,सरकारी अधिकारी,राष्टपती,शासकीय ऑफिस, याला पितृ स्थान असेही म्हणतात.पितृ भक्ती,वडिलांचे धन याचा विचार करतात.आपल्या कडून होणारी बरी वाईट कर्मे.पती किंवा पत्नीचे वाहन सौख्य.
एकादश भाव: या भावाला लाभ स्थान असेही म्हणतात.होणारे लाभ.किंवा इतचह पुर्ती, द्रव्य प्राप्ती,तसेच मौल्यावान वस्तूंची प्राप्ती.मोठा भाऊ,सुना,जावई,,मित्र,संतान सुख,हितचिंतक,पुनर्मिलन,दया शिकता.
द्वादशभाव अर्थात व्ययस्थान:--या भावा वरून,पुरुशांचा उजवा डोळा,स्त्रियांचा डावा डोळा ,बोटे,पाऊल,तळवे,, खर्च,तुरुंग वास,एकांत वास,कैद,दंड,धन हानी कसर्ज,व्याधी,गुप्त शत्रुत्व, परदेश गमन,लांबचे प्रवास,,शिवाय मोक्ष,परागंदा,होणे,गुंतवणूक,हॉस्पिटल मधील वास्तव्य,गुप्त विद्या,कठोर साधना,स्मशान,जंगले गुहा,फाशीचा जागा,परलोकसाधना,दूतावास,गुंतवणूक या बाबींचा विचार करतात.
या बारा भावांची माहिती असल्या शिवाय,कुंडलीचे विवेचन करता येणार नाही.
आता काही उदाहरण पाहू.
१) कुंडलीत संतान योग्य अगर संतती योग पाहवयाचा असेल तर पंचम स्थानाचा विचार
करावा लागेल.समजा सिंह लग्न आहे म्हणजे
पंचम स्थानी धनु रास येईल.त्या वेळेस गुरू तूळ राशीत असेल तर तो पाचवे स्थानाला अकरावा येतो याचा संतती योग आहे.ज्या वेळेस १,२,३,४,५,७,८,९ वा असतो त्या वेळेस
अनुकूल असती.हे पहात असतांना त्या वेळेस
असणाऱ्या दशा, महादशा व अंतर्दशा याचाही
विचार करावा.पंचम स्थानी मंगल असेल तर
संतातीस अनुकूल नसतो.
२)विवाह योग पहातांना सप्तम स्थानाचा विचार करतात.विवाहाला गुरू अनुकूल असावा लागतो गुरू अनुकूल असेल तर विवाह लवकर होतो.सप्तम स्थानी शनी अगर मंगळ असेल तर विवाह विलंबाने होतो.
पंचमेश जर सप्तम स्थानी असेल तर प्रेम विवाह होतो.सप्तमेश तृतीयात असेल किंवा तृतीयेश असेल तर स्थळ नात्यातील,आते भाऊ,आते बहीण,मामे भाऊ मामे बहीण,लाभ स्थानी असेल तर ओळखीचे स्थळ असते.तसेच सप्तमेश केंद्रात असेल म्हणजे१,४,७,१० या भावात असेल तर स्थळ जवळचे असते किंवा त्याच गावातील असते.नवम स्थानी असेल किंवा नवमेश असेल तर तर स्थळ लांबचे असते.तसेच सप्तमेश चंद्र असेल तर वयात यानंतर फार नसते,गुरू,शुक्र,बुध असेल तर वयात ५ते७ वर्ष अंतर असते.जर शनी असेल वयात ८ते१० वर्ष अंतर असते.
सुधाकर गोपीनाथ काटेकर
विशारद
Astrological Research Institute
Chennai