रवी;--रवीला ज्योतिष शास्रात आत्मा म्हणतात.सिंह राशीत स्वगृही,मेष राशीत उचीचा तर तूळ राशीत नीचिचा असतो.रवी पितृ कारकही आहे.या ग्रहांचे दशमात लग्नात विशेष महत्व याचा अमल पुरुषाचा उजवा डोळा व स्त्रियांचा डावा यावर आहे.तसेच
मेेंदुवर आहे. हा राज ग्रह असल्यामुळे राज पद, अधिकार,सन्मान नाव लौकिक याचा विचार करतात. मेष,कर्क,सिंह धनु या राशीत तो विशेष बलवान असतो. या ग्रहाचा शनिशी योग नसावा.रवी चंद्र षडाष्टक योग्य नसावा .
रवी गुरू विद्वत्ता व श्रेष्ठत्व याचे प्रतीक आहे.
धनस्थानी व्यव करतो,व्यय स्थानी धनाचा व्यय.चतुर्थात चिंता रवीच्या दशमात शनी असेल तर धंदे वारंवार बदलतात रवी-बुद्ध बुद्धी देणारा,रवी शुक्र कालप्रीय.शुभ स्थितीत
उत्कर्ष करतो.रवी मंगळ प्रकृती उष्ण रासायनिक,किंवा अभियंता.शरीर काटक.व
चिकाटीने काम करणारा व साहसी असतो.
चंद्र :--चंद्र कर्क राशीत स्वगृही,वृषभ राशीत उंचीचा,वृश्चिक राशीत निचिचा असतो.ज्योतिष शास्रात चंद्र मनाचा कारक मानला जातो.तसेच हा मातृकारक ग्रह आहे.स्त्रियांचे वक्ष स्थल, पोट, लहान आतडे मोठे आतडे यावर चंद्राचा आमल असतो.जलाशय,स्त्रियांची मासिक पाळी,मानाची स्थिती याचा विचार चंद्रावरून करतात.लग्न,चतुर्थ,दशम नवम व पंचम यात तो विशेष चांगला.लग्नी व सप्तमात विलासी.रवी चंद्र योग म्हणजे अमावस्या. रवी चंद्र योग्य दारिद्र्य दर्शक आहे.अमावसेला जन्म झाला असता आई वडिलांना भीती वाटते. परंतु भिण्याचे कारण नाही.अमावसेचा सर्वच भाग अशुभ नसतो.चतुर्दशी पूर्ण होते त्यावेळी चंद्र रवीच्या मागे १२अंश असतो.व अमावस्या पूर्ण होते तेंव्हा हे दोन्ही ग्रह एकत्र असतात.म्हणून चतुर्दशी पूर्ण झाल्या अमावस्या पूर्ण होई पर्यंतचा काल अमावसेचा काल असतो.रवी, चंद्र योग जी पूर्ण अमावस्या ती अनिष्ट मानतात.चंद्र मंगळ योग लक्ष्मी कारक ६,८,१२या स्थानात हा योग नसावा.चंद्र गुरू योग अतिशय चांगला,कीर्ती,यश,अध्यात्मिक प्रगती,भरपूर संपत्ती लग्न,नवम,पंष्म,दशम आणि लाभ या स्थानात अधिक महत्व.हा एकच योग ज्याचे कुंडलीत आहे त्याचे इतर ग्रह योग्य पाहण्याची जरुरी नाही प्रभू रामचंद्राचा जन्म याच योगावर झाला.चंद्र बुध योग बुद्धिमत्ता देतो.चंद्र शुक्र योग ऐष आराम,छान शोक.
मंगळ:--मंगळाला भूमी पुत्र म्हणतात.मेष व वृश्चिक या मंगळाच्या राशी.मकर राशीत उंचीचा व कर्क राशीत नीचीचा असतो.अधिकार,आत्मविश्वास, शल्य विशारद,यंत्र पोलीस,मिलिटरी, रवीला राजा तर मंगळाला सेनापती मानतात.डोके,मेंदू,स्नायू,दंड, यावर आमल असतो.मंगल ४,७,८या दृष्टीने पाहतो
मेष,सिंह,धनु राशीत महत्व आहे.अश्विनी,मघा,मूळ या नाक्षत्रात उच्च पदावर नेतो.लग्न,त्रितीय,षष्ठ साहस लढाऊ पणा.दशम स्थानी असणारा मंगळ, महत्वाकांक्षी, दिर्घोद्योगी असाध्य गोष्टी घडवून आणणारा,मेष,सिंह,धनु राशीचा असावा.पंचमात असता गर्भपात होतो.धनस्थानी पैसा खर्च होतो.नेत्र मोठे,घारे. कर्क राशीतला मंगळ नीच गोष्टी घडवतो.मिथुन राशीत स्वाभिमान,तूळ राशीत स्फूर्ती देणारा.मंगळ कुंभ राशीत असेल तर तत्ववेत्ता असतो.बौद्धिक राशीत अहंकारी.
बुध:--बुधला सोमपुत्र, रौहिणेय.चंद्र हा तारांचे पीधान करतो.चंद्र,रोहिणी व बुध यांचे एकाच वेळी पिधान झाल्यावर बुध हा चंद्राच्या बाहेर पडला.म्हणून त्याला रौहीणेय म्हणतात.रोहिणी चंद्र समागमातून बुध हा पुत्र झाला अशी कल्पना आहे.बुध हा बुद्धीमत्तेचा द्योतक आहे.सूर्य हा राजा तर बुध हा युवराज आहे. ती सूर्याच्या जवळ असतो.याचा रंग हिरवट व काळसर आहे.याचा संबंध वाणीशी आहे.दुसऱ्या स्थानावरून वाणीचा विचार होतो.द्वितीय स्थानी बुध असल्यास मनुष्य बोलका व विद्या संपन्न असतो.पंचम स्थानी बुद्ध विद्या व बुध्दी देतो.लग्न,पंचम,द्वितीय, नवम व दशम या स्थानात त्याचे जास्त महत्व आहे.मिथुन,व कन्या या राशीत स्वगृही असतो.कन्या राशीत उचीचा तर मीन राशीत नीचीचा असतो.मिथुन राशीत बलवान असतो.या राशीत वक्तृत्व,स्मरण शक्ती,शास्राचे ज्ञान असते
गूढ विद्येचे आकलन होते.टाप टीप नीट नेटकेपणा,व्यस्थितपणा हा त्याचा गुण धर्म आहे.राजकीय वैभव,व्यापार यास अनुकूल आहे.तो रवीच्या पुढे असणे अधिक चांगले.रवी बुध योग विद्वत्ता व बुद्धिमत्ता देणारा योग आहे.गणित हिशोब यात प्राविण्य
असते.बुध हा नपुसंक ग्रह आहे.बुधाचा मंगळा बरोबर योग नसावा.बुद्धी भलत्याच मार्गाला जाते.बुध गुरू अध्यात्म.बुध शुक्र ललित कला यंत्र रचना.बुध शनी योग नसावा.
तूळ राशीत चांगले फल देतो.
सुधाकर काटेकर
विशारद
Astrological Institute,Chennai
M.O.9653210353