Jyotishshastra books and stories free download online pdf in Marathi

ज्योतिषशास्र - । पत्रिका मिलन नाडी, गण याचा विचार - 6

पत्रिका मिलन पाहतांना१) वर्ण २), वश्य ३)तारा४) योनी ५)ग्रह मैत्री ६) गण ७),राशी कूट ८)आणि नाडी याचा विचार करतात. या वरून किती गुण जमले पाहतात.१८ पेक्षा जास्त जमल्यास चांगले.चंद्र नक्षत्रा वरून घटित पाहतात कारण त्याचा मनाशी संबंध
आहे. चंद्र मनाचा कारक आहे. जन्म नक्षत्राचे
जन्म नक्षत्राशी व नाम नक्षत्राचे नाम नक्षत्राशी घटित पाहावे.
१) गण विचार. देव गण, मनुष्य गण राक्षस गण असे तीन वर्ग पडतात.सत्व गुण म्हणजे
गण, रजोगुण म्हणजे मनुष्य गण, तमो गुण
म्हणजे राक्षस गण.
२)नाडी विचार.सत्व राज तम् हे गुण जसे स्वभाव दर्शक आहेत तसेच नाडीचे वात, पित्त व कफ प्रकृती दर्शक आहेत.वधू किंवा वर कोणत्या तत्वाची हे समजावे.गण एक असता
उभयतांचे स्वभाव जमतील.प्रकृती भिन्न पाहिजे.वैद्यकीय दृष्ट्या उभावंतांची प्रकृती
भिन्न पाहिजे.आद्य,मध्य व अंत्य हे नाडीचे प्रकार आहेत.
४) वर्ण ५) वश्य:-चतुष्पाद,मनुष्य,जलचर,वनचर,व कीटक असे पाच आहेत.
मेष,वृषभ चतुष्पाद,मिथुन,कन्या, धनु आणि कुंभ, मनुष्य. जलचर:-कर्क,मीन,मकर.
वनचर सिंह व वृश्चिक:- कीटक
समान धर्माच्या राशीचे २ गुण, विषम १/२ गुण.एकाची चतुष्पाद दुसऱ्याच जलचर १ गुण. एकाची चतुष्पाद व दुसऱ्याची वनाचर
किंवा कीटक असता ० गुण धारावयाचे.
तारा:- एकाच्या जन्म नक्षत्रापासून दुसऱ्याच नक्षयरापर्यंत मोजून आलेल्या संख्येस ९ ने भागावे.बाकी ३,५,७ राहिली तर अशुभ,१,२,४,६,८ ० राहिल्यास शुभ दोघांची शुभ तारा आल्यास ३ गुण. एक शुभ आणि दुसरी अशुभ असल्यास १।। गुण दोन्ही अशुभ ०
योनी:--एकंदर नक्षत्रांच्या १४ योनी आहेत.
१)अश्व (२) गज (३) मेष(४) सर्प (५) श्वान
(६) मार्जार (७) मूषक (८) गौ (९) म्हैस
(१०) व्याघ्र (११) मूषक (12) मृग (१३) नकुल
(१४) सिंह
यात उभयंताची एक योनी असल्यास ४ गुण
योनीचे मित्रत्व असल्यास ३ गुण, औदासीन्य
असल्यास २ गुण, शत्रुत्व असल्याड १ गुण
व महावैर असल्यास ० गुण समजावे.
ग्रह मैत्री,राशी कूट:-
द्वीरदा दशक:-योग,नवपंचम योग,शडाष्टक योग, शडाष्टक योग नसावा.उभयंताची एक रास व एक नक्षत्र व चारण भिन्न असेल तर ३६गुण धरतात.
दाम्पत्य योग
१) एकाचा चंद्र ते दुसऱ्या चा सप्तम
२)एकाचा शुक्र ते दुसऱ्या चे सप्तम किंवा लग्न.
३)एकाचे लग्न ते दुसऱ्या चे सप्तम
४) वधू वर यांचो लग्ने यांची एका राशीची
५) एकाचे लग्न ते दुसऱ्या चे सप्तम
६) उभयंताचा चंद्र एकाच राशीचा
७) एकाचा सप्तमेश दुसऱ्याच्या लग्नात दुसऱ्याचा लग्नेश दुसऱ्याच्या सप्तमात
मंगळ:-- लग्न जमवितांना पुष्कळ वेळा मंगळ पाहण्याची पद्धत आहे.बऱ्याच वेळा
गुण जमतात पण मंगळ आहे म्हणून अनेक
लग्न जमत नाहीत. कुंडलीच्या एक,चार,सात,
आठ व बारा या स्थानात मंगळ असल्यास
मंगळ आहे असे मानतात.याच स्थानात शनी
असल्यास कुंडली जमते.
स्थळ कोणते असेल हे जर पहावयाचे असेल तर आधी सप्तमेश पहावा.सप्तमेश जर केंद्रात असेल तर,एक,चार,सात अथवा दहा
या पैकी एका स्थानात असेल तर स्थळ त्याच
गावातले असते.जर सप्तमेश त्रितीय स्थानी
असेल स्थळ नात्यातील असते,विशेषतः आते
भाऊ किंवा आते बहीण अथवा जवळचे नात्यातील असते. जर सप्तमेश लाभस्थानी
असेल तर ओळखीच्या व्यक्ती कडून लग्न जमते.
वयातील अंतर:--सप्तमेश जर चंद्र किंवा बुध असेल तर साधारणपणे दोन ते तीन वर्षाचे अंतर असते.गुरू किंवा शुक्र असेल तर पाच ते सहा वर्षाचे अंतर असते. शनी जर असेल तर नऊ ते दहा वर्षाचे अंतर असते.अर्थात हा
नियम नाही.
पंचमेश जर सप्तमात असेल तर प्रेम विवाह होण्याची शक्यता असते.
नोकरी:- नोकरीचा विचार करताना दोन,सहा व दहा या स्थानांचा विचार करतात.कारण
हा अर्थ त्रिकोण आहे. मनुष्य ज्या वेळेस प्रथमच नोकरीस लागतो त्या वेळेस महादशा व अंतर्दशा षष्ठम स्थानाशी संबंधित असतात.
नोकरी केव्हा लागेल असा ज्यावेळी प्रश्न असेल त्यावेळी महादशा व अंतर्दशा यांचा संबंध दोन,सहा किंवा दहा या स्थानाशी
येतो त्या वेळेस नोकरी लागते.त्याचबरोबर
चलीत भ्रमणाचा सुदधा विचार करावा.
सु. गो. काटेकर
VISHARAD
Astrological Research Institute,
Chennai

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED