ती कोण होती dhanashri kaje द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 2

    रुद्र अणि श्रेयाचच लग्न झालं होत.... लग्नाला आलेल्या सर्व पा...

  • नियती - भाग 34

    भाग 34बाबाराव....."हे आईचं मंगळसूत्र आहे... तिची फार पूर्वीप...

  • एक अनोखी भेट

     नात्यात भेट होण गरजेच आहे हे मला त्या वेळी समजल.भेटुन बोलता...

  • बांडगूळ

    बांडगूळ                गडमठ पंचक्रोशी शिक्षण प्रसारण मंडळाची...

  • जर ती असती - 2

    स्वरा समारला खूप संजवण्याचं प्रयत्न करत होती, पण समर ला काही...

श्रेणी
शेयर करा

ती कोण होती

पानांची सळसळ होते. आणि आवाज ऐकुन शिव व त्याचे मित्र बाहेर येतात. किर्रर्र... शांतता असते त्यामुळे आवाज जरा स्पष्टच ऐकु येत असतो. शिव थोडं आवाजाच्या दिशेने पुढे सरकतो आणि विचारतो. "कोण आहे रे तिकडे हॅलो." परत एकदा पानांची सळसळ होते. शिव थोड्यावेळ बाहेर थांबतो तेवड्यात घरातुन एक आजी येते आणि सगळ्यांना आत बोलाऊन घेते. "पोरांनो रात्रीच काय करताय रे बाहेर. या लौकर घरात इथे अस रात्रीच फिरणं बरोबर नाही बर का कधी काय होईल सांगता येत नाही तेव्हा लौकर घरात या.(थोडस थांबत)आलात का." "हो आजी आलोत." म्हणत शिव आणि त्याचे मित्र घरात येतात तेवढ्यात रजतची नजर लांब उभी असलेल्या एका पांढऱ्या शुभ्र ड्रेस घातलेल्या मुलीवर पडते. ती मुलगी एकसारखी त्या मुलांकडे पहात असते. रजत थोडं पुढे जाऊन तिला विचारतो. " हॅलो. कोण आहेस तु?(त्याला बघुन ती पुढे जाऊ लागते) थांब थांब जरा" त्याला जाताना पाहून रजतचे मित्रही त्याच्या मागे जाऊ लागतात. शिव रजतला आवाज देतो. "राज्यां थांब.. थांब अरे तिकडे जाऊ नकोस ऐक रजत जंगलात धोका आहे थांब जरा." रजतला आवाज देत सगळे त्याच्या मागे जाऊ लागतात. सगळ्यांना आपल्या कडे येताना बघून ती जंगलात जाऊ लागते अंधार असल्याने कुणाला काहीच कळत नाही बस ती मात्र त्या मिट्ट काळोखात स्पष्ट दिसत असते. काही वेळ पाठलाग केल्या नंतर अचानक कुठेतरी ती मुलगी गायब होते . अंधार असल्याने कुणालाच समोरच काहीच दिसत नाही सगळे मित्र जंगलात हरवुन जातात. मनात प्रश्न एकच असतो ती मुलगी कोण होती. तिचा शोध घेता घेता शिव आणि त्याचे मित्र जंगलात एकमेकांपासुन दूर होतात कुणीही कुणाला सापडत नाही. आणि अचानक शिवला रजत दिसतो शिव रजतवर खुप चिडतो. "गाढवा तुला कळाल नाही का आजींनी काय सांगितलं होतं ते. हे जंगल आहे आपलं शहर नाही बघितलं न आपले फ्रेंड्स ही कुठे गेले कळत नाहीये आता त्यांना काही झालं तर कोण जबाबदार आहे त्याला. मी काय बोलतोय कळतंय का तुला." थोडस भानावर येत."ती मुलगी.. यार मी आता एका मुलीला पाहिलं रे इथे कोण असेल रे ती आणि एवढ्या मोठ्या जंगलात अशी एकटीच तिला कुणी काही केल तर नसेल न." शिव परत चिडतो. "मुलगी? मला वाटलंच हे कारण असणार तुझी ही सवय कधी जाणार कोण जाणे. तिला सोड तुझ्या मुळे आपले फ्रेंड्स इथे आलेत न त्यांना शोध आधी. तुझ्यामुळे झालय सगळं त्यांना काही झालं न रजत तर मी तुला कधीच माफ करणार नाही." रजत काहीच बोलत नाही आणि दोघ आपल्या मित्रांना शोधू लागतात. शोधता शोधता सकाळ होते. आणि अचानक शिवला त्याचे फ्रेंड्स दिसतात तेव्हा त्याचा जीव भांड्यात पडतो. सगळे एकमेकांना भेटतात सगळ्यांना सुखरूप असण्याचा आनंद होतो आणि सगळे एकमेकांची गळाभेट घेऊन परत घराकडे येतात. घरी परतल्यावर रजत आजीला घडलेला प्रकार सांगतो तेव्हा आजी म्हणते. "वेड्यानो तुम्हाला बजावलं होत न मी रात्रीच बाहेर जाऊ नका म्हणून हे गाव आहे गावात काय होईल सांगता येत नाही आम्हीच रात्रीच बाहेर पडत नाही तुम्ही तर चक्क जंगलात जाऊन पोहोचलात काही झालं असत म्हणजे . तुमचं नशीब चांगलं म्हणून तुम्ही वाचलात ती मुलगी कोण आहे हे आजपर्यंत कुणालाही कळलेलं नाही तुमचा सारखा प्रयत्न बऱ्याच जणांनी केला पण कुणीही परत आलेलं नाही. ती मुलगी आमच्या साठी एक रहस्यच आहे तिला रहस्यच राहू द्या आणि आता इथून निघा." मूळ काहीही न बोलता 'ती कोण होती?' मनात एकच प्रश्न घेऊन बाहेर पडतात. परत कधीही न येण्यासाठी.