विवस्त्र भाग २ Mohit Kothmire Mk द्वारा सामाजिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

विवस्त्र भाग २

धावत धावत मी घरात गेले व आतील रूम मध्ये जाऊन रूम लॉक केला आई रुमकडे अचानक धावत आली.
"स्मिता काय झालं?? दार का लावले आहे??"
मी दबक्या स्वरात काही नाही आई तब्येत ठीक नाही आहे झोपते जरा..
"अग पण तू तर सुधीर सोबत गेली होतीस ना...?? आई ने प्रश्न विचारला
"हो" बोलले फक्त आई ला वाटले की सुधीर ने मला घरी सोडून निघून गेला असेल?
पण मी मात्र रडत होते..
"मी त्या व्यक्तिला पहिल्यांदा भेटले त्यांनी मला विश्वासात न घेता असे केले ? मला काय वाटेल ह्याचा जरा ही विचार नाही केला..
आणि ही गोष्ट मी कोणाला सांगू ही शकत नव्हते..
कारण असा प्रसंग माझ्यासोबत पहिल्यांदा घडत होतं..
मग मी थोडा विचार केला उगाच नको ह्या गोष्टी बाबत विचार करायला
"फरक काय पडतो स्मिता तुझा असा ही होणारा नवरा आहे ना?? पण आमचं कुठे लग्न झालंय??
"पण होणार आहे ना त्यात काय एवढे लग्ना नंतर ह्या गोष्टी तर होणारच तेव्हा पण मुस्काटात मारणार का त्याच्या ??" असे विचार मनात येत होते..
तेव्हढ्यात बाहेरून सुधीर चा आवाज आला
"मामी स्मिता आली का घरी ??"
" हो आली ना पण तुम्ही तर सोबत गेले होते ना??"
हे ऐकताच तो गडबडला " ती कुठे आहे??"
"आहे झोपली आहे तब्येत नाही ना ठीक ??
"हो मामी म्हणून मी विचारला आलो कारण ती डायरेक्ट घरी आली ना तिला बोलो मी सोडतो पण ती बोलली मी जाते ??"अस बोलून त्याने विषय सावरला..
"मी जातो आता तिला सांगा मी येऊन गेलो हवं तर फोन करेन मी " अस बोलून तो निघून गेला
पण मला आता असंख्य प्रश्न पडत होते
हा असा का वागला ह्याने अस का केलं?? का मी मारले ते चुकीचं केलं का हे प्रश्न माझ्या पुढे थैमान घालत होते
मी लग्न चुकीच्या व्यक्ती बरोबर करत आहे का ??
असे असंख्य प्रश्न...
थोडी झोप घेऊन अंघोळ केली व बाहेर आले
"अग स्मिता सुधीर येऊन गेले त्यांना फोन कर काळजी लागली असेल त्यांना"
पण तेवढ्यात फोन आला
"हॅलो,स्मिता अग खरच सॉरी मी भावनेच्या भरात झालं सर्व माझ्या मनात तसे काही नव्हते.. "
मी फक्त ह्म्म्म.. करत होते
"तू बर केलास मला मारल मी चुकीचा वागलो खरच माफ कर हवं तर मी येऊन माफी मागू का तुझी तू सांग फक्त मी काय करू??"
मग मलाच थोड वाईट वाटल
"नको नको राहू द्या नका एवढं वाईट वाटून घेऊ पण पुन्हा अस काही...
"नाही नाही स्मिता प्रॉमिस.."
"बरं ठेवते फोन बोलूया नंतर" अस बोलून मी फोन ठेवला
"तसा तो वाईट नव्हता चुकी तर माणसच करतात ना??
मग मी तो विषय विसरून जाऊन पुन्हा आहे तसे वागुया"
सुधीर रोज फोन करायचा हळू हळू मला पण तो आवडू लागला होता..एकंदर त्याच्या प्रेमात पडत होते असे बोलायला हरकत नाही...
"स्मिता अग स्मिता प्रिया आली बघ" आई ने आवाज दिला
"प्रिया आज कशी काय मैत्रिणीची आठवण झाली तुला ??
"अग नाही तस काही तुलाच वेळ नाही आता
लग्न ठरलय ना मॅडम च मग आमच्या सारख्या मैत्रिणींबरोबर बोलायला वेळ कुठे तुला आता"प्रिया बोलली
"अग नाही तस काही "
"मग कसं आहे आमचे होणारे दाजी??"
मी लाजत"छान आहेत की"
"ह्म्म्म खूपच आवडले वाटत"प्रिया बोलली..
"गप ग उगाच काही तुझे"
"मग काय प्लॅन ठरला तुमचा"प्रियाने विचारल
"कसला प्लॅन"
"आता ते ही आम्हीच सांगायचे का ??"
"अग प्रिया नीट सांग ना काय विचारतेस ते
"हणीमून कुठे जाणार मग"
"प्रिया तू पण ना कुठे ही पोचलीस ??
"बरं बरं राहील पण लग्ना नंतर आम्हाला विसरू नको म्हणजे झाल "
"नाही ग तस नाही.."
"चल मी निघते इथून चालले होते म्हणून तुला भेटून जावे म्हणून आले bye" अस बोलून प्रिया गेली
"बावळट कुठची काही ही प्रश्न विचारत होती हणीमूनला कुठे जाणार?? पण प्रश्न एवढा बावळट नव्हता" मला तर खूप इच्छा होती की काश्मीर ला जावे " मीच मला हसत "अग वेडाबाई तू का विचार करतेस एवढा " मग मीच स्वतःला लाजले..
"पण तो क्षण काही वेगळाच असेल ना पूर्ण जग माझ्यासाठी थांबेल असेल तो पहिला स्पर्श.. पहिल्यांदा कोणाच्या कुशीत..पहिल्यांदा एकद्या पुरुषासोबत रात्र घालवले तो अनुभवच काहीसा अविस्मणीय असेल. पण असं बोलतात की जी स्त्री आपल्या पतीला पहिल्या रात्री जिंकते तो पती तिची साथ कधीच सोडत नाही.."उगाच स्वतःशी लाजत मी असे विचार करत होते..
आणि लग्नाला काही मोजके दिवस शिल्लक राहिले होते..

क्रमशः

©