लव्हस्टोरी - प्रेमवेडा - 1 Hemangi Sawant द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

लव्हस्टोरी - प्रेमवेडा - 1

अग ऐकं तरी तो तिच्या मागे जात बोलला ती मात्र आपल्याच धुंदीत चालत घरी निघाली होती. हे रोजच झालं होत.

प्रिया तिच नाव सगळेच तिला पियू म्हणूनच हाक मारत. प्रिया दिसायला सर्व सामान्य मुलींसारखी. गोल सुबक चेहरा, नाजूक गुलाबी ओठ, छोटस नाक आणि तितकाच राग ही नाकावर. सोनेरी केस, अशी ही आम्हची प्रिया. अगदी एखादया बाहुली सारखी सुन्दर.


आणि हो तो तर राहिलाच की आपला हिरो. अमोघ उर्फ अमु. दिसायला सावळा, सडपातळ बांधा पण तेवढाच चार चौघात उठुन दिसणारा असा हा अमु....

तर झाल अस की दोघे एकाच शाळेत शिकत होते, मात्र तो होता शेवटच्या वर्गात आणि ती होती नववीत. त्याने एकदा कधी कार्यक्रमा मध्ये तिला पाहिलं आणि काय आपला हिरो पडला की प्रेमात आपल्या पियूच्या...
पण तिला मात्र काहीच म्हाहित नव्हत की रोज आपल्या वर कोणीतरी पारख ठेवून आहे.

असच एके दिवशी पियू शाळेत लवकरचं आली का कुणास ठाऊक तिचा मूड काही ठीक नव्हता असणारच कारण; तिला कळलं होतं मैत्रिणींन कडून कोणी मुलगा म्हने तिचा पाठलाग करत असतो शाळा सुटली की तिच्या घरापर्यंत... थोडी चिडलीच होती. बरोबरच होत म्हणा तीच कोणी अस आपला पाठलाग करत असेल तर काय करणार ती तरी बिचारी..

शाळेची घंटी वाजली सर्व मुलं मुली वर्गात आली, बाई पण आल्या पण पियूच मन काही वर्गात नव्हत, ती त्याचं मुलाचा विचार करण्यात व्यस्त होती आणि अचानक झालेल्या बाईंच्या प्रश्नाने तिचा विचार करण्यात भंग पावला. "अग, काय झाल..? कोणत्या एवढया विचारात होतीस..?!" बाजूला बसलेल्या तिच्या मैत्रिणी ने तिला खुणेनेच विचारलं..., "काही नाही ग असंच", बोलून तिने बाईंनी विचारलेल्या प्रश्नांच उत्तर देऊ केले आणि परत तोच विचार करत खाली बसली. कसे बसे तास संपले. मधली सुट्टीची घंटी वाजली.

मधल्या सुट्टीत दोघी एकत्र डबा खात होत्या, मात्र पियुचं लक्ष काही केल्या डबा खाण्यात नव्हतं तेव्हा तिची खास मैत्रिणी वर्षा ने तिला विचारलं, "काय ग पियू काय झालयं तुला आल्यापासून बघतेय तुझ कशातच लक्ष नाहीये. आता पण डबा सोडून तुझ कुठे लक्ष आहे कोण जाणे,... काही झालयं का घरी??"

पियू: "घरी काही झालं नाहीये ग," अगं तू काल बोललीस बघ त्या मुला बद्दल त्याचाच विचार करतेय...

वर्षां: अग तो अमोघ का.., त्याच काय झालं आता..?

पियू: काही झालं नाही ग.. तूच बोललीस ना माझ्या मागे असतो अस म्हणून विचारलं तुला...

वर्षा: अच्छा ते होय अगं त्या दिवशी बघ आपण घरी जात होतो सोबत आणि मला दुकानात जायचं होतं तर मी निघाले. पुढे जाणार तेवढयात अमोघ मला दिसला सायकल घेऊन तुझ्या एरिया मध्ये तुझ्या मागे येत असताना. अगं माझ्या दादा पण सांगत होता की तो रोज शाळा सुटली की तुझ्या मागे येतो पाठलाग करत, म्हणून सांगितलं बाकी काही नाही ग, तू नको एवढा विचार करुस हवं तर आपण त्याला आजच विचारुया जाब का असा तुझ्या मागे येतो ते..

पियू: खरचं का...?? मला भीती वाटतेय ग..का असा तो मुलगा मागे येत असेल माझ्या ??

वर्षा: त्यात काय घाबरायच मी आहे ना...चल आता संपव बघू तुझा डबा.

दोघी डबा संपवून त्याला भेटायला निघाल्या.. त्याच्या वर्गालासमोर आल्या; अमोघ समोरच मित्रांमध्ये बसून गप्पा मारण्यात गुंग होता. त्या दोघींना बघून तो त्यांच्या जवळ आला. तो जवळ येताच आपली पियू त्याला बघून चांगलीच घाबरली. तो मात्र तिला न्याहाळत होता अगदी पायापासून डोक्यापर्यंत..तो एवढा गुंतला होता की त्या कधी त्याच्या एकदम बाजूला कधी येऊन उभ्या राहिल्या कळलंच नाही. तोच वर्षा त्याच्या हाताला हलवत बोलली.

वर्षा: हॅलो अमोघ ?? (जरा रागात)अस काय बघतो आहेस आमच्याकडे टक लावुन??


अमोघ: क् काही नाही.. तू इथे काय करतेस?? सागर ची बहिण ना तू?? (प्रश्नार्थक चेहऱ्याने त्याने तिला विचारलं)

वर्षा: हो सागर माझा दादा. काय रे तू माझ्या मैत्रिणीचा पाठलाग का करत असतोस बरं???

अमोघ: (जरा घाबरतच उत्तर देतो) "काय मी पाठलाग करतो आणि तेही तुझ्या मैत्रिणीचा", कसं शक्य आहे. मी तर तुझ्या कोणत्याच मैत्रीणीला ओळखत नाही हा. मग मी का करू पाठलाग...

वर्षा: सवंशयास्पद चेहऱ्याने बघत ती प्रिया ला पुढे ढकलत विचारल, "हिला नाही का ओळखत तू???"

अमोघ: प्रियाला वर्षा सोबत बघून अमोघला चांगलाच घाम फुटला.(स्वताशीच बोलत)
"आता काही खैर नाही आपली आपलं पितळ उघड पडणार वाटत आज..", तरी सागर सांगत होता नको जात जाऊस तरी आपण काही ऐकलं नाही. आता ही जाऊन बाईंना सांगेल मग बाई आपल्या बाबांना बोलवतील, अरे देवा कुठे अडकलोय मी... स्वताशीच पुटपुटत अमोघ आपल्याच विचारात होता की वर्षा बोलली...

वर्षा: "ए अमोघ", (त्याच्या हाताला हलवत वर्षा बोलली) काय रे काय झालं? हिला नाही का तु ओळखत??!

स्वतःच्याच तंद्रीतुन बाहेर येत अमोघ बोलला.. ह् ही तुझी मैत्रीण आहे का; छान आहे हा...उगाच काही तरी बोलायचं म्हणून तो बोलत होता. ते ऐकुन मात्र आपली प्रिया चांगलीच लाजली आणि तिथून पळालीच, ती सरळ आपल्या वर्गात येऊन बसली.. वर्षाने तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघून तर हातच जोडले. पण अमोघ मात्र बराच सुखावला होता तिच्या लाजलेल्या चेहऱ्याला बघून आणि तोही हसत होता मनातल्या मनात. काय करणार शेवटी हृदय देऊन जो बसला होता आपल्या पियू ला..

हे सर्व बिचारी आपली वर्षा मुकाटपणे बघत होती. मग तिनेच ठरवलं की आपणच विचाराव काय भानगड आहे; म्हणून तिनेच अमोघ ला प्रश्न केला...

वर्षा: ए अमोघ एक विचारु का तुला, रागावणार नसशील तर विचारते हा?

अमोघ: हा विचार ना, त्यांत काय रागवायचे!

वर्षा: जरा खाजगी आहे म्हणून परवांगी घेतली,...

अमोघ: अच्छा विचार काय विचारायचं आहे तेही खाजगी??

वर्षा: 'तु माझ्या मैत्रिणी च्या मागे का बर जातोस तेहि रोज; कारण मी पाहिलंय तुला तिच्या मागे सायकल घेऊन जाताना. म्हणून विचारलं आणि दादा ने पण सांगितलं होतं मला. त्यामूळे खऱ्या उत्तराची अप्पेक्षा आहे.

अमोघ: स्वताशीच विचार करून ठरवतो की हिलाच आपण सगळं सांगून टाकूया निदान तिच्या पर्यंत पोहोचेल तरी की आपलं किती प्रेम आहे तिच्यावर.... अस ठरवून तो सांगायला सुरुवात करतो...



(to be continue.....लवकरच.)