Love stories - Premveda - 4 books and stories free download online pdf in Marathi

लव्हस्टोरी - प्रेमवेडा - ४

वर्षा वर्गात आली. जरा रागातच तिने आपला कटाक्ष प्रियाकडे टाकला. तस प्रियाने कान पकडुन माफी मागितली. पण वर्षा जरा रागावलीच होती; म्हणून ती काही बोलली नाही. शाळा सुटली तशी वर्षा घरी जायला निघाली, पियू पण सोबत निघाली पण कोणी कोणासोबत बोलत नव्हतं.

पियू: अग वर्षा काय झाल बोल ना..?

वर्षा: (जरा रागावून) काय झाल विचारतेस, तू मला त्या अमोघ सोबत एकट सोडून पळालीस ना..? अस वागतात का आपल्या बेस्ट फ्रिएन्ड सोबत. मला नाही बोलायच तुझ्यासोबत.

पियू- सॉरी ना, माफ कर ना ग मला.. प्लीज ..... हवं तर कां पकडू का मी.. हे बघ पकडले...

वर्षा: बर बर... असुदे परत कधी अशी वागलीस ना तर गाठ माझ्याशी आहे कळलं... तशा दोघी हसायला लागल्या.

पियू: बर काय बोलत होता ग तो अमोघ...?

वर्षा: अग त्याला तू आवडतेस; म्हणजे तो तुझ्या प्रेमात आहे. अस बोलत होता मला.....

पियू: काय....! प्रेम वेगेरे काय.... मला नाही पटत हे प्रेम वेगेरे... आणि हे वय नक्कीच नाहीये प्रेम करायला. पूर्ण आयुष्य पडलंय ग.

वर्षा: हो म्हाहित आहे मला. पण त्याच प्रेम आहे तुझ्यावर. तु एकदा बोल ना त्याच्याशी....,

पियू: अरे..., मी काय बोलु त्याच्या सोबत..? साधी मैत्री पण नाहीये आमची आणि काय बोलणार त्याच्या सोबत...!?? त्यात तो सातवी मध्ये वर्ग वेगळा आणि मी त्याला ओळखत सुद्धा नाही..., कस शक्य आहे..! मी नाही हा बोलणार त्याच्यासोबत...,

वर्षा: बर बाई नको बोलुस, मग मागे आला तर रडत येऊ नकोस माझ्याकडे.. चल उद्या भेटुया. अस बोलून वर्षा निघून गेली.

पियू स्वतःच्याच विचारात घरी निघाली. वर्षा बोलते ते बरोबर आहे. जर खरच तो रोज माझ्यामागे येत राहिला तर ...?
नको हे सगळं पाठी पडण नकोच.. मीच स्वतः त्याच्याशी बोलेन आणि त्याला समजावेल अस मनात ठरवून पियू स्वतःच्या घरी पळाली.

हे बघा अस होत प्रेमात. आपला अमू पियूच्या प्रेमात आणि पियुला काही वाटतच नाहीये. तरी बघू आता ती त्याच्याशी बोलतेय की तोच तिला प्रपोस् करतोय..

इकडे अमू घरी आला. त्याला काय कराव सुचत नव्हत. आपण वर्षा सोबत बोलून चूक तर नाही ना केली असे सतत त्याला वाटत होतं; पण आपण कधी न कधी सांगणारच होतो मग ते काल सांगितलं इतकच. पण सतत त्याला भीती वाटत होती की जर पियूने तिच्या घरी किव्हा शाळेतल्या बाईंना सांगितलं तर...? अरे देवा कुठे अडकलो मी. आता तूच वाचव मला यातुन.. पण ती समोर आली तेव्हा लाजून पळून का गेली असेल.. कदाचित तिलाही मी आवडत असेल का..? असे एक ना अनेक प्रश्न अमू ला सतावत होते. त्याचाच विचार करत तो झोपी गेलो.

सकाळची न्याहारी करून शाळेत निघाला. चालताना परत तेच विचार; काय करायचं आज बोलूया का तिच्यासोबत??
प्रयत्न तर करून बघु. आपण मैत्रीच करूया कोणाला काही कळणारच नाही मग. पण सागर ला सांगावं लागेल नाही तर तो सगळ्या जगाला ओरडून सांगेल की माझा जिग्री दोस्त प्रेमात आहे हे आणि ते.. शेवटी शाळेच्या पटांगणावर पोहोचत अमुची नजर परत तिला शोधत होती. ती समोर तिच्या मैत्रिणींसोबत गप्पा मारण्यात व्यस्त होती सोबत वर्षा होतीच.

वर्षाच लक्ष गेलं तस तिने लगेच पियूला खुणावत की,तो आलाय. त्याचाही त्यांच्यावरच लक्ष्य होता. तो त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करायला म्हणून पुढे येतच होता; की ह्या दोघी वर्गात पळाल्या.

वर्षा: पियू तु ना त्याच्याशी बोल एकदा आणि सांगून टाक ना एकदाच, नाही तर तो असाच तुझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करत राहील. बघ सध्या कोणाला म्हाहित नाहीये, पण जर का कोणाला ही जरा तरी कळलं ना मग झाली सगळीकडे बोंबाबोंब मग बस रडत...

पियू: हो बोलते. पण काय आणि कस...??To be continued....

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED