लव्हस्टोरी - प्रेमवेडा - ५ Hemangi Sawant द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

लव्हस्टोरी - प्रेमवेडा - ५

वर्षा: हे बघ दोन दिवसांनी माझ्या दादाचा वाढदिवस आहे. छोटीशी पार्टी असेल घरी. दादा चा खास मित्रच येणार आहेत आणि तो तर त्याचा जिग्री दोस्त आहे म्हणजे नक्कीच येणार तो. तू पण ये. मग त्या निमित्ताने का होईना तु बोलशील त्याच्याशी... अशी वाटली आयडिया..??(वर्षा ने टाळीसाठी हात पुढे करत विचारले)

पियू: आयडिया तर छान आहे.. पण मी अस कस बोलू त्याच्याशी .. जरा भीती वाटतेय ग मला...

वर्षा: अरे तो काय खाणार नाहीये तुला आणि मी असेल ना तिकडे मग कशाला टेंशन घेतेस... आणि तसही मुलगा चांगला आहे असं काही करणारा नाही वाटत.

पियू: पण....

वर्षा: बस झाल तुझ 'पण' आणि अजून काही... तू येतेस पार्टीला आणि बोलणार आहेस त्याच्याशी सरळ कळलं तुला... (जरा रागवतच वर्षा बोलली)

पियू: (हात जोडत पियू बोलली) बर माझ्या आई. तू म्हणशील तस... दोघी खिदळायला लागल्या..

इकडे आपला अमू एकदम शांत बसुन होता वर्गात. विचार करत असेल बहुदा म्हणून सागरने त्याला विचारले नाही...
अमू स्वतःच्याच विचारात होता की अस का दोघी पळून गेल्या असतील..??? मी काय खाणार होतो का त्यांना..? फक्त एकदा मला तिच्याशी बोलायचे होते. माझे मन व्यक्त करायचे आहे. पण ती बोलताच नाही मग काय होणार आहे माझं... अमुचा वर्गात लक्ष नाही बघुन सागरने शेवटी त्याला विचारायचे ठरवले.

सागर: अमू.. मित्रा काही झालंय का रे...??

अमू: क् काय.. काही नाही रे सागर

सागर: बोल की लेका आता. माझ्यापासून काय लपवतोस.. ती आली नाहीये का आज शाळेत की अजून काही कारण आहे.

अमू: आज आलीये ती...

सागर: अरे वाह.. मग काय प्रॉब्लेम आहे. चेहरा का पडलाय..?

अमू: आज मी तिच्याशी बोलायचं प्रयत्न केला तर ती परत निघून गेली सोबत तुझी बहीण होतीच. कशी मैत्री करू कळताच नाहीये. तूच कर मदत मला.

सागर: अच्छा तर अस झालं होय.. बोलेल रे तू सतत तिचा पाठलाग करत राहणे, बोलायचं प्रयत्न करणे हे असं नको करुस. त्याने ती अजून दूर जाईल हा...बोलेल ती सुद्धा वेळ दे तिला..

अमू: हो ठीक आहे. नाही पाठलाग करत आणि नाही बोलायला जात. बघु आता स्वतःहून येते का..?

सागर: येईल रे... चल जरा पाणी भरून येऊया.
डोळा मारत सागर बोलला. अमुला काहीच कळत नाही बिचारा त्याच्या मागे मागे गेला गप्पपणे.

अमू: मधेच कशाला पाणी हवय तुला मधल्या सुट्टीत घेतलं असत ना..!

सागर: हो घेतलं असत पण तेव्हा तुला पियू कशी दिसती असती...

अमू: (प्रश्नार्थक चेहऱ्याने सागरकडे बघत विचारलं) म्हणजे...???

सागर: समोर बघ..

अमू: (लगेच मागे फिरत ) अरे तिच्या वर्गासमोर कशाला आणलंस... आताच बोललास ना मागे जाऊ नकोस, स्वतःहून बोलायचं प्रयत्न करु नकोस मग हे काय....?


सागर: हो पण ते उद्यापासून, आज चालेल....(सागर अमुला डोळा मारत बोलला).

अमू: तू पण ना सागर....

अस म्हणुन त्याने सागर ला घट्ट मिठी मारली आणि तिच्या वर्गाच्या बाहेरून तिला बघत उभा राहिला. सागरने त्या वेळात स्वतःची पाण्याची बाटली भरली आणि दोघे वर्गात आले.

अमू: सागर खूप भारी वाटतंय रे आता. तिची एक झलक बघून मन प्रसन्न झाल बघ..

सागर: बस काय मित्रा. तु मघातपासून असा कुठे तरी विचार करत बसला होतास. आणि मला नाही आवडत तू उदास म्हणुन म्हटलं चला जरा फ्रेश होऊन येऊ.. मग वाटतंय ना फ्रेश..??

अमू: हो वाटतंय ना एकदम फ्रेश..(अस म्हणत दोघे ही हसु लागले)

गप्पा झाल्या, दंगा झाला.. मस्ती मज्जा करून सगळे घरी जाण्यास निघाले. आज आपल्या अमूने गप्प घरी जाण्याचे वचनच दिले होते सागरला. तसे सगळे गेले आप-आपल्या घरी. पियू आणि वर्षा पण गेल्या. दुसऱ्या दिवशी भेटुया असा निरोप घेऊन.

नाही जमत व्यक्त व्हायला,

कसे सांगु मी तुला माझ्या भावना...

होईल व्यक्त एके दिवशी,

जेव्हा तुलाही वाटेल काही तरी..

असचे दिवस गेले आणि शेवटी सागरच्या वाढदिवसाचा दिवस आला. सगळे घरीच होते. रविवारी जो वाढदिवस आलेला. सागरच घर पाहुण्यांनी भरून गेलेल. त्यात त्याचे काही जिग्री दोस्त आलेले. आणि आपली पियू ही आलेली मदतीसाठी म्हणून.



लवकरच....