लव्हस्टोरी - प्रेमवेडा - ६ (अंतिम भाग) Hemangi Sawant द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

लव्हस्टोरी - प्रेमवेडा - ६ (अंतिम भाग)

सर्व मुलांचा दंगा चालू होता, त्यात सागरच्या आईने सर्वाना पोहे आणुन दिले. पोहे खाऊन सर्वांनी जरा कामात मदत करावी अशी त्यांची भाबडी अपेक्षा. सागरचे सगळे मित्र आणि आपला अमू. सर्वांनी आप-आपले पोहे संपवत कामाला लागले. पण अमूची नजर कोणाला तरी शोधत होती. तो इकडे तिकडे बघत कोणाला तरी शोधत होता.

सागर: कोणाला शोधतो आहेस का?

अमू: नाही नाही... कुठे काय..

सागर: ती आणि पिंकी बाजारात गेल्यात आई सोबत येतील थोडयावेळात...

आता बोलालं हि पिंकी कोण.. पिंकी म्हणजे आपली वर्षा. तिला घरी सर्व लाडाने पिंकी बोलत.

अमू: ह् बर बर...

सागर: मग आज बोलणार आहेस का???

अमू: मन तर खूप आहे बोलायचं पण नको. एखाद्यावर आपण किती जबरदस्ती करणार ना..,

सागर: नशीब माझ, मला वाटल ' बोलेण' अस बोलतो आहेस, मारलच असत तुला.

त्यावर अमू काय बोलणार गप्पपणे स्वतःचे काम करत बसला.

तिकडे पिंकी उर्फ़ वर्षा पियूला सतत आज बोल त्याच्याशी असा सारखा दम भरत होती. कस बोलायचं काय बोलायचं याचे धडे देत होती जस की हिने त्यात मास्टरीच केली आहे.
पण बोलतात ना प्रत्येकवेळी अनुभवी व्यक्तीपेक्षाही अनुभव नसलेली वेक्ती जास्त चांगल्या प्रमाणे आपल्याला समजावु शकते तसच काहीस वर्षाच चालु होत.
मग त्या सगळा बाजार आणि केक घेऊन घरी आल्या. तोपर्यंत सर्व मुलांनी छान सजावट केलेली. मग परत एकदा कांदे- पोह्यांचा राऊंड करून सर्व तय्यारीसाठी घरी गेले परत येण्यासाठी.

पियू ही निघाली. मनात विचार चालू होते तिचे. आज अमूने आपल्याशी बोलायचा एकदाही प्रयत्न केला नाही की कित्येक दिवस त्याने आपला पाठलाग केला नाही. पण आज सागरच्या पार्टीमध्ये आपण त्याच्याशी बोलणारच अस तिने स्वतःशी जणू काही ठरलेलंच होत.

सात वाजले सगळे परत सागरच्या घरी जमले. सर्व छान नटून थटून आलेले. अमूने लाल रंगाचा शर्ट आणि ब्लॅक रंगाची पॅन्ट घातली होती. त्याच्यावर तो रंग एकदम खुलुन दिसत होता. तेल लावून माघे ओढलेले केस अजूनच त्याला हँडसम बनवत होते. पण आपली पियू काही आली नव्हती, त्यामुळे अमुचा चेहरा काळवंडला होता. सगळे सागर ला गिफ्ट आणि शुभेच्छा देत होते आणि अमू पियूच्या ओढीने जणू कोमेजलाच होता. मग काय आपल्या पियू ने एन्ट्री घेतली आणि अमुचा चेहरा पौणिमेच्या चंद्रासारखा खुलुन निघाला. तिनेही गडद लाल रंगाचा फ्रॉक घातला होता. एका बाजुला वेणी घालुन त्यावर लाल रंगाचे बक्कल लावले होते. लाल रंगाच्या फ्रॉकमध्ये बाहुलीच वाटत होती पियू.

मग ओवाळणी झाली आणि केक कापून सर्वांनी सागरला शुभेच्छा देऊ केल्या. एकेक करून सर्वजण त्याला शुभेच्छा आणि भेटवस्तू देत होते व फोटो काढून घेत होते. सर्व जण काही न काही करण्यात दंग आहेत बघून पियूने बोलायचे ठरवले. ती हळुच अमुच्या जवळ गेली आणि नजरेनेच तिने त्याला टेरेसवर यायचा इशारा केला.
मग काय आपला अमू ढगात होता. शेवटी "भगवान के घर देर है पर अंधेर नही", पासूनच्या "सबर का फळ अच्छा ही मिलता है।", पर्यन्त सगळ्या म्हणी मनात बोलून झाल्या. पळत जाऊन तो ही टेरेसवर पोहोचला.

चंद्राहुनही सुंदर भासते ती मला,

काय तिचे ते रूप जणू एखादी अप्सरा...

पाहता तिला मन तृप्त झाहले,

परत पडलो प्रेमात तिच्या...

कोणी म्हणजे मोहिनी कोणी मेनका,

पण माझ्यासाठी ती आहे माझी स्वप्नसुंदरा...

ती आधीच येऊन उभी होती. चंद्राच्या प्रकाशात ती एखाद्या परी सारखी भासत होती. तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे मी बघत पुढे गेलो आणि माझ्या चाहुलीने ती मागे फिरली. खरच एखाद्या परी सारखी होती ती दिसायला. आज पहिल्यांदाच एवढ्या जवळून तिला बघत आहे. तिचे ते बोलके डोळे, नाजुक असे ओठ. अमू तिच्यात रमून गेले होता. मग तिनेच बोलायचे ठरवले...

पियू: हाय..

अमू: हॅलो..

पियू: मी पियू... सॉरी सॉरी माझं नाव प्रिया, मला सर्व लाडाने पियू असे हाक मारत. तिने हात पुढे केला.

अमू: मी अमोघ.. अस म्हणून त्याने ही तिला हात मिळवला. तिचा तो स्पर्श अमुला वेगळाच वाटल.. जणू हवा हवासा. मला सगळे अमू बोलतात तू ही बोलू शकतेस.

पियू: हो नक्कीच.. आणि तू मला पियू.

अमू: हो नक्कीच पियू.. (मनात, पियू तर सर्वांसाठी माझ्यासाठी तर तू माझी परी आहेस.)

मग दोघांनी खूप गप्पा मारल्या जणू काही आधी पासूनची मैत्रिच. मग पियूने स्वतः विचारायचे ठरवले.

पियू: अमू एक सांगशील खर खर..?

अमू: हो नक्कीच. मला म्हाहित आहे तुला काय विचारायचं आहे ते.

पियू: होका.. काय बर मला विचारायचे आहे...?

अमू: हेच ना की मी तुझा पाठलाग का करायचो वैगेरे...?

पियू: (जर गडबडत विचारते) तुला कस कळल की मला हेच विचारायचे आहे...! कळलच आहे तर सांग मग का असा पाठलाग करायचास माझा..?


अमू: बर सांगतो पण तू रागावणार नाहीस ना.? आणि आपली मैत्री तोडणार नाहीस ना..? प्रॉमिस कर मला.(अमू ने आपला हात पुढे केला.)

पियू: विचार करत बोलली की ठीक आहे नाही रागवत आणि मैत्रीही नाही तोडत मग तर झाल अस बोलून तिने आपला हात त्याच्या हातात दिला आणि वचन देऊ केले.

अमू: मोठा श्वास सोडत बोलता झाला. मला तू खूप आवडतेस पियू. आपल्या वार्षिक स्नेहसंमेलनात मध्ये मी तुला पाहिलं आणि पाहताच राहिलो. तुझा डान्स बघितला आणि अजून तुझ्या प्रेमात पडलो. प्रेम म्हणजे काय हे नक्की नाही सांगू शकत मी, पण तुला बघुन एक वेगळाच आनंद मिळतो मला. तुझी एक झलक बघायला मी यायचो रोज तुझ्या वर्गात, मधल्या सुट्टीत, आणि घरी जाताना.. मला म्हाहित आहे हे वय नाहीये आणि माझ्या मनाला मी समजावलं पण तुला बघितल्या शिवाय नाही करामत मला. मी असा मुलींच्यामागे फिरणारा नक्कीच नाहीये पण तुझ्यात काही तरी वेगळं आहे जे मला सतत तुझ्याकडे खेचत असत. तुझे ते बोलके डोळे, छोटेचे ओठ, सोनेरी केस. एखाद्या परी सारखी आहेस तू. माझी स्वप्नसुंदरी जणू. मला माफ कर माझ्यामुळे तुला त्रास झाला. पण माझं खरच खूप प्रेम आहे ग तुझ्यावर..

अस बोलून अमू एकदम शांत झाला. बाजूला जाऊन एकटक त्या चंद्राकडे बघत राहिला. मग पियू बोलली

पियू: अमू हे खूप सुंदर आहे. आपल्यावर कोणी प्रेम करणे. पण मला हे प्रेम पटतच नाही रे. मुळात आपलं वय नाहीये प्रेम करायच. संपुर्ण आयुष्य पडलंय प्रेम करायला आणि माझ्या घरी हे प्रेम वैगेरे नाही चालत. मला खुप शिकायचं आहे काही तरी करून दाखवायचं आहे. मी पुढचं सांगत नाही पण आपण खूप चांगले मित्र नक्कीच बनु शकतो. तुझं प्रेम मी नाकारत नाहीये. आपल्याला कोणीही कधीही आवडू शकतो. मान्य आहे पण जर ते वय बरोबर असण गरजेचं आहे नाही का..? मला तरी वाटत आपण आधी शिक्षण पूर्ण करणे जास्त महत्वाचे आहे. तुला वाटतंय ते प्रेम आहे पण ते आकर्षक सुद्धा असू शकते. कारण प्रेम आणि आकर्षक यामध्ये एक बारीक रेघ असते ज्याला ती दिसती तो जिंकला. म्हणून सांगते वेळ दे. वेळ हा सर्वात उत्तम औषध आहे यावर...आपण शिकू काही करून दाखवु.

अमू: किती छान समजावलेस तु.. हो नक्कीच. मी असा कधी विचारच केला नव्हता. असेलही आकर्षण मीच त्याला प्रेमच नाव दिल असेल. पण आज खरच खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून. तू सगळ किती मस्त समजावलस मला. मग आपली मैत्री तर राहिला ना...?

पियू: हो नक्कीच आपली मैत्री राहील. मग फ्रीन्डस्...(हात पुढे करत विचारले)

अमू: फ्रीन्डस्... (हातात हात देत)

अस बोलून ते दोघे खाली आले. सर्वांमध्ये मिसळून गेले आणि नवीन नात्यासोबत घरी परतले. त्या नात्यात नाही राग होता नाही द्वेष होती ती फक्त निखळ मैत्री.

अमू ला तर कळलं की त्याच ते प्रेम नसून फक्त एक आकर्षण आहे. असच आपल्या समाजातील इतर मुलांना कळलं तर ऍसिड चे धोके नक्कीच कमी होऊ शकतील.
प्रेम म्हणजे एखाद्याच्या चांगल्या गुणांसोबत त्याच्या वाईट सवयीनाही स्वीकारणे. आपले प्रेम आहे म्हणजे त्या वेक्तीचेही आपल्या वर प्रेम असावे अस आपण गृहीत धरणे चुकीचे आहे.

कारण प्रेम जबरदस्तीने नाही होत. शेवटी ते मनापासून असावे लागते. अमू ला ते कळलं म्हणून त्याला प्रेम नाही पण नवी मैत्रीण नक्कीच मिळाली. कारण प्रेमापेक्षाही मोठ हे मैत्रीचे नाते असते. ज्याला उमगले त्याला सगळे मिळाले.

आपल्या अमूची आणि पियू ची तर मैत्री झाली बघू कदाचित मैत्रीतूनच प्रेमाचे फुल उमलेलं का...



*समाप्त*