जुळलं नात....1 Garima द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

जुळलं नात....1

७ वर्षांपूर्वीची हि गोष्ट..... मेहकर नावाचं एक गाव होत त्यात M.E.S नावाची शाळा होती. त्या शाळेत ''आदर्श'' नावाचा खूप बंड आणि मस्ती करणारा मुलगा शिकत होता जो नेहमी कोणत्या ना कोणत्या भांडणामुळे सर च्या हातून मार खात असे. नवीन वर्गात जाण्याचा उत्साह सर्व मुलां मुलीत असतो आणि ते ७ व्या वर्गातून ८ व्या वर्गात जात होते. आदर्श पण खूप खुश होता नवीन वर्गात जाण्या करता तेव्हड्यात वर्गात सर आले आणि सांगत होते कि आता अभ्यासाला लागा तेव्हाच एका मुलीचा प्रवेश होतो. मुलगी : सर ,आत येऊ का ? (हळूच आवाजात ) सर : हो या ना.... अनोळखी आवाज आदर्शच्या कानावर पडला आणि तो तिला पाहायला लागला पण तिच्या केसांमुळे तिचा चेहरा त्याला दिसेना तरी तो तिला पाहत होता कि आता चेहरा दिसावं . सर सर्वाना नाव विचारत होते तेव्हा तिला पण नाव विचारलं तर तिने ''गरिमा'' नाव सांगितलं आणि आदर्श ला नाव जस माहित झालं तसेच त्याचा चेहऱ्यावर चमक आली. जेव्हा तिने मागे वळून मुलीनकडे पाहिलं तेव्हा त्याला तिचा चेहरा दिसला म्हणतातनं कि '' पाहली नजर में प्यार हो गया '' तसेच त्याचा सोबत झालं आणि तो रोज तिला लपून लपून पाहत असे . त्याला गरिमा पहिल्या नजरेत आवडली , तो तिला रोज कुठे ना कुठे पाहत असे आणि मनातल्या मनात खुश व्हायचंच पाहून . जेव्हा पासून तिला पाहिलं तेव्हा पासून त्याने भांडण पण कमी केले , तो तिचा नेहमी पिच्छा करायचा आणि तिची पूर्ण माहिती काढली कुठे राहते , केव्हा कुठे जाते. बस तो तिला पाहून खुश राहायच जो लोक ती घरी नव्हती जात तो लोक तो पण घरी नव्हता जात . तो नेहमीच मधल्या सुटीत शाळेतून जायचा पळून पण तिला पाहिल्यापासून तो कधीच मधल्या सुटीत पळून नाही गेला म्हणजे थोडक्यात सांगावं तर त्यात सुधार यायला लागला होता. बस तिला लपून लपून पाहत असायचा मधल्या सुटीत पण आणि त्याचा या सुधारमुळे शाळेत सर्व मुलां -मुलीनं मध्ये असं झालं होत कि तो गरिमा वर प्रेम करतो . सगळ्यांना माहित होत कि हा तिच्या वर प्रेम करतो पण तिला नव्हतं माहित.असेच दिवस निघत गेले आणि ९ व्या वर्गात आले दोघे पण तो तसेच तिला लपून लपून पाहत असायचा. नेहमी सारखं तो तिच्या घराकडे जात होता तिला पाहायला मग एक दिवस त्याने तिला एका मुलाशी बोलताना पाहिलं तर त्याला वाटलं कि यांच्यात काही तरी आहे आणि तो तिच्या पासून दूर होत गेला, पण तस काहीच नव्हतं जस तो विचार करत होता आणि त्याचा त्या विचारामुळे तो दूर होत गेला.तरी तो तिला पाहत असे लपून लपून पण पहिल्यापेक्षा कमी पाहत होता,परत तो भांडण करायला लागला . असं करता करता ते १० व्या वर्गात आले , त्याच प्रेम तिक्तकच असतो तिच्या वर पण आता गरिमा ला शक होत होता कि तो तिच्या वर प्रेम करतो आणि आदर्शला ती नेहमी मस्ती आणि भांडण करताना पाहत असायची तर तिच्या मनात त्याचा करता काहीच नव्हतं. मुलींकडून गरिमा च्या कानावर त्याचा बदल खूप काही ऐकू पडलं तर तिला वाटलं या मुलींना कस चूप करावं कि त्यांच्या दोघात असं काही नाही तर तिने विचार केला कि सर्वांसमोर त्याला राखी बांधव आणि मुलींचं बोलणं बंद करावं. तेव्हा रक्षा बंधन पण जवळ येत होत , ती त्याला राखी बांधण्याकरता चाली होती कि लगेच त्याला माहित पडलं आणि तो मित्राच्या गाडी वर बसून निघून गेला पण मग त्याला माहित झालं कि मुली त्याचा आणि गरिमा बदल बोलत होत्या आणि गरिमा मान खाली करून शांत उभी होती, तर तो परत शाळेत आला आणि सर्वांसमोर राखी बांधवून घेतली मग सर्व मुलींना chochlate देऊन निघून गेला. त्या दिवशी रात्री एकटा बसून खूप रडला पण विचार केला कि ती खुश झाली बस मग मी पण खुश. 10 विची परीक्षा जवळ येत होती त्याला परीक्षेचं टेन्शन नव्हतं तर १० वि नंतर ती दुसरी कडे जाईल शिकायला आणि मी दुसरी कडे जाईल मग तिला पाहणं नाही होणार याच टेन्शन होत त्याला . परीक्षा झाल्या नंतर तो १५ दिवस खूप रडला तिच्या आठवणीत, पण देवाला काही दुसरच मंजूर होत आणि ११ वि मध्ये दोघांची शाळा समोरा-समोर होती जस त्याला माहित झालं तो खूप खुश झाला कारण नेहमी एकच प्रार्थना मागायचा कि ''ती कुठे पण असो खुश असो तिच्या सर्व इच्छा पूर्ण हो''. मग तो तिला पाहायला रोज तिच्या शाळेत जायचा तिचा पिच्छा करायला लागला ,परत तिला लपून लपून पाहायला लागला असं करता करता १२वीत आले तर त्याला वाटलं जर आता काही केलं नाही तर तिला गमावून बसेल मग आदर्श ने एक plan बनवलं तिला पटवण्याचा आणि १२ वि मध्ये ते chemistry च्या class ला सोबत होते तर तिला मान भरून पाहायचा. गरिमा ला पण त्याचा बदल मनात प्रेमाची भावना येत होती आणि तिला वाटलं कि हा खरंच पाहतो का आपल्याकडे मग ती त्याला मागे वळून पाहायला लागली जेव्हा ती त्याला पाहायची तो नजर खाली करायचा किंवा दुसरीकडे पाहायचा. आदर्श ने काय केलं friendship day च्या दिवशी तिला letter लिहलं आणि तिच्या गाडी वर ठेवून दिल त्यासोबत एक friendship band पण दिल मग क्लास सुटला आणि ती बाहेर आली , तर तिने पाहिलं कि तिच्या गाडी वर कोणी लेटर ठेवलं ती इकडे तिकडे पाहायला लागली पण कोणी दिसेना मग तिने लेटर वाचलं ते तर तिला कळलं कि ते लेटर आदर्श ने लिहलं.ती ओळ होती .... '' हा लेटर वाचून ज्याची तुला आठवण येईल तो मी आहे '' तिला ती शेवटची ओळ खूप आवडली आणि पूर्ण दिवसात बस ती ओळ खूप वेळा वाचत होती आणि मनातल्या मनात हसत होती थोडक्यात सांगावं तर तिला पण तो आवडायला लागला होता. पण परत मुलींचं सुरु झालं कि आदर्श ने लेटर दिल गरिमाला, त्या दोघात काही ना काही तरी आहे. तिला हे पटलं नाही आणि तिने त्याला सर्वांसमोर राखी बांधली. ते लेटर सर ला जाऊन दिल आणि सरळ सांगितलं कि आदर्श ने लेटर दिलं पण सर ऐकायला तयार नाही कारण तो असं काही करेल त्यांना वाटत नव्हतं. आदर्श ने पूर्ण plan करून ठेवलं होत मग काही दिवसांनी सर्व शांत होते. Facebook वर त्याचा मित्राच्या id वरून तो तिला बोलायचं पण तिला माहित नव्हतं मग तिने विचारलं कि राखी बांधली तर आदर्श ला वाईट वाटलं का तर त्याचा मित्राने सगळं सांगितलं (पण सांगणारा आदर्श होता गरिमाला त्याचा मित्रच वाटतो म्हणून ती त्याला विचारते)तर त्याने सांगितलं त्याला जाऊन sorry बोल. दुसऱ्या दिवशी गरिमा chemistry च्या class ला जाते आणि त्याला कान पकडून sorry बोलते पण आदर्श दुर्लक्ष करतो (जस त्याला काही नाही माहित असं शांत बसेल राहतो पण सर्व planing त्याची असते). मग facebook वर ते दोघे बोलायला लागले आणि तिने त्याला सांगितले कि ती त्याच्यावर प्रेम करते आणि दोघांनी नात्याला सुरुवात केली .........