चप्पल चा चमत्कार Hrishikesh Mohan Jadhav द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

चप्पल चा चमत्कार

आमच्या घरी घडलेला हा खरा प्रसंग आहे. आमच्या कुटुंबामध्ये मी, आई, बाबा,ताई, आणि दादा असे पाच जण आहोत. ताई च लग्न झालंय आणि ती जवळच आमच्या इथे एका बिल्डिंग मध्ये राहते. आम्ही तेव्हा एका चाळीत राहायचो. चाळ तशी लहान होती पण आजूबाजूला माणसांची वर्दळ, बाजार, किराणा दुकान हाकेच्या अंतरावर होत आणि चाळीत बरीच वर्ष राहत असल्याने आम्हाला त्या चाळीतून दुसरीकडे राहायला जायचं असं कधीच वाटत न्हवतं कारण चाळीत असल्याने सगळ्या धर्माची लोकं राहायची आणि सगळेच मिळून मिसळून एकमेकांचे सण साजरे करायचे.. अशीच एके वर्षी दिवाळी असताना घडलेला हा प्रसंग..दिवाळीत आम्ही नेहमीप्रमाणे खूप मज्जा केली होती, फराळ केला , फटाके उडवले , नवीन कपडे तर आम्हाला दिवाळीतच मिळायचे. त्या वर्षी पण आम्ही चाळीत धम्माल दिवाळी साजरी केली होती.दिवाळी होळी, रंगपंचमी, आम्ही दरवर्षी उत्साहात साजरे करायचो तुळशीच्या लग्नाच्या दिवशी एकादशीला आमच्या कडे विठ्ठलाची जत्रा असते.त्या दिवशी आई, बाबा आणि मी जत्रेला निघालो.बाहेर खूप काळोख होता आम्ही तसेच गडबडीत निघालो माझी ताई आणि भावोजी पण आमच्या घरी आले होते आणि भावोजींना मुंबई ला जायचे होते म्हणून ताई आणि भावोजी घरीच थांबले. त्यांची मुंबई ला जाणारी ट्रेन उशिरा होती म्हणून आईने चावी बाजूला द्यायला सांगितली आम्ही रिक्षा पकडली आणि जत्रेत पोहोचलो आधी देवळात जाऊन आलो मग जत्रेच्या गर्दी मध्ये गेलो. सगळीकडे रंगेबिरंगी कपडे लहान मुलांची खेळणी,महिलांचे दागिने,फटाके,फुगे,सजावटीच्या वस्तू लहान मुलांची तर त्या दिवशी मज्जाच असते.आणि खाण्याचे चमचमीत पदार्थ आणि त्यावर पडलेली लोकांची झुम्बड बघून वेगळीच मजा येते मी लहानपणापासून अगदी 2-3 वर्षाचा असल्या पासून आई मला जत्रेत घेऊन जायची त्यामुळे दरवर्षी जत्रेच्या दिवशी एक वेगळाच उत्साह असायचा. त्या दिवशी आमची खरेदी झाल्यावर आम्ही पुन्हा देवळात गेलो आणि गर्दीतून खूप दमायला झाले म्हणून जाऊन एका ठिकाणी बसलो थोडा वेळ बसून परत जायला निघालो तर काय आईची चप्पल कुठेच दिसत न्हवती सगळीकडे शोधली पण कुठेच मिळाली नाही आई तशीच अनवाणी चालत होती वेळ खूप झाला कारणाने आम्ही तसेच रिक्षात बसून घरी आलो आणि बसलो आणि तोच आई दरवाज्याच्या बाहेर पायरीच्या कोपऱ्या कडे बघत मोठ्याने म्हणाली अहो ही बघा माझी चप्पल इथे कशी आली.इथे कोणी आणून ठेवली? बाबा आणि मी पण बघून अचंबित झालो.बाबा आईला म्हणाले तुझीच चप्पल घालून गेली होतीस ना?आई म्हणाली होय माझीच चप्पल घालणार ना मी. मी आईला विचारलं जाताना वाटेत किंवा देवळात तीच होती ना चप्पल? आई म्हणाली होय पण काय आठवत नाय रे, आम्ही सगळे एकाच विचारात, चप्पल परत आली कशी? चमत्कार तर झाला नसेल ना, रात्रभर आम्ही तोच विचार करत होतो. दुसऱ्या दिवशी पण आमची सकाळी तीच चर्चा मग आम्ही हा चमत्कारच झाला असेल असे स्वतःला समजावून घेतले पण हा विचार माझ्या मनातून जाता जात न्हवता चप्पल परत कशी काय येऊ शकते? म्हणून मी आम्ही जत्रेला निघाल्या पासून ते येईपर्यंत सगळ्या गोष्टी चाचपडायला सुरुवात केली. परंतु ती चप्पल परत कशी घरी आली याच गुपित मात्र उलगडलं नाही..असेच दिवस निघून गेले आणि एके दिवशी माझी ताई आणि भावोजी घरी आले होते.आणि बोलता बोलता ताई आई ला म्हणाली अग सुरज (माझे भावोजी )ची चप्पल हरवली त्या दिवशी, आम्ही आलो होतो बघ, तुम्ही तेव्हा जत्रेला गेला होतात सगळे, बिचारा तसाच दुकानात गेला आणि नवीन चप्पल घेतलान त्याने मिळाली काय तुम्हाला कोणाला? प्रश्नार्थक चेहऱ्याने तिने आम्हाला विचारले.तिच्या प्रश्नाने भाम्भावलेला मी आई आणि बाबा एकमेकांकडे थोडा वेळ असेच बघत बसलो.... आता नेमकं त्या दिवशी काय घडलं हे तुम्हाला समजलं असेलच? कंमेंट करून सांगा.