भातुकलीतले प्रेम - 1 Kiran Magar द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • चाळीतले दिवस - भाग 6

    चाळीतले दिवस भाग 6   पुण्यात शिकायला येण्यापूर्वी गावाकडून म...

  • रहस्य - 2

    सकाळ होताच हरी त्याच्या सासू च्या घरी निघून गेला सोनू कडे, न...

  • नियती - भाग 27

    भाग 27️मोहित म्हणाला..."पण मालक....."त्याला बोलण्याच्या अगोद...

  • बॅडकमांड

    बॅड कमाण्ड

    कमांड-डॉसमध्ये काम करताना गोपूची नजर फिरून फिरून...

  • मुक्त व्हायचंय मला - भाग ११

    मुक्त व्हायचंय मला भाग ११वामागील भागावरून पुढे…मालतीचं बोलणं...

श्रेणी
शेयर करा

भातुकलीतले प्रेम - 1

मनोरंनासाठी तयार केलेल्या या काल्पनिक मालिकेचा कुठल्याही व्यक्ती किंवा स्थान यांच्याशी कुठलाही प्रकारचा संबंध येत नाही. आल्यास तो केवळ योगायोग समजावा.
सूर्या साधारण २९ वयाचा अविवाहित तरुण आहे. एक विकसनशील व्यावसायिक म्हणून त्याची ओळख. खरं तर त्याची आवड मुलांना भविष्यात योग्य दिशा मिळावी यासाठी धडपड करणे. तो त्यामुळे स्वतःचा कोचिंग क्लास चालवतो. पण कधीही त्याने या कामाला आपल्या कमाईचे साधन बनवले नाही. याचबरोबर दोन शॉपिंग मॉल्स आणि शहरात एक मंगल कार्यालय यातून त्याचे घर चालून बाकी पण खूप पैसा बचतीचा वाटा बनत असे.
गरिबीच्या परिस्थितीतून आल्यामुळे त्याला पैसे वाचवण्याचे जणू अंगवळणीच पडले होते. घरात सतत त्याच्या लग्नाच्या चिंतेत बुडालेले आईवडील आणि तो बस...हीच त्यांची फॅमिली.
आज तो वेळ मिळत नसतानाही मुद्दाम एका पार्टीला गेला होता. कारण ती पार्टी खास त्याच्या शाळेतल्या मित्रांची होती. त्याने गेल्या गेल्या पार्टी देणाऱ्याला कबुल करून घेतल,
"ए बंटी, मी फक्त अर्धा तासच थांबणार आहे बरका" ,
"इट्स ओके राव" , बंटी जवळ येत बसत म्हणाला.
"कसली पार्टी आहे आज? जमतंय की काय तुझ"
"नाहीरे , सगळ्यांना भेटण्याची खूप इच्छा होत होती, पण साल्यांना भेटायची पण रिश्वत द्यावी लागते , म्हणून पार्टी च नाव लावल"
"ओह माय गॉड" सूर्या हसतच म्हणाला.
"थांब मी सगळ्यांना इंटरो देतो तुझा, माझे कॉलेज चे पण काही मित्र आलेत " उभे राहून बंटी म्हणाला,
"हे गाईझ, प्लीज लिसन मी, दिस इज सूर्या , आपल्या शहराचा बेस्ट कोचिंग शिक्षक,
युनीव्हरसितीतून गणित विषयात मास्टर की मिळऊन त्याने काही गोष्टीत रिसर्च पण केलेला आहे"
सगळे जण कौतुकाने त्याच्याकडे बघत टाळ्या वाजवत होते आणि सूर्या अता फक्त एकच गोष्ट बोलू शकत होता, " थ्यांक यू"
"अरे यार मला वाटल फक्त नाव सांगशील, पण तू तर कुंडली च काढली" चेहऱ्याने लाजिरवाणे हावभाव दाखवणारा सूर्या मात्र मनातून आनंदी झाला होता. कारण हे असल्या गोष्टी मित्रांच्या तोंडून ऐकण्याची सवय नवती कधी, नेहमी थट्टा मस्करी करणारे मित्र आज मोठ्या माणसासारखे बोलत होते
सूर्याला विचारातून बाहेर काढत बंटी म्हणाला,
"चल, आता जेऊन घेऊ म्हणजे तू पण मोकळा"
"ओके " असे म्हणत सूर्या उठला.
जेवण झाल्यावर अनेक जुने मित्र आणि त्यांच्या आठवणी रंगून झाल्यावर तो घरी निघाला. फोन बघितल्यावर कळलं की आई चे चार फोन येऊन गेलेत, आई ला परत फोन केल्यावर आई बोलली की तुला एक गोष्ट सांगायची आहे तू लवकर घरी ये, अशा रीतीने तोंडावर प्रश्नचिन्ह ठेऊन तो घरी निघाला होता.
रात्रीची वेळ झाली होती , त्याचेकडे चार चाकी गाडी असल्याने काही अडचण नवती. सर्व मित्र त्याला गाडीपर्यंत सोडायला आले होते.
मैत्रिणींचा तर विषयच नवता, कारण होते त्याचे डिग्री च्या पहिल्या वर्षाला असताना एका मुलीशी झालेले भांडण. खरं त्या गोष्टीला मी भांडण नाव देतोय पण सूर्या आणि ती मुलगी म्हणजेच रितिका हे दोघांना ओळखत ही नवते.
गम्मत अशी होती की ते दोघे सोशल मीडियावर मित्र होते. खूप चांगले मित्र होते, सूर्या तर तिला आपली बहीण च मानत होता तेव्हा. पण तिने एक दिवस वैयक्तिक दुसरीकडे झालेल्या गोष्टीचा राग सूर्यावर काढला होता, वाट्टेल ते ती सूर्याला बोलली होती. त्यावेळी सूर्याने शांततेत प्रकरण मिटवल होत. त्यानंतर चार वेळेस सॉरी म्हणूनही सूर्याने तिला रिप्लाय केला नवता. या प्रकरणानंतर सूर्या प्रत्येक मुलीपासून दूरच राहतो. त्याचा असा समज झाला असावा की मुली परिस्थिती बघून माणूस वापरून घेतात.
सगळ्या मित्रांना परत कधीतरी असेच भेटण्याची हमी देऊन तो तेथून निघाला.


पुढील भाग लवकरच...................