Bhatukalitale Prem - 3 books and stories free download online pdf in Marathi

भातुकलीतले प्रेम - 3


पाच दिवसांनंतर सूर्या घरी आला. मुसळधार पाऊस चालू होता. घरी आल्यानंतर अंघोळ करून फ्रेश होऊन आल्यावर आई समोरच उभी होती.
" पावसातून आला तरी अंघोळ केली होय "
" सकाळी अंघोळ केली नवती, म्हणून म्हणल फ्रेश व्हावे"
" बर जाऊदे, काही खाणार आहेस का ?"
" नाही नको , मी थोड खाल्ल होत रेस्टॉरंट ला, आणि मला लगेच निघायचं आहे, थोड थकलेलं असल्यामुळे आज ऑफिस मध्ये आणि क्लास ला जाणार नाही, मग वेळ आहे तर येतो मामांकडे जाऊन "
" या वेळी मनावर घेतलेलं दिसतंय "
" नाही तसे नाही , पण तुमच्या म्हणन्याप्रमाणे येतो जाऊन"
" बर जा, पण हळूच जा "
" बर चालेल " असे म्हणत सूर्या निघाला.
पाऊस अता बंद होण्याच्या मार्गावर होता. पण बंद काही होत नव्हता . आता सूर्या रंगू मामाकडे चालला होता . रंगू मामा म्हणजे काही सूर्याचे सख्खे मामा नवते . पण खूप प्रेमळ असल्यामुळे सूर्या त्यांना सख्या मामापेक्ष्या जवळचे मानत होता. लहान असताना सूर्याला त्याची आई सुट्टीला याच मामांकडे पाठवत असे.
खूप दिवसांनी सूर्या तिकडे चालला होता. रस्ता पण व्यवस्थित आठवत नव्हता. गावात गेल्यानंतर कोणाला तरी विचारून जाता येईल या हिशोबाने तो चालला होता. गावात आल्यानंतर तो गाडी थांबाऊन इकडे तिकडे बघू लागला . पाऊस चालल्यामुळे कोणीच बाहेर नव्हते.
थोडा वेळ थांबल्यावर एक मुलगी त्याला दिसली. ती पळतच होती. तिच्याकडे छत्री देखील नव्हती. हाताने पावसापासून स्वतचं बचाव करत पळत होती. सूर्या ने गाडीतच बसून तिला आवाज दिला. पावसामुळे तिचा चेहरा ही फारसा दिसत नव्हता. सूर्याच्या आवाजाने ती मुलगी गाडीच्या दिशेने चालत निघाली.
जवळ आल्यावर तिचा चेहरा आता स्पष्ट दिसत होता. दिसायला थोडीशी सावळी, पण सौदर्य तर अस की बघणारा बघत च रहावा. आपलेपणाची हमी देणारे बदामी आकाराचे डोळे, बारीक टोकदार पण नाजूक असं तिचं नाक, मऊ मऊ गालांवर पडलेल्या त्या खळ्या ज्यातून पावसाच्या प्रत्येक थेंबाने उडी मारण्याचा आग्रह करावा, चंद्रासारखा गोल लाजरा पण साजरा मुखडा, पावसातील येणाऱ्या गार हवेमुळे थंडी वाजून थर थर करणारे तिचे ओठ आणि त्यांच्यावरील प्रत्येक थेंबाने त्यांपासून दूर जाताना व्यक्त केलेले दुःख. स्वतःच्या हातांनी भिजलेल्या साडीत दाबून धरलेले तिचे मनमोहक शरीर. हे सगळ सूर्या बघतच बसला होता. आणि तिलाही हे बहुतेक कळलं असावं. ती तिच्या नाजूक आवाजात म्हणाली,
" गावात नवीन आहात का?"
" अ... ब..... ब..हा , आपल हो , मी नवीनच आहे जगात, नाही गावात म्हणायचं होतं" , गोड स्वप्नातून बाहेर आलेला सूर्या मात्र गडबडला होता.
" काही मदत हवी होती का ?" , आपल हसू दाबत तिने विचारले
" हो , मला रिटायर बँक मॅनेजर रंगाराम यांच्या घरी जायचं होत , पण रस्ता माहीत नाही " , सावरत सूर्या म्हणाला
" अच्छा, मला पण तिकडेच यायचे आहे , तुमची हरकत नसेल तर "
" ओके , मला चालेल "
हेच तर हवं होत सूर्याला. ती गाडीत बसली, रस्ता दाखवला . गाडी चालू होती, पण बराच वेळ झाला शांतताच होती. शेवटी सूर्याला च बोलण गरजेचं वाटल,
"माझं नाव सूर्या, मी रंगाराम यांचा भाचा, सखा नाही पण त्यापेक्षाही जास्त प्रेम दिलय त्यांनी मला"
अस म्हणून सूर्याने तिच्याकडे बघितले तर तिचा चेहरा आणि हावभाव बदलत होते, ती अचानक लाजत होती. हे सूर्याला जरा विचित्रच वाटत होत. ती अचानक सूर्याकडे एक तिरपी नजर मारून त्याला न्याहाळत होती.
पुढील भाग लवकरच..............


इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED