Ardhantar - 1 books and stories free download online pdf in Marathi

अधांतर - २

कामयाबी का मतलब,
जितने वाला क्या जाने।
बिखरने का मतलब तो,
समेटने वाला ही जाने ।


सगळं काही उद्धवस्त झाल्यानंतर नव्याने उभ राहण्याचे जे प्रयत्न असतात त्यालाच आयुष्य म्हणावं..हातातुन सगळं काही वाळू सारख निसटून गेल्यावरही सावरायचं कस हे ज्याला कळाल त्याला कोणतंही संकट हतबल करू शकत नाही...पाहिजे फक्त संयम....आपण स्वतःला सिद्ध करू शकू असा एक दिवस नक्कीच प्रत्येकाच्या आयुष्यात येतो, आपलं नशीब ही संधी आपल्याला एकदा तरी नक्कीच देतो, फक्त ती संधी ओळखायला आणि त्याच सोनं करायला आपल्यात धमक असली पाहिजे...आयुष्य आपल्यासाठी कितीही कठीण असलं, त्याच्या वाटेत चालताना कितीही रखरखीत उन्हाने आपण भाजल्या गेलो तरी कुठेतरी वटवृक्षाच्या सावलीत थोड्या तरी गारव्याची व्यवस्था आपल्यासाठी नक्कीच असते...आणि मला माझ्या आयुष्यातला वटवृक्ष अभय सरांच्या रूपाने भेटला होता…

तस तर त्यांना विसरणं म्हणजे आज मी जे जाही आहे त्याच अस्तित्व नाकारणं अस होत...माझ्या सोबत नसताना ही माझी हरएक खबर ठेवायचे ते...आणि मला वाटायचं की त्यांच्या व्यस्त आयुष्यात मी कधी आठवत नसेल त्यांना, पण आज त्यांच्या आलेल्या कॉल ने पुन्हा मला चुकीच ठरवलं, त्यांचं नाव मोबाईल च्या स्क्रीन वर पाहूनच याच समाधान वाटलं की अजुनही माझ्या असल्या नसल्याचा कोणाला तरी फरक पडतो, मी जास्त वेळ न दडवता लगेच फ़ोन रेसिव्ह केला,

"पोहोचलीस दिल्ली स्टेशन वर? एक तास उशिराने आहे ट्रेन.."
मला तोंडातून एक शब्दही न काढू देता अभय सर बोलुन मोकळे झाले...

"कस कळत सगळं तुम्हाला?? जासुस ठेवले आहेत का माझ्यामागे?"

"तसच समज, तू तर काय स्वतःहून तुझी खबर बातमी देत नाहीस त्यामुळे मलाच सगळी माहीती ठेवावी लागते कोणत्या ना कोणत्या मार्गे.."

"एका आईएएस कॅण्डीडेट सोबत बोलत आहेत तुम्ही, जरा सांभाळून..." मी त्यांची मज्जा घेत बोलली.

"बेटाजी जीस स्कुल मे तुम पढते हो, वहाके हम सिनिअर है, मला नको शिकवू.. "

"हो हो कळलं...पोचते उद्या सकाळी तेंव्हा बघते तुम्हाला..."

"तू काय बघशील, मीच आतुर झालोय तुला बघायला..."

"तुम्ही पुन्हा सुरू के..."

"काही सुरू नाही केल, शांत हो, आणि सांभाळून ये..सकाळी भेटू.."

आणि मी काही बोलणार इतक्यात त्यांनी फोन कट केला..आज विचार करते जर खरच हा मनुष्य माझ्या आयुष्यात नसता तर काय केलं असत मी? जगली असती की नाही याचीही शाश्वती नसती..भूतकाळात मिळालेल्या जखमांचे व्रण तर अजूनही दिसतात पण त्या जखमांवर फुंकर मारणारा हा व्यक्ती अजूनही मला सावरायला आहे हा विचार करून त्या दुःखांची तीव्रता कमी होते..किंवा मी अस म्हणेल की ते दुःखच नाहीस होतं...

ट्रेनला यायला अजून वेळ होता, स्टेशन गजबजलेल होतं अन त्यात माझ्याकडे समान खूप, त्यात एकही बेंच रिकामा नव्हता बसायला, मी जागा शोधत असताना मला जाणवलं एक मुलगा खुप वेळेपासून मला टक लावून बघतोय, आधी तर मला भीती वाटली, नंतर खूप हिम्मत करून मी त्याच्याजवळ गेली त्याला जाब विचारायला तर तो लगेच उठून उभा राहिला आणि बसायला जागा दिली..मला हे अपेक्षितच नव्हतं, मी तर त्याला मवाली समजत होती, त्याने तर माझी मदतच केली... किती चुकीच समजली त्याला मी....माझं अस झालंय की कोणत्या पुरुषावर लवकर विश्वास ठेवावाच वाटत नाही आता..सगळे पुरुष संधीसाधूच आहेत अशी माझी धारणा झाली आहे कदाचित...माझ्या पूर्व आयुष्यातील हे देणं सोबत घेऊन आली आहे मी...मला माझ्याच कृत्याची खंत झाली, पण काय करू आयुष्याने एवढं काही दाखवून दिलंय की कोणावर विश्वास ठेवण्याची भीती वाटते...नशीब हे की अभय सरांनी माझ्यातल्या संवेदना, माझ्यातली आत्मा पुन्हा जागृत केली नाहीतर आज मी प्राण नसलेल्या पाषाणासारखी असती....
-------------------------------------------------------------
एकदाची ट्रेन आली आणि माझा नागपूरकडे प्रवास सुरु झाला...आज तीन वर्षांनंतर मी नागपूरला जात होती. एकीकडे जाण्याची उत्सुकता ही होती आणि मनात खूप धाकधूक ही होती पुन्हा त्या सगळ्या लोकांच्या समोरासमोर जायची...पण हे सुद्धा वाटत होतं की ज्या आईवडिलांनी मला जन्म दिला, ज्यांनी मला इतक्या दिवसांत पाहिलं ही नाही, जे माझी वाट बघत असतील(कदाचित) त्यांना जाऊन भेटावं...

सकाळी सहाच्या सुमारास माझी ट्रेन नागपूर स्टेशनवर पोहोचली... मी लगबगीने माझं सगळं समान घेऊन ट्रेन मधून उतरली..मी कोणाला सांगितलं नव्हतं माझ्या येण्याच त्यामुळे कोणी मला घ्यायला येईल याची अपेक्षा नव्हती आणि सांगितलं जरी असत तरी कोणी आलं नसतं..तिथे पाय ठेवल्यावर अस वाटायला लागलं
की पुन्हा माझा भूतकाळ माझ्या वर्तमानाच्या मानगुटीवर बसलं तर, पुन्हा तीच लोकं, तेच प्रश्न, तोच मनस्ताप...सगळं काही डोळ्यासमोर जसेच्या तसे तरळत होते, आता मात्र माझी धडधड वाढायला लागली.. का आली मी परत? पुन्हा त्याच ठिकाणी जायचा मूर्खपणा का करत आहे मी? ज्या लोकांना माझं दुःख, माझ्या वेदना कळल्या नाही त्यांना माझं कर्तृत्व तरी काय कळणार?? मी काय करू काय नाही या अविर्भावात असताना मला जणीव झाली की कोणीतरी मागून माझ्या खांद्यावर हात ठेवला आहे...मी मागे वळून पाहिलं तर एक अत्यंत परिपक्व, समजदार आणि तेवढच रुबाबदार व्यक्तीमत्व माझ्या समोर उभं होतं... अभय सर...माझा जेंव्हा जेंव्हा मानसिक, वैचारिक द्वंद्व सुरू झाला तेंव्हा तेंव्हा मला त्या पेचातून बाहेर काढण्यासाठी माझ्यासोबत अभय सर होते....खर तर अस सांगायला हरकत नाही की माझ्या आयुष्याच्या रथाचे ते सारथी होते...आणि ते सारथी होते त्यामुळेच त्यांनी माझ्यातला अर्जुन शोधून काढला आणि मला त्याची जाणीव करून दिली...आणि आजही मला मार्ग दाखवायला माझा माधव, माझा चक्रधारी माझ्या समोर उभा होता..

माझ्यासमोर चुटकी वाजवत त्यांनी मला विचारांतून बाहेर काढलं,
"हे बघा नैना मॅडम, मला माहीत आहे की मी जरा जास्तच हँडसम आहे दिसायला पण तुम्ही मला अस टक लावून पाहिलं तर कस कस होत मला😜😜"

"हं...मला फरक नाही पडत तुम्ही कसेही दिसले तरी, तुमचं हे दिसण तुमच्या त्या फालतू मैत्रिणींसाठीच ठेवा, ज्या तुमच्या मागे पुढे करतात.."

"त्यांचं सोड, मी तुझ्या किती मागे मागे करतो ते नाही दिसल तुला कधी??"
मी काही न कळण्याचा भाव आणत बोलली,

"एवढ्या सकाळी सकाळी इथे काय करताय??"

"माझी ड्युटी लागली आहे इथे झाडू मारण्याची तेच करायला आलोय.." ते नाटकी चिडत बोलले,

"हो का, मग गप्पा काय मारताय लागा कामाला, मला ही बघू द्या एक आईपीएस अधिकारी झाडू मारताना कसा दिसतो...😄😄"

"काय यार नैना तू पण... एवढ्या दिवसांनी तुला पाहतो आहे मी, तुला इतक्या 'प्रेमानी' मी घ्यायला आलो, त्याच काही नाही तुला आणि मस्करी करत बसलीस तू..😟😟"

"ठीक आहे घ्यायला आले त्यासाठी धन्यवाद, आणि त्यासोबत जे 'प्रेम' आणलं आहे त्याला मी बोलवलं नव्हतं..."

"बोलवल तर मलाही नव्हतं तू....बर असो, घरी नाही जायचं का, की इथेच थांबणार आहेस?"

"भीती वाटत आहे खूप.. पुन्हा तेच सगळं..."

"घरी जायचं आहे, युध्द करायला नाही ज्यात तुला भीती वाटावी?"

"स्वतःच्या माणसांसोबत लढण्यापेक्षा युद्ध कधीही परवडत..."

"मी आहे ना, विश्वास आहे माझ्यावर..?"

नक्कीच...नक्कीच खुप विश्वास होता मला अभय सरांवर.. पण स्वतःच्या घरच्यांसोबत लढणं सोप्प नव्हतं..कस असत ना, जिंकलो तरीही नुकसान आपलंच आणि हरलो तरीही सगळं गमावून बसणार...पण हे सगळं माहीत असताना ही मी लढली, माझ्याच लोकांसोबत आणि जिंकली सुद्धा...पण आता घरी जाताना अस वाटत होतं, माझ्या जिंकण्याला काहीच अर्थ उरला नाही आहे..इच्छा असूनही तो आनंद मी कोणासोबत मी वाटू नाही शकत आहे....पण तरीही आयुष्य असच असत हा विचार करून मी घरी जायला निघाली..घरी पोहोचल्यावर काय होणार होत हा विचार करूनच माझा थरकाप उडत होता...
------------------------------------------------------------------
क्रमशः


इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED