RATNAPARKHI - 1 books and stories free download online pdf in Marathi

रत्नपारखी भाग १

रत्नपारखी भाग एक

आज कल आपण प्रत्येक गोष्टीत बदल शोधत असतो . आयुष्यात काही तरी बदल हवा यात काही वैर नाही , पण कधी विचार केलाय कि असच केलेल्या बदल मुळे कधी काही खूप वाईट होऊ शकतं .

हो असच एका आगळ्यावेगळ्या शोधात , एक नवीन बदल च्या नादात निघाला होता रत्नपारखी कुटुंब आणि या सगळ्या गुंतागुंतीच्या खेळात काहीतरी भयानक होऊन बसतं. अस काही ज्याची अपेक्षा हि त्यांनी केली नसावी.

ह्या कुटुंबात ,मिलिंद रत्नपारखी , आपल्या आई , बायको आणि दोन मुलानं बरोबर राहत असतात. मिलिंद रत्नपारखी , खूप उच्च कोटीचे न्यायाधिश असतात. मिलिंद च लग्न प्रणिता बरोबर झालेलं असत, तो त्याच्या वडिलांची इच्छा मारू शकला नाही आणि त्याने प्रणिता शी लग्न केलं .

कॉलेज पासून त्याच प्रेम उमा वर होत पण तरी ही त्याने उमा शी लग्न केलं नाही .कॉलेज चा शेवटचा दिवस होता, सगळे छान नटले होते , आज मिलिंद उमा ला सांगणार होता. सगळे नाचले, गायले, खेळ खेळले, आता मिलिंद तयार होता पण भीती ने त्याने विचार केला की आधी आपण नीट तयार होऊन येऊ, घामाघूम झालेला म्हणून तो स्वच्छतागृह कडे गेला तर त्याने जे पहिले ते पाहून तो अगदी स्तंभ झाला होता. उमा चिन्मय एकत्र एक मेक्काना घट्ट मिठी मारून उभे होते .

हे पाहून मिलिंद तिथून त्वरित निघून गेला. मिलिंद आतून तुटून गेला होता, त्याला अस वाटत होत जस जणू जगच संपत असाव आता. मिलिंद ने आपला पांढरा कोट काढला आणि कॉलेज च्या बाहेर असलेली टपरी कडे निघून गेला.

कधी सिगारेट न पिलेल्या मिलिंद ने मात्र आज त्याला आपल्या हातात जागा दिली होती. त्याचे डोळे लाल झाले होते, रडून अगदी त्याच लहान मूल झाल होतं. त्याला वाटले की आपण सगळे नीट केले आज पर्यंत , कधी कोणाचं बरं वाईट करायच विचार देखील डुंकून गेला नाही पण आज माझ्याच मित्राने चिन्मय ने हे केलं. विश्वासघात म्हणता येणार नाही, कारण चिन्मय ला कल्पना नव्हती की मिलिंद उमा वर प्रेम करतो.

पण तरी मिलिंद ला दुःख होत , त्याच हृदयातून आज दोन जवळचे व्यक्ती लांब गेले होते.आता मिलिंद एकटा होता, त्याचा मनात असलेले घर रिकामे झाले होते. मिलिंद ने आपली मोटर सायकल घेतली आणि पूर्ण वेगाने तो तिथून निघून गेला. आता मिलिंद एकटा पडला होता.

मिलिंद च्या मोटर सायकल चा वेग एवढा वाढला होता की आता त्याला तिला हि सांभाळता येईना . समोरून ट्रक आली मिलिंद थोडक्यात वाचला, पण नंतर मिलिंद ने स्वतःला वाचवताना दुसऱ्याला ठोकून दिल होत.

पुलावरून जाताना हा अपघात झाला होता , मिलिंद ने एका मुलीला उडवले होते. तिला खप जोराचा फटका बसला आणि ती पुलाखाली पडून गेली. हे बघून मिलिंद ने आपली मोटर सायकल नाही थांबवली , तो तसाच तिथून निघून गेला. पण त्याला तिचा चेहरा लक्षात होता.

मिलिंद घरी पोहचला पण त्याला काही झोप लागेना तो घाबरला होता त्याने गुन्हा केला होता . दसऱ्या दिवशी त्याच्याकडे प्रणिता आणि तिचे आई वडील आले होते, मिलिंद च्या वडिलांना कॅन्सर असल्या मुळे त्याची इच्छा होती की मिलिंद च लग्न पाहावं.

ह्या सगळ्यातून मिलिंद सावरला नाही होता , त्याने प्रणिता कडे पहिले खर म्हणायच तर ती उमा हुन देखणी होती , उंच, गोरा रंग , अगदी अभिनेत्री दिसेल अशी होती. मिलिंद च्या डोक्यात आधीच्या रात्रीचे दृश्य समोर येत होते, पण त्याला राग होता की एक दुःख कमी होत जे एवढे येऊन टपले आहे. त्याने मनात विचार केला..... मी हि आनंदात राहू शकतो मला हक्क आहे. आणि त्याने लग्नाला होकार दिला.

माणूस आनंदाचं किती वेळ सोंग करेल कधी न कधी त्याला त्याचा चुका मान्य करावेच लागतात. मिलिंद ला वाटलं आपण अजून शिकून न्यादाधिश झालो तर मग आपली सुटका होईल. पण ते म्हणतात ना आपले भोग आपणच भोगतो आणि भोगावेच लागतात. मिलिंद ने लग्न केलं आणि त्याने प्रणिता वर भरपूर प्रेमाची वर्षा केली पण हृदयात उमा होती, अधून मधून तिची आठवण त्याला येतच असे.

उमा आणि चिन्मय ने सुद्धा लग्न करून घेतले होते.चिन्मय ला छान नौकरी होती पण त्याच त्यात मन लागत नसे. म्हणून नंतर त्याने ठरवलं की तो डिटेक्टिव्ह होणार जे त्याला लहानपणा पासून वाटत होत.पण यातून पुरेल एवढे पैसे मिळत नसे म्हणून उमा ची खूप चिडचिड होईची. आता ते दोघी नुसते भांडत बसायचे, शेवटी उमा ला हि कंटाळा आला होता आणि ती घर सोडून निघून गेली होती.

त्या रात्री खूप पाऊस पडत होता ते दोघी एक मेकांवर प्रेम करत होते आणि उमा प्रेमाने त्याला म्हणली कि राजा ऐकून घे माझ तू सोड हे डिटेक्टिव्ह च काम यात काही नाही हवं तर मी बाबांशी बोलते ते तुला मस्त मॅनेजर म्हणून ठेवतील. हे ऐकून चिन्मय चिडला त्याने उमा ला झटकून सोडलं आणि म्हणाला तुला समजत नाही का तुला एवढंच पैसा हवा असेल तर जा तुझ्या बाबा कडे निघून जा आणि परत यायची गरज नाही आहे.

इथे उमा च्या आठवणीत मिलिंद त्याचा खोलीत बसून होता, तिथून प्रणिता ओरडून म्हणाली आये मिली ऐकतोस ना आणि खोलीत शिरली. मिलिंद ने विचारलं हो प्रिये बोल काय म्हणतेस , तर ती म्हणाली तू बाबा होणार आहेस . हे ऐकून मिलिंद आता उमा ला पूर्ण पणे विसरला होता, त्याचसाठी त्याचे येणारे मूल खूप खूप प्रिय होते.

थोडे दिवस उलटले आणि त्यानं अजून एक आनंदाची बातमी मिळाली . मिलिंद ला दोन जुडी मुलं होणार होते, त्याला असे वाटायला लागले की आता त्याच्या आयुष्यत फक्त प्रणिता आणि त्याचे मुलं हेच महत्वाचे आहेत. खूप वर्ष उलटली आणि मग अखेर ते अठरा चे पूर्ण झाले. लव आणि कुश , प्रणिता श्री रामांची भक्त असल्यामुळे ह्या हुन चांगले दुसरे कुठले नाव असतील.

मिलिंद च लव कुश वर प्रेम होत पण त्याने प्रेम व्यक्त केलं नाही तो त्यांच्याशी तुटस्त वागायचा कि त्याने जी चूक केली ती चूक त्याच्या हातून होऊ नये.त्याचं लक्ष फक्त त्याचा अभ्यासावर राहो हेच मिलिंद ला वाटे. मिलिंद ने खूप पैसे कमावले होते, तर तो त्याची प्रत्येक इच्छा पूर्ण करत असे.

लव कुश आता मोठे झाले होते, त्यांचे खूप मित्र मैत्रिणी होते.आणि आता वयात आल्यामुळे ते त्यांच्या आई वडिलांना विसरून मित्रानं बरोबर च राहत असे. पार्ट्या, पब्स, ह्यात त्याची दुनिया आता सामावली होती. या मुळे मिलिंद अस्वस्त राहत असे.प्रणिता च्या लाड चे हे परिणाम होते.

प्रणिता ला आता तिची चूक कडू लागली होती जेव्हा ते दोघी कायम गेम्स,मित्रांशी फोन वर बोलणे, बाहेर रात्र भर फिरणे,हे करून आता प्रणिता ला हि त्याचं अंतर भासू लागला होता.प्रणिता मिलिंद ला म्हणाली, आय एम सॉरी मिली , खरंच खूप चूकले , फक्त त्यांचवर प्रेम केले मी कधी रागावून काही शिकवले नाही चूक सांगितली नाही.तू बरोबर होतास मिली, तू बरोबर होतास......असं रडून प्रणिता म्हणाली. मिलिंद ने प्रणिता ला सावरलं, तो म्हणाला शांत हो अजून वेळ गेली नाही आहे.

इतर रसदार पर्याय