रत्नपारखी भाग दोन
मिलिंद ने आता ठरवलं होतं की काही तरी करायचं आणि आपल्या मुलानं बरोबर वेळ घालवायचा. मिलिंद साठी आनंद म्हणजे फक्त लव कुश होते. त्याने खूप गोष्टी मागे सोडले होते, उमा,चिन्मय,त्या रात्री ची घटना.......ती. मिलिंद च्या मनात अजून हि त्या गोष्टीच अपराधबोध वाटत होता.
अखेर तो दिवस उगवला होता, मिलिंद ने आता ठरवलं होतं की काय करायचं आहे. प्रणिता ने हाक मारली मिली.... मिली तुझी चहा घे, पोरराना हि पाठव. लव कुश तर मस्त आरामात झोप काढत होते.आज पासून त्याच्या सुट्ट्या सुरु झाले होते.मिलिंद ने त्याना उठवलं, आणि त्यांना मस्त बातमी द्यायची ठरवली.
मिलिंद वर त्याच्या खोलीत गेला आणि दोघाना हाक मारू लागला.दोघे हि चिडून उठले,कारण ते 4 तासापूर्वीच झोपी गेले होते.ते म्हणाले, डॅड.... काय आहे यार!!!! तुम्ही प्लीज आम्हला झोपू द्या.मिलिंद ने आज प्रेमाने बोलायचं ठरवलं.
मिलिंद म्हणला, अरे मुल्लानो, ऐका तर , आज मी तुम्हाला आपल्या कुटुंबाचं रहस्य सांगणार आहे.म्हणून लवकर तुम्ही उठा तयार व्हा मग बघा तुम्हाला मज्जा येते की नाही अस मिलिंद ने त्यांना पटवून दिलं. त्यांना हि उत्साह आला,ते उठले तयार हि झाले. मग मिलिंद म्हणाला बसा ...तू हि बस प्रिये, आपलं कुटूंब रत्नपारखी, ह्या नावातच रहस्य लपले आहे. कुश म्हणाला कसले रहस्य डॅड, सांगा लवकर.
रत्नपारखी, म्हणजेच ....रत्नांवर पारख ठेवणारा,रत्नांची माहिती ठेवणारा. आपले पूर्वजांनी खूप रत्न आणि त्यांची माहिती लिखित ठेवली आहे. पण त्या साठी आपल्याला आपल्या गावी जावं लागेल,तिथे आहे रहस्य त्या रत्नांच आपल्याला जायला हवं,खूप वर्ष उलटले तीस वर्षे उलटली...मिलिंद म्हणाला, ते हि जायला तयार झाले.
तेव्हा मिलिंद म्हणाला की माझी एक अट आहे, तिथे जाऊ पण सोबत फोन, लॅपटॉप, काहीच घेऊन जायचं नाही.एक साधा फोन असेल बस. आधी त्याचं डोकं फिरलं पण मग नंतर एक वेगळा बदल मिळेल म्हणून ते तयार झाले. कोणाला माहित होत कि या बदल मुळे, जीव धोक्यात जाणार आहे.
त्यांचे गाव आडगाव .......आणि तिथे मिलिंद च्या आजोबांचा वाडा सर्जीराव यांचा वाडा.मिलिंद ची आई रत्नादेवी नावातच रत्न होत म्हणून तर मिलिंद च्या बाबांनी तिच्याशी लग्न केलं, मिलिंद च्या आई ची तब्बेत नाजूक असल्या मुळे त्याला तिला घेऊन जाता आले नाही.तिच्या वर लक्ष ठेवायला अरविंद काका होते, कुटुंबात खूप आधीपासून यांचा वाटा होता.
आधी त्याचे वडील आता ते रत्नपारखी कुटुंबाचे झाले होते.मिलिंद निर्धास्त होता, आणि तो दुसऱ्या दिवशीच कार ने जाईला निघून गेला. कंटाळा येऊ नये म्हणून सोबत गेम्स , वगैरे घेतले होते. आडगाव ला जाताना प्रणिता च आजी च घर लागत असे, आई ची आई ,ते तिथे एक रात्र थांबणार होते.
लव कुश आता झोपून हि कंटाळले होते,प्रणिता हि थकली होती.वाट पाहून पाहून अखेर वरळी आलं, तिथे प्रणिता चे आजी आजोबा होते वृद्ध झालेले पण तिथे सोयरी होती. सोयरी त्याच्या घराजवळ राहायची, पैशानसाठी काम करायची.
कार आली आणि सोयरी निघाली,दिसायला देखणी होती सतरा वर्षाची होती.प्रणिता म्हणाली..अंग तू सोयरी ना , फोन वर आई बोली मला.सोयरी म्हणली..हो ताई साहेब म्या सोयरीच येवा ना ,कधीच वाट बघताय तुमची .
लव कुश आणि मिलिंद कार मधून सामान घेऊन निघाले,प्रणिता म्हणाली तिथे सरळ जा विहीर आहे तिथे हात पाय धुवून घ्या .ते तिघी विहीर पाशी गेले,लव कुश तर पहिल्या वेळा गावात आले होते.
त्यांना तर खूप मजा येत होती, नंतर ते आजी आजोबांना भेटले,सोबत जेवण केलं.आता ते वर गच्ची वर झोपायला निघाले, वर मस्त आकाश , मातीचा सुगंध.गार वाटत होत लव झोपी गेला,पण कुश ला झोप लागेना त्याला आता रश्मी ची आठवण येत होती.
रश्मी त्याच्या शाळेतली गोड मैत्रीण , त्याच तर तेव्हा पासूनच तिच्या वर प्रेम होत पण आता पर्यंत त्याने हे तिला नव्हतं सांगितलं.कुश ला वाटलं की रश्मी ला न सांगता जर आपण आलो तर कदाचित तिला आपली आठवण येईल आणि तिला हि प्रेमाची जाणिव होईल.
पण झालं काहीतरी वेगळंच,भयानक,ज्याची कुश ला कल्पना हि नसेल. ते लोक पहाटेच तिथून निघून गेले,आता त्याचात परत प्रवास करायची स्फूर्ती आली होती.लव कुश मध्ये हि आता भावांसारखं नातं निर्माण होत होतं.
लव कुश शाळेपासून जास्त सोबत नाही राहायचं याच एकमेव कारण हे कि त्याचे स्वभाव सारखे नव्हते.कुश साधा अभ्यासू , आणि खऱ्या प्रेमात त्याला विश्वास होता.पण लव नुसता त्याच्या मित्रानं बरोबर मस्ती, मुलींशी मस्ती , टाईमपास , करत असे.
त्या दोघाना तर एक दुसऱ्या बद्द्ल माहिती हि नसे,कि नक्की कोण जवळ आहे कोण नाही, ते त्यांच्या आयुष्यात मग्न होते.कुश खूप भावुक होता,आणि लव बिलकुल नव्हता.लव ला तर हे हि नव्हतं माहित कि कुश ला रश्मी वर प्रेम आहे मनापासून प्रेम.
कुश शांत असायचं पण त्या रात्री ,त्याची जामच सटकली होती त्या अस्मय वर, अस्मय रश्मी चा मित्र त्याची आई आणि रश्मी ची आई जवळचे मैत्रिणी होते.म्हणून ते दोघी तर या जगात आल्या पासूनच एक मेक्काना ओळखता.
अस्मय ना रश्मी च्या खूप जवळ जवळ करायचा ते तिला नाही आवडायचं, आणि त्या रात्री पब मध्ये तर त्यानी हद्दच पार केली होती.त्याला खूप चढली होती आणि म्हणून त्याने रश्मी ला घट्ट धरून घेतलं होतं ती म्हणत होती की मला सोड पण त्याला भान नव्हतं.आणि मग कुश ने बघितलं आणि त्याला तिथेच मारलं खूप आणि रश्मी ला शांत केलं.
तिथून कुश आणि रश्मी म्हणजे कुश्मी झाले,घट्ट मित्र सोबत राहू लागले फिरू लागले,नेहमी सोबत असायचे.अस्मय आता चिडू लागला होता,त्याची सटकली होती,तो आता फक्त वेळ पाहत होता की कधी तो कुश आणि रश्मी मध्ये भांडण लावून देईन.
रश्मी अस्वथ होती , कुश कुठे आहे फोन उचलत नाही आहे, ती आता खूप जास्त अस्वथ होत होती.अस्मय ला हे समजलं आणि दुसऱ्या दिवशी त्याने ठरवलं की रश्मी ला गाठू पण त्याला समजलं की रश्मी चा खून झालाय.तिथे कुश या आनंदात होता की रत्नपारखी वाड्यावर पोहचल्यावर तिथून काही छान रत्न रश्मी साठी घेऊन जाईल आणि तिला सांगून देईल कि मला तू आवडतेस.
दोन दिवसा नंतर...............
आज कुश तर खूप आनंदात होता, लव म्हणला बघा बघा स्वारी ला आनंद मावत नाही आहे.कुश मुंबईत पोहचला आणि घरी त्याने हातात फोन घेतला,आणि रश्मी चे खूप मेसेज आणि कॉल्स होते.त्याने त्याच्या मित्राचे मेसेज वाचले, मित्रा तू कुठेस?!! अरे रश्मी बघणं ती तिचा कोणीतरी खून केलाय...आता कुश चा राग मावत नाही होता , सगळ्यांवर त्याला राग येत होता.